Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तीन स्टॉंग समजले जाणारे
तीन स्टॉंग समजले जाणारे कंटेस्टंट्स आज घराच्या बाहेर आहेत.बिबॉसनेही त्यांना खूप ड्रामा करून टीआरपी खेचून जाउ दिल
मग आता नेहा आणि शिव हे ही स्टॉंग म्हणून चर्चेत आहेय.त्यांनाही असच जाऊ देणार आहेत का बिबॉ
नक्की या वेळेस ह्य तरी काय?
आम्ही त्याला काढलं नाही, आमची
आम्ही त्याला काढलं नाही, आमची तर ईच्छा होती त्याला ठेवण्याची पण त्याला कुणीच स्वीकारायला तयार नसल्यामुळे तो गेला हे दाखवून बीबॉला हात झटकायचे असतील. लोकांचा रोष ओढवणार नाही आणि परागही बाहेर जाईल. साप भी मरे ओर लाठी भी ना टुटे.
काल ममां ओरडले नसले तरी अ
काल ममां ओरडले नसले तरी अॅक्चुअली नीट बोलले असे वाटले मला. परागच्या ग्रुप ला बोलले ते सर्व मुद्दे खरेच होते. बरोबर क्रॉस क्वेश्चन केले त्यांनी.
किशोरी महा डंब आहे हे सिद्ध झाले पुन्हा. "मला वाटायचं असं ग्रुप मधेच बसावं लागतं" वगैरे तिच्या कमेन्ट्स विनोदी होत्या. रुपाली भंपक. तिला पण ममांनी बरोबर कन्फ्रन्ट केले, नुस्ती फ्रेन्डशिप आहे असा स्टँड आहे ना, मग टकलाचे मुके कसले घेतेस त्याच्या?
पराग ने तोम्डावर केविलवाणेपणा दाखवत असला तरी मुळ अॅटिट्यूड गेलेला नव्हता, बोलायला दिले तर कन्फ्रन्ट करत होता, कांगावे करत होता. कसलं इन्टर्नल पेन बिन सगळा कांगावा वाटला मला तर.
आता पराग ला घरात पाठवण्याचा सीन प्रोमोत दाखवला म्हणजे प्रत्यक्षात उलटे असूच शकते. पण मग या कोर्ट रूम टाइप ड्रामाचा उपयोग नुस्ता टिआरपी की सोमि वरच्या लोकांना जाणीव करून देणे तो नक्की काय आहे?
पराग ला शेवटचं बाय करण्यासाठी
पराग ला शेवटचं बाय करण्यासाठी घरात पाठवलेलं दिसतंय परत.तिथून परत बाय बाय असेल.
त्याने खरच इतका भयानक गुन्हा केला असेल तर त्याला परत कशाला बोलावलं. त्याचंच कसं नेहेमी चूक होतं हे काल त्याला सुनावलं गेलं. बाकी सगळे धुतल्या तांदळा सारखे नाहीत ना. केळ्या आणि वैशाली तर नेहेमीच सहीसलामत सुटतात.
आता उरलेल्या लोकांना बघण्यात काही मज्जा नाहीये . पराग जरा controversy तरी create करायचा.काल मांजरेकर म्हणाले की पराग 24 तास strategy बनवायचा ई ई. पण घरात सगळ्यांना जेवू घालायचं काम तोच करत होता. नेहेमी किचन मध्ये असायचा.
सगळ्यात जास्त पलटी रुपाली ने खाल्ली काल. जुना मित्रा म्हणून 1 तरी वाक्य बोलायचं पराग च्या बाजूने. तिच्यापेक्षा माधव परवडला. जरा बरं बोलला पराग बद्दल.
मला वाटत एक strong स्पर्धक जातोय अनायासे तर कशाला थांबवा म्हणून सगळे पलटले असतील.
पराग ला सगळ्यानि मिळून evict
पराग ला सगळ्यानि मिळून evict केल म्हणे..
जर housemates वरच अवलम्बून होत तर मग कशाला ड्रामा.. बाकी सगळे सत्यवान सावित्रीच आहेत का घरात... आता बिग बॉस बघण बंद कराव म्हणते.. शांत झोप तरी लागेल
आता शीव वीणा हिना यांचा लव
आता शीव वीणा हिना यांचा लव triangle पहायचा बिग्ग बॉस मध्ये .
