विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फा.. Lol
संझगिरींच्या उपमा बाजूला ठेवल्या तर त्यांचा क्रिकेटबद्दलचा अनॅलिसिस चांगला वाटतो आहे वर्ल्डकपच्या लेखांमध्ये.
कणेकरांचं कुठल्याच विषयावरच लिखाण आणि त्यांचे एकपात्री प्रयोग अजिबात आवडत नाहीत. त्यांचं लिखाण / बोलणं ऐकून दरवेळी पुलंचं "आपण उंदिर मारायच्या विभागात असलो तरी... ठोका मतं.. " हे आठवतं. संझगिरी, हर्षा भोगले वगैरेही स्वतः क्रिकेटचं मैदान गाजवलेले नाहीत पण त्यांच बोलणं / लिखाण तसं नाही वाटत खरं..

मॅरिअर इरास्मस यांच्याशी विराटने केलेला वाद आणि याआधीच्या सामन्यातील त्याच्या खराब वर्तणुकीचा फटका विराटला बसु शकतो असे वाचनात आले. विराट वर दोन सामन्यांसाठी बंदी येऊ शकते.

( * कणेकर नि कार्ड्स एकाच वाक्यात ? तुम्ही पण ? * - यावरून सहज लक्षात आलं. आम्ही क्वचितच भेटत असलो , तरी कणेकरांशी खूप वर्षांचा बरयापैकी परिचय आहे. त्यानी स्वाक्षरी करून भेट दिलेल त्यांचं पुस्तक माझ्या अगदींच मामुली पुस्तक संग्रहात कार्डसच्या पुस्तकाच्या पंक्तितच असणं अनिवार्य आहे ! Wink )

ते निळा रंग नको दोन्ही संघांचा म्हणून आपल्याला इन्ग्रजांविरूद्ध बदलावे कपडे लागले. आज बांग्लाला बदलावे लागले.
मला एक कळत नाही १९८७ पर्यंत सर्व संघांचे पांढरे कपडे होते तेंव्हा प्रॉब्लेम आला नाही. कसोटीत नसतो प्रॉब्लेम गोंधळाचा मग आताच का येतोय?

>>कसोटीत नसतो प्रॉब्लेम गोंधळाचा मग आताच का येतोय?

हो ना. तरी बरं, एका मैदानावर एकच सामना चालू असतो. आमच्या मैदानावर तर बाजूबाजूला चांगले ६-७ सामने चालू असत आणि तितकेच संघ क्षेत्ररक्षण करत असत. तरीपण आमचा कधी गोंधळ उडाला नाही. आम्ही आमच्याच सामन्याचा चेंडू पकडत असू.

हाॅकी, फुटबॉल सारखं क्रिकेटमधे विरूद्ध खेळाडू एकमेकांत मिसळून खेळत नाहीत. त्यामुळे , रंगांचा इतका बाऊ कां हें खरंच कळत नाही.

*आम्ही आमच्याच सामन्याचा चेंडू पकडत असू.* - ... आणि,
' LOOK OUT' ही बोंब कुठूनही आली तर कपाळावर हात घेवून खाली बसत असूं ! Wink

*आम्ही आमच्याच सामन्याचा चेंडू पकडत असू.* - ... आणि,
' LOOK OUT' ही बोंब कुठूनही आली तर कपाळावर हात घेवून खाली बसत असूं ! Wink>>>>
अगदी अगदी! Happy

आज लंकेला मात देऊन अव्वल स्थानी रहाण्याची आशा जागृत ठेवावी भारतीय संघाने.

कांगारूंना जर आज आफ्रिकेने अनपेक्षित मात दिली तर भारत न्युझीलंड उपांत्यफेरी होईल म्हणजे साखळीची उणीव भरून निघेल!

आज दोन्ही सामने बघावे लागणार! Happy

मला वाटते आज नाणेफेक जिंकली तर भारत फलंदाजी घेईल असा अंदाज.
आणि अग्रवालला खेळवायला हवे आज. चार पैकी एक यष्टीरक्षक कमी करुन.

<<आमच्या मैदानावर तर बाजूबाजूला चांगले ६-७ सामने चालू असत आणि तितकेच संघ क्षेत्ररक्षण करत असत. तरीपण आमचा कधी गोंधळ उडाला नाही. >>>
आमच्या कडे तर आपली फलंदाजी असेल तर काही जण दुसर्‍याच सामन्यात जाऊन क्षेत्ररक्षणाला मदत करत असत. मग आपला नंबर आला बॅटिंगला की तिथे दुसरा कुणितरी येई - कुठल्यातरी तिसर्‍याच सामन्यातला!
चालतय् की!

जाताजाता २ नंबर ला ढकलले आफ्रिकेने कांगारुना.
रोहित विक्रमादित्य.
साखळीत सर्वोच्च ६४७ धावा.. ५ शतके..
आता अजून दोन शतके कर चषक आपलाच!!

भारत न्यूझीलंड उपांत्य.... पुन्हा पाऊस आला तर काय निर्णय घेईल समिती?

