Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हि मारामारी गुरुवारी झालेली.
हि मारामारी गुरुवारी झालेली. म्हणजे ती प्रत्यक्ष प्रेक्षक वगैरेनी पाहिलेली असणे शक्यच नाही.
लोका कायच्या काय विडिओ बनवून अफवा पसरवतात आहेत.
वीकेंडचा डाव मध्ये पण शुक्रवारी झालेले क्लीपिंग असते. लाईव भाग हा फारच थोडा शनिवारी वगैरे शूट होतो.
एका डान्स रीयलिटी मध्ये काम केलेला मित्र जो ‘ कन्टीन्युटी‘ भागात होता जिथे आधीचा भाग कुठून संपला आता, लाईव मध्ये कुठून शूट करायचे व किती त्यात तो सांगत होता, खुप फालतुगिरी असते. भर रात्री सुद्धा शूटींग असल्याने, लाईव प्रेक्षक वैतागतात. त्यांचे काही काही क्लिपींग काढून जातात.
परागवरचा लाईट काढून टाकला पण
परागवरचा लाईट काढून टाकला पण बिचुकले अजूनही प्रकाशमान आहे म्हणजे हायकोर्टात जामिन मिळाला तर आणणार का त्याला परत.
पराग पडल्यावर उठला आणि केस धरून नेहाला ओढून कानाखाली वाजवल्या, वैशाली त्याला आडवायला धऊन गेली, तिला चेस्टवर धक्का देऊन जमिनीवर ढकललं , मग केळ्या आणि माधव धावले त्यांच्या हाथापाई झाली, शिव एकटा कंट्रोल करु शकला सिच्युएशन आणि त्याला बाजुला घेऊन गेला. >>> इतकं केल्यावर परागने खरंतर त्याच दिवशी माफी मागून बाहेर पडायला हवं होतं किंवा कलर्सवाल्यांनीपण माफ करणारा मोठा असतो वगैरे मखलाशी कशाला करायची. इतकं केलं कारण सगळेच या घटनेला कारणीभुत होते बिग बॉससकट. हिंसा झाली बाहेर, हा रुल नीट फॉलो करा. अर्धवट नको. वीणा आणि शिवानीलापण बाहेर काढायचं होतं त्यादिवशी.
नेहाने नीट बाहेर निरोप दिला नाही, हे एकदाच ममां म्हणाले मग तिने सारवासारव केली तर ऐकलं त्यांनी. विषय थांबवला.
हि मारामारी गुरुवारी झालेली.
हि मारामारी गुरुवारी झालेली. म्हणजे ती प्रत्यक्ष प्रेक्षक वगैरेनी पाहिलेली असणे शक्यच नाही.
लोका कायच्या काय विडिओ बनवून अफवा पसरवतात आहेत. + ११११
काहीही अफवा पसरवतात लोक . पण पराग कडे टॅलेन्ट आहे. कुकरी शोज त्याने आधीच केलेले आहेत आणि आता लोंकाना तो माहिती पण झालाय याचा त्याला नक्कीच फायदा होऊ शकतो
हि मारामारी गुरुवारी झालेली.
हि मारामारी गुरुवारी झालेली. म्हणजे ती प्रत्यक्ष प्रेक्षक वगैरेनी पाहिलेली असणे शक्यच नाही.
लोका कायच्या काय विडिओ बनवून अफवा पसरवतात आहेत.
<<
हो अर्थातच हे माहित आहे, पण हे वीकेंडच्या डावला मांजरेकरांनी मेन्शन केलं म्हणे , आजचा ओनेस्ट्ली इन्सेन चा युटूब व्हिडिओ पहा, अर्थात क्लिप दाखवत नाहीत तोवर कसलेच प्रुफ नाही.
हिना नेहा शिवशी मिसबिहेव्ड
हिना नेहा शिवशी मिसबिहेव्ड करत होत्या तेव्हा किती लवकर जाग आली bb ला. शिव पण शांत बसला, त्याने खरंतर आरडाओरडा करायला हवा होता.
परागला काढलं हे बरोबर पण त्याचबरोबर पुढच्या विकमध्ये नेहा, वैशाली, केळकर, हीना आणि सुरेखाताई ह्यांना nominate करायला हवं होतं, किमान ही त्या सर्वांच्या वागणुकीची शिक्षा द्यायला हवी होती.
बिचुकलेवर बाहेर अनेक गुन्हे
बिचुकलेवर बाहेर अनेक गुन्हे आहेत, भले एकाने मागे घेतली आहे केस. खालच्या कोर्टात जामीन मिळाला नाहीये. आता कमीतकमी त्याला आणू तरी नये. चुकीचा संदेश जाईल.
