विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. ९९ च्या कप मधे प्राधान्य तशा क्रमाने होते (एकमेकांविरूद्धचे विजय आधी), त्यामुळे शंका होती की पुन्हा तसेच आहे की काय.

आलं लक्षात. नव्वदच्या दशकात विश्वचषकांत फार मजेदार गोष्टी होत होत्या. नंतर ऑस्ट्रेलियाने जो एकसुरीपणा आणला आहे, की ज्याचं नाव ते.

World cup नंतर धोनी घेणार निवृत्ती.. धोनीचा योग्य निर्णय.. >> वाचले नाही कोठे. तो तसे करेल असे नेहमीच वाटत आले आहे पण आत्ता मधे घोषणा करेल असे वाटत नाही.

नव्वदच्या दशकात विश्वचषकांत फार मजेदार गोष्टी होत होत्या. नंतर ऑस्ट्रेलियाने जो एकसुरीपणा आणला आहे, की ज्याचं नाव ते. >>> टोटली. आणि त्यांनाच या नियमाचा सर्वात मोठा फायदा झाला होता. आफ्रिकेविरूद्धची सेमी-फायनल टाय झाली तेव्हा लीग गेम मधल्या त्यांच्या आफ्रिकेविरूद्धच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया फायनल मधे गेली. नाहीतर ऑल्मोस्ट तोपर्यंत ते ही त्या कप मधे चाचपडतच होते. मग फायनल ला पाक होते. पाक तेव्हाही बायनरी खेळत - त्यादिवशी ० लेव्हलचा गेम ते खेळले आणि ऑसीज जिंकून मग तो एकसुरीपणा सुरू झाला Happy

१९९९ चा कप मस्त झाला होता. बरेच चढ उतार होते नि क्लुसनर ने मस्त मजा आणली होती. वॉ ची इनिंग तर विसरणे अशक्यच आहे.

आपल्या पुढच्या मॅच मधे जाधव असणार कि नाही ह्याचे कुतूहल आहे. त्याला बॉलर म्हणून वापरत नाही, बॅटींग पण एकदम खाली येतोय. नक्की problem काय आहे ? सगळे चार वर try करताना त्याला केले नाही हे विचित्र होते (एका सामन्यात केलेले बहुधा). पुढच्या सामन्यात राहुलने थोडे कमी dot ball खाल्ले तर बरे होईल, रोहितची पाचवी सेंच्युरी लागू शकते.

लॉर्ड्स च्या पाक-बांगला मॅच करता म्हणे एमसीसी ला शाळेतील पोरे आणून बसवावी लागणार आहेत. भारताच्या मॅचेस चेस्टर-ली-स्ट्रीट, साउथहॅम्प्टन सारख्या ठिकाणी ठेवून पाक-बांगला मॅच लॉर्ड्स वर ठेवण्याचे अफलातून प्लॅनिंग कोणाचे असेल माहीत नाही.

परवा आपली एक मॅच टॉण्टन ला झाली ना? तेव्हाही १९९९ ची ती द्रविड-गांगुली ची भागीदारी आठवली.

कपिलच्या १९८३ च्या त्या १७५* नंतर पुन्हा टनब्रिज वेल्स चे नाव ऐकले नाही.

*अंबाती रायडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन निवृत्ती* - ज्यासाठी एवढी तपश्चर्या करायची, त्या क्षेत्रातून असं कडवटपणा घेवून अकाली बाहेर पडणं ही खरंच शोकांतिकाच ! गांगुलीसारखयानी त्याला समजावून निर्णय बदलायला लावणं अधिक योग्य.

१९९९ च्या कप मधे असे नियम होते.
>>
९९ वर्ल्डकप ला सुपर सिक्स क्वालिफायर विरुद्धच्या ग्रुप स्टेज मॅचचे पॉईंट्स कॅरी फॉर्वर्ड केले होते.
ग्रुप ए मधून दक्षिण अफ्रिका (८), भारत (६) आणि झिंबाब्वे (६) क्वालिफाय झाले होते. पण भारत बाकी दोन्ही टीम्स विरुद्ध हरल्यामुळे वरच्या रूल प्रमाणे सुपर सिक्स स्टेजला दक्षिण अफ्रिका (४), झिंबाब्वे (२) अन भारत (०) पॉइंट्स वर आले.

