विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जसा मियांदादच्या ८६ च्या शारजाहतल्या एशिया कप फायनलमधल्या लास्ट बॉल सिक्सचा निगेटिव सायकॉलॉजिकल ईंपॅक्ट भारतीयांवर बरीच वर्ष टिकून होता तसाच जडेजाच्या ९६ च्या बंगळूरमधल्या वर्ल्ड कप मॅच मधल्या ऑनस्लॉटचे सायकॉलॉजिकल हाँटिंग पाकिस्तानवर अजूनही असावे असे वाटते.

'वन डे मध्ये बँटींग करतांना मी जर चाळीस बॉल खेळलो तर माझ्या स्वतःच्या चुकीशिवाय कुठलाही बॉलर मला आऊट करू शकत नाही असे मला वाटते' असे रोहित शर्माला बर्‍याच वेळा (दोनशे-दोनशे स्कोर केल्यानंतर) म्हणतांना ऐकले/वाचले. त्याचे हे बोलणे पहिले बोस्टिंग वाटायचे, मग नंतर 'कदाचित हे ईंडियन पीचेस वर शक्य आहे' असे वाटले. पण आता रोहितच्या बोलण्यात नक्कीच तथ्य आहे आणि त्याने प्रयत्नपूर्वक तसा (रन्स झाले नाही झाले तरी विकेट न फेकण्याचा गावस्करचा अट्टहासी अ‍ॅप्रोच ईंप्रोवाईज्ड स्टाईलमध्ये ) अ‍ॅप्रोच आत्मसात केला आहे असे खात्रीने वाटते. गुड फॉर हिम.

अगदी दोन एक वर्षांपूर्वीपर्यंत ३०० गाठायचे म्हणजे पहिल्या १० ओवर्समध्ये ९०-१०० बोर्डवर लावायचेच असा अट्टहास सगळीकडे दिसायचा. पण आता (माझ्या मते कोहली कॅप्टन झाल्यापासून आणि धोनी,पंड्या, जाधवने खाली टेकून दिल्यापासून) ह्या आग्रहावर भारताने यू-टर्न घेतला आहे असे दिसते. रन्स बनवण्यापेक्षा विकेट्स टिकवून पाच च्या अ‍ॅवरेज ने का होईना पण शक्य तेवढा ब्रॉड विकेटलेस प्लॅटफॉर्म मिळवून ३००+ गाठणे जास्त सोपे आहे हे भारताने सातत्याने दाखवून दिले आहे.

*पाच च्या अ‍ॅवरेज ने का होईना पण शक्य तेवढा ब्रॉड विकेटलेस प्लॅटफॉर्म मिळवून ३००+ गाठणे जास्त सोपे आहे हे भारताने सातत्याने दाखवून दिले आहे.* - सहमत. पण सर्वांसाठी तोच एकमेव राजमार्ग आहे, असं मात्र नाहीं. काल बांगलादेशने सुरवातीपासून 7ची धांवगती सतत राखत केवळ 3 विकेटवर 300+ चं लक्ष्य रूबाबात पार केलंच !!

पाक बरोबरची आपली मॅच एकतर्फी झाली असं सगळीकडे वाचायला मिळतंय.
आमीर सोडला तर अजून कोणीच मॅच आणि पीच च्या अनुसार बॉलिंग केली नाही. फिल्डिंग, फिल्ड प्लेसमेंट फारच कमकुवत होती हे सचिन ने सुद्धा सांगितलं. मोहंमद आमीर ला अजून एखाद्याची चांगली साथ मिळाली असती तर कदाचित एवढा स्कोर होऊ शकला नसता.. अर्थात या जरतर च्या गोष्टी..
३००+ चे आव्हान आपण उभे केल्यावर, त्यांची सुरुवात छानच झाली होती. भुवी जायबंदी होऊन बाहेर गेला आणि विजय शंकरच्या स्लो बॉल वर इमाम फसला आणि एल्बीडब्लू झाला.
नंतर फखर जमान आणि बाबर आझम ची पार्टनरशीप भितीदायक वाटायला लागली होती. फखर जमान ने याआधीही आपल्याला मोठा धक्का दिला आहे, त्याची पुनरावृत्ती होती की काय असं वाटत होतं. प्रत्येक बॉलरला फटके पडत होते. भूवी आधीच बाहेर गेला होता.
..आणि एका अप्रतीम चेंडू वर कुलदीप ने बाबर ला चकवले आणि मग लगेचच फखरने विकेट अक्षरशः फेकली. त्या नंतर मात्र मॅच एकतर्फी झाली !

