Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Anju,
Anju,
I dont think he's gone , seeing secret room news everywhere!
If it is so, then good.
If it is so, then good.
निलंबन आणि काढून टाकणे ह्यात काही फरक आहेना. काढून टाकलं असं नाही म्हणाले bb. म्हणून काही दिवसांसाठी निलंबन केलं असंही असू शकते.
सोशल मिडिया मात्र जवळजवळ ८०
सोशल मिडिया मात्र जवळजवळ ८० टक्के का होईना परागच्या बाजूने गेलाय. नेहा, वैशाली, केळकर या सर्वांना शिव्या पडतायेत आणि सुरेखाताईंनापण.
सॉरी टू से पण हीनाकडे कधी कधी बघवत नाही.
स्मिताची राहून राहून आठवण येते. किती छान ग्रेसफुल होती, कोणाच्या गळ्यात पडत नव्हती. आपलं आपलं तिचे सुरु असायचं. स्वत: चा आब राखून होती टास्कमध्ये पण. एकदा पुष्करला लाथ दाखवली आणि एकदा मेघाला किती खरच करतेस केसांवर यावरून टिप्पणी केली हे चुकलं आणि लगेच शिव्या पण खाल्ल्या तिने ममां कडून पण नंतर ती आपल्या चुका सुधारायची आणि अगदी dignity ठेऊन decently वावरायची. वल्गर कधीच वाटली नाही.
मी हिंदी बिग बॉसचे पहिले दोन
मी हिंदी बिग बॉसचे पहिले दोन की तीन सीझन पाहिलेत. त्यात असले टॉर्चर वगैरे प्रकार अजिबात नव्हते. मराठीचा पहिला सीझन पाहिला नव्हता.
टास्कस पण दोन टीम्सच्या मध्ये नसून सगळ्यांना मिळून असे आणि त्यातल्या यशावर लक्झरी बजेटसाठी पॉइंट्स मिळायचे. त्यातून यांना हवं ते विकत घ्यावं लागायचं.
अभिजीत केळकर आणि वैशाली मंथरा वाटताहेत. शिव किती दिवस सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये राहू शकेल आणि दोन दगडांवर पाय ठेवू शकेल हे पाहायचंय. त्याचं लहान मुलासारखं बोलणंही जेन्युइन आहे का ते कळत नाहीए.
स्मिता आणि हिना ची कंपरिसन का
स्मिता आणि हिना ची कंपरिसन का करतायत लोक?
मलाही सिक्रेट रूम च वाटतेय.
मलाही सिक्रेट रूम च वाटतेय. नेहा आणि ग्रुप ला ती शंका पण आली की काय असेही एका संवादावरून वाटले. 'गेला असेल का' असे काहीतरी बोलता बोलता थांबल्या.
सुरुवातीला येडपटासारखे माधव आणि अभिजीतने का भोकाड पसरले होते कळले नाही. वैशाली तर धडधडीत नाटक करत होती रडण्याचे. सगळ्यात जास्त तिचाच राग येतो मला. बिबॉ त्यांची पण चुक आहे असे म्हणाले. नक्की काय झाले अजिबातच कळणार नाही का कधी ? रुपालीचा पराग च्या कपड्यांवर अश्रू गाळणे ड्रामा पण टू मच आणि ओढून ताणून वाटला. ती बॅग वर झोपून रडली तर लगेच किशोरी पण दुसर्या बॅग वर आडवी होऊन रडायला लागली ते बघून हसायलाच आलं मला.
नेहा, वैशाली, केळकर आणि
नेहा, वैशाली, केळकर आणि माधवला चुडेल चौकडी नाव दिलंय बहुतेक honestly insane ने.
परागने नेहाला मारल्यावर केळकर आणि माधवने मारलं असेल त्याला असं वाटतं. शिव परागला घेऊन बाजूला गेला बहुतेक.
आख्ख्या घरात फक्त शिव एकटाच चांगला वाटायला लागलाय.
