मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजू, वीणा शिवानी प्रकरणीही न्यायाच्या नावाखाली अन्यायच झाला की. तिथे बिचुकले होते, इथे मांजरेकर.
तिथे वीणाच्या डोक्यावर चार बादल्या पा ओतलं गेलं, इथे पराग घराबाहेर गेला.
परागने आपला रिमोर्स लगेच दाखवायला पाहिजे होता. अनेकदा संधी मिळूनही त्याने तो दाखवला नाही. तिथेही तो कॅल्क्युलेटेड मुव्हज करीत राहिला आणि नेहमीप्रमाणे तोंडावर पडला. त्यातून त्याला खरंच सॉरी वाटत नसेल, तर तो बाहेर गेला ते ठीक आहे. वाळीत टाकल्यासारखं घरात राहणं त्याला झेपेल का माहीत नाही.

इथेच नेहाने त्याच्यावर कुरघोडी केली.
तो चिडेल आणि त्याचा तोल सुटेल हे त्यांनी व्यवस्थित जमवून आणलं त्यात तो टास्कच्या आधी पासूनच हायपर होत होता. मग त्याने हात उचलल्याने यांची आयती सोय झाली. ती म्हणालीही , की लोकांनी बघितलंय. तेच पराग पडल्यावर शांत राहिला असतां किंवा नेहाने कॅप्टनसी टास्कमध्ये पडल्यावर जे केलं ते केलं असतं तर आज नेहा आणि कंपबी अडचणीत असत्या.
परागला वाटतं तितका तो धूर्त नाही आणि नेहा- वैशाली - अभिजीत केळकर या तिघांच्या एकत्र कपटाचा सामना करायला त्याला तसा सपोर्टही नाही. त्याच्या बरोबर असलेल्या दोघी बिन्डोक आहेत. परागने इतरांना अंडर एस्टिमेट केलं किंवा मांजरेकर म्हणताहेत तसं तो स्वतःला यांच्यापेक्षा ग्रेट समजतो. त्यासाठीही तो बाहेर जाणंच बरोबर आहे . सतत एकच विचार ठेवून पुढे जाता येत नाही.
---
वैशालीने दुसर्‍यांदा की तिसर्‍यांदा अमक्याला बाहेर गेल्यावर बघून घे ईन असं म्हटलंय. याआधी कोणा मुलीबद्दल बोलली होती.

भरत छान पोस्ट.

बाहेर गेल्यावर बघून घेईन म्हणजे परागवर गुन्हा वगैरे दाखल करायचा असावा तिला असं वाटतंय.

शो बघणे बंद करण्याबद्दल वर लिहिलेल्या सगळ्यांशी सहमत. मी सुद्धा कालपासून बघायचा सोडला हा शो. Not worth spending 1/1.5 hrs daily. त्यापेक्षा सेट मॅक्स वर dub kelele south indian सिनेमे बघेन. असला भिकारडा शो आणि दळभद्री होस्ट त्या चॅनेललाच मुबारक. byebyecolors.

अंजू, नाही. गुन्हा दाखल करता येण्यासारखं काही असेल असं वाटत नाही. ती हे याआधीही म्हणालीय, एका मुलीबाबत.
तसंच एकदा म्हणाली , तिचं थोबाड फोडून ठेवीन. त्यासाठी मला बाहेर जायला लागलं तरी चालेल. आणि परागने तिच्यावर घाण शिव्या दिल्याचा आरोप केल्यावर साफ नाही म्हणाली.

केळकर आणि वैशाली सोमिवर शिव्याच खातायेत..
त्यांच्या official हँडल्स वरच्या प्रत्येक पोस्टला ट्रोल करतायेत लोक.. एकही जण त्यांच्या बाजूने बोलणारा नाही.

@Sanjay २०१०
यांच्या पोस्टला अनुमोदन.. बीचुकलेनी इतक्या वाईट शिव्या देऊनही रूपाली ने त्याची माफी मागितली तेव्हाच मी शो बघणं सोडलं..इथे मात्र दररोज अपडेट्स वाचत होते...आतातर चुकून सुद्धा. शो बघणार नाही.

