मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पराग जर म्हणतोय की वैशालीने जे केलं त्यामुळे त्याला इंटर्नल ब्लीड होतंय आणि तीन वेळा डॉक्टर आले तर मग वैशाली अजून घरात का आहे?
मला आता शिवानीच हुश्शार वाटते आहे , ती या पागलखान्यातून वेळीच बाहेर पडली. पराग तरी परत घरात का जातोय? नुसता माफी मागण्यापूरता जात असेल तर ठीक पण तिथे राहायचं कशाला? जर बिग बॉस वैशाली आणि नेहावर काहीच कारवाई करणार नसतील तर त्या बायका पुढच्या वेळी परागचा जीवच घेतील.

शिव वीणा च्या मैत्रीला सगळ्यांचा विरोध का आहे, ते गेम पलीकडे जाऊन एकमेकांना धरून आहेत, दु:ख शेअर करतात>> कारण ते वेगवेगळ्या ग्रुप मध्ये आहेत . आणी ते दोघे सारखे एकत्र असतात आणी बाकिच्याना वेळ देत नहित. म्हणजे वीणा ,रुपाली आणी किशोरी बरोबर ग्रुप मध्ये आहे. खर त्यांच्याशी बोलायला किन्वा चर्चा करायला तिला वेळच नाही ती सारखी शीव मागे असते. जास्त वेळ शीव बरोबर घालवते. तिला रुपाली आणी किशोरीला पण वेळ द्यायला हवा . सेम याच गोष्टी वरुन मेघा सई पुष्कर वर चिडायाची.

पराग जर म्हणतोय की वैशालीने जे केलं त्यामुळे त्याला इंटर्नल ब्लीड होतंय आणि तीन वेळा डॉक्टर आले तर मग वैशाली अजून घरात का आहे? >>> हे कधी म्हणाला.

एनीवे मलाही वाटतंय त्याच्या वैद्यकीय तपासणीत काहीतरी त्रास झालाय हे समोर आलं तर सगळेच अडकू शकतात परागसकट त्यामुळे काहीतरी मलमपट्टी होणार. परागही असं असेल तर जाऊ शकतो सर्वांविरुद्ध कोर्टात कि मी असं वागलो कारण असं झालं. मला मोठी शिक्षा द्याच पण ह्यांनाही थोडीतरी व्हायला हवी असं सांगू शकतो.

म्हणून एकंदरीत पढवून पाठवलं आहे त्याला.

जास्त वेळ शीव बरोबर घालवते. >>> ह्या दोघींपेक्षा वैशाली आणि केळकर सारखे टोचत असतात शिवला. त्याने सांगूनही थांबत नाही.

मला आता शिवानीच हुश्शार वाटते आहे , ती या पागलखान्यातून वेळीच बाहेर पडली.
मला पण असच वाटत आहे.खरतर परागने जाऊच नये.

वैशाली आणी केळकर ला वाटते शीव ने हीना बरोबर रहावे तिला हर्ट करु नये कारण हिना मुळे त्यांचा ग्रुप तयार झालाय. माधव आणी नेहा त्याना addझालेत.

मला आता शिवानीच हुश्शार वाटते आहे , ती या पागलखान्यातून वेळीच बाहेर पडली. >>> Lol

आपल्याला बाहेर इतके कळू देणार नाहीत पण bb स्वत: आणि इतर स्पर्धक दोषी दिसल्याशिवाय परागने केलेल्या मोठ्या कृत्याला परत दोन दिवस का होईना यायची संधी देणार नाहीत असं वाटतंय.

एखादवेळेस उद्या काढतील पण त्याला संधी दिलीना परत यायची हे महत्वाचे.

शीव ने हीना बरोबर रहावे तिला हर्ट करु नये कारण हिना मुळे त्यांचा ग्रुप तयार झालाय. >>> अरे त्याला ठरवूदेना, जबरदस्ती का.