आज मला अस खूप वाटत आहे की
आज मला अस खूप वाटत आहे की विकएंडच्या डावात वीणा आणि शिवच्या नात्याचा सोक्षमोक्ष लागणार आहे.
कारण वूटवर एका अनसिन सिनमध्ये केळकर ग्रुप ट्रुथ आणि डेअर चा गेम खेळत असताना शिव डेअर निवडतो,केळकर त्याला वीणाला काहीतरी सांगत असतो.शिव वीणाच्यि कानात सांगायला जातो,kvrpgrp एकत्र बसलेले असतात ,वीणि जेवताना शिव सरळ येऊन तिच्या कानात काहीतरी सांगायला जातो,वीणा पूर्णपणे भडकून अपोझ करते,किशोरीपण विरोध करते,ही केळकर गँग निघून जाते.
वीणाला यते कळत आणि मग ती परागला सांगताना दाखवल आहे की शनिवार येऊ देत,मग मी एकदाच शिवबद्दल बोलणारच आहे आणि नंतर माय्र बास.आणि असा कोपरापासून नमस्कार करताना दाखवली आहे.
बिबॉ याचा उपयोग ममांना नक्कीच करायला लावणार.
बघू काय होत ते.
परागने जर नेहाच्या कानाखाली
परागने जर नेहाच्या कानाखाली मारली असेल तर त्याला बाहेर काढले हे चांगलेच झाले..... कारण ते मारणे कुठल्याच कारणास्तव जस्टीफाय नाही होवू शकत!
खेळाच्या बेसिक नियमांच्या विरुद्ध आहे ते!
आज याला सोडून दिले तर उद्या हेच उदाहरण देवून कुणीतरी अजुन कुणाला तरी मारायची हिम्मत करेल.... तोंडाने करा ना काय करायची ती बडबड!
नेहा काल अजुनच आवडली.... कुठलाही कांगावा नाही.... आकांडतांडव नाही..... परागला उलटसुलट बोलली नाही नंतर लगेच की फार काही रडारड केली नाही!
बिग बॉस ने परागला दोषी ठरवून त्याला घराबाहेत जाण्याची शिक्षा दिल्यानंतर जेंव्हा नेहा ला तिचे मत विचारले तेंव्हा तिने त्याला माफ केले असते तर ती एका अर्थाने बिग बॉसच्या व्हर्डिक्टच्या विरुद्ध गेली असती.... उगाच माफ बिफ करुन नेहाने महान बनण्याचा प्रयन्त केला नाही ते चांगलेच झाले.... तो राग फक्त कालच्या टास्कमधला नव्हता तर एकंदर बऱ्याच दिवसाचा साचलेला राग/फ्रस्टेशन होते हे पण अगदीच पटले.... अर्थात तो ज्या ॲटीट्यूडने माफी मागत होता त्यात पश्चातापाचा लवलेशही नव्हता...... तुमचे मन मला माफ करण्याएव्हढे मोठे नाही पण तरीही मी माफी मागतो असे म्हणून माफी मागितली तर कुठला शहाणा माणूस माफ करेल?
वैशालीने करेक्ट पकडला तो पॉइंट!
बाकी पराग बाहेर पडल्यानंतर घरातले वातावरण अगदीच हलकेफुलके झाले.... दोन्ही ग्रूप कधी नव्हे ते एकमेकांशी अगदी खेळीमेळीने बोलत होते (अर्थात बिग बॉस ला फार दिवस बघवणार नाही हा feel good factor आणि परवडणार ही नाही).... पण कालच्या त्या घमासानीनंतर तो हलकाफुलका टास्क ही आवश्यक होता स्पर्धकांना नॉर्मल करायला
रुपालीचा मेलोड्रामा तिला करणेच भाग होते, बाकीच्यांसारखी ती लगेच हसाखेळायला लागली असती तर ते वाईट दिसले असते (ती वीणाला म्हणाली सुद्धा की किमान वाईट वाटल्याची ॲक्टींग तरी कर)..... न जाणो त्याला सिक्रेट रुम मध्ये ठेवले असेल तर
शिव हळूहळू आवडायला लागला आहे!