पराग जाताना शेवटी कॅमेराकडे पाहून म्हणाला की मी एक चांगला स्पर्धक होतो, माझ्यापासून इतर स्पर्धकांना धोका जाणवला आणि त्यामुळे मला बाहेर काढण्यात आलं (हेच शब्द नसतील पण याच अर्थाचं). संपूर्ण एपिसोड पाहिल्यावर एक क्षण मनात आलं की एवढं सगळं होऊन हा परत आपलंच खरं का करतोय ! ?
मग एक एक घटना परत परत आठवून पाहिल्या.
नेमकं काय झालं हे आपल्याला प्रेक्षकांना दाखवलं नाही, आणि दाखवणार ही नाहीत इतक्यात. मनात संभ्रम तयार करुन भरपूर टीआरपी खेचला. त्यामुळे ठामपणे पराग चूक की बरोबर हे आपण सांगूच शकणार नाही.
परागने माफी नीट मागितली नाही, म्हणजे त्याला ती मागायचीच नव्हती, त्याला झाल्या प्रकाराचा काही गील्टच नाही याची उजळणी झाली. पण वर म्हटल्याप्रमाणे त्याने काय केलं नक्की हे आपल्याला दाखवलं नसलं, तरी वैशाली आणि नेहा त्याच्याशी बरोबर वागत नव्हत्या त्या टास्क मधे हे तर स्पष्ट दाखवलं की आपल्याला ! मग जर परागने सॉरी म्हणायला हवं होतं, तर ह्या दोघींनीही का म्हणायला नको?
जसं त्या दोघींना वाटत होतं की त्यांनी केल्या त्या गुदगुल्याच होत्या आणि खुर्चीवरुन बळाचा वापर न करता त्याला उतरवलं , तर त्याच न्यायाने त्याचंही म्हणणं त्याच्या जागी बरोबर होतं. आणि बळाचा वापर होतोय हे त्याने आणि अनेकांनी तेव्हा संचालिकेच्या निदर्शनास आणून दिलं होतं. सॉरी फक्त त्यानेच म्हणायला हवं हा अट्टाहासच एकतर्फी होता. त्याच्यावर जो सो कॉल्ड खटला झाला, तो ही अश्या प्रकारे एकतर्फीच होता.
त्याला संधी देणे, मग घरात जाऊन सगळ्यांकडून माफी मागून घेणे वगैरे सगळी ड्रामेबाजी फक्त त्याच्यावर आधीच ठरलेल्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होतं ! की बघा.. आम्ही त्याला संधी दिली, पण त्याने 'चूक' सुधारली नाही !!
खरंच स्पर्धक आणि चॅनल यांच्यातल्या करारातली कलमं वाचायला हवी.
जितका जास्त अपमान/ मानहानी करवून घ्याल, तितका वेगळा बोनस/इंसेंटिव्ह असं पण कलम असावं एक.. Happy
सरते शेवटी, ह्या स्पर्धकांनी मिळवून दिलेल्या टीआरपीचा भविष्यात चॅनल व्यवस्थित वापर करुन घेणार. परागसाठी कुकरी शो किंवा वैशालीसाठी कुठला तरी गाण्याचा शो, बाकीच्यांसाठी डेली सोप्स वगैरे वगैरे. तो पर्यंत मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर !! Happy

मित, खरंय.

कलर्स वरचा कुकरी शो बहुतेक बंद पडलाय.
मी मध्ये मराठी हिंदी एंटरटेनमेंट चॅनेल्स अनस ब्स्क्राइब केले होते त्यामुळे कधी कसं झालं माहीत नाही.

विष्णु म नोहर यांच्यानंतर काही काळ परागने इथे कुकरी शो केला. मग विष्णु मनोहर परत आले. पराग झीवर गेला. तिथे त्याने महाराष्ट्राची सुगरण हा शो सुप्रिया पिळगावकर सोबत होस्ट केला.
मग काही काळाने झीची क्रिएटिव्ह टीम कलर्सवर आली आणि इथल्या कुकरी शोचा फॉर्मॅट झीसारखा झाला. प्रशांत दामले आले.
आता डॉ काशिनाथ घाणेकरसाठी कलर्स परत घेतलं तर दीडच्या स्लॉटला कुकरी शो नाही.

त्या दोन्ही कुकरी शो+ स्पर्धांतला त्याचा प्रेझेन्स आवडायचा. दोन्हीकडे जज म्हणून तो स्पष्टवक्ता होता, पण फटकळ , तुसडा वाटला नाही.

अंजू, नाही. गुन्हा दाखल करता येण्यासारखं काही असेल असं वाटत नाही. ती हे याआधीही म्हणालीय, एका मुलीबाबत. >>> अच्छा मला वाटलं काल जे म्हणाली त्यावरुन की तिला केस करायची असेल बाहेर आल्यावर.