त्याने खरच इतका भयानक गुन्हा
त्याने खरच इतका भयानक गुन्हा केला असेल तर त्याला परत कशाला बोलावलं. >> एक्झॅटली . फालतू पण नुसता. काढलं ना बाहेर . विसरून जा ना ? बोलवायची नाटक कशाला ? त्याच्या शेवटच्या एंट्री मध्ये पण टीआरपी खेचायचा आहे चॅनलला . फुल टू पराग कडून टीआरपी पिळून घेत आहेत
पराग ला सगळ्यानि मिळून evict
पराग ला सगळ्यानि मिळून evict केल म्हणे.. Sad जर housemates वरच अवलम्बून होत तर मग कशाला ड्रामा.. .. TRP
फुल टू पराग कडून टीआरपी पिळून
फुल टू पराग कडून टीआरपी पिळून घेत आहेत>>+1111
ज्या स्पर्धकांनी त्याला अधीच काढले होते . ते काय 2दिवसांनी परत घेणार होते का ? जरी त्यानि काही केले नसते आणी बाकिच्या स्पर्धकांच्या हातात कोणाला काढणे असते तरी परागलाच काढले असते त्यांनी .
पराग ला काढणे योग्य होते.
पराग ला काढणे योग्य होते. पण त्याच वेळी काढले होते ना . परत कशाला बोलावले. बर नेहा आणी टीम ला जरा सुद्धा जाणिव कारुन दिल्ली नाही की तुमचे पण चुकले होते . ती वैशाली काल पण बोलत होती की गुदगुल्या करत होते म्हणून . परागला ढकलेल्यची clip दाखवायची तरी.म आपण पण चुकीचे वागलो हे तरी त्यांच्या लक्षात आले असते.
बिग बॉस सारखं सारख घरातील
बिग बॉस सारखं सारख घरातील स्पर्धकांना का विचारत आहेत पुन्हा त्याला परत घ्यायचं की नाही ते...आधीच त्यांनी त्यांचा निर्णय सांगितलाय . बिग बॉस ला निर्णय घेता येत नाही का ? .शो तुम्ही प्रेक्षकांसाठी करताय ना. ?..मग जर प्रेक्षकांच्या मताला किंमत नसेल तर प्रेक्षकांची मत मागता कशाला ? कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचाय सगळं तुम्हीच ठरवणार मग प्रेक्षकांची मत पाहिजेत कशाला ?
काल नेहा जाम आवडली. केवढं
काल नेहा जाम आवडली. केवढं मुद्देसूद बोलते! परागच्या जाण्यासाठी ती एकटी जबाबदार नाही, तिनी सगळ्यांची मतं विचारुन प्रत्येकालाच तो कसा नको आहे हे ठासून सांगितलं. गो गर्ल!
काल ममा चं बोलणं पण आवडलं. बॅलन्स्ड!
शिव, किशोरी यांना कशा पद्धतीनी टॉर्चर करताहेत हे बघितल्यावरच परागनी हेल्थ च्या कारणासाठी बिबॉला सांगून बॅकाऊट व्हायला पाहिजे होतं. कारण जे काय चाललं होतं ते खेळाचाच भाग होतं. बिबाँनी त्यावर काहीच ऑब्जेक्शन घेतलेलं नव्हतं.
त्याला संपूर्ण वैद्यकीय तपासणी करुन बिबॉमुळे हेल्थला काही झालं नाही असं लिहून दिल्यावरच सोडतील बहुधा!
आता शिवला हार्ट कोण करुन देईल?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Q8emjVrO3Qo
https://www.youtube.com/watch?v=Wp78bw1qRgs&t=48s
https://www.youtube.com/watch?v=kAOj4TYoZ28&t=64s
काय माजलेला आहे पराग.. चोर तो
काय माजलेला आहे पराग.. चोर तो चोर वर शिरजोर.
हो ना, म्हणे मला माधवचे पटतंय
हो ना, म्हणे मला माधवचे पटतंय. का तर तो त्याला स्ट्राँग प्लेयर म्हणाला
लेटेस्ट स्पॉयलर नाही पाहिलेत , पण एकदा कोर्ट रूम झाल्यावर पुन्हा घरात फेस टु फेस पाठवण्याचा काय हेतू आहे ? अजूनही सिक्रेट रूम पॉसिबिलिटी आहे का?