पण अजुनही वीणा आणि नेहा या दोघीच सगळ्यात जास्त आवडत्या आहेत.... त्या दोघीही एकमेकींपेक्षा अगदी वेगळ्या आहेत तरीही दोघीही आवडतायत!
शिवानी आणि वीणाच्या वेळी
शिवानी आणि वीणाच्या वेळी दोघींना दोषी ठरवून आधी अडगळीची खोली दिली. मग खोटा कोर्टरून ड्रामा करून बिचुकले मार्फत शिवानीला दोषमुक्त करून वीणाच्या डोक्यावर बहुमताच्या निर्णयाने बादल्या बादल्या पाणी ओतलं.
तर त्या केसमध्ये दोघी दोषी होत्या तर परागच्या केसमध्ये माधव, अभिजित आणि वैशालीची फक्त निषेधावर सुटका केलीय.
मला असं वाटतंय की परागच्या ग्रुपला प्रेक्षकांची सहानुभूती मिळावी अशाच खेळी बिग बॉस करत आलेत.
---
गेल्या शनिवारी मांजरेकरांनी स्वतःच चुगलीखोर होऊन परागचा प्लॅन उघड का केला?
---
वीणा ग्रुपमध्ये मनापासून आहे, असं कधीच वाटलं नाही. ती स्वतःचा गेम खेळायला आली आहे.
------
नेहाने परागला उकसवायचा पुरेपूर प्रयत्न करून हवी तशी रिअॅक्शन मि ळव्ल्याने उलट ती खुष असावी त्यामुळे तिने नंतर जास्त कालवा केला नसावा किंवा तो भाग दाखवला नसेल.
नाहीतर या आधी तिने प्रत्येक वेळी व्यवस्थित भांडवल केलं आहे.
स्मिता आणि हिना ची कंपरिसन का
स्मिता आणि हिना ची कंपरिसन का करतायत लोक? >>>
मीच करतेय हो. ग्लॅमरस म्हणून.
नेहा काल अजुनच आवडली.... कुठलाही कांगावा नाही.... आकांडतांडव नाही..... परागला उलटसुलट बोलली नाही नंतर लगेच की फार काही रडारड केली नाही! >>> कशाला करेल, तिचं काम ऑलरेडी झालेलं. हिंसा झाल्यावर पराग जाणार हे जवळजवळ नक्की होतं. अर्थात परागची चुक होतीच.
अॅक्चुअली परागने अति मुर्खपणा केला, ढकलले हा कांगावा केला असता आणि मारलं नसतं तर bb नी नेहा, वैशालीला माफी मागायला लावली असती त्याची. स्वतः च्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेणारा कोण असेल तर पराग. आता बाहेर आल्यावर त्याला जेव्हा कळेल voting lines बंद होत्या तेव्हा कळेल त्याला, आपण बाहेर पडणार गृहीत धरून बसलो ती किती मोठी चूक होती.
सगळेच गेम खेळतायत, अॅक्टिंग
सगळेच गेम खेळतायत, अॅक्टिंग करतायत.
परागने पद्धतशीरपणे आपल्या किडनी डोनेशनबद्दल आधी कधी तरी बोलून ठेवलं... आणि खुर्ची टास्क मधे त्याने ती गोष्ट आपल्या फेवरमधे वापरुन घेतली. त्याचा वापर केल्याने त्याला बाहेर भरपूर सहानुभूती मिळणार हे बरोब्बर समजल्याने नेहा-वैशालीने रडून नंतर गंगास्नान (स्विमिंग पूल मधे डुबकी- म्हणे याने डोकं शांत होतं!!!) करुन तीच सहानुभूती आपल्याकडे खेचून घेतली. अश्या प्रकारे परागने (आणि त्याचे समर्थक सुद्धा) ही भांडवल केलं आणि नेहा-वैशाली आणि त्यांचे समर्थक यांनी सुद्धा !