२००३ वर्ल्डकप ला सुपर सिक्स क्वालिफायर विरुद्धच्या ग्रुप स्टेज मॅचचे पॉईंट्स आणि इतर टीम्स विरुद्धच्या पॉइंट्सच्या एक चतूर्थांश पॉइंट्स कॅरी फॉर्वर्ड केले होते. (इथे प्रत्येक विजयाचे ४ पॉइंट्स होते)
ग्रुप बी मधून श्रीलंका (१८), केनिया (१६) अन न्यूझिलंड (१६) क्वालिफाय झाले होते. पण वरच्या रूल प्रमाणे सुपर सिक्स स्टेजला केनिया (१०), श्रीलंका (७.५) आणि न्यूझिलंड (४) पॉइंट्सवर आले. अन केनिया याच्या फायद्यामुळे सेमिफायनलला क्वालिफाय झाले.

ज्यासाठी एवढी तपश्चर्या करायची, त्या क्षेत्रातून असं कडवटपणा घेवून अकाली बाहेर पडणं ही खरंच शोकांतिकाच
>>
भाऊ, रायुडू पहिल्यापासूनच खूप इंपल्सिव माणूस वाटतो. अंडर १९ वर्ल्डकपनंतर म्हणावा तसा रिस्पॉन्स न मिळाल्यानी आयसीएल जॉईन करणं असो, की ३डी ग्लासेस बद्दलचं ट्वीट. मनात आलं अन करून टाकलं टाईप.
त्याला मुंबई इंडियन्सकडून खेळवण्याचं बरंच श्रेय हर्शा भोगलेला जातं (सुरुवातीला तो मुंबईचा स्ट्रॅटेजिस्ट होता). जखमी ब्रायन लारा ऐवजी पोलार्डला संघात घ्यायचा निर्णयही त्याचाच होता.

*रायुडू पहिल्यापासूनच खूप इंपल्सिव माणूस वाटतो.* इंपलसीव वागणं हा दोष असेल पण खेळाआड येत नसेल तर त्यामुळे त्याला वगळण्याइतका तो दुर्गुण तर नाहीं. त्याला राखीव ठेवून डावलणं अन्यायकारक वाटणं सहाजिकच आहे, इतकंच .

पण खेळाआड येत नसेल तर त्यामुळे त्याला वगळण्याइतका तो दुर्गुण तर नाहीं
>> बिल्कुल नाही...

त्याला राखीव ठेवून डावलणं अन्यायकारक वाटणं सहाजिकच आहे
>> अर्थात...

धवन जखमी झाल्याने आपला ओपनिंग स्लॉट मोकळा झाला. (अजूनही)
रायडू ऐवजी मयांक चांगला ऑपशन आहे. राहूल चौथा.

रायडूला बर्‍याच वेळेस संधी देऊनही त्याने फार प्रकाश पाडला नाही. सुरुवातीला तो आला तेंव्हा त्याच्याकडून दुसरा सचिन आहे या नजरेने बघितले जायचे. त्या दृष्टीने त्याने पूर्ण अपेक्षाभंग केला.

*रायडू ऐवजी मयांक चांगला ऑपशन आहे. * - त्याला डावलणयामागे क्रिकेटींग कारणं असतील व ती समर्थनीयही असतीलच. पण तो राखीव खेळाडू असला तर त्याला डावलताना तो किमान दुखावला जाईल ही काळजी घेणं गरजेचं. त्याच्या प्रतिक्रियेवरून तसं झाल नसावं असं वाटतं.

आपल्याला आतल माहित नाही भाऊ. त्याच्याशी समितीतील कोणीतरी बोललच असेल. त्याला पहिल्यांदा टीम मधे घेतले नव्हते तेंव्हाच तो नाराज झाला होता.