सिक्रेट रूममध्ये परागला पाठवणार नसतील तर वीणाला पाठवतील. शिव हीना मसाला तयार करायला पण हीना गळ्यात पडेल जास्त, हा नाही वाटत.

शिवानी आणी पराग हे दोघे ही चिडले तर काहीही करु शकणारे आहेत.
शिवानीच्या लक्षात आलेले की येथे आपल्याला चिडण्यासारखे रोज काहितरी घडणार आहे . म्हणूण तिने जायचा निर्णय घेतला. ती म्हणत होती मी घेतलेला निर्णय माझ्यासाठी योग्या आहे .

पराग तोंडाने वाटेल ते बोलायच्या पण फिजिकली काही करायचा नाही, शिवानी आधीपासून फिजिकल attack करत होती. त्याने शिवानीच्या वेळी तरी sportingly घेतलं.

आता जर त्याने असं केलं तर त्याने परवा स्वतः हून सांगायला हवं होतं, माझी चूक अशी आहे कि मी माफी मागण्याच्या लायकीचा नाही. बाहेर पडायला हवं होतं असं वाटतं. पण त्याला खरंच काही त्रास होत असेल आतून त्या task नंतर तर त्याची बाजू एकदम कमकुवत नसेल. त्यामुळे तो परत आला किंवा आणला गेला का.

का कुणास ठाऊक मला काहीतरी गोम वाटतेय. बिग बॉस वर प्रकरण शेकू नये म्हणून त्याला आत येऊन माफी मागायला लावून परत पाठवतील. ऋतुजा धर्माधिकारी येणार आहेना. मग परागला ठेवतील असं वाटत नाही.

सोशल मिडीयावर , वरती कोणीतरी लिहिलय तेच मेसेजेस फिरतायेत परागबद्दल , पण कपडे फाडले वगैरे दिसले नाहीत, नेहाने अजुन खूप आवाज चढवला असता तसे झाले असते , मारामारीत पकडताना टीशर्टला धरून खेचल असेल कदाचित.
अफवा पसरतच रहातील जोवर पराग नेहा पैकी कोणी बाहेर येऊन सांगत नाही नक्की काय झाले ते !
पण अगदी हेच पुन्हा सिध्द हितय कि मुलींनी टी शर्ट मधे हाय घालून गुदगुल्या केलेल्या चालतायेत बिबॉला आणि ऑडीयन्सला , मुलानी हात लावला तर मॉलेस्टेशन चार्जेस लागतायेत !
मागच्यावेळी आस्ताद बरोबर बोलला होता मग कि झेंडे कपड्यांमधे लपवु नका, चुकून एखाद्या पुरुषाचा धक्का लागला तर आम्हाला केवढ्याला पडेल ते !
बिबॉने इथून पुढे लेडीज ओन्ली/ मेन ओन्ली टास्क्स ठेवायची वेळ आली आहे.

डीजे तेच कपडे फाटलेले तर दिसत नव्हते तिचे, असं बऱ्याच जणांनी लिहिलं आहे. मलाही नाही दिसले.

पण अगदी हेच पुन्हा सिध्द हितय कि मुलींनी टी शर्ट मधे हाय घालून गुदगुल्या केलेल्या चालतायेत बिबॉला आणि ऑडीयन्सला , मुलानी हात लावला तर मॉलेस्टेशन चार्जेस लागतायेत !
मागच्यावेळी आस्ताद बरोबर बोलला होता मग कि झेंडे कपड्यांमधे लपवु नका, चुकून एखाद्या पुरुषाचा धक्का लागला तर आम्हाला केवढ्याला पडेल ते ! >>> अगदी अगदी.

काहीजण असंही लिहितायेत, कि परागने एवढं केलंय तर नेहाच्या घरचे का गप्प आहेत. पोलीस कम्प्लेंट का नाही केली.

बिबॉला आणि ऑडीयन्सला , मुलानी हात लावला तर मॉलेस्टेशन चार्जेस लागतायेत ! >>> ह्याबद्दल आज सुनावलं ममांनी हीनाला कि तू बीभत्स खेळलीस, मला बघवत नव्हतं असं जर एका मुलाने केलं असते तर.