शिव म्हणाला ना केळकरला मोठ्या गोष्टीत तुम्ही अडवता मला आणि छोट्या गोष्टी मोठ्या करता. मी बिचुकलेला अडवायला गेलो तुम्ही थांबवलं मला.
तो शिवच विनर व्हायला हवाय.
इकडे कोण DSK Talks चे
इकडे कोण DSK Talks चे रिव्यू पहात का यूट्यूब वर ? चांगले असतात. मुद्देसूद बोलतो तो. कुणाचीही साइड घेत नाही . आणी फालतू बडबड ही करत नाही.
मी bollywood spy वगैरे बघते
मी bollywood spy वगैरे बघते पण मोठे असतील तर नाही बघत दोन तीन मिनिटांचे बघते.
पण सगळ्या review वाल्यांना पराग हवा होता बहुतेक, असंचं दिसतंय. काहीजण बिचुकलेची पण वाट बघत होते बरेच दिवस.
अर्थात क्लिप दाखवत नाहीत तोवर
अर्थात क्लिप दाखवत नाहीत तोवर कसलेच प्रुफ नाही. >>> दाखवणार नाहीत. हे सर्व खरं असेल तर बाहेर कोणीतरी महिलांवर अन्याय झाला bb च्या घरात, परागने केला म्हणून केस टाकेल परागवर मग आधीचे पण सर्व बाहेर येईल task मधले.
येथे एखाद्या रेव्यू च्या
येथे यूट्यूब वरच्या एखाद्या रेव्यू च्या लिंक्स दिल्या तर चालतात का ?
तो बिचुकले पण कशाला ठेवलाय.
तो बिचुकले पण कशाला ठेवलाय.
एकुणच कॉलीटीच्या नावाने बोंब आहे.
पहिला सिझन मी अजिबातच पाहिला नाही. हिंदी तर कुठलेच कधीच पाहिले नाही.
ह्याचे पण सुरुवातीचेन एखादे भाग पाहिले मैत्रीणीमुळॅ आणि आता ह्या मारामारीमुळे, व लोकांचा टाईप पाहुन अगदीच धन्य वाटले की, मी वेळ घातला नाही बरं केलं.
आता काय, एकदम गोड गोड असणार का? किशोरेस आणि रुपाली त्रिशंकु बहुतेक. वीणाचा काय तो एलिमिनेशनच ड्रामा.. तिला पक्क माहितीय म्हणून, काहीही रडत न्हवती. परत रुपाली व वैशालीचे मगरमच्छ आसू. पण केळ्कर आणि वैशालेला इतकी खात्री कशी की वीणा जाणार नाही? महाधुर्त आणि कावेबाज आहेत दोघं.. म्हणून पटतं. केळकर आणि वैशाली.
तो बिचुकले पण कशाला ठेवलाय. >
तो बिचुकले पण कशाला ठेवलाय. >>> त्याला हायकोर्टात जामीन मिळवून देऊन आणायचं असेल परत कलर्सवाल्यांना. अजिबात नका आणू.
Dsk talks reviews are really
Dsk talks reviews are really good and on point !
आज शिवला बोलतील केळकर,
आज शिवला बोलतील केळकर, वैशाली की तू आमचं सर्व जाऊन सांगतोस तिला. याने भिक घालायची नाही त्यांना, सांगायचं मला शिकवू नका, मला जसं वागायचं आहे तसं मी वागेन.
येथे यूट्यूब वरच्या एखाद्या
येथे यूट्यूब वरच्या एखाद्या रेव्यू च्या लिंक्स दिल्या तर चालतात का ? >>> माहिती नाही, देतो आम्ही.
थैंक यू अन्जू सांगितलय बद्दल.
थैंक यू अन्जू सांगितलय बद्दल. मी पण confuse आहे म्हणुन विचारले.
मागच्यावर्षी पण देत होते
मागच्यावर्षी पण देत होते लिंक्स, कोणी आक्षेप घेतला नव्हता. पण रूल खरंच माहिती नाही.
आता कोणी तरी जबरदस्त वाइल्ड
आता कोणी तरी जबरदस्त वाइल्ड कार्ड entry पाठवली पाहिजे तरच बघायला मजा येईल.
ऋतुजा धर्माधिकारी येतेय ना.
ऋतुजा धर्माधिकारी येतेय ना.