काल बांग्ला ने भारी फलंदाजी केली! शक्य तिथे १-२ धावा घेत धाव फलक हालता ठेवला.. आणि त्या फलंदाजीसाठी अनुकुल खेळपट्टीवर सतत़ आखूड टप्प्याची गोलंदाजी करून विंडीज ने हातभार लावला..
शकीबने अश्या स्कोअरचा खेळपट्टी अनुकुल असली तरी कसा पाठलाग करावा ह्याचे छान प्रात्यक्षिक दिले... कुठेही आतातायीपणा दिसला नाही.

काल विंडिजची बॉडी लँग्वेज अगदीच दयनीय होती. बंगला च्या २०० रन्स झाल्यावर मॅच सोडूनच दिली होती जणू. एखाद्या युद्धासाठी आतूर असलेल्या लढवैया सैन्याऐवजी एक पराभूत मनोवृत्ती असलेली भाडोत्री गुंडांची टोळीच जशी काही.
बेकार शॉर्टपीच बॉलिंग, सुमार क्षेत्ररक्षण आणि कुठल्याही स्ट्रॅटेजीचा पूर्ण अभाव अस असल्यावर काय होणार.
शकीब फार मस्त खेळतो. Luck favors the brave ही उक्ति काल वारंवार आठवत होती.

थोडे विषयांतर : पाकिस्तान, श्रीलंका आणि विंडीज या तिन्ही देशांच्या क्रिकेट अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमधे आनंदी आनंद आहे. त्याचा परिणाम टीम्सवर जाणवत आहे. (जस आपल्याकडे इतर खेळात असत) आपल्याकडेही COA विरूद्ध बोर्ड हे युद्ध लवकर थांबल नाही तर तशीच वेळ येउ शकते हा धडा घेतला पाहिजे. पण आपण करू तरी काय शकतो.

*. ...सतत़ आखूड टप्प्याची गोलंदाजी करून विंडीज ने हातभार लावला* - जेसन होल्डर हा क्लाईव्ह सारखा वे.इंडीजचा यशस्वी कर्णधार ठरेल असं वाटत होतं पण आतां शंका येते. बंगलादेशी धांवगती वाढवायला आंखूड टपयाच्या चेंडूंची वाट पहायचे व वे. इंडीज गोलंदाज त्याना वाट पहायला लावायचेच नाही. कसले डांवपेंच नाहीत, सल्लामसलत नाही ! वे. इंडीजने काल अगदीच निराश केलं !

मॉर्गन ने आज वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. रशिद खानला बर्‍याच दिवसांनी कोणि तरी एव्हढा धुतलेला बघितला. नेमका त्याच्याच्बॉलिंग वर कॅच सोडलेला मॉर्गनचा ही खरी आयरनी.

आपल्याकडेही COA विरूद्ध बोर्ड हे युद्ध लवकर थांबल >> दुभती गाय असल्यामूळे तसे होउ दिले जाणार नाही भाऊ.

पाकिस्तान:
अति झालं , हंसू आलं !!

काल अफगाणीस्तानच्या गोलांदाजांचा इन्ग्रजांनी फडशा पाडला! २५ षटकार!! आणि तेवढ्याच धावांनी (१५०) बरोबर अफगाण सामना हारले !

न्यूझीलंडच्या बॉलर्सनी अफ्रिकेला खूपच जखडून ठेवले आहे. २८ ओवर्स १११/३
बाकी कुठल्याही टीम्सपेक्षा न्यूझी ओपनिंग बॉलर्स मोठे स्पेल टाकत आहेत हे माझे निरिक्षण योग्य आहे का?
हेन्री ने सलग ७ ओवर्स टाकल्या, बोल्टला स्विंग मिळत नव्हता पण ग्रँडहोम ने सलग ६ टाकल्या.... विल्यमसनचा सुरूवातीला प्रेशर बनवणार्‍या बॉलर्सना डेथ ओवर्सची फारशी भिती न बाळगता आधीच मोठे स्पेल देण्याकडे कल दिसतो आहे.
बुमरा आपल्याला ओपनिंग आणि डेथ दोन्हीकडे हवा असतो म्हणून त्याचे ओपनिंग स्पेल्स सहसा ५ ओवर्सपेक्षा मोठे नसतात. मग तो इनिंगच्या मध्यातही विकेट मिळवण्यासाठी दोनेक ओवर्स टाकतो आणि डेथ मध्ये ३ वगैरे. जर सुरूवातीला बनवलेले प्रेशर टिकवायचे असेल बुमराला सलग ७ वगैरे ओवर्स दिलेल्या बघायला आवडेल किंवा डेथमध्ये सलग ५ टाकतांना.

आज न्यूझीलंड बहुधा सलग तिसर्‍या वर्ल्डकपमध्ये (११' क्वार्टर , १५' सेमी फायनल आणि १९' लीग?) अफ्रिकेचा पूर्ण गाशा गुंडळाण्यास कारणीभूत होईल का?.
रबाडाच्या बरोबरीनी आज न्गिडी आहे बघूया अफ्रिका काय करते.

आज हरले तर अफ्रिकेला सेमीमध्ये जाण्यास अगदीच प्रचंड ऊलटफेर झाल्याशिवाय आजिबात संधी ऊरणार नाही असे दिसते आहे.

बर्गा त्यासाठी पाचवा बॉलर अधिक भेदक हवा. हार्दिक किंवा शंकर हे कॉम्बो त्या पठडित बसत नाही त्यामूळे मधे बुमरा येत राहील. समजा कधी शमी पाचवा बॉलर म्हणून आला तर भुवी किंवा शमी मोठे स्पेल टाकतील. बुमरा डेथ बॉलर म्हणून पाठी राहील.

हो बरोबर ! आणि पाचवा बॉलर पेसरच हवा म्हणजे सध्या शमी हा एकच पर्याय आहे (भुवी फिट असेल हे ग्रुहित धरून). आणि त्याला आत आणण्यासाठी केदार जाधवला बसवणे हा एकच पर्याय ऊरतो. आपली स्ट्राँग टॉप ऑर्डर बॅटींग जबरदस्त फॉर्मात असतांनाच हा प्रयोग शक्य आहे.
एकदा का वरती टर्नओवर वाढला की पुन्हा हे अवघड होऊन बसेल. सेमी मधली जागा निश्चित झाली तर ईंग्लंड च्या अगडबंब बॅटिंग लाईनप विरूद्ध हा प्रयोग नक्की करून बघावा...बांगलाविरूधसुद्धा चालेल.

*आणि पाचवा बॉलर पेसरच हवा म्हणजे सध्या शमी हा एकच पर्याय आहे*
असंच कां ? आपण आपलीच शक्तीस्थळं वापरणं अधिक योग्य. जाधवला अजून फलंदाजीत वाव मिळाला नाहीय व त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजीचा उपयोग करून घ्यायची पाळी आली नाहीय. मला तरी वाटतं कीं सध्याच्या संघात भुवी फिट नसेल तर शमी , यापलिकडे प्रयोग करूं नयेत

असंच कां ? >> भाऊ साधारणपणे फक्त पेसरच ओपनिंग आणि डेथ स्पेल टाकू शकतात म्हणून. तिथे तुम्हाला बुमराचे मोठे स्पेल्स हवे असतील तर दुसर्‍या ठिकाणी (आयदर ओपनिंग ऑर डेथ मध्ये) त्याची जागा घेणारा पर्याय हवा स्पेशालिस्टच म्हणून पेसर.
रिस्क अँड रिवार्ड स्पेक्ट्रमवर ऊजव्या कोपर्‍यात बसलेले दोन दोन स्पिनर्स असतांना, बुमराला मोठे स्पेल टाकता येण्यासाठी अजून तिसरा स्पीनर आणून काहीच ऊपयोग नाही म्हणून बुमरा, भुवी, चहल आणि यादव बरोबर पाचवा बॉलिंग ऑप्शन पेसरच हवा.

