विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय बोलणार. होत अस कधी कधी. चांगली टीम जिंकतेच अस नाही.
गेल्या 100 सामन्यात 4, 5, 6 आणि 7 क्रमांकांनी 40 टक्के धावा केल्या नसतील. आज 90 टक्के केल्या. पहिले चार एकूण 9 धावा काढून बाद झाल्यावर सुद्धा आपण चांगली लढत दिली. शेवटी तीन षटक असताना आपल्याला आशा निर्माण करेपर्यंत परिस्थिती आणली होती. अजून काय पाहिजे.
Hard luck. Well played team India.

आपण चांगले खेळलो म्हणूनच प्रथम क्रमांकावर आलो. आपल्या दुर्दैवाने गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ढगाळ वातावरणात धावांचा पाठलाग करावा लागला. न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली, नीशमने जबरदस्त झेल घेतला व पंत आणि पंड्याने विकेट फेकली. त्यामुळे आपण हरलो.

भुवनेश्वर व बुमराह जबरदस्त स्विंग गोलंदाजी करीत असताना बाद न होता हेन्री निकोल्स व विल्यमसन कसे खेळले होते ते पाहून रोहीत, राहुल व कोहलीने खेळायला हवे होते.

धोनीला ५ व्या क्रमांकावर पाठवायला हवे होते.

५/३ झालं तेव्हाच सामना ७५ टक्के हातातून गेला होता.

न्यूझीलंडचे खेळाडू उत्कृष्ट खेळले. भारत हरल्याचं दु:ख आहे, परंतु न्यूझीलंड जिंकल्याचे दु:ख नाही.

२०११ च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडने जेमतेम २२७ धावांचा बचाव करताना बलाढ्य आफ्रिकेला असेच हरविले होते.

एक तरी इनिंग बिल्ड करणारा प्लेअर खेलावायची अक्कल कोहलीला येवो
दिनेश कार्तिक अन् वन डे चा संबंध पूर्णपणे संपुष्टात येवो
शास्त्री अन एम एस के प्रसादाच्या सिलेक्षन कमिटी ला राजा मिळो

अश्या रितीने भारताच्या विश्वचषक स्पर्धेची सुरुवात आणि शेवट न्यूझिलंड विरुद्धच्या पराभवाने झालेली आहे..

फायनलला जाऊन हरण्यापेक्षा सेमी फायनल हरलो तर कमी दुःख होईल म्हणून आपण आजचा सामना हरलो असं मला वाटतंय. तसेच धोनीने अजून 2 ते 3 वर्ल्डकप खेळावेत असं मला वाटतंय. जडेजा आज चांगला खेळला म्हणून त्याला कप्तान बनवावे आणि कोहलीकडून कॅप्टनशिप काढून घ्यावी, ज्या वर्षी तो आयपील जिंकेल त्यादिवशी त्याला पुन्हा कॅप्टन घोषित करावे, नेहमी चार विकेटकीपर संघात खेळवावे आणि प्रत्येक दहा ओव्हर्स नंतर विकेटकीपर चेंज करावे. सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांना पानिपत वाचायला द्यावे, कुटुंबकबिला सोबत नेला की कशी धुळदान उडते हे त्यांना समजेल.

"मला वाटले "अंपायर्स कॉल" म्हणून रिव्यू आल्यावर अंपायर म्हणेल "मे बी बेल्स ला लागला असता पण बेल्स पडल्या नसत्या" - खास फा टच कॉमेंट आहे ही Happy

"सर जडेजांच्या नावा आधी मात्र आजपासून आणखी एक श्री लावण्यात यावा" - जडेजा अप्रतिम खेळला.

पराभवाची बरीच कारणे आहेत.

१) नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली व गोलंदाजाना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ढगाळ वातावरणात भारताला धावांचा पाठलाग करावा लागला.

२) ३ बाद ५ अशा वाईट अवस्थेत असताना एक बाजू लावून धरणाऱ्या धोनीला पाठवायला हवे होते. धोनी-कार्तिक संथ खेळले असते तरी पडझड थांबून डाव स्थिरावला असता. ३ बाद ५ वरून अगदी २५ षटकांत ३ बाद ७५ अशी धावसंख्या असती तरी पंड्या व पंत शिल्लक असताना उर्वरीत २५ षटकांत १६५ धावा करणे सहज शक्य होते. परंतु ३ बाद ५ असताना पंतला पाठविणे व नंतर ४ बाद २४ असताना पंड्याला पाठविणे चुकीचे ठरले.