बरं मला एक कळत नाहीये, ममांनी नेहा आणि केळकरला बोलाऊन किशोरीताईबद्दल चुगली का केली. शो मधे ऑडीयन्सनी चुगली करायची आहेना.

त्यांच्या official हँडल्स वरच्या प्रत्येक पोस्टला ट्रोल करतायेत लोक.. एकही जण त्यांच्या बाजूने बोलणारा नाही. >>> हो का जाऊन बघायला हवंय. नेहाला पण शिव्या घालतायेत तिचं बघितलं, ह्या दोघांचं बघायला हवं.

आता त्या तिघांना सोपं आहे, सर्वांना हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करायचं आणि फिजिकल हल्ला झाला की बाहेर दुसरे. त्यामुळे त्यांच्या ऑपोझिट असतील त्यांनी संयम ठेवावा.

शिवला पण खूप प्रवृत्त करत होती नेहा आणि परागपण त्या धोबीपछाड टास्कमधे, त्याने हात मागे बांधले होते. तेव्हा नेहा पराग एक होते, पराग तेच करत होता.

मांजरेकर तेच करायला लागलेत. गेल्या शनिवारी परागचा पूर्ण प्लान उघड केला. त्यामुळे बाकीचे १० लोक एकत्र आले.
आज पुन्हा किशोरीबद्दल ती खलना यिका आहे की असं काही बोलले. शिव वीणाचं पण सां गितलं. ते एका ग्रुपला फे वर करताहेत असं दिसतंय.

त्याचा परिणाम प्रेक्षकांत उलट होत असेल आणि हा चॅनेलचा डाव असेल तर नकळे.

स्पर्धकांपेक्षा आपण प्रेक्षक बिग बॉसच्या हाता तलं खेळण आहोत. Lol

Submitted by मित on 1 July, 2019 - 00:03 >> संपूर्ण पोस्ट ला पूर्ण अनुमोदन
जसं त्या दोघींना वाटत होतं की त्यांनी केल्या त्या गुदगुल्याच होत्या आणि खुर्चीवरुन बळाचा वापर न करता त्याला उतरवलं , तर त्याच न्यायाने त्याचंही म्हणणं त्याच्या जागी बरोबर होतं. आणि बळाचा वापर होतोय हे त्याने आणि अनेकांनी तेव्हा संचालिकेच्या निदर्शनास आणून दिलं होतं. सॉरी फक्त त्यानेच म्हणायला हवं हा अट्टाहासच एकतर्फी होता. त्याच्यावर जो सो कॉल्ड खटला झाला, तो ही अश्या प्रकारे एकतर्फीच होता. >> +११११११११

एरवी बेडवर कम्फर्टर ओढून बसून राहणारी वैशाली परागला त्रास देताना मात्र उत्साही व आनंदी होती, ते बघून विचित्र वाटलं. >> +११११
बघावं तेव्हा वैशाली बेड वर झोपलेलीच असते. हे मी इथे पण दोन तीनदा लिहिलेल आहे . का ? कारण ती ९०% झोपलेलीच असावी मग कॅमेराला पण पर्याय राहत नाही . ती उठून काही तरी काम करताना कधी दिसतच नाही . बघावं तेव्हा बेडवर आडवी . केळकर आणि ती कांन भरताहेत शिवचे . त्यांचा आवडता उद्योग

त्यापेक्षा सेट मॅक्स वर dub kelele south indian सिनेमे बघेन. असला भिकारडा शो आणि दळभद्री होस्ट त्या चॅनेललाच मुबारक. byebyecolors >>>>
मी असल्याचं एखाद्या कमेंटची वाट पाहत होतो इथे. बिगबॉस च्या बद्दल ऐकून होतो पण असले शो कधी पाहिलं असं वाटलं नाही. सध्या वेळ काटण्याचा प्रश्न असल्याने सुरुवातीला ५-६ भाग पाहिले. पण इतका लो कार्यक्रम काही मला झेपला नाही आणि इथल्या कमेंटस/कॉमेंटरी त्यापेक्षा जास्त मनोरंजक आहेत.

ती हिना किती बडबडत होती, तिला कोणी इतर बोलत नाहीयेत तर चान्सच मिळाला. इरीटेट होत होतं. बास ग बाई, नका करु त्याला माफ पण आम्हाला ऐकायला लागतंय तू बोलतेयस ते.