आता बिग बॉस बघण बंद कराव
आता बिग बॉस बघण बंद कराव म्हणते.. शांत झोप तरी लागेल
नवीन Submitted by तुरू on 30 June, 2019 - 07:21 >> हेच मनात आले.
पण housematesना निर्णय घ्यायच्यासाठी परागला घरात नेण्याची काय गरज. बाहेरुनच विचारता आले असते. वर लिहिल्याप्रमाणे जर घरात घेउन परत बाहेर काढले असेल तर अशक्य मूर्खपणा आहे.
पराग परत घरात आला नाहि तर बरं
पराग परत घरात आला नाहि तर बरं आहे; त्याच्या आणि घराच्या भल्यासाठी. आणि त्याने अँगर मॅनेजमेंटचा कोर्स शक्यतो लवकरात लवकर पुर्ण करावा. दुसरीकडे नेहाला हि बाप्पाचा सल्ला (सगळ्या बसमागे धावायचं नसतं) समजलेला दिसत नाहि किंवा तीला नपोलियन कांप्लेक्स असण्याची दाट शक्यता आहे...
कालचा परागचा अॅटिट्य्ड
कालचा परागचा अॅटिट्य्ड चुकिचा होता त्याने माफी मागितली पण परत स्वत;ला डिफेन्ड करायला सुरवात केली, त्याने नक्कि काय केल ते बीबॉ कळु देणारच नाहित पण चुक त्याची एकट्याची नाही हे नक्कि (त्यात आदल्यादिवशी आखी टिमच नॉमिनेट झाल्याने तो वैतागला होता बहुधा)
वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे सुपु याला जास्त जबाबदार आहेत त्यानी अतिशय सुमार पद्धतिने हा टास्क हॅन्डल केला पण बीबॉने नेहाला कशाला बोलावुन सान्गायच? सरळ स्वतःच टास्क पॉझ करा ना त्याने दोन्ही टिमला ब्रेक मिळाला असता आपोआपच पुढचा अनर्थ टळला असता.
एरवी बेन्बिच्या देठापासुन ओरडणारे ममा काल शान्त भाषेत नेहा,वैशाली आणी केळ्याला समज देत होते त्याने कपनीला ला कळलच नाही आपण काय लेव्हल ला जाउन उकसवल ते
माझ्या मते पराग काही खुप हुशार वैगरे नव्हता गेममधे त्याच्या स्टॅटर्जी पण फुसक्याच असायच्या पण एव्हिक्ट होण्याइतका बण्डल पण नव्हता त्याच्यापेक्षा सुपु,किशोरी,रुपाली कितितरी विक आहेत.
बाकी काल परागला आणण्यामागे सोमी वर पब्लिकला जाणवुन देण की आम्ही येवढ होवुनही त्याला एक चान्स देन्ञाचा प्रयत्न केला
एका अनसीनमध्ये शिव आणि हीना
एका अनसीनमध्ये शिव आणि हीना त्यांची हा शो स्वीकारण्यामागची कारण सांगत आहेत.
शिवच्या मते रोडिज मुळे तो दिल्ली,कलकत्ता ,इथे माहित आहे.आणखी त्याने एका शोच नाव घेतल.स्पिटविला अस काहीतरी होत,मला माहित नाही,तसच mtv.वर पण तो फेमस आहे,पण महाराष्ट्रात विशेषकरून मराठी इंडस्ट्री मध्ये त्याला स्वत:ची ओळख निर्माण करायची आहे.त्यिला अभिनय क्षेत्रात यायच आहे.त्यासाठी हा शो त्याला मदत करेल ,अस त्याच मत आहे.
एकंदरीत पोरग हुशार आहे.
हीनाच वेगळच काहीतरी,तिला म्हणे हिंदी बिबॉसमध्ये जायच आहे.आता इथे तिला पाहिल्यावर हिंदीमध्ये चान्स मिळेल अस तिला वाटत आहे.
म्हणून तिने हा शो स्वीकारला.
शिव splitsvilla मध्ये नव्हता
शिव splitsvilla मध्ये नव्हता कधीच..
Maybe next season मध्ये असू शकतो
कारण त्यात बहुतेक जण Roadies मधलेच असतात..