पंत (७१/५) व पंड्या (९२/६) बाद झाल्यानंतर ८ ची धावगती आवश्यक असताना पिंच हिटर शिल्लकच नव्हते.

३) पंत व पंड्याचा उतावळेपणा घातक ठरला. पंत कायम आयपीएल मानसिकतच खेळतो. दोघांनाही एक जीवदान मिळाले होते. १९८७ मध्ये एडी हेमिंग्ज व गटिंगने जसे कपिलला जाळ्यात पकडले होते तसेच पंत व पंड्या काल स्यांनटरच्या जाळ्यात अडकले.

४) नीशमने घेतलेला अशक्यप्राय झेल व गप्टिलने थेट फेकीवर केलेला धावबाद सुद्धा निर्णायक ठरले.

५) गप्टिल खूप लवकर बाद झालेला असताना निकोल्स व विल्यमसन यांनी धावा वेगात करण्याऐवजी बाद न होता टिकून राहण्यावर भर दिला होता. भारताचे पहिले ३ खेळाडू इतक्या झटपट बाद झाले की त्यांना स्थिरावण्याची संधी मिळाली नाही. दुर्दैवाने पंत व पंड्या यांनीसुद्धा स्थिरावण्याऐवजी उंच चेंडू मारून बाद झाले.

LG, कारण क्र. 1 खरं तर सर्वात महत्वाचं . गावसकर सुरवातीलाच म्हणाला होता, जपून खेळत किमान 220 - 240चं लक्ष्य भारतासमोर ठेवण्याला न्यूझीलंड अग्रक्रम देईल व तेच या कंडिशन्समधे योग्य ठरेल !

LG, कारण क्र. 1 खरं तर सर्वात महत्वाचं . गावसकर सुरवातीलाच म्हणाला होता, जपून खेळत किमान 220 - 240चं लक्ष्य भारतासमोर ठेवण्याला न्यूझीलंड अग्रक्रम देईल व तेच या कंडिशन्समधे योग्य ठरेल ! इतकं कमी लक्ष्य, व तेही या भारतीय फलंदाजीसाठी, कसं म्हणतोय गावसकर , हें खटकलं होतं. Obviously, he knows better !

Obviously, he knows better !>> मला तेंव्हा वाटल गावस्कर न्यूझिलंडला गाफिल ठेवण्यासाठी म्हणालेत की या विकेटवर २३०/२४० धावा पुरेश्या होतील. Happy

प्रत्येकाने प्रामाणिकपणे उत्तर द्या .
५/३ धावसंक्ख्या आहे , तिन्ही खंदे फलंदाज बाद . नवखा पंत विकेटवर . स्विंगिंग कंडिशन्स .
तुमचे नेक्स्ट ३ आहेत , धोनी (कायम ४,५ वर येणारा) , पांड्या , कार्तिक (शेवटी हिटींगसाठी जाधव ऐवजी घेतलेला)
तुमचा क्रम काय असे:)?

जर इंग्रज अंतीम फेरीत गेले तर सचिनचा विक्रम अबाधित! वॉर्नर ९ धावा करुन बाद! रोहित पेक्षा १ धाव कमीच! कांगारू २ बाद १०!

सुरुवातीच्या ३ विकेट्स नंतर धीराने घेतले थोडा वेळ पण आता ४३ व्या ओवर ला १८१/७ म्हणजे आपल्याहून फार वेगळी परिस्थिती नाहीये. स्टेडियम मधे १ रन काढली की ढोल वाजवणारे आणि हुकला की सामुहिक ओह्ह्ह्ह्ह करणारे प्रेक्षक नसल्यामुळे शांत वाटत असेल Happy