बाय द वे हा सर्व विषय नंतर झाला पण परागने नेहासाठी बड्डेला काहीतरी केलं ते दाखवलं का नाही त्यादिवशी. मला तर वाटलं की काय हे तिघे साधं विशही करत नाहीयेत तिला.

काल खुप वाईट वाटलं परागच.. किती होता, हतबल होता.. सगळ्यांना विनंती केली मला रहायच आहे घरात हवं तर ब्रेकफास्ट, लंच, डिनर दोन्ही वेळचं शिक्षा म्हणुन रोज करतो.. नेहा कडे बोलताना त्याने आपली स्टोरी सांगितली अन सांगितलं कि म्हणुनच आपली देहबोली तशी झालीय कि त्यातुन तुंम्हा लोकांना तो माझा गर्व आहे असं वाटतं.. खुप क्रूर वाटले काल तिन जण.. नेहा, वैशाली अन केळकर... सुरेखा ताई तरी म्हणत होत्या कि जाऊंदे आपण समजुन घेवुया त्याला.. थोडा सॉफ्ट त्याच्याबाजुने मॅडी पण वाटला पण मग सगळेच भेडचाल ने गेले.. परागने पहिल्यापासुन ग्रुप ग्रुप न खेळता स्वताच्या जिवावर खेळायला हवं होतं..गृपमधल्या कुणीच त्याला साथ दिली नाहि सरतेशेवटी..
बेक्कार शो यावेळचा.. कुणीच चांगलं नाहिय आता या शोमध्ये..

बाप रे,फेसबुकच कलर्स मराठीच्यि पेजवर पोस्ट मध्ये कसल्या एकएक कमेंट दिल्या आहेत, बर्याच लोकांनी चँनेलच काढल आहे.हे मात्र कलर्सला महागात पडू शकत.
आजच्या आठवड्यात टीआरपी खाली जाणार बहुतेक.
यात फायदा कोणाचा झीमराठीचा,आता खूप लोक चहयेद्या बघणार.

परागने काय केलं ते दाखवू शकत नाही म्हणाले पण वैशाली, नेहा काय करत होत्या ते तर बघितलं ना सर्वांनी. पण ममां खडसावून बोललेही नाहीत त्यांना हेही खूप जणांना खटकलं आहे.

बराच गोंधळ एकला मैत्रीणीकडून म्हणून शेवटी गेल्या आठवड्यातले दोन तीन भाग बघितले.
अतिशय फालतु( नेहमीप्रमाणे) पण नीचतेचा उच्चांक होता काही भाग.

जर काही लोकांना असे वाटते की , परागला सुपिरिरर कॉम्प्लेक्स होता तर वैशालीला इन्फिरर कॉम्प्लेक्स. तिचा स्वतःचा कॉम्प्लेक्स इतका की, पुर्ण जेलसीने भरलेली व्यक्ती. तिचा चेहरा इतका खुनशी दिसतो भांडताना आणि तो भांडतानाचा चिरका आवाज. खुदा जाने गाणे एकताना पण नकोसे झाले.
बर , वैशालीला फक्त परागशी वैर असे नाही, तिला ओवरॉल ज्यांच चांगलय, त्या सर्वांवर जळु आहे. पॅथेटीक स्वभाव. काय होणार अश्याने दुसर्‍याचा दुस्वास करुन. किशोरीला पण काहितरी फोम लावताना, घ्या रीसपेक्ट आता असे म्हणत होती... अरेरे किती मनात ते जळणे...
आणि म्हणे, पराग वैयक्तिक अढी ठेवून खेळतो. चोराच्या उलट्या बोंबा.

नेहा तर अतिशय आक्रमक व्यक्ती आणि लालची. त्या हावरेपणात, ती कोणाशीही क्रूर खेळते. केळ्कर संधीसाधु.
कोणीतरी नेहाला म्हणालेले ना, सगळ्या बसेस नसतात पकडायच्या, काही सोडल्या तरी चालतात अगदी चपकल आहे.
बाकी, नेहा पाहिजे तसे बायकी विक्टीम कार्ड काढून खेळते वाटतं. बायका पँटीत , शर्टात हात घालून टॉवेल, पिशवी ओढु शकतात मग वूमन कार्ड कशाला? नेहा तर खुपच थंड वाटली त्या भागात, अगदी मला हवं ते घडलं अश्या थाटात पाणी पित होती त्या मारामारीनंतर. बाकीचे , मगरमच्छ के आंसू वहात होते. आधी तर, वैशाली थोबाड फोडेन वगैरे ओरडत होती मग खास करून वैशली आणि केळकर एकदम रडारडी. मग पाण्यात काय उतरले.. मला नाही वाटते, अगदी कानाखाली मारले वगैरे. नेहाचा मेकअप व्यव्स्थित होता.
परागने रागाने वगैरे ढकलले असेल, किंवा तिच्या आवाजाला वैतागुन तोंडावर तिच्या हात ठेवून बहुधा ढकलले असेल. आणि बाकीच्या संधीसाधु केळकर, वैशाली गँगने परागवर अ‍ॅटॅक केला असेल. आणि बीबी आपली लाज ठेवण्यासाठी दाखवत नाहीये.