पण फार खालच्या सुरात बोलले नेहा, वैशाली, हीना, सुरेखाताई यांना. हेच शिव वर आणि परागवर किती आवाज चढवला होता ममांनी मागच्या आठवड्यात. खूप टीका होतेय याबद्दल सो मि वर.

किशोरीताई पण सांगत होत्या मुली गुदगुल्या नाही, नखे टोचत होत्या आणि ते जर खरं असेल तर परागला नखे टोचलेली दिसली असतीलही मेडिकलमध्ये.

https://www.youtube.com/watch?v=ACxb52ipB74 या लिन्क वर पहिल. त्यवरुन अस दिसत आहे कि पराग ने नेहा वर हात उगारला.... काय खर आनि काय खोट माहित नाहि...

परागने इंटर्नल ब्लीडिंग नाही म्हटलं वेदना होताहेत, असं सांगितलं.

इतरत्र पसरवली जाणारी माहिती आणि स्पेक्युलेटिव्ह वातम्या/ पुड्यांवर विसंबून उगाच त्यावर वेळ घालवण्यात अर्थ नाही. प्रत्यक्षात काय दिसतंय (दाखवलं जातंय) तेवढंच आपल्यापुरतं खरं.
वर जे पराग च्या लाथा, कपडे फाडण्या बद्दल लिहिलंय, तर इतकं स ग़ळं झालं असतं तर नेहाची रिअ‍ॅक्शन अशी नसती. ती सगळ्यांत आधी calm and composed झाली होती.
माझ्या मते या आठवड्यात तरी सुरेखा घरात राहायला अपात्र आहेत. त्यांना खेळ समजत नाही. त्या स्वतःची जबाबदारी उचलत नाहीत. संचालिका असताना पूर्ण पार्शल होत्या आणि बहुतेक काही कामंही करत नाहीत. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच ही परिस्थिती ओढवली हे खरंय.

माधव बॉल स्विंग होत होता काय बडबडत होता? मनोर्‍यावर लावलेला नेम बॉल स्विंग होऊन तोंडावर जाईल? मग त्याला लगेच इं ग्लंडला पाठवलं पाहिजे भारताच्या संघात सामील करायला.

त्या नेहाच्या फेसबुक पेजवर तिच्या प्रशंसकाच्या पोस्टस कमीच आहेत. लोकांनी तिला जबरी नावं ठेवली आहेत.

माधव बॉल स्विंग होत होता काय बडबडत होता? मनोर्‍यावर लावलेला नेम बॉल स्विंग होऊन तोंडावर जाईल? मग त्याला लगेच इं ग्लंडला पाठवलं पाहिजे भारताच्या संघात सामील करायला. >>> Lol

तो ममांचा लाडका आहे. तो क्रिकेटवेडा आहे का क्रिकेटियर आहे माहिती नाही पण ते त्याचं क्रिकेटवरून कौतुक करत असतात. प्लस तो channel च्या गाजलेल्या सिरीयलमध्ये पण होता.

केळकरपण लाडका आहे.

चढ्या आवाजात ह्या सर्वांना सुनवायला हवं होतं, नेहा आणि वैशालीला जास्त. नशीब हीनाला बीभत्सपणा केला हे तरी बोलले. ती आयडिया पण बहुतेक नेहाची होती. कारण हीना सांगत होती, आम्ही असं ठरवलेलं वगैरे.

परागने इंटर्नल ब्लीडिंग नाही म्हटलं वेदना होताहेत, असं सांगितलं. >>> हो. तेच मलापण आठवत नव्हतं इंटर्नल ब्लीडींग बद्दल काही म्हणाला असं.

महेश मांजरेकर worst host.
चढ्या आवाजात सुनावल नाही हे जाऊच द्या ,पण आज महत्तवाचा मुद्दा काय होता आणि हे त्या वीणाच्या ग्रुपला टार्गेट करत होते.
या भागात शिव आणि वीणा चा विषय महत्वाचा होता का?
तरी किती वेळ तेच चालू होत.
जेव्हा वीणाने हीनाच्या हिंदी, इंग्लिश बोलण्याच्या मुद्द्याला हात घातला,तेव्हा ममांंनी विषय बदलला.
किशोरीला म्हणाले तुला कन्फेशन रुममध्ये फुटेज दाखवतो.
मग नेहा,वैशाली ,केळकरलापण तुम्हाला फुटेज दाखवतो अस का नाही सांगितल?
ते वीणा शिव,रुपाली पराग,माधव च पचकी म्हणण हे मुद्दे खरतर इतके महत्वाचेच नव्हते.
परागला जास्त बोलून देतच नव्हते.
ककिशोरीचा ग्रुप आयसोलेटेड असेल
पण नेहाच्या ग्रुपमध्ये पण वीणा आणि शिव,पराग हे च विषय असतात
त्याबद्दल चकार शब्द नाही.
शिवमुळे आज मोठा ग्रुप सेफ झाला,म्हणछन ममांना तो चांगला वाटला का.गेले तीन आठवडे तो शिवच बोलणी खात होता.
ममां त्या छोट्या ग्रुपलाच का टार्गेट करतात,वास्तविक एक पराग आणि वीणा व्यतिरिक्त बाकींंच्याकडून काही धोकाच नाही आहे.

नाही, मांजरेकर काल खूप चांगलं बोलले. तुम्ही टास्कपुरते , नॉमिने शनपुरते ग्रुप करा, पण बाकीच्या वेगळी सगळ्यांशी मिळून रहा, हे म्ह णणं बरोबर आहे. वीणा हे करते. सुरेखांना टास्कमध्ये अगं तुगं केल्यावर लगेच त्यां ना सॉरीही म्हणाली.

नॉमिनेशनबाबत वीणाचा त्यांनी एकच मु द्दा पकडला की मला विनर करा. तिचा दुसरा मुद्दा हा होता की ज्या मुद्द्यांवर हीनाला माझ्याविरोधात स्वर्गात पा ठवलं त्याच मुद्द्यांवर तिला माधवविरोधात स्वर्गात पाठवायला हवं होतं.

व्हू टवर व्हिडियोच्या आधी हा कार्यक्रम voyeuristic असल्याची पाटी क्षणभर दिसते. टीव्हीवरही दिसत असावी, मी तेव्हा फा फॉ करत असल्याने पाहिली नाही.
(तसं असेल, तर maybe this is not my cup of tea. आता पाहतो आहे, तर शेवटपर्यंत पाहीन. जिथे नको वाटेल तिथे फाफॉ आहेच. किंवा ए पिसोड स्किप करेन. )

त्या अर्थाने या शोसाठी वैशाली, अभिजीत केळकर आणि नेहा या best content provider आहेत. परागच्या वागण्यात मला दुसर्‍याला त्रास द्यायची इच्छा दिसली नाही. फक्त मांजरेकर म्हणाले तसं आपणच हे सगळं आपल्याला हवं तसं करून नेऊ, हा अ‍ॅटिट्यूड त्याला नडलाय.

वैशाली आणि अभिजीत शिवशी बोलत असताना त्याचा में दू कुरतडत असल्यासारखं वाटतं.
हीना प्रचंड इरिटेटिंग आहे. एक धागा घेऊन तो ताणत बसते. वीणा- टिश्युज आणि शिव- डान्स प्रकरण.

डीश टीव्ही एचडी वर एखादी मालिका संपली, की पुढची मालिका सुरु होण्यासाठी उरलेल्या वेळेत, 'मन बावरे', 'घाडगे' वगैरे मालिकांच्या आठवड्याभरातल्या घटनांचा सारांश दाखवतात. कालही शेवटी अर्धा तास उरला असताना असंच झालं म्हणून चॅनल बदललं.. नंतर समजलं की कालचा भाग ठरलेल्या वेळेतच संपला. त्या आधी १०-१५ मिनिटं फोन वर होतो, असा एकूण साधारण पाउण तास शेवटचा पाहता आला नाही.
जेवढं पाहिलं त्यात फक्त पराग आणि समर्थक यांची शाळा घेणे चालू होतं. नेहा आणि समर्थकांकडे मी तुमच्या कडेही येणार आहे, म्हणत वेळ आली तेव्हा सौम्य शब्दांत झापलं गेलं. अपवाद माधवचा..
मागेही एका विकेंडच्या डावामधे पराग कोणाशी कसं वागतो हे एकदम तपशीलवार उघड केलं होतं ममा ने. भले तो त्याच्या मते स्ट्रॅटेजीचा भाग असला तरी ! पार उघडा पाडला होता की तेव्हा त्याला. शिव आणि विणा बद्दल केळ्या आणि वैशाली काय काय बोलतात, मुद्दाम हिना चा वापर करुन कसं उकसवतात, हे का नाही सांगत ममा ? केळ्या आणि वैशाली यांना कायम फारच जपून, मोजून मापून बोलतात ममा असं जाणवतं.
शिव या आठवड्यात सगळ्यात चांगला खेळला हे मान्य केलं आणि त्याचं कौतुक केलं हे मात्र चांगलं केलं.
शिव ची पण काल चिडचिड झालेली दिसली. माधव वरचा राग ग्लास वर निघाला. त्यावर ही वैशाली आणि केळ्याचा शहाणपणा चालूच होता.

...आणि टास्क पुरती टीम करा, बाकी वेळी सगळे मिळून मिसळून मजा करा, वगैरे बोलायचं आणि सगळे छान मिळून मजा करतायत, असं दिसलं रे दिसलं की काहीतरी करुन ठिणगी पाडायची असंच दिसलंय आतापर्यंत. पिकनिकला नाही आले आहात वगैरे टोन्ट्स वेगळे आहेतच !

आजच्या भागात पराग घरात येतो आणि माझं कोणीच वेलकम करणार नाही ना विचारतो अशी जाहिरात दिसली..
त्यामुळे आजचा भाग पण पुन्हा एकदा जाम टीआर पी खेचणार Happy

मला वाटतंय परागला काढून टाकणार..
मांजरेकरांचा/colors चा पॅटर्न कळायला लागलाय आता..
शिवानीलाही काढून टाकताना आधी झाकून ठेवलेल्या/ कौतुक केलेल्या चुकांचा पाढा वाचला होता.. माधव, नेहा पब्लिकलाही बोलले होते शिवानीला सपोर्ट केल्याबद्दल..
बिचुकलेच्या वेळी पण तसंच केलं..
काल तेच केलं..
सोमिवर फिरतंय तसा तो वागला असता तर त्याक्षणी हाकललं असतं..
नक्की काय आहे ते colors वाले कळूच देणार नाहीत..

परागला घ्यायचे कि नाही हे पुन्हा हाउसमेट्सवर सोपवले म्हणे, अर्थात सगळ्यांनी नकार दिला आणि अखेर पराग एलिमिनेट झाला अशा न्युज आहेत .
पराग अजिबात आवडत नसला तरी अगदी कालपर्यन्त अत्यंत कॉन्फिडन्ट दिसणारा माणुस आज केविलवाणा दिसत होता बघून वाईट वाटले !
सर्वात नौटंकी, संधीसाधु, रंग बदलणारी ठरली रुपाली !
इतके दिवस परागच्या मागे राहून खेळायची, फक्तं त्याच्यामुळे स्क्रीन टाइम मिळायचा, आता व्हिलन ठरताच लग्गेच हात झटकून मोकळी , स्ट्राँग काँपिटिशन गेल्याचा मोकळा श्वास टाकला तिनी पण काल मात्र रडायचं नाटक , आज थोडीही बाजु घेतली नाही सो कॉल्ड मित्राची , किशोरी आणि वीणाही त्याच्या विरुध्द बोलल्याच , दिसली यांची युनिटी रिस्पेक्ट- लव्ह Proud
पब्लिकने आज मांजरेकरचा कितीही उध्दार केला असला तरी मला एका गोष्टीचा फार आनंद झाला कि त्यांनी केव्हीपीआर गृपचा ओव्हरकॉन्फिडन्स जमिनीवर आणला आणि किती भंपक आहे याची जाणीव करू दिली !
वीणा आजही चांगली बोलली आणि शिव बेस्ट परफॉर्मर ठरला हे ही आवडलं.
या सिझनला सगळे ओवह्रहाइप्ड स्पर्धक तसेच निघून जातायेत आपापल्या कर्मानी , पब्लिकला व्होट करायचे कामच नाही Happy
आता ऋतुजाला आणून तरी काही फरक पडेल का प्रश्नच आहे, सगळ्या बायकाच बायका घरात !
बरय म्हणा हरासमेन्ट इस्युज होणार नाहीत, सगळी लेडीज ओन्ली टास्क ठेवा आणि उरल्यासुरल्या पुरुषांना संचालक बनवा कॅट फाइट्स बघत !

तरी मला एका गोष्टीचा फार आनंद झाला कि त्यांनी केव्हीपीआर गृपचा ओव्हरकॉन्फिडन्स जमिनीवर आणला आणि किती भंपक आहे याची जाणीव करू दिली >> +१११ आणि ग्रुप करू नका . सगळ्यांशी मिळून मिसळून वागा असं सांगितलं . गेम पुरते ग्रुप . ते तर बिग बॉस च करताहेत . गेम संपला कि मजा करायची . लांबे लांब चेहरे करून एकमेकांना खुन्नस देऊन राहायचं नाही . हे आता परागला आणि बाकी सगळ्यांनाच कितपत समजलंय आणि ते कितपत अमलात आणताहेत हे पण समजेल .

बाकी परागला कोण किती एक्सेप्ट करताय त्यावर पण परागच्या पुढचा प्रवास अवलंबून असेल . एक्सेप्ट जर केलं नाही तर आहेच परत परागचा उद्रेक . नेहाला आणि तिच्या ग्रुप ला पण समजायला पाहिजे त्यांची पण चूक होती ते . त्यांना जर समजल नसेल आणि आम्हीच काय ते बरोबर होतो फक्त पराग चीच चुकी होती याच गुर्मीत राहिले तर परागला आणूनही सगळं मुसळ केरात. परत पहिले पाढे पंचावन्न Happy

रुतुजाच्या एंन्ट्रीबद्दल मी सहमत नाही.एकतर तिला जर आणायचच होत तर या सिझनमध्ये सुरुवातीपासूनच आणायला हव होत.
ती आधीच्या सिझनमध्ये जवळजवळ सव्वि महिना होती,गेम किय आहे तिला माहित आहे.तिने हा सिझनही फॉलो केला असणारच.
तिच फँन फॉलोइंगही असणारच
आऑलरेडी शो मध्ये येउन ,अनुभव घेऊन गेलेल्या व्यक्तीला एंन्ट्री देण्यापेक्षा,मैथिलीला संधी द्या ना मग.

परागला काढलय म्हणे फायनली - ओके
पण बिग बॉस ने तर "निलंबित करण्यात येत आहे "असा शब्द वापरला होता . म्हणजे काही काळापुरती खेळण्यास मनाई ना ? बिग बॉस मराठी भाषेचा वापर करण्यात चुकले कि काय ? Happy

परागला काढलय म्हणे फायनली -.....अरे मग आणल होत कशाला आणि घरात परत कशाला पाठवल?त्याच्या बँग्ज पाठवून दिल्या होत्या ना.मग हा ड्रामा कशाला?
काय चालल आहे बिबॉसच?

Pages