जाधवला अजून फलंदाजीत वाव मिळाला नाहीय व त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजीचा उपयोग करून घ्यायची पाळी आली नाहीय. >> म्हणूनच फुल टाईम पाचव्या बॉलरचा प्रयोग करण्याची ही योग्य संधी आहे असे म्हणत आहोत. Happy

सध्याच्या संघात भुवी फिट नसेल तर शमी >प्रयोग सगळे पर्याय फिट असले तरच करणार. भुवी फिट नसेल तर शमी हे सरळसोट आहे, तिथे प्रयोगाला जागाच नाही.

परवाच्या मॅचमधल्या पाकिस्तानी टीमची जरा दयाच आली! अक्रम, मियांदाद, अख्तर, अमिर सोहेल, अन्वर ह्यांच्या काळात पाकी क्रिकेटपटूंच्या चेहेर्‍यांवर माज ओसंडूण वहात असायचा. त्यांनी बॉडीलँगवेजही अत्यंत आक्रमक असायची. परवा सगळे गरीब बिचारेच वाटत होतो अगदी. आमिर अ‍ॅटेकिंग बॉलिंग टाकत होता. पण फोलो थ्रुमध्ये एकदमच मवाळ वाटत होता. गिरिष कुबेर त्यांच्या अग्रलेखात ह्याचा संबंध त्यांच्या अर्थव्यवस्थेही जोडतील. Happy

पराग +१११! ती मजा राहिली नाही ! त्या काळात धडकी भरलेली असायची मॅच च्या आधीपासून ! आता म्हणाजे पाक पेक्षा बांगला जास्त खुन्नस देतात Happy आणि खेळतात पण बेटर!!

*.....म्हणून बुमरा, भुवी, चहल आणि यादव बरोबर पाचवा बॉलिंग ऑप्शन पेसरच हवा *
2 पेस गोलंदाज ( बुमराह, भुवी/ शमी )+ 2 फिरकी गोलंदाज (कुलदीप, चहल )+ 2 ऑलराऊंडर पेस गोलंदाज ( पांडया, शंकर )+ 1 ऑलराऊंडर फिरकी गोलंदाज ( जाधव ) इतके गोलंदाज हाताशीं असूनही कर्णधार डेथ ओव्हरससाठी पेस गोलंदाजांना ओव्हरस मिळतील याची व्यवस्था करूं शकत नाहीं ? आंणि, केवळ टाॅप ऑर्डर बॅटींग आतांपर्यंत बहरली म्हणजे आतां ती नेहमी अशीच बहरणार असं गृहीत धरायचं ?

बहुतेक फेलुकवयोला बॉलिंग करायलाच लागणार नाही असा विचार करुन त्याच्या ३ ओव्हर्स शिल्लक ठेवल्या होत्या दू प्लेसिसने

"त्यासाठी पाचवा बॉलर अधिक भेदक हवा" - नेल्ड इट. पण आपली बॉलिंग सद्ध्या वर्क होत असताना, त्यात बदल करण्याचं काही कारण दिसत नाही. त्यातून एक प्रयोग म्हणून चर्चा करायची झालीच तर सध्याच्या लाईन-अप मधे पंड्या ने बॉलिंग ओपन करून बुमराह ला शेवटी मोठ्या स्पेल साठी आणण्याचा एक पर्याय आहे - जर पंड्या प्रेशर टाकू शकत असेल तर.

जर पंड्या प्रेशर टाकू शकत असेल तर. >> मला नाहि वाटत पांड्या त्या प्रकारचा बॉलर आहे, तो १-२ लूज बॉल टाकतोच. त्यामूळे प्रेशर मेंटेन ठेवणारा बॉलर असे त्यापेक्षा बघिअण्यापेक्षा विकेट टेकर म्हणून बघितले तर जास्त उपयोगी ठरेल असे मला वाटते.

चार वर शंकर राहणार कि पंतला आणून बघितले जाईल ह्याचे उत्तर बहुधा शमी कशी बॉलिंग करतो पुढच्या मॅच मधे ह्यावर ठरेल. शंकर पांड्याचा बॅकप आहे बॉलिंग साठी हे उघड आहे. जर शमीला पण लागणार असेल तर .....