नाहितर, इतका तापलेला माणूस जर कोणाला मारेल तर ती व्यक्ती बावरलेली असेल. नेहा उलट पाणी वगैरे पिवुन, माधवचे डोके मांडीवर घेवून समजावत होत्ती. आं? मग वैशालीला फंडे सांगितले की, पाण्यात डोके कसे बुडवल्याने शांत होते वगैरे. इतकं स्टेबल कोणीच नसतं मार खाल्ल्यावर. बीबी, मारामारी थांबवली नाही असा जाब जनता विचारेल म्हणून भाग कापून ड्रामा करत बसली.
चुकी एकट्या परागची नसावीच आणि नाही जो काही भाग बघितला त्यावरून, मग का त्याने पाय धरावे?
त्यामुळेच बहुधा, तो माफी मागत न्हवता नीट. नक्की गोम आहे. आणि त्याची बाजूने विचार केला तर, इतरांनी का ठरवावे त्याने घरात रहावे की नाही? त्यांची पात्रता काय?

किशोरी आणि रुपाली वगैरे गटबदलु.. रीयल मध्ये काय असतील हि लोकं... वीणा एकदम खोटारडी...

त्यातल्या त्यात तो माधव बरा वाटला.

विष्णु मनोहर यांच्यानंतर काही काळ परागने इथे कुकरी शो केला. मग विष्णु मनोहर परत आले. पराग झीवर गेला >> मग आता परागच्या पॉप्युलॅरिटीचा फायदा घेऊन परागला च घेऊन कलर्स वाले कुकरी शो पुन्हा सुरु करतील . आता तो प्रेक्षकांना माहिती झालाय म्हणजे त्यांचा कुकरी शो हिट . किव्वा झी वाले पण उचलतील त्याला . जर कलर्स मराठी बर्याच जणांनी अनसब्स्क्राइब केल असेल तर. . कारण चॅनल जरी अनसब्स्क्राइब केलं तरी व्हुट वरती बघूच शकतो कि हा "शो" . या एकाच "शो" साठी कलर्स मराठी घेण्याची आवश्यकता नाही Happy

पराग मनापासून माफी मागत नव्हता, कारण तो पूर्णपणे कन्व्हिन्स्ड नव्हता, की त्याची चूक आहे. पण शो मध्ये राहायचं तर ड्रामेबाजी करावी लागते, त्याने संपूर्ण शरणागती घेतली असती तर कदाचित शो मध्ये राहिला असताही. पण तो स्वतःच किती ऑसिलेट होत होता, एकदा अ‍ॅटिट्युड दाखवत होता, एकदा माफी मागत होता, एकदा म्हणाला माझ्यासारखा स्ट्रॉन्ग स्पर्धक यांना नकोच आहे. काल एक वाक्य नेहा म्हणाली की बाहेरच्या जगात तुझ्यावर प्रेम करणा-या माणसांमध्ये जा... ते आवडलं.
वैशालीचा फक्त आवाज आवडतो. बाकी तिचं सगळंच वागणं, बोलणं, विचार करणं हे संकुचित आहे. तिची का माफी मागायची होती? ती का रडत होती? उठून गेली? पक्की ड्रामेबाज आहे. नेक्स्ट स्पर्धक टु गो - आधी वैशाली , मग सुरेखा.
बायदवे, सुरेखाताईंनी काय एक्स्प्लनेशन दिलं- संचालिका म्हणून त्यांनी काहीच हस्तक्षेप केला नाही- याबद्दल काय म्हणाल्या त्या? मांजरेकरने मान्य कसं केलं ते?