.....आणि सोशल मिडिया वर आपण टीआरपी देत बसलोय यांना कोणाची ना कोणाची तरी बाजू घेऊन
बिग बॉस हा 'रिअॅलिटी' शो 'स्क्रिप्टेड' आहे, हे दोन गोष्टींवरुन काल स्पष्ट जाणवलं-
१. परागने नक्की काय केलं (हात उचलला की ढकललं की अजून काही!) हे नीटसं समजलं नाही किंवा दाखवलं नाही. सगळे जण खरोखरच चिडले होते, तर एकाने तरी रागाच्या भरात स्पष्टपणे परागने नेहाच्या-वैशालीच्या थोबाडीत मारली, कानफटात मारली, किंवा तत्सम शब्दप्रयोग केला असता. एकानेही तसं म्हटलं नाही, फक्त वरवर पराग चुकीचा वागला असंच सगळे बोलत होते. याचा अर्थ त्यांना तसंच बोलायला किंवा मारलं असेल तर ते न बोलायला सांगितलं होतं.
२. वीणा-रुपाली दोघींमधे दिवसभर कुरबुर होत राहिली आणि मग त्या पुराणिक्सच्या टास्कमधे दोघींना वेगवेगळ्या ग्रुप्समधे ठेवलं. जे या आधी कधी केलं नव्हतं. म्हणजे दिवसभर दोघींनी भांडायचं आणि मग टास्कमधे पण दोघींना एकमेकींच्या विरोधात उभं करायचं (भले तो टास्क महत्वाचा नसू दे) हे मुद्दामच केलं गेलं.
असो परागचं चुकलंच आहे. हाच
असो परागचं चुकलंच आहे. हाच तर गेम आहेना, कुठल्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसे वागता. शिवानीने फिजिकली त्याला पाडायचा प्रयत्न करून त्याने तक्रार नाही केली. शिवानी आपल्या कर्माने गेली तसा हा आपल्या कर्माने आणि बिचुकले त्याच्या कर्माने.
मित....।।।सहमत
मित....।।।सहमत
मला तर हा शो पहिल्या दिवसापासून स्क्रिप्टेड वाटत आहे.
मुळात खुर्चीसम्रिटच्या टास्क मध्ये नॉमिनेटेड लोकांचीच टीम न बनवता बरोब्बर हीना ला केळकर ग्रुप आणि शिवला वीणासोबत ठेवल
सुरेखाला संचालक ठेवून एक जबरदस्त खेळी खेळली बिबॉसने.
म्हणूनच आता उत्सुकता आहे की पुढच स्क्रीप्ट काय असणार?
कारण काल पराग बाहेर पडल्यानंतर घरातल वातावरण आनंदाच होत,जे बिबॉसला कधीही सहन होणार नाही.
मला अस वाटत आहे वाईल्ड कार्ड एंन्ट्री ने मेल कंटेंस्टंटला वीणाच्या ग्रुप मध्ये पाठवून शिवला इनसिक्युअर करतील
त्या शिव वीणा वर फोकस bb चं
त्या शिव वीणा वर फोकस bb चं जास्त करतात. काय दाखवायचं आणि काय नाही ते त्यांच्या हातात आहेना. कधी कधी खूप क्युट वाटतं. मला आवडते त्यांचे bonding. पण काल खरंच कंटाळा आला, किती वेळ आख्खं घर त्या दोघांभोवती होतं. इतकं पण नका ना दाखवू. अर्थात काल त्यांच्याकडे दाखवायला काहीच नव्हतं.
शिव वीणाला फुटेज द्यायची गेले चार दिवस bb चीच इच्छा दिसली. दोन्हीकडचे त्यांची फ्रेंडशीप तोडण्याच्या मागे आहेत, आता कोण success होतंय बघूया. अजूनपर्यंत नाही झाले. केळकर आणि वैशाली तर सतत धमकी देण्याच्या मूडमध्ये असतात शिवला.
