Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बिग्ग बॉस ने शिवनीला पण खुप
बिग्ग बॉस ने शिवनीला पण खुप drama करुन काढले आणी आता पराग . काढायचेच होते तर त्या दिवशीच तू नियम मोडला आहेस तू खेळातून बाद झाला आहेस असे सांगून लगेच बाहेर काढायचे. इतके सगळे करायची काय गरज होती. प्रेक्षकांना मूर्ख बनवणे आहे. हे जे केले ते.
टिआर्पी वाढवण एवढच लक्ष होत
टिआर्पी वाढवण एवढच लक्ष होत अस दिसतय.
वीणाचा भोचकपणा कधीकधी उपयोगी
वीणाचा भोचकपणा कधीकधी उपयोगी ठरतो कारण आज ममांनी वोटिंग लाईन्स बंद आहेत हे सांगितल्यावर लगेच वीणाने का विचारल,ममां म्हणाले की दोघ जण बाहेर गेले.म्हणजे बिचुकले गेमच्या बाहेर गेले,बाप्पा एलिमिनेट झाले म्हणून वोटिंग लाईन्स बंद...कैच्या कै
पण बिबॉसमधला इंटरेस्ट संपला.
उद्या पण ती नेहा तशीच ओरडत आहे .नाही बघवणार बहुतेक आता.
कोर्ट ड्रामा होऊन ही त्याला
कोर्ट ड्रामा होऊन ही त्याला घरात पुन्हा पाठवले म्हणजे सिक्रेट रूम ची शक्यता मला वाटत होती/आहे.
https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/bigg-boss-marathi-2-...
इथेही तसेच म्हटलंय.
चॅनल पण टीआरपी साठी किती
चॅनल पण टीआरपी साठी किती हरामी पणा करत असत. परवाच इतर स्पर्धाकांचा निर्णय झाला आहे . दोन दिवसात काय एवढा मोठ्ठा बदल होणार आहे आणि त्यांचा निर्णय बदलणार आहे ? तरी परागला मुदामून आत पाठवला "जा इतर स्पर्धाकांची स्पेशली त्या दोघींची माफी माग" वगैरे . खूप अजीजी कर. अगदी पाया पड लोटांगण घालून वगैरे. नाहीतर तुला पैसे मिळणार नाहीत असं काहीतरी सांगितलं गेलं असावं.
मग पैशासाठी म्हणून माणूस काही पण करायला तयार होतो मनाविरुद्ध . पण शेवटी शेवटच्या दोन दिवसात दिवसात सह स्पर्धकांचा निर्णय थोडाच बदलणार असतो ? आणि हे चॅनलला पण माहिती असत . चॅनल ने प्रेक्षकांना दाखवलं "बघा आम्ही त्याला संधी दिली पण सह - स्पर्धकांचा तो नको आहे मग आम्ही काय करणार ? . त्यामुळे नाईलाजाने त्याला काढावं लागतंय ." इत्यादी इत्यादी . सगळी नाटक टीआरपी साठी
बिचूकलेचा जामीन दुसऱ्यादा
बिचूकलेचा जामीन दुसऱ्यादा फेटाळला , यावेळी कलर्स ने वकील दिला होता . पण जमले नाही. चॅनल वाले कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात.
परागची माफी मनापासून नव्हती
परागची माफी मनापासून नव्हती हे त्याने camera शी बोलताना स्वतःच दाखवून दिलं.
सिक्रेट रूम - अशा बातम्या फोडून किंवा अफवा पसरवून हे लोक टीआरपी वाढवताहेत.
पण बघण्यातली मजा जातेय.
-
यानिमित्ताने मराठी शो इंग्रजी प्रसारमाध्यमांतही चर्चिला जातोय हे एक नवीन आहे. या स्पर्धकांना हिंदी रियलिटी शोची दारं उघडतील.
-
किशोरी , रूपालीनी परागला झुरळासारखं झटकलं. कमाल आहे .
मांजरेकर स्वतःच चुगल्या करताहेत. मागच्या वेळी उघड, आज बूथमध्ये.
नेहा आपलं म्हणणं व्यवस्थित नेमक्या शब्दांत मांडते हे आज जाणवलं.
वीणा याच्या अगदी उलट. आणि जोडीला हातवारे.
काय नालायक आहे तो बिग भुसा
काय नालायक आहे तो बिग भुसा आणि मांजऱ्या !
हलकट बेडकी, केळ्या आणि काळ्या माजोरड्या कावळिणीला पाठीशी घातलं. बिचाऱ्या परागचा अपमान केला.
आता त्या पापी चांडाळ चौकडीचा अहंकार आणखी वाढेल, आपल्याला कोणी काही करू शकत नाही, मग आणखीन माजखोरी करतील.
इतका पार्शल एपिसोड कधी बघितला नाही.
त्या निर्लज्ज हलकट चांडाळ चौकडीला आता पुन्हा पाहणे नको. बिग भुसा आणि त्या मूढ मांजऱ्याला रामराम !
अहो इतक्या नका चिडू.
अहो इतक्या नका चिडू.
डबल.
पैशासाठी हे नट नट्या,
पैशासाठी हे नट नट्या, चॅनेलवाले किती हलकट थराला जातात !
हे नट नट्या, चॅनेलवाले किती मुजोर, नीच आणि माणुसकीहीन वृत्तीचे आहेत ते दिसलं हेही नसे थोडके. त्यांचा आता कधीच आदर वाटणार नाही. त्यापेक्षा आम्ही सामान्य माणसे हजार पटींनी चांगले. इतकी गलिच्छ माणसे पुन्हा कधी बघणे नको.
सगळ्यात महत्वाच हे आहे की
सगळ्यात महत्वाच हे आहे की नेमक परागने केल काय?
जर इतक निंदनीय क्रुत्य होत तर मुळात बिबॉसनेच त्याला घालवायला हव होत.
इथे बिबॉस स्वत:ला सेफ ठेवत असेल कारण जर ते नँशनल टेलिव्हिजनवर दाखवल आणि खरच भयानक असेल तर हा शोच बंद करण्याची नुसतीच मिगणी नाही तर याला राजकरणी रंग पण चढू शकतो,तसच परागच्या करियरचाही प्रश्न आहेच,त्यावरही परिणाम होऊ शकतो,कारण कायदेशीर कारवाई सुध्दा होऊ शकते आणि हे सगळ कलर्सला खूप महागात पडू शकत.
अहो, चिडणार नाही तर काय करणार
अहो, चिडणार नाही तर काय करणार? दिवसभरात काम करून थकून सहज काही करमणूक म्हणून बघायला जावी तर या नालायक नट लोकांची गलिच्छ थेरं पाहून मनस्ताप व्हायला लागतो. हलकेफुलके गंमत म्हणून न खेळता दरोडेखोर गँगवॉर असल्यासारखे खेळतात आणि तो मूर्ख बिग भुसा स्वतःसह त्या नटव्यांच्याही नीच प्रवृत्तीला प्रोत्साहन देतो. कशासाठी? तर कुठल्या तरी रटाळ टीआरपीसाठी.
आम्हाला मूर्ख समजतात. पण रिमोट आमच्या हातात आहे.
काही भयानक केलेलं वाटत नाही.
काही भयानक केलेलं वाटत नाही.
ज्यांच्या वाट्याला भयानक आलं आहे ते लगेच दुसऱ्या दिवशी हसत खेळत मौजमजा करीत नाहीत. चांडाळ चौकडीचा कांगावा वाटतो. त्यात ती नेहा, वैशाली तर जहाल ड्रामेबाज आहेत. आपल्याला फायदा होतो आहे हे पाहून आणि शत्रू पराग परस्पर कटतोय हे पाहून पराचा कावळा करणे चालू असेल. आपण किती निष्पाप असे दाखवणे चालू होते. आताच्या त्यांच्या प्रतिक्रिया बघा ! कसं कटवलं अशाच प्रकारच्या आहेत. पुढे काही दिवसांनी खरे घाण चेहरे पुन्हा उघडे पडतील. उद्यापासूनच.
