विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐन पावसाळी मोसमात वर्ल्डकप इंग्लंडमधे, आणि वर्ल्ड्कप फायनलच्या विकेंडला बीएमएमचं कंवेंशन आयोजन करणारे संयोजक सत्कारास पात्र आहेत... Wink

काल जाणवलेल्या कांही गोष्टी-
1. विराट मधूनच रिलॅक्स मूडमधे हंसताना दिसला . खूप बरं वाटलं ;
2. महत्वाची मॅच सुरू असतांना मधेच जुन्या ऑसीजच्या मॅचवर चित्रफितीसकट चर्चा करणं आक्षेपार्ह व रसभंग करणारं वाटलं ;
3. टप्पा किंचित पुढे पडलयाने धोनीचा एक झेल थोडक्यात हुकला. गोलंदाज बुमराह कसलंही अकांडतांडव न करतां इतका गोड हंसला ! ग्रेट टेंपरॅमेंट !!
4. बुमराह व भुवीचया गोलंदाजीचा पहिला स्पेल अफलातून होता व
5 पावसामुळे सचिनचे तिथेच घेतलेले दोन छोटे इंटरव्हयू पहायला मिळाले. ( रोहितचया बॅटचं बॅकलिफट अफलातून असलयाचं तयाने अधोरेखीत केलं ).

बरंच झालं ! सचिनचे एकदिवसीय सामन्यातले रेकाॅर्ड अबाधित राहीले ना !! susalyaa.JPG

भाऊ रेकॉर्ड होईलच की अजून.
स्टीव वॉ कॉमेंट्रीला असताना त्याचा व्हिडिओ दाखवत होते.
विकेट स्लो होती पण धावा मर्यादीत रहाण्याच कारण विकेटपेक्षा काल बॉलिंग चांगली झाली. आपण इंग्लिश गोलंदाजांकडून शिकून स्लो शॉर्ट पिच वर भर दिला. जड्दूने कमाल केली. निकोलसनची विकेट गेल्यावर जणू विकेट अनप्लेयेबल आहे आणि घाई केली तर १५० च्या आत ऑल आउट होईल अशी भिती त्यांनी घेतली होती. विल्यमसन्सचे डावपेच अनाकलनीय होते. काल पांड्याच्या दुखापतीमुळे पोटात गोळा आला होता. पण त्याने जिगर दाखवून दिली. विश्रांतीसाठी कमी वेळ मिळणार आहे फायनल पूर्वी. त्याला बॅटींग करायला लागू नये.

डिएल रूल किती भंपक आहे हे आजचेच उदाहरण दाखवून देत आहे. न्यूझिलंड ५० षटक खेळले आणि २३७ धावा केल्या ( जे ते उरलेल्या ४ षटकात करतील) तर आपण त्या ५० षटकात कारायच्या. पण जर मॅचचा वेळ वाया गेला अणि फक्त आपल्याला बॅटिंग करायला मिळाली तर तेवढ्याच धावा ४६ षटकात करायच्या. Happy

मॅच निदान २० षटकांची तरी झाली पाहिजे.

टप्पा किंचित पुढे पडलयाने धोनीचा एक झेल थोडक्यात हुकला. गोलंदाज बुमराह कसलंही अकांडतांडव न करतां इतका गोड हंसला ! ग्रेट टेंपरॅमेंट !! >> सही! भाऊ - आयपीएल च्या फायनल मधेही अगदी मोक्याच्या क्षणी डिकॉक कडून बॉल सुटून मुंबईकडून चार धावा गेल्या होत्या बुमराह च्या बोलिंग वर, तोपर्यंत त्याने अत्यंत टाइट ओव्हर टाकलेली असताना. त्यानंतर लगेच तो डिकॉक च्या गळ्यात हात घालून त्याला समजावताना दिसला होता. फास्ट बोलर ने पूर्ण अ‍ॅग्रेशन ने जीव तोडून बोलिंग केल्यावर लगेच झटक्यात टीम स्पिरीट दाखवत सहकार्‍यांना धीर देणे हे फार अवघड आहे आणि फार क्वचित दिसते.

ये लंबी रेस का घोडा है!

आज काय म्हणतोय मँचेस्टरच्या हवामानाचा अंदाज?