Checkout Parag gets
Checkout Parag gets aggressive! on Voot https://voot.app.link/Aq2JR09eUX
त्यात पराग चा टास्क 3 तास चालला होता..
पराग ने नक्की काय केले ते
पराग ने नक्की काय केले ते दाखवले नाहीच आहे तिथल्या लोकांच्या बोलण्यावरून त्याने खुप काही केले असे वाटले. बिग्ग बॉस कार्यात बळाचा वापर केल्याबद्दल कुणाला कहीच बोलले नाहित. ते माधव वैशाली अभिजित केळकर ला ओरडले कारण त्यानि परागच्या action वर प्रतिक्रीया म्हणून त्यानि ही त्याच्यावर बळाचा वापर केला.
त्यात पराग चा टास्क 3 तास
त्यात पराग चा टास्क 3 तास चालला होता.. >>> चांगलं करत होता. त्याला मागून ढकलले नसतं तर तो जिंकला असता.
ते voot चं वेगळेच व्हिडीओ येतायेत तीन. परागचा नाही दिसत मला वरच्या लिंकमध्ये. मी voot वर जाऊन बघते सगळेच.
पराग aggressive झाला त्या
पराग aggressive झाला त्या व्हिडीओत actually तो भाग कटचं केलाय की नेहाला काय केलं. कशाप्रकारे attack केला ते दाखवणे बरोबर वाटलं नसेल बहुतेक bb ना.
मला वाटतं परागला तपासणी करून
मला वाटतं परागला तपासणी करून बाहेर पाठवलं असेल, कारण जर त्याला खरंच थोडं जरी लागलं असेल तर प्रकरण bb वर शेकू शकते. पराग मग कांगावा करू शकतो कि असं झालं आणि bb ने लक्ष दिलं नाही, ह्या सर्वांनी त्रास दिला म्हणून मी असं केलं.
तसा परागपण channelचा माणूस होताच, कुकरी शो आणि झुंज मराठमोळी मध्ये होता इ टीव्ही असताना.
<बिग बॉस हा 'रिअॅलिटी' शो
<बिग बॉस हा 'रिअॅलिटी' शो 'स्क्रिप्टेड' आहे, हे दोन गोष्टींवरुन काल स्पष्ट जाणवलं>
स्क्रिप्टेडपेक्षा क्रिव्टिव्ह टीम स्पर्धकां च्या वागण्याचा वापर करून पुढे कथानक रचत जाताहेत असं वाटतं.
शिवानी कडून तिची व्यवस्थित काळजी घेतली गेली हे वदवून तिला बाहेर काढणं,
अख्खा ग्रुप नॉमिनेट झालेला असताना च व्होटिंग लाइन्स बंद असणं,
वीणा ग्रुपपासून दुरावतेय हे लक्षात येताच तिला दुसर्या टीमा मध्ये टाकणं
राडा व्हायची भरपूर शक्यता असलेल्या टास्कमध्ये सुरेखांना संचालक ठेवणं (त्यांना तो टास्क स्पर्धक म्हणूनही झेपला असता का?)
इ.
तसं असेल तर परागला extra
तसं असेल तर परागला extra किंमत देतील आणि पुढे कामेही देतील. आत्ता काढलं तरी.
Scripted असावं असा संशय त्यादिवशी आला मला जेव्हा सकाळी ते ब्रेकअप गाणं लावलं पण उलटंच झालं दोघांत ब्रेकअप झालाच नाही. परागपण म्हणाला आता त्यांच्यात ब्रेक अप व्हायला हवं होतं तर ही त्याच्याशीच गप्पा मारायला जातेय.
आणि जर परागला सिक्रेट रूममध्ये ठेवायचं असेल तर नंतर कारण असं सांगतील की त्याला injury झालेली या खेळामुळे, त्यामुळे तुम्हीही दोषी आहात म्हणून आम्ही त्याला सिक्रेट रूम शिक्षा दिली. शेवटी bb ला हवं असेल जसं तसं ते करणार.