बेसिकली पराग रागावर कंट्रोल
बेसिकली पराग रागावर कंट्रोल ठेवणारा आहे हे त्याने आधीच्या काही प्रसंगात दाखवून पण दिल आहे . शिवानीने त्याच्या अंगावर हात उगारला . त्याला काय वाटेल ते बोलली तेव्हा तो शांतच होता कि . बाथरूममध्ये शिवानीने त्याच्या पायात पाय घालून त्याला पाडायचा प्रयत्न केला . त्याच्या तोंडावर पाणी उडवलं तेव्हा हि तो शांत राहिला कि .उलट साबण पण दे म्हणजे तोंड धुवून घेतो असं बोलला .
मग नेमका याच प्रसंगात का चिडला ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे . कारण नेहा आणि वैशालीकडून त्याला सतत इज़ा होत होती. त्या दोघी त्याच्या किडनीच्या जागी परत परत बोट खुपसत होत्या . डंबेल्स ठेवत होत्या . त्याने त्या जागी प्रोटेक्शन करता ठेवलेला टॉवेल खुपसून काढत होत्या. अरे कशाला ? तुम्हाला माहिती आहे ना तिथला तो पार्ट त्याचा कमकुवत आहे म्हणून ? मग तुम्ही स्पेशली त्या पार्ट ला शारीरिक इजा करायला जाताच कशाला ? बिग बॉसने वोर्निंग देऊनही ? परत परत तिच चुकी ? एवढ्या दोघीही हरामी वागूनही त्या दोघींची चॅनल कडून सौम्य स्वरात कानउघाडणी ? . त्यांना का नाही त्याची शिक्षा दिली ? . परागची तर चुकी आहेच आहे पण मग यांचं काय ? प्रेक्षकांचा म्हणून त्या दोघींवर राग आहे
आजपासुन माझं bb बंद, व्होटिंग
आजपासुन माझं bb बंद, व्होटिंग पण करू नका
तसेही पॉप्युलर स्पर्धक
तसेही पॉप्युलर स्पर्धक जातायेत आपापल्या कर्मानी या सिझनला, पब्लिकनी वोटींग न केल्यानी काही फरक पडणार नाहीये
तसही पब्लिक च्या व्होटिंग ने
तसही पब्लिक च्या व्होटिंग ने बिग बॉस ला काहीच फरक पडत नसतो . बिग बॉस च ठरवतात कोणाला काढायचं ते . कोण कोण कमकुवत आहे ते बघून बघून त्याप्रमाणे बाहेर काढतात. पब्लिक च्या व्होटिंग फक्त कोण जास्त पॉप्युलर आहे एवढच त्यांना समजत . त्याप्रमाणे निर्णय घ्यायला
आतापर्यत तिघही स्पर्धकाचा
आतापर्यत तिघही स्पर्धकाचा सगळ्यात मोठा अवगुण म्हणजे आपण फार सुपेरियर आहोत आणी चुकिचा अॅटीट्युड
माझ्यामते परागला स्वतःला
माझ्यामते परागला स्वतःला माहीती होतं आपला गुन्हा अक्षम्य आहे, तर त्याने बाहेर सगळ्यांची माफी मागून मी या शोत रहाण्याच्या लायकीचा नाही म्हणून बाहेर पडायला हवं होतं, तर सॅल्युट होता त्याला. हे स्क्रीप्टेड नसेल तर परागने असं केलं असतं तर बरं झालं असतं .
मी जेव्हा जेव्हा लिहीत होते की वोटींग लाईन्स बंद आहेत हे समजलं की मला नेहाचा आणि इतरांचा चेहेरा बघायचा आहे तेव्हा मला खोल कुठेतरी वाटत होतं कदाचित माझाच पचका होईल आणि तो झाला
.
एनिवे आता विनर मात्र नेहा होईल हे नक्की कारण तिच्या मार्गातले एकेक अडथळे त्यांच्याच चुकांमुळे बाहेर पडतायेत. शिव वीणा जपुन रहा बाबांनो. यात नेहाचा दोष आहे असं मी म्हणत नाही, ती टास्कमधे माणुसकी हरवून खेळते, ती तिच्या टास्क खेळण्याची पद्धत आहे पण तिचं नशीब बलवत्तर आहे असं म्हणेन त्यामुळे गोष्टी तिच्या बाजूने घडतायेत.
माझा नवरा पण म्हणतोय सर्व स्क्रीप्टेड वाटतंय. पराग सारखा अॅटीट्युडवाला माणूस माफी मागायला आलाच नसता.
सुरेखाताईंची चुक होती म्हणून त्यांना कुठेतरी वाटत होतं पराग यावा.
बरं आज बिचुकलेचं नांव का
बरं आज बिचुकलेचं नांव का काढतायेत, काही करुन आणायचं आहे का त्याला, नाकारला ना जामिन मग परत काय तेच तेच. याचा अर्थ आतमधे गुन्हा केला तर तो अक्षम्य आणि बाहेर कितीही गुन्हे असतील तर क्षम्य का.
यात परागचं समर्थन अजिबात करायचं नाही, त्याचा गुन्हा अक्षम्य असेल तर तो बाहेर गेलेलाच चांगला. त्यात बिग बॉसला तो हवा होता तर आत्ता सिक्रेट रुममधे ठेऊन आठ दिवसांनी समोर आणायला हवं होतं. आता कोणीही माफ करण्याच्या मनः स्थितीत नसणारच ना.
आरोप नेहा वैशालीवर जास्त झाले असतील पण त्यापैकी कोणा ऑडीयन्सला आणलं नाही. सुरेखाताईंवर केला तो बरोबर होता. शिव बायस्ड असला तरी टीमसाठी खेळला तो.
शिक्षापण काय देतात वा.
कोर्ट ड्रामा होऊन ही त्याला
कोर्ट ड्रामा होऊन ही त्याला घरात पुन्हा पाठवले म्हणजे सिक्रेट रूम ची शक्यता मला वाटत होती/आहे. >>> नसेल बहुतेक कारण fb वर कोणीतरी लिहिलं आहे bb च्या की पराग त्याच्या घरी आहे अंधेरीत, माझ्या मित्राच्या शेजारी राहतो.
असो शो खराखुरा असेल तर परागच्या बाबतीत दैव देतं आणि कर्म नेतं असं झालं. स्वतः च्या हाताने स्वत:च्या पायावर धोंडा घालून घेतला.
किशोरी , रूपालीनी परागला
किशोरी , रूपालीनी परागला झुरळासारखं झटकलं. कमाल आहे . >>> हे खरं आहे मात्र आणि परवा वीणाला किती बोलत होती रुपाली. आज मात्र तिच्यापेक्षा नेहातरी बरी बोलली परागशी, आपलं मत तिने शांतपणे मांडले.
परागने आपला attitude शेवटपर्यंत सोडला नाही मात्र. वैशालीकडे तो गेलाच नाही. कॅमेऱ्यात बघून चुकीचंच बोलत होता, एक रुपालीबद्दल सोडलं तर.
पराग ला इजा होत होती तर
पराग ला इजा होत होती तर त्याने सीट वरून उठायला पाहिजे होते. तुम्ही लोक का त्याची बाजू घेताय? Justify नाही होत त्याने जे केले ते.
वैशाली ने खरच फार त्रास दिला
वैशाली ने खरच फार त्रास दिला पराग ला, तिला लवकर बाहेर काढा.