Eg. Prince Narula
आधी roadies मग Splitsvilla आणि मग BB
नॉमिनेशनबाबत वीणाचा त्यांनी
नॉमिनेशनबाबत वीणाचा त्यांनी एकच मु द्दा पकडला की मला विनर करा. तिचा दुसरा मुद्दा हा होता की ज्या मुद्द्यांवर हीनाला माझ्याविरोधात स्वर्गात पा ठवलं त्याच मुद्द्यांवर तिला माधवविरोधात स्वर्गात पाठवायला हवं होतं. >>> तिचा दुसरा मुद्दा वॅलिड होता पण ममांचा लाडका आहे माधव.
हीना प्रचंड इरिटेटिंग आहे. एक धागा घेऊन तो ताणत बसते. वीणा- टिश्युज आणि शिव- डान्स प्रकरण. >>> अगदी अगदी, ही जुईसारखी किरकिरी वाटते मला.
परागच्या तोंडून तोच कसा चुक
परागच्या तोंडून तोच कसा चुक आहे वदवून काढणार होते, असं काल वाटलंच. बिग बॉसने स्वतःची आणि इतरांची कातडी वाचवली.
मलापण पराग नंतर आवडेनासा झाला होता पण काल त्याचं केविलवाणं रुप बघवलं नाही. त्याला फिनालेला पण बोलावतील असं नाही. शिवानी, बिचुकले, पराग या तिघांनाही बोलावणार नाहीत.
हे सगळे खरच actors आहेत.. तो
हे सगळे खरच actors आहेत.. तो पराग बाहेर गेला आणि बर्फी काय खाल्ली.. हसायला काय लागले.. सगळं खोटंच वाटतय.. आता scripted वाटतय..
किती नाटकी आहेत सगळे..
किती नाटकी आहेत सगळे..
हसणं, चिडवणं सगळंच फेक वाटतंय..
आजच्या स्क्रिप्टमध्ये 'हसा' असं लिहून आलंय बहुतेक
काय फालतू गिरी यार..म्हणे
काय फालतू गिरी यार..म्हणे पाया पडून माफी माग..अशीच माफी माग..तशीच माफी माग.. माहितच होत की माफी नाही मिळणार मग बिग बॉस ने कशाला त्याला अजून अपमानित व्ह्यायला आत पाठवल??? नाहितर स्वताच निर्णय द्यायचा होता की त्याला re enter करत आहोत.. मी तर पुढचा पांचटपणा बघियतलाच नाही..बंद केला प्रोग्राम..आता उरलेला गाळ बघण्यात काही inrest नाही..की नविन नविन प्रकारचे हार्ट बनवायला शिकायचे नाहित..रुपाली तर कसली पलटली.. एकदम जहाल बोलली..
बाकी सगळे धुतल्या तांदळा
बाकी सगळे धुतल्या तांदळा सारखे नाहीत.vaishali and neha tar dramebaj ahet...I m not going to see big boss now..parag Kadun chuk zali understood..but evadha episode khechaychi garaj navhti...abheejit kelkar pan dramebaj...don't vote for neha vaishali and abhijeet.
आजच्या स्क्रिप्टमध्ये 'हसा'
आजच्या स्क्रिप्टमध्ये 'हसा' असं लिहून आलंय बहुतेक..........भारी,हसणारी बाहुली.
शिव splitsvilla मध्ये नव्हता
शिव splitsvilla मध्ये नव्हता कधीच......तो म्हणाला की मला जायच आहे.पण या शोमुळे मराठी इंडस्ट्रीत काम मिळतील.
उद्या पासून चला हवा येऊ दया
उद्या पासून चला हवा येऊ दया चा trp वाढणार... निलेश बाबा तू तरी चांगली स्क्रिप्ट बनव रे...bye bye colors
पराग ला बळीचा बकरा बनवून बिबॉ
पराग ला बळीचा बकरा बनवून बिबॉ ने भरपूर टी आर पी खेचला.त्याने national TV वर लोळण घेऊन माफी मागावी अशी अपेक्षा होती का लोकांची. वैशाली नुसती गायीका नाही तर उत्तम नायिका पण आहे हे कळलं आज.रुपाली आणि किशोरी आता पटापट निघतील बाहेर.
पराग जे बोलला जाताना तेच खरं. त्याला अनायसे काढता येत होतं तेच सगळ्यांना हवं होतं.
आता या सगळ्यांच्या डोक्यावर बसायला एक मस्त स्ट्रॉंग wild card entry पाठवायला हवी.आणि त्याने सगळ्यांना जागेवर आणायला हवं.
Pages