शिवानी, बिचुकले, पराग सगळे
शिवानी, बिचुकले, पराग सगळे पोटेन्शिअल व्हिलन गेले, आता घर शान्त आनंदी झालय, बिगबॉस आता कशी आग लावणार
परागने म्हणे थोबाडीतपेक्षाही अजुन बरच काहीतरी मेजर केलय अॅटॅक सारखं काहीतरी ज्यानी सगळेच अवाक झाले आणि ऑलमोस्ट २० मिनिट गेले म्हणे त्याला कंट्रोल करण्यात, नेहाला एकटीला नाही, वैशाली , माधव आणि केळ्यालाही मारलं त्यानी कारण ते मधे आले, नेहाला जास्तं इन्टेन्स्ली मारलं , हे ट्विट्रवर वाचलं !
नक्की काय झालं कधीच बाहेर आणणार नाहीत, बिगबॉस स्वतःलाच/ स्वतःच्या रेप्युटेशनलाच प्रोटेक्ट करतायेत.
बाकी सगळ्यांचीच रडायची नौटंकी हस्यास्पद, वीणा जे म्हंटली ते बरोबर होतं, असं कपड्यांवर हात पसरून रडणे कोणी मेल्यावर करतात !
वीणा जे म्हंटली ते बरोबर होतं
वीणा जे म्हंटली ते बरोबर होतं, असं कपड्यांवर हात पसरून रडणे कोणी मेल्यावर करतात ! >>> हो हे तिचे बरोबर होतं म्हणणे. पण रुपाली खरोखर रडत होती असं वाटलं मला.
नक्की काय झालं कधीच बाहेर आणणार नाहीत, बिगबॉस स्वतःलाच/ स्वतःच्या रेप्युटेशनलाच प्रोटेक्ट करतायेत. >>> खरं आहे. तसं असेल तर परागला परत आणणार नाहीत हे नक्की.
परागने म्हणे फक्त थोबाडीतच
परागने म्हणे फक्त थोबाडीतच नाही मारली तर लाथाही मारल्या.म्हणजे बरच गंभीर प्रकरण होत.
कारण वीणा ही रडून माफी मागणार्यातली मुलगी नाही आहे.पण ती नेहा ,वैशालीला सॉरी म्हणत होती,रुपालीही नेहा आणि वैशाली सोबत होती आणि त्यानंतर ती जे परागवर ओरडली ते मात्र खर होत.
त्यामुळे परागलि परत आणतील अस वाटत नाही.
एवढं केल्यावर परागने स्वतः
एवढं केल्यावर परागने स्वतः हूनचं बाहेर पडायला हवं होतं आणि bb नी पण माफ करणारा मोठा असतो वगैरे डायलॉग्ज म्हणायला नको होते. इतकं करून माफी मागतानाचा attitude परागने दाखवायला नको होता. तो खरंतर पूर्ण विक frustratedचं होता, आता माझी विकेट पडणार करून.
पण ह्या सर्व सिच्युएशनला bb स्वतःच जास्त जबाबदार आहेत आणि सुरेखाताईसुद्धा.
बस क्या, शो स्क्रिप्टेड वाटतो
बस क्या, शो स्क्रिप्टेड वाटतो अजुनही तुम्हाला? शक्यं आहे का इतके दिवस स्क्रिप्ट्स पुरवत रहाणे ?
सिच्युएशन्स तयार करणे, गृप्स मॅनिप्युलेट करणे, राडा होणारी टास्क्स देणे, ह्युमन सायकॉलॉजी प्रमाणे कोण किती हायपर होईल, पेशन्स ठेवेल याची परीक्षा घेणारं १०० दिवसांचं हाउसअरेस्ट टास्क आहे.
थोडक्यात सदस्यांना प्यादी म्हणून वापरणे हे बिबॉ नक्कीच करतात, त्याला स्क्रिप्टेड म्हणत नाहीत, ‘बिग बॉस खेल गए‘ म्हणतात
बिबॉ सारख्या अनेक रिअॅलिटी शोज मधे हेच चालतं !
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=gXXDpWvBZ88
चला बