मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तारीख अनाउन्स झाली का ?
तारीख आली कि अपडेट करा, आम्ही कलर्स मराठी पहात नाही अदरवाइज.
ज्यांची नावं लिक होतात त्यातले फार कमी अ‍ॅक्चुअल स्पर्धक असतात , कॉमनर्स नसले म्हणजे मिळवलं !
मागच्या सिझनला टास्क साठी पाहुणे म्हणून आलेले १-२ बरे होते, तो खुलता खुळी मधला दाढीवाला ओमप्रकाश, घाडग्यांची सुनबाई हे मस्तं टफ वागले होते हाउसमेट्सशी !

राधा प्रेम रंगी रंगली संपतेय, त्यातले बरेच जण असतील नवीन पर्वात असं यु ट्युबवर बघितलं>>>
सचित पाटील perfect candidate आहे बिबॉसाठी.. आधी प्रसिद्ध, मग कुठेतरी गायब, मग controversy आणि आता टीव्ही सिरीयल... एकदम package आहे

ती जुनी शनाया इथे एलेला असते अता, शिकतेय काहीतरी, बिबॉ साठी १०५ दिवस सुट्टी काढायला लागेल तिला Happy

सचित पाटील perfect candidate आहे बिबॉसाठी. >>> हा सोडून दुनियाभरातले सर्व आहेत त्या सिरीयलमधले वुडबी कॅन्डीडेट. नायिका, खलनायिका, हिचे बाबा, त्याचे बाबा वगैरे वगैरे.

शैलेश दातार, गौतम जोगळेकर, विणा जगताप, अर्चना निपाणकर ही नावं आहेत चर्चेत. अर्चना आणि शर्मिष्ठा राऊत एक्स नणंद भावजय आहेत. श रा मागे येऊन गेली, मग आता अर्चना येणार असेल.

ती जुनी शनाया इथे एलेला असते अता, शिकतेय काहीतरी, बिबॉ साठी १०५ दिवस सुट्टी काढायला लागेल तिला >>> ती कधी गेलीय, एक वर्ष झालं असेल तर येईल परत. एक वर्षाचा कोर्स आहे असं म्हणाली होती बहुतेक, वाचलं कुठेतरी. तसं असेल तर नक्की येईल. एक वर्ष झालं नसेल तर नाही येणार.

आधी प्रसिद्ध, मग कुठेतरी गायब, मग controversyआणि आता टीव्ही सिरीयल... एकदम package आहे

>>>> कसली controversy?>>>>>
काही वर्षांपूर्वी गोव्यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या स्पामध्ये सापडला होता.. मराठी पेपर आणि न्युज चॅनेलमध्ये बरीच चर्चा झाली होती

अक्षया गुरव म्हणजे राधामधली अन्विता हिने आपण बिग बॉसच्या घरात जात नसल्याचे तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आणि platinummarathi.com यामधल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितले आहे.
शैलेश दातार सुभाच्या अश्रुंची झाली फुले मध्ये काम करणार आहे.50 प्रयोगच करणार आहेत,पाडवा किंवा एप्रिल एंड पर्यंत नाटक येत आहे,त्यामुळे,तो ही नसावा
बाकीच्यांच माहित नाही.
अर्चना आणि शरा नणंद भावजया आहेत ते इथे कळल.

अर्चना आणि शरा नणंद भावजया आहेत ते इथे कळल. >>> होत्या. डीव्होर्स झाला अर्चनाचा भाऊ आणि श राचा. ते मराठी बि बि मधे समजलं, डीव्होर्सचं.

https://www.youtube.com/watch?v=RwLGjuFvlyg

यात स्पर्धक म्हणून सुप्रिया पाठारे येणार म्हणतायेत, पण नुकतीच तिची नविन सिरीयल सुरु झालीय, स्टार प्रवाहवर.

शशीराम ज्या गोष्टी तुम्हाला बोरींग वाटतात ना त्याच गोष्टी आम्ही एकदम चवीने वाचतो

तुम्हाला वाचायला बोर होत असेल वाचु नका प्लिज.

आता वाटू दे भले बोरींग पण एकदा सीझन सुरु झाला की धागा पेटायला वेळ लागत नाही!
तुमच्या त्या राजकारणाच्या धाग्यावर काय हमरीतुमरी असेल इतकी जुंपते इकडे!
या वेळ काढून निवांत!

केतकी चितळे....नाव चर्चेत आहे.कलर्स मराठी च्या सीरीयल मधून काढून टाकलयं तिला.(प्रोडूसर शी भांडण).पण नकोच ती.खूप अर्रोगंट म्हणून फ़ेमस.

Pages