सगळ्यात भारी शिव च आहे. तोच जिंकणाच्या लायक आहे. स्ट्रॉन्ग प्लेयर, तरी कोणाच्या अध्यातमध्यात नाही, अग्रेसिव्ह नाही, आणि इनोसन्टही आहे.

वीणा खुप खोटारडी आहे. हीना ला हिन्ग हिच बोललेली आणी सगळे खापर परागच्या नावावर घातले. सगळे मिळून ठेवत होते ना नावे मग तसे कबूलतरी करायचे.
पराग ने जे केले ते वूट वर तरी दाखवायचे unseen मध्ये .
पराग चा छोटा इंटरव्यू आला आहे वूट वर eviction नंतरचा . त्यात तो सांगात आहे गेम मध्ये mistermind वैशाली आहे . आणी तो रुपालिला सर्वात जास्त मिस्स करनार.

वैशालीचे दुसर्‍याच्या अंगावर थुंकायचं एकुन शहारा आला. अरे काय हि पातळी.
बरेच टीवी शो केल्याने, हि माणसं अशीच ड्रामेबाज असतात की खरीच अशी कोती असतात? त्यांना आयुष्य्यात कधी काळी, छी थु मिळाल्याने हा कडवटपणा असतो का की मुळातच हा स्वभाव हा प्रश्ण पडला.

ओके, वीकेन्डच्या डावला प्रत्यक्ष गेलेल्या प्रेक्षकांना जे समजलं आणि एपिसोडमधे एडीट केलं गेलं,
पराग पडल्यावर उठला आणि केस धरून नेहाला ओढून कानाखाली वाजवल्या, वैशाली त्याला आडवायला धऊन गेली, तिला चेस्टवर धक्का देऊन जमिनीवर ढकललं , मग केळ्या आणि माधव धावले त्यांच्या हाथापाई झाली, शिव एकटा कंट्रोल करु शकला सिच्युएशन आणि त्याला बाजुला घेऊन गेला.
म्हणून नेहा - वैशालीची माफी माग चालु होतं आज हजारवेळा .
(हे युट्युबर ऑनेस्ट्ली इन्सेन ने मेन्शन केलय प्रत्यक्ष प्रेक्षकांना कॉन्टॅक्ट करून, तरी कोणाकडेही कसलेही प्रुफ नाही , फोन घेऊन जायला परवानगी नसते, ज्या प्रेक्षकांनी हे ट्विट केलं ते ट्विट्सही डिलिट करायला लावल्या म्हणे.)
बाकी आजचा एपिसोड अतिशय फालतु, किती वेळा परागच्या माफी ड्रामा , मांजरेकरच्या फालतु चुगल्या आणि वीणा जायचा ड्रामा !
वीणा नक्की मिनिमम गॅरेंटी घेऊन आली आहे, सगळ्यांना माहित असणार आणि तिलाही माहित असणार मांजरेकर खोटं बोलतायेत ते, क्लिअर दिसत होतं.
सुरेखाताई बिचार्या साध्या आणि खूप ट्रान्स्परन्ट आहेत, परागला माफ करा म्हणत होत्या ते खूप जेन्युइन वाटलं, मला त्या आवडतात खूप अ‍ॅक्टिव नसल्या तरी , जेंव्हा बोलतात तेंव्हा स्पष्ट बोलतात आणि खर्या वाटतात.
सर्वात फेक, संधीसाधु, डंब बायका म्हणजे किशोरी आणि रुपाली , विसर्जन करा त्या गृपचं आता, पराग गेलेलाच आहे, या दोघी आधी गेलेल्या आवडतील मला इतर कोणा आधी.
बाकी बिबी घरातल्या बायका वेस्टर्न कपड्यांवर कुंकु का लावतात , हा नवा ट्रेंड आहे का Uhoh
म्हणून ती वीणा मला कायम काकूच वाटते Happy

सुरेखांनी सांगितलं की मी action घेतलेली चालेल का माहीत नव्हतं म्हणून काही केलं नाही. आधीच्या गेममध्ये दोघींना बाहेर काढल्यावर बिग बॉसने असं करता येणार नाही असं सांगितलं, म्हणून सुद्धा.

या टास्कला इन्स्ट्रक्शन्समध्ये स्पष्ट म्हटलं होतं की अंतिम निर्णय संचालिकेचा, बिग बॉस हस्तक्षेप करणार नाहीत.
त्यांनी नेहाला बोलवण्याऐवजी सुरेखांना बोलवायला हवं.होतं.
झंपी आणि पूनम +१

Pages