त्या सुपरसॉपर पेक्षा 'मांजरपाठ' घेऊन मैदान कोरडे केले असते तर लवकर कोरडे झाले असते! Wink

ये लंबी रेस का घोडा है!>>> अगदी अगदी!!

*भाऊ रेकॉर्ड होईलच की अजून.* माहित आहे. जरा गंमत केली इतकंच.
*स्टीव वॉ कॉमेंट्रीला असताना त्याचा व्हिडिओ दाखवत होते.* - मान्य. पण किती वेळ व सेमीफायनल सुरू असतांना !!

त्यांना चार सुपर सॉपर आणि पन्नास माणस ठेवायला काय जात. उगाच फक्त १०-१२ माणस लाउन वेळ लावतात. तिथे जाग्यावर मदतीचे आवाहन केल तर भारतीय प्रेक्षकच वेळ आली तर शेकड्याने उतरतील मदत करायला. Happy
भारतीय चाहत्यांच्या जबरदस्त पाठिंब्याचा बाकीच्यांनी धसका घेतलाय. Happy

भाऊ मस्त.. पोस्ट आणि तीनही व्यंचि.. Happy

थंड डोक्याचे फास्ट बोलर म्हंटल्यावर कोर्टनी वॉल्शची आठवण झाली.. त्याच्या नंतर बहुतेक बुमराह आणि भुवीच.. बाकी मधले सगळे तुडतुडेच होते..अ‍ॅम्ब्रोस, डोनाल्ड, मॅकग्रा, अक्रम, अख्तर वगैरे मंडळी कायम पेटलेलीच असायची... भुवी तर इतका गरीब बिचारा दिसतो की हा फास्ट बॉलर असेल असं वाटतच नाही! Happy

मँचेस्टरला थेट रात्री आठला पाऊस आहे म्हणे. दिवसभर काही नाही. सकाळी सनी आणि मग ढगाळ.

*त्या सुपरसॉपर पेक्षा मांजरपाठ घेऊन मैदान कोरडे केले असते तर लवकर कोरडे झाले असते! * Wink
नक्की आठवत नाही, पण ' मांजरपाठ' शब्दच ' मॅनचेसटर कलाॅथ 'वरून आल्याचं वाचलंय असं वाटतं. जिथं पिकतं तिथं विकत नाही, म्हणून सुपरसाॅपर !! Wink

नक्की आठवत नाही, पण ' मांजरपाठ' शब्दच ' मॅनचेसटर कलाॅथ 'वरून आल्याचं वाचलंय असं वाटतं.>>>> भाऊ बरोबर ! Happy

तिकडे आज देखील 'वरूणच' फलंदाजी करणार म्हणे!

उद्या बॅटिंग देतो असं सांगून गेलेली पोरं परत येत नाहीत हा आमचा अनुभव आहे..
न्यूझीलंड ची टीम येते का चेक करा Wink
साभार- व्हॉट्स अप

*तिकडे आज देखील 'वरूणच' फलंदाजी करणार म्हणे* - आज 'वरूण'ची फलंदाजी बहरणयाची ( आणि बरसणयाची ) शक्यता कमीच . कारण, इथे एखाद्यावर उपरोधिक काॅमेंट झाल्याशिवाय त्याची फलंदाजी बहरलयाचं (वा बरसल्याचं ) आठवत नाहीं ! Wink

*तिकडे आज देखील 'वरूणच' फलंदाजी करणार म्हणे* - आज 'वरूण'ची फलंदाजी बहरणयाची ( आणि बरसणयाची ) शक्यता कमीच . कारण, इथे एखाद्यावर उपरोधिक काॅमेंट झाल्याशिवाय त्याची फलंदाजी बहरलयाचं (वा बरसल्याचं ) आठवत नाहीं ! Wink

232/8

*५० षटकात २४० ची आवश्यकता! * - सहज शक्य व्हावं अशी रास्त अपेक्षा ! 8 फलंदाज ! फलंदाजीची भिंत म्हणायची कीं चायना वाॅल !

मांजरेकरने बाद केले रोहित ला परफेक्ट!

रोहित नुकतीच सुरुवात करतोय आणि हा कॉमेंटरी करत असताना त्याला बाद करण्यासाठी काय करायला हवे हे बोलतोय!

अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांनी विश्वास ठेवायला हरकत नाही!

Pages