आज शिवला बोलतील केळकर, वैशाली
आज शिवला बोलतील केळकर, वैशाली की तू आमचं सर्व जाऊन सांगतोस तिला. याने भिक घालायची नाही त्यांना, सांगायचं मला शिकवू नका, मला जसं वागायचं आहे तसं मी वागेन.>>>>>> actually.
काल हीना भयानक दिसत होती,
काल हीना भयानक दिसत होती, मागच्या शनिवारी छान दिसत होती.
काल हीना भयानक दिसत होती,
काल हीना भयानक दिसत होती, मागच्या शनिवारी छान दिसत होती.
>>> मागच्या सीज़न मद्ये छान असायचे सगळ्यांचे कपडे आणी मकेअप पण पण या सीज़न मध्ये वीकेंड च्या वार ला पण काही चांगले घालत नाहीत सारखी साडी च घालतात. सुरेखा ताईनी पण काही तरी experiment केला पाहिजे वेशभुशेत जरा.
https://www.voot.com/shows
https://www.voot.com/shows/bigg-boss-marathi-s02/2/798234/parag-pours-hi...
परागचा interview.
पराग कालच्या शो मध्ये नक्की
पराग कालच्या शो मध्ये नक्की का आला होता?
एकूण त्याच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीत कुठेही पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता..... त्याला मुळात माफी मागायचीच नव्हती पण चॅनेलने त्याला जबरदस्तीने उभे केल्यसारखे वाटले.... काहीतरी लीगल असेल आणि मग तो मारुनमुटकुन आला असेल असे वाटले..... म्हणजे माफी तर मागायची नाही पण शो मध्ये ही रहायचे आहे अश्या काहीतरी विचित्र मन: स्थितीत तो होता असे वाटले
एक दोनदा कीव ही आली त्याची.... म्हणजे खरच जी काही चर्चा चालली आहे त्याप्रमाणे त्याने मारहाण केली असेल (जरी सगळेच याबद्दल अतिशय मोघम बोलत असले तरी अगदी त्याचा स्वताचा ग्रूपच ज्याप्रमाणे त्याला झिडकारत होता त्यावरुन नक्कीच ते बऱ्यापैकी आक्षेपार्ह असावे) आणि मग असे कृत्य हातुन घडले असताना माफी मागून सरळ बाहेर पडावे..... ज्यांच्या नजरेतुन उतरलोय त्यांच्यामध्येच रहाण्याचा अट्टहास करु नये!
म्हणजे काल त्याने येवून त्याच्या इमेजचे डॅमेज कंट्रोल होण्यापेक्षा तो अधिकच हास्यास्पद झाला आणि मग माफी मिळत नाही म्हंटल्यावर ते बळेबळे "मी स्ट्रॉंग आहे म्हणून मला काढतायत" वगैरे म्हणणे अगदीच विनोदी दिसले
बर तो काही actor वगैरे नाही की चॅनेल त्याचे करीअर बिघडवू शकते.... कुकरी शो वगैरे फक्त एक मार्ग झाला पण एक शेफ म्हणून जर तो चांगला असेल तर तो अजुन बरेच काही चांगले करु शकतो..... "माझ्याकडून जे झाले ते रागाच्या भरात झाले त्याबद्दल मी माफी मागतो आणि म्हणून मलाच या घरात रहायचे नाही" असे जर तो म्हणाला असता तर ते खऱ्या अर्थाने डॅमेज कंट्रोल झाले असते
त्याला आत यायची कितीही इच्छा असूदे पण त्याला आत आणणे त्याच्या आणि शो च्याही भल्याचे नव्हते.... इतके सगळे होवून गेल्यानंतर तो त्याचा नॅचरल गेम खेळू शकला नसता आणि शिव म्हणाला तसे त्याने हिंसा करुनही जर त्याला गेम मध्ये राहू दिले असते तर तो एक चुकीचा ट्रेंड सेट झाला असता आणि उद्या अजुन कुणीतरी हिंसा करायला प्रव्रुत्त झाला असता/किंवा काही कारवाई होत नाही म्हंटल्यावर अजुन कुणाच्या तरी मनात पुढेमागे असेच करायचा विचार आला असता.
परागला सपोर्ट करणाऱ्यानी एक लक्षात घेतले पाहिजेल की एखाद्या टास्कमध्ये केला जाणारा बळाचा वापर आणि टास्कबाहेर एखाद्यावर हात उचलणे या दोन अतिशय भिन्न गोष्टी आहेत.... टास्कमध्ये बळाचा वापर बिग बॉसच्या इतिहासात य वेळेला झाला आहे..... तो काही तितकासा मोठा गुन्हा नाही..... जेंव्हा ते अति होते तेंव्हा बिग बॉस थांबवतातच पण कुणी टास्कमध्ये बळाचा वापर केला म्हणून त्याला मारणे हे कुठल्याही परिस्थितीत जस्टीफाय होत नाही.... ज्याला सहन होत नाही त्याला टास्क सोडण्याचा आणि नंतर समोरच्या टीमने बळाचा वापर केला म्हणून सहानुभूती घेण्याचा ऑप्शन असतोच!
बर कुठल्याही परिस्थितीत टास्क जिंकणे हा बिग बॉस जिंकण्याचा फॉर्म्युला नाहीये.... हे काही रोडीज नाहीये!
प्रसंगी टास्क हरुन सुद्धा लोकांची मने जिंकता येतात
नेहा चे प्रचंड कौतुक वाटते...... बिग बॉसने तिच्या खांद्यावर ठेवून परागवर बंदूक चालवण्याचा जो प्रयत्न केला; त्याला या निर्णयात सगळ्या घराला सहभागी करुन आणि हा तिच्या एकटीचा निर्णय नाहीये हे ठसवून तिने चोख उत्तर दिले.... Thats called a player!
रुपाली, किशोरीचे जे खरे रंग या सगळ्या प्रकारात परागला दिसले ते त्याच्यासाठी आणि घरातल्या इतरांसाठीही आय ओपनर ठरोत..... नुसते unity, respect and love म्हणून काही होत नसते..... नाती आणि ग्रूप असे ठरवून आणि बळेबळेच बनवता येत नाहीत.... त्यांना वेळ द्यावा लागतो आणि ते जर जमत नसेल तर सरळ एकटे एकटे खेळावे!
शिवानी आणि बिचुकले गेल्यावर पण शो चा TRP घसरणार
वगैरे आवया उठत होत्या आता पराग गेल्यावर पण आम्ही शो बघायचे सोडणार असे काही लोक म्हणतायत..... असो!
आता यातले किती लोक खरच शो बघायचे सोडतायत ते बघायला आवडेल!
परवा ममां नेहाला म्हणाले ना
परवा ममां नेहाला म्हणाले ना कि नेहमी तिच्या चेहेर्यावर खुन्नस असतो, जरा हसरा चेहेरा ठेव ,ते खरच आहे. किती खुनशी हास्य असतं ती, वैशाली दोघींच्या चेहेर्यावर.
बीबी = बंडलबाज.नविन नामकरन
बीबी = बंडलबाज.नविन नामकरन कसे आहे ? स्माईली.
पराग ने गुन्हा केला म्हणुन
पराग ने गुन्हा केला म्हणुन तो गेला याबद्दल खरतर जास्त वाईट वाटत नाहिये. वाईट या गोष्टीचं वाटतय की ज्यांच्यामुळे हे सगळं झालं, जे अप्रत्यक्षपणे याला जबाबदार आहेत त्यांना खुप महान बनवलं गेलं , त्यांना फार प्रेमळ शब्दात त्यांच्या चुकांवर बोललं गेलं आणि पराग ला परत घरात पाठवुन लोटांगण घालुन माफी मागायची अपेक्षा केली गेली. तो माफी मागताना सुद्धा तुझ्या चेहेर्यावर भावच नाहीत, डोळ्यात खरेपणाच नाही ई ई चालु होतं. अरे तो नाहिये अॅक्टर.नसेल जमलं त्याला हे सगळं दाखवयाला. पण एका नॅशनल टीव्ही च्या शो वर तो माफी मागायला आलाय तर तो असा लोळणं घेउन मागेल का ?
आणि लोटांगण घालुन माफी मागायला तुम्ही कोण बच्चन लागुन गेलात ,बघितलं तर फार काही कोणी महान कलाकार नाही तिथे. कोणतं दुसरं काम नाही म्हणुनच आहेत ना बिबॉ मधे.मग कशासाठी एवढा माज ? उद्या बाहेर येउन तुम्हाला कामं मिळतील याची काय खात्री आहे ? याउलट तो उत्तम शेफ आहे. ३ वेळा world record holder आहे. आत्ता अडचणीत असला तरी त्याची ही कला त्याला कायम पुढे नेइल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किडनी दान करणे ही काही सोपी गोष्ट नाही. यावरुन तो एक चांगला माणुस आहे हे नक्कीच कळत. आणि त्याची भावनेच्या भरात झालेली कृती चुकीची होती हे तो पुन्हा पुन्हा स्वत: कबुल करत आहे की. ३ तास सलग कोणी त्रास दिला मग भले ते टास्क असो जेव्हा त्याचा कडेलोट झाला तेव्हा कोणीही समोरच्याची गचांडी धरेल. आपण त्या जागी असतो तर तेच केलं असतं. आणि जे लोक म्हणतात की त्याने उठायला हवं होतं , तर तो हे सगळं जिंकण्यासाठी करत होता ना मग तो का उठेल? त्याला मारायचं असतं तर त्याने आधीच चिमटे सुरु झाले तेव्हाच लगावली असती. त्याला ढकलुन पाडण्यात आलं आणि म्हणून स्फोट झाला हे नक्की. असो. परत परत तेच लिहिलं जातयं.