राहुल ओपन करणार हे निश्चित झाल्यामूळे रोहितच्या रोल मधे आता बदल होईल. धवन बरोबर असला कि रोहीतला सेट होण्यासाठी लागणार्‍या वेळात धवन स्लॅक भरून काढतो, राहूल ते करेल असे मला वाटत नाही - त्याच्या शॉट्स चा प्रश्न नाही, फक्त तो तेव्हधा confident वाटत नाहीये अजून - इ>ङ्लंड दौर्‍याचा परीणाम असावा बहुधा. त्यामूळे रोहित लवकर सुटायला लागेल असे वाटते.

2 पेस गोलंदाज ( बुमराह, भुवी/ शमी )+ 2 फिरकी गोलंदाज (कुलदीप, चहल )+ 2 ऑलराऊंडर पेस गोलंदाज ( पांडया, शंकर )+ 1 ऑलराऊंडर फिरकी गोलंदाज ( जाधव ) इतके गोलंदाज हाताशीं असूनही कर्णधार डेथ ओव्हरससाठी पेस गोलंदाजांना ओव्हरस मिळतील याची व्यवस्था करूं शकत नाहीं ? >> जेव्हा मिडल ओवर्स मध्ये विकेट पडत नाहीत, पार्टनर्शिप्स बिल्ड होत असतात, स्पीनला पीचकडून साथ मिळत नाही त्यावेळी पार्टनर्शिप्स तोडण्यासाठी तुमचे बेस्ट बोलर लावण्याशिवाय काय पर्याय ऊरतो? आधीच मिडल ओवर्स मध्ये विकेट नाही पडल्या त्यात स्पेशालिस्ट बोलर्सच्या ओवर्स कमी राहिल्या मग डेथ मध्ये पंड्या, जाधव कडून बोलिंग करवणार का? Happy

आंणि, केवळ टाॅप ऑर्डर बॅटींग आतांपर्यंत बहरली म्हणजे आतां ती नेहमी अशीच बहरणार असं गृहीत धरायचं ? >> तेच तर म्हणतो आहे. ती बॅटिंग बहरली नाही तर तिने जे काही रन्स बनवले आहेत ते डिफेंड करायला स्पेशिअ‍ॅलिटी बोलर्स नको का?
मला वाटलं आता आपण बॅटिंग बद्दल आत्मविश्वास बाळगून आहोत तर बाकीच्या टीम्स सारखी आपणही तीन पेसर्सची बोलिंग ताकद (थोडक्यात पाच स्पेशालिस्ट बोलर्स ) घेऊन ऊतरू शकतो.

ईंग्लंड - वूड-आर्चर-प्लंकेट/वोक्स
न्यूझी - हेन्री-बोल्ट/साऊदी-फर्गसन
ऑसी - स्टार्क-कमिन्स-रिचर्डसन/बेहेरेन्डॉफ्/रिचर्डसन

ह्यांच्यात आणि भारतात फरक असा आहे की ते स्पेशालिटी स्पीनर कमी घेऊन खेळतात आपण एक पेसर कमी घेऊन खेळतो. स्पीनर्स फक्त २०-४० मध्ये ईफेक्टिवली वापरता येऊ शकतात. पण विकेट पडल्यानंतर पीचवर आलेल्या प्लेअर्सना पेस्+स्पीन दोन्ही खेळायला लागले तर ते जास्त लवकर अडचणीत येऊन विकेट्स मिळू शकतात. जडेजाही स्पेशालिस्ट स्पीनर आहे... बॅटिंगची ताकद वाढवायची असल्यास चहल किंवा यादव ऐवजी त्याला घेऊन जाधवच्या जागी तिसरा पेसर आणता येऊ शकतो.
विनिंग टीम बदलणार नाहीत माहित आहे पण सगळे दिवस सारखे नसल्याने संधी मिळताच प्रयोग केले पाहिजेत एवढेच म्हणणे आहे.

आप्ल्या स्पीनर्सची कसोटी बंग्लादेश विरूद्ध लागेल बघा आता. शाकिब्/तमिम वगैरे लोक स्पीन चांगले खेळतात आणि वरतून ते फॉर्म मध्ये आहेत.

Pages