तुलाही मुलगाच झाला? साला, बॅड लकच आहे आपलं !कन्यारत्न घेवून मिरवताहेत बघ कसे, तो रोहित व वाॅरनर !! 20190115_202451_0.jpg

मस्त व्यंगचित्र भाऊ..
आफ्रिकेच्या विजयाने, आपल्यासाठी तुलनेने सोपा पेपर सेमी फायनलला मिळणार.
....वॉर्नर मॅच फिरवणार असं वाटत असतानाच विकेट पडली आणि आफ्रिकेचा पुढचा मार्ग सोपा झाला.
विकेट किपर डी-कॉक ने काढलेल्या दोन विकेट्स फारच मोक्याच्या क्षणी आल्या. पहिली विकेट म्हणजे स्टॉइनीस चा रन आउट आणि दुसरी मॅक्सवेलची.. जबरदस्त कॅच होता !
न्यूझीलंड विरुद्ध सेमी फायनलला आपण कालचीच टीम खेळवू असं वाटतंय...

स्टॉइनीस चा रन आउट आणि दुसरी मॅक्सवेलची.. जबरदस्त कॅच होता !>>>
रन आऊट खरोखर भन्नाट मागे न पाहता चेंडूला दिशा दिली यष्टीवर..
कॅचच्या उडीचे टायमिंग भन्नाट!

*न्यूझीलंड विरुद्ध सेमी फायनलला आपण कालचीच टीम खेळवू असं वाटतंय...* -
मला 3 बदल होतील अशी शक्यता वाटते- कार्तिक, जडेजा, भुवी ऐवजी - जाधव, शामी व चहल .

भाऊ कार्टून मस्त. तुमचा क्लास लावावा म्हणतो. Happy
काल मॅचेस्टरला विकेट टर्निंग होती. तरी पण दोघांच्याही 300 + झाल्या. तीच विकेट असेल तर आपल्याला मात्र संधीचा फायदा होईल.
केदार म्हणूनच आत येऊ शकतो. कार्तिक ऐवजी.

जिंकलो तर नाचणार, या वयात ? अहो, हात-पाय मोडला तुमचा तर इथेही बीसीसीआय सबस्टीटयूड पाठवेल, असं वाटतंय कीं काय तुम्हाला !!sindhu.JPG

*धोनी है तो मुमकिन है* ह्याने शुभारंभ झालेल्या या धागयावर
धोनीजीना वाढदिवसाच्या शुभेच्छा व पुढच्या दोन सामन्यात त्यांच्याकडून त्याना शोभेशी कामगिरी होवो, ही प्रार्थना !!

भाऊ, व्यंचि मस्तच! Lol

धोनीजींचा बड्डे काल होता की आज? त्यांना हॅपी बड्डे!! Happy

विश्वचषकातील काही फलंदाजीचे रेकॉर्डस्

आजवर एकूण १९६ शतके पैकी पहिल्या क्रमांकावर ३२ भारतीय फलंदाजांचे. तर पाठोपाठ ऑसीज ३१ बाकी देश खूप मागे.
भारतातर्फे पहिले शतक कपिलदेव झिंबाब्वे विरुद्ध १७५.
एका विश्वचषकात सर्वाधिक शतके रोहित शर्मा ५. विश्वशतकात एकूण वैयक्तिक शतके ६ सचिन आणि रोहित.
विश्वचषकात एका डावात सर्वाधिक वैयक्तिक २३७ न्युझिलंडचा मार्टिन गप्तिल .
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा सचिन ६७३... आत रोहित दुसर्‍या क्रमांकावर तर पाठोपाठ डेव्हीड वॉर्नर आहे ..

रोहितला संधी आहे उद्या बरेच रेकॉर्ड करायची!

परवा ऑसी - अफ्रिका मॅच मधे ३२६ चेस करताना ऑसीज २५ ऑव्हर्स नंतर १२४/४ होते तेंव्हा मी मॅच सोडून झोपलो.
सकाळी उठून स्कोअर पाहिला अन आवाक झालो. पुढच्या २५ ओव्हर्स मधे ऑसीजनी १९१ मारल्या होत्या.

That’s precisely why they are one of the most dangerous teams in this game…

ऑसीज, इंग्लंड, न्यूझिलंडच्या टीम्सनी याच वर्ल्डकप मधे लोअर मिड्लऑर्डरच्या काँट्रिब्यूशनवर मॅचेस जिंकल्या / खेचल्या आहेत.
आणि आपण हेच करण्यात कमी पडलोय. आपली मदार संपूर्णपणे टॉप ऑर्डर वर आहे. आणि ही गोष्ट बाकी टीम्सच्या लक्षात आलेली असणारच. किंबहुना त्यांच्या गेमप्लॅनमधेही यावर बरंच लक्ष दिलं असणार.

माझे प्लेइंग ११ :
शर्मा, राहुल, कोहली, केदार (विकेट्स लवकर पडल्यास नं. ४), पंत (विकेट्स पडण्यापूर्वी भरपूर स्केअर झाल्यास नं. ४), पांड्या, धोनी, भूवी, चहाल, शमी / कुलदीप (कुठली विकेट मिळते त्यावर अवलंबून), बुमरा

Pages