त्याने नेहासमोर गुढगे टेकुन माफी मागितली तेव्हा तो मलातरी जेन्युईन वाटला होता. नंतर पण नेहा शी बोलताना तो जेन्युईन होता. त्याने केले प्रयत्न खुप एवढ नक्की. सगळं नसेल दाखवलं आपल्याला. तो रुपाली, किशोरी सगळ्यांशी बोलला असणारे. तेव्हा त्याला नक्कीच कळलं असेल की हे लोक ठरवुन त्याला माफ करत नाहियेत. म्हणुन शेवटी जाताना पण तो म्हणाला की "मी जावं अशीच यांची ईच्छा आहे कारण एक कॉम्पिटीशन कमी होईल तर का परत वाढवा. हा माझा शेवटचा संदेश."असं काहीतरी.
नेहा स्पर्धक म्हणुन चांगली असेल, माणुस म्हणून एकदम बेक्कार वागली.
हिंदी बिबॉ अगदी सुरुवातीचे
हिंदी बिबॉ अगदी सुरुवातीचे काही भाग थोडेफार पाहिले होते.नंथर राहुल महाजनच्या रासलीला बघून वीट आला आणि बघणच बंद केल.
पण हिंदीच्या बाबतीत अस वाचण्यात आल होत की,तिथे सलमान चा खुप दबदबा आहे,कारण त्याचे कॉंन्टँक्ट्स माहितच आहेत कुठपर्यंत आहेत ते,त्यामुळे स्पर्धक पण म्हणे त्याला घाबरुन असताततसच चँनेल सुदा फार ढवळाढवळ करत नाही म्हणे त्याच्या बाबतीत,तो हव तिथे त्याच वजन वापरतो.
हे खर आहे का?
त्याला तीन तास कुणीतरी
त्याला तीन तास कुणीतरी टास्कमध्ये त्रास दिला म्हणून त्याने भावनेच्या/रागाच्या भरात एखाद्याला मारहाण करणे जितके सहजी ॲसेप्ट केल जातय तितकेच ज्याला मारहाण झाली तो माणूस त्या घटनेनंतर केवळ दोन दिवसातच आणि (माझ्या मते ॲटीट्यूड दाखवून) मागितलेल्या माफीने विरघळावा अशी अपेक्षा का केली जातीय?
आणि जर तो विरघळला नाही तर ती व्यक्ती माणूस म्हणून एकदम बेक्कार?
परागला माफी मागायला लावली तरी
परागला माफी मागायला लावली तरी ज्यांची माफी मागायची ते लोक निर्दोष होते, असं अजिबात नाही. बिग बॉसने त्यांना माफ करणारा मोठा असतो, असलं काहीतरी ग्यान देणं. परागला एकदा कठड्या आडून आणि एकदा घरात जाऊन त्यांच्याशी बोलू देणं. टास्कदरम्यान नेहाला बोलावून इजा पोचेल असं काही करू नका, हे सांगणं. मांजरेकरांनीही त्यां ची टास्कदरम्यान ची कृत्य धोकादायक होती, हे सांगणं, शनिवारच्या भागाच्या सुरुवातीलाच, परागने तो प्रकार केल्यावर मग तर इट वॉज फ्री फॉर ऑल असं म्हणणं यावरून विरुद्ध पक्षही बर्यापैकी दोषी आहे, हे बिग बॉस आणि टीम सुचवताहेत.
राग त्यांनी माफी न देण्याबद्दल नाही, तर त्यांच्याच वागण्याबद्दल आहे.
परागला माफी मिळायला हवी, असं इथे कोणी लिहिलेलं दिसलं नाही. उलट त्याने बाहेर जाणं हे त्याच्यासाठी बरंच आहे, असंच म्हणणं दिसतंय.
Pages