विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अति विश्लेषण करून विजयी संघाचा फार्म्यूला तयार करण्याचा चूकीचा अट्टाहास ( माझाही ) करण्यापेक्षा हें परवडलं असं मलाही वाटतं.>> भाऊ अट्टहास करणं हा तर आपल्यासरख्या पॅशनेट फॅन्सचा हक्क आहे त्यात चूक वगैरे काही नाही. आपल्या अट्टहासी विश्लेषणावर थोडीच कोणी प्रत्यक्षात अंमल करणार आहेत आणि केले तरी त्याचे क्रेडिट वा क्रिटिसिझम थोडीच आपल्या वाट्याला येणार आहे.
मग दशकानुदशके ग्राऊंडवर खेळणार्‍यांपेक्षा आपल्यालाच कसे जास्त कळते हे सांगायची संधी आपण का सोडायची. Proud

कालचं आणि आजचं दोन्ही व्यचित्र बाकी मस्त. पण प्रत्येक भजं ऑल-राऊंड पाहिजे बरंका Wink

पण प्रत्येक भजं ऑल-राऊंड पाहिजे बरंका >>>
मला नुसती गोल भजी नको कांद्याची स्पेशल खेकडा भजी पण हवीत बरं का !!
Wink

पाकिस्तान गॅसवर ! 166-6 !
*अट्टहास करणं हा तर आपल्यासरख्या पॅशनेट फॅन्सचा हक्क आहे त्यात चूक वगैरे काही नाही. * खरंय . तुकोबा म्हणतात ना, ' याचसाठी केला अट्टाहास , शेवटचा दीस ( खेळाचा) गोड व्हावा' ! Wink

अफगाणी मस्त खेळतायत.. निकाल काही लागला तरी सरफराज पुन्हा ट्रोल होणार आता !! एकंदरीत अफगाण्यांचा अनुभव कमी वाटतो आहे..

अरेरे ! अफगाणिस्तान साठी वाईट वाटले. हाताशी आलेली मॅच त्या एका ओवर मुळे गेली! खरंय, असे प्रेशर हँडल करायला अनुभव कमी पडला.

हातात आलेली मॅच घालवली यांनी. शिनवारीच्या २ ओव्हर बाकी होत्या. ज्याने जास्ती रन दिले त्यालाच परत ओव्हर देण्याचा अट्टाहास का होता कळले नाही. Sad . जाऊ दे.

पाकिस्तानचा वहिब रशिद हा अत्यंत उपयुक्त व अनुभवी खेळाडू आहे. तो quietly efficient type असल्याने नजरेत भरत नाही. अफगाणिस्तानचं रास्त कौतुक करताना त्याचं श्रेयही अधोरेखित व्हावं.

Lol ... so much for the hunting pair and their suffocation tactics.
पावरप्ले मध्ये स्पीनर्स Proud (स्ट्रॅटेजी म्हणून आणता येतात पण हे क्लीअर डेस्परेशन होते कारण तुमच्या स्ट्राईक बोलर्सना विकेट्स घेणेच जमत नाही)
१४ ओवर्स मध्ये पाच बोलर्स वापरून झाले. पंड्या २ ओवर्स २१.
आणा तो क्रिस्टल बॉल. Proud
देवाचे आभार माना ही नॉक आऊट मॅच नाहीये.

बादवे जेसन रॉय खेळतांना सेहवागची आठवण होते.

अलीम दार चे जीवदान..
कोहलीच्या review नाघेण्याचा निर्णय आणि जेसन रॉय सुटला..
भारतीय संघ हतबल

पडली एकदाची पहिली विकेट.. सर जडेजा यांच्या सौजन्याने..

रच्याकने,
मैदानावर अंपायर्स - अलीम दर आणि कुमार धरमसेना
कॉमेंट्रीला - मांजरेकर आणि रमीज राजा
... याहून अजून काय वाईट होऊ शकतं !! Light 1

मैदानावर अंपायर्स - अलीम दर आणि कुमार धरमसेना
कॉमेंट्रीला - मांजरेकर आणि रमीज राजा
... याहून अजून काय वाईट होऊ शकतं !! ..... एकदम मनातलं .....

जडेजा डझ जडेजा. Happy
आज जडेजा सरांनी घेतलेला रॉयचा कॅच बघून अजय जडेजाचा १९९२ च्या वर्ल्डकप मधला बॉर्डरचा कॅच आठवला. बरंच साम्य आहे दोन्ही कॅच मध्ये आणि दोन्हीही कॅचेस लाँग ऑन आणि डीप मिडविकेटच्या मध्ये घेतल्या गेले.

मी आताच पंचांग आणि रोहित शर्माची कुंडली पाहिली, तुम्हाला सांगायला आनंद होतोय की रोहित शर्माच्या कुंडलीत आज द्विशतक करण्याचा योग आहे. सगळे ग्रह तारे व्यवस्थित आपापल्या स्थितीत आलेत, टीव्ही सोडून कुठेही जाऊ नका.

मला वाटतं ३२० पार स्कोर आहे ह्या विकेटवर. म्हणजे टार्गेट अगदीच टू--फार नाही.
पहिल्या १०-१२ ओवर्स मध्ये विकेट न गमावता ५० जमवता आले तरी चालू शकते. आपण ईंग्लंडसारखे सुरूवातीलाच ७.५-८ च्या रेट ने रन्स बनवायची गरज नाही. खाली पंड्या,धोनी, पंत आहेत आणि स्पीनर्स पण एकच आहे ईंग्लंडकडे त्यामुळे नंतर रन्स नक्कीच बनू शकतात.

२० ओवर्स १०० एखादी विकेट
दोन तीन विकेट्स च्या मोबदल्यात ४० ओवर्स मध्ये २२० च्या आसपास

असे माईलस्टोन्स ठेऊन ते गाठल्यास आपला विन पर्सेंटेज ४० व्या ओवरला नक्कीच खूप चांगला असेल.
रोहित सुर्रुवातीला स्लो खेळ्णार असेल तर ५० झाल्यावरही त्याला आधीचा स्लो रेट मेक-अप करण्यासाठी विकेट न घालवता पीचवर ऊभे राहिले पाहिजे.

२० ओवर्स चा पहिला माईलस्टोन ऑलमोस्ट अचिव केला.
आता ३० ओवर्सला विकेट न गमावता १४५ च्या पुढे मागे पोचायला हवे म्हणजे ४० ओवर्सला २२० चा पल्ला गाठणे शक्य होईल.
सध्या तरी आपण काँपिटिटिव पोझिशनमध्ये आहोत.
शर्माजी आज जरा लाजर्‍या मूड मध्ये आहेत पण लवकरच घुंघट काढून बाहेर येतील. Happy
कोहली लुकिंग फ्लुईड अ‍ॅस युज्वल.

Pages