सुरूवातीच्या काळात (अंडर १९), एक चाईल्ड प्रॉडिजी म्हणून अगदी तेंडुलकर शी रायडू ची तुलना झाली होती. नंतर हैद्राबाद संघटनेशी वाद, आयसीएल मधील सहभाग, मैदानावरची भांडणं, फर्स्ट क्लास क्रिकेट मधून निवृत्ती, ‘ते’ ट्वीट आणी हा तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय ह्या सगळ्यातून एक classic case of what could have been तयार झाली.

संझगिरी एकेकाळी बरे होते. आता ओ येईपर्यंत, शब्दबंबाळ लिहितात. >>>

आणि उपमाबंबाळ. उपमांच्या बाबतीत कोठे थांबावे कळत नाही अनेक लेखकांना. "रनरेटला हरणाचे पाय फुटणे काय" कायच्या काय.

"..मुंबईचा पाऊस रोहित-राहुलच्या फलंदाजीचं रूप घेऊन एजबॅस्टनवर आला, पण तो प्राणहानीकारक नव्हता. ज्या पावसात भिजावंसं वाटतं तसा तो पाऊस होता. रोहितने पुन्हा एकदा मुलायम फटक्यांच्या पावसात आम्हाला ओलचिंब केले. राहुलने त्याला साथ दिली. रोहितचं शतक हे त्या पावसानंतरचं इंद्रधनुष्य होतं. इंद्रधनुष्याला सात रंग असतात. रोहितच्या शतकाला त्यापेक्षा जास्त रंग होते...."

नशीब हे आणखी पुढे नेउन "मग मध्य रेल्वेच्या स्थानकांवर रूळांवर पाणी साचते तशा भारतीय संघाच्या धावा साचल्या. त्यातून वाट काढणे बांगला च्या लोकांना जमले नाही. त्यांच्या फलंदाचीच्या लोकल ट्रेन्स...." वगैरे आणले नाही. नाहीतर पुलंच्या राजाबाई टॉवर प्रमाणे क्रिकेटची बातमी आणि मुंबईच्या पावसाची बातमी म्हणून एकच लेख छापता आला असता.

* "बिगरी ते मॅट्रिक" - तत्कालीन पाठ्यपुस्तकांत वसईचा पूल आणि राजाबाई टॉवर म्हणून एकच चित्र आडवे आणि उभे छापलेले होते म्हणे Happy

फा, भारीच! Lol

आज अफगाणचा खेळ बघण्यासाठी केवळ मॅच पहायची!

मस्तच फारेंडा.

अवांतर : नेवील कार्ड्स नाव ऐकले आहे का. क्रिकेट बद्दलचा अप्रतिम समीक्षक. त्यांची ओळख शिरीश कणेकरांमुळे. त्यांच क्रिकेटवरच मराठी पुस्तक वाचा . केवळ धमाल. आणि नेवील कार्ड्सही वाचा.
फारेंडा तुमच्या मुळे त्या दोघांची आठवण झाली. कमाल.

क्रिकेट म्हणजे आंकडेवारी कीं पोएट्री याचं उत्तर मिळेल !!! >> हे कधी येणार ह्याचीच वाट बघत होतो Happy

एक चाईल्ड प्रॉडिजी म्हणून अगदी तेंडुलकर शी रायडू ची तुलना झाली होती >> तेंडुलकर शी तुलना झाल्याने बरेच जण असे वाटेला लागलेत. राहुलमधे सचिन शोधणार्‍यांना सचिन कळलाच नाही असे म्हणू शकतो. आपल्याला दुसरा कपिल, सचिन, सुनिल, विराट, राहुल शोधायची वाईट खोड आहे.

तुमच्या मुळे त्या दोघांची आठवण झाली. >> कणेकर नि कार्ड्स एकाच वाक्यात ? तुम्ही पण ? काननबाला नि दुर्गा खोटे आठवले. देवा उठा ले रे ! Lol

नेवील कार्ड्स ने आज लिहील असत
देवा आज विराटचे शकत होऊ दे पण इंग्लंड जिंकू दे. किंवा
स्टॅटिस्टीक्सवाले म्हणतील गेल हा बुमरापेक्षा चांगला बाॅलर आहे. Happy

Pages