पराग ला इजा होत होती तर
पराग ला इजा होत होती तर त्याने सीट वरून उठायला पाहिजे होते. तुम्ही लोक का त्याची बाजू घेताय? Justify नाही होत त्याने जे केले ते. >>> हो उठायला हवं होतं. शीर सलामत तर पगडी पचास, जीवाला त्रास कशाला करायचा पण माणुसकी सोडून task करणे पण चूक ना. त्याने जे केलं ते नाही justify करत, bb ने जे समोर दाखवलं ते म्हणतेय. परागला फिजिकली त्रास देताना दिसत होते ते चूकचं होतं. डम्बेल्सची आयडिया नेहाचीच होतीना. मी तर म्हणते परागने त्या दिवशीच मी गुन्हा केलाय आणि मला इथे नाही राहायचं असं म्हणून बाहेर जायला हवं होतं जर तो गुन्हाचं अक्षम्य होता तर मग bb पण कशाला मलमपट्टी करत होते, माफ करणारा मोठा असतो, कशाला हे. जे समोर दिसते त्यावर प्रेक्षक बोलणार. आता जे काही ऐकायला येतंय त्यावरून जास्त काहीतरी झालं असावं असं वाटलं. त्यादिवशी सगळीकडे youtube वगैरे एक ठेऊन दिली असं वाचलेलं अर्थात तोही फिजिकल attack झाला पण वाटलं एक मारली असेल तर जो न्याय वीणा शिवानी वेळी केला तो करायला हवा. वीणाने खेचल्यावर पायावर मारले म्हणून शिवानीने लाथ मारली छातीत तेव्हा त्याचं समर्थन केलं गेलं होतं. थोडावेळ अडगळीच्या खोलीत ठेऊन कोर्टरूम ड्रामा खेळला गेलेला.
शिव शांत बसला म्हणून त्याने हीना नेहाच्या हीन वागणुकीची तक्रार केली असती तर, असा task करतात का.
बरं ह्या शिव वीणा मध्ये
बरं ह्या शिव वीणा मध्ये चांगलं bonding आहे ते घरातल्याना तर बघवत नाहीच पण महेशसरांना पण बघवत नाही. शिव वीणाला सर्व जाऊन सांगतो हे का सांगितलं त्यांनी. मागच्यावेळी पण पराग सगळं असं इथे तिथे सांगतो म्हणाले होते.
शिव सर्व वीणाला सांगतो, वीणापण सांगते तर काय झालं. त्या दोन आगलाव्या लोकांना नाही बोलले काही वैशाली आणि केळकरला की तुम्ही का जळता त्यांच्या मैत्रीवर. हीनाकडे जा म्हणून वैशाली मात्र आवर्जून सांगते, किती नीचपणा आहे हा. वरून धमकी देतात त्याला तुला काय वीणा पुढे गेम मध्ये नेणार नाही, आम्ही नेऊ. शिव वीणा दोघेही आपला गेम बरोबर खेळतायेत. ते ज्या टीममध्ये असतील त्या टीमबरोबर असतात. त्यापलीकडे त्यांना एकमेकांशी सर्व शेअर करायचं असेल तर करुदेना.
पराग कडून चुक वदवून घेऊन
पराग कडून चुक वदवून घेऊन trp वाचवला बाकी कायपण आता प्रेक्षक चं ठरवतील काय वाट लावायची ते...
मी शो बघायचं सोडलं! बोअर होऊन
मी शो बघायचं सोडलं! बोअर होऊन गेला आता शो. समहाऊ, नेहा वैशाली जे वागत होत्या तो एपिसोड बघताना जाणवलं की हे आपल्यासाठी नाही, असं दुसऱ्याला टॉर्चर होताना बघणं आपण एन्जॉय करत नाही आहोत. एरवी बेडवर कम्फर्टर ओढून बसून राहणारी वैशाली परागला त्रास देताना मात्र उत्साही व आनंदी होती, ते बघून विचित्र वाटलं.
Voyeur प्रकारातला शो आहेच पण sadist प्रकारही सुरू झाला. Not my cup of tea.
मीही सोडल पाहायच.....फारच
मीही सोडल पाहायच.....फारच बकवास झाला आता शो.
Pages