स्टेडियम मधे १ रन काढली की ढोल वाजवणारे आणि हुकला की सामुहिक ओह्ह्ह्ह्ह करणारे प्रेक्षक नसल्यामुळे शांत वाटत असेल>>>
एकही आशियाई संघ नाही त्यामुळे अंतीम सामना देखिल शांत पार पडेल अगदी..
पुर्वी आमच्या शाळेत भाषणाला किंवा कार्यक्रमाला टाळ्या वाजविताना ६ टाळ्या वाजवायची पद्धत आमच्या हेडमास्तरांनी सुरु केलेली. तेंव्हा सर्व मुलांच्या टाळ्या एकदम सुरु व्हायच्या ३-३ च्या लॉट मध्ये दोनदा वाजवून बंद. तसेच ह्यां इंग्रजांच्या टाळ्या ऐकताना वाटते. चौकार मारला की एकदम सुरु एकदम बंद. कसे शांत सुरु असते. विंबल्डनबघात होतो काल त्या चेंडू मारणार्‍या खेळांडूंच्या घुमण्या शिवाय आणि चेंडूच्या रॅकेटवर आदळण्या शिवाय दुसरा आवाज नाही. एखादा चांगला फटका मारला किंवा परतवला तर तेवढ्या पुरत्या टाळ्या एखादा अन्फोर्स्ड एरर अथवा बाहेर मारला की तेव्हाढ्या पुरते ओहSSS वा टाळ्या. हे सुद्धा एकदम सुरु आणि एकदम बंद.

कोहलीच्या नेतृत्वाखाली क्षमता असून सदोष संघनिवडीमुळे सामना हाराण्याच्या बाबतीत कमालीचे सातत्य दिसले आहे. विविध कसोटी मालिका, आता विश्वचषक!

"प्रत्येकाने प्रामाणिकपणे उत्तर द्या ." - कालच्याच प्लेयिंग ११ च्या मर्यादेत विचार करायचा तर, पहिले तीन बॅट्समेन आऊट झाल्यावर मी धोनी ला पाठवलं असतं - मग कार्थिक, पंत आणी नंतर पंड्या, जडेजा . ह्यात धोनी - कार्थिक जोडीच्या अनुभवाचा (कार्थिक पेक्षा जाधव?) डाव स्टेबल करण्याच्या दृष्टीनं उपयोग झाला असता, मधे पंत ने फास्ट खेळणं अपेक्षित होतं आणी पंड्या जडेजा हे स्फोटक आणी पंतपेक्षा अनुभवी म्हणून त्याच्या नंतर पाठवले असते. असो.. स्वप्नरंजन पुरे.

आज इंग्लंड ने पहिला हाफ चांगला कंन्ट्रोल केलाय आणी आता स्टार्क वर अ‍ॅटॅक करून ऑस्ट्रेलिया पुढे प्रश्नचिन्ह उभं केलय. बघू ऑसीज कसे तोंड देतायेत ते.

पहिले तीन बॅट्समेन आऊट झाल्यावर मी धोनी ला पाठवलं असतं >>> १००% मी ही +१

माझ्या सगळ्या मित्रांचही हेच उत्तर होत , मग आपल्या थिंक टँक लाच काय वेगळ वाटल असेल ?

"मग आपल्या थिंक टँक लाच काय वेगळ वाटल असेल" - म्हणून तर आपण इथे, ते तिथे.. चालायचच! शास्त्रीबुवांना तार करून विचारलं असतं त्यांच्या विचारधारेविषयी . पण ते निराळ्याच 'तारेत' असतात आणी त्यांची 'धार' ही वेगळी च आहे. Happy

तिकडं साहेब विश्वचषक घेऊन चालला बहुतेक. मनातल्या मनात त्यानं तो एमसीसी च्या शिसवी लाकडाच्या कपाटात घालून, काचेतून पहायला पण सुरूवात केली असावी. आता पुढची दीड-दोनशे वर्षं, प्रत्येक टी-२०, वन-डे, टेस्ट, काऊंटी, कुठल्या कुठल्या शायरच्या गल्ल्यातलं क्रिकेट,सगळीकडे ऐकू येईल, 'वर्ल्ड चँपियन्स'. बहुदा हीथ्रो एअरपोर्ट चं नाव बदलून वर्ल्ड चँपियन्स हीथ्रो वगैरे पण करतील.

हो तसंच दिसतंय. बाबो! ११९/० १७ व्या ओवर मधेच!! आताच्या ओवर ला पाठोपाठ ३ सिक्सेस !! रॉय - बेअर्स्टो पार किरकोळीत काढतायत ऑसी बोलर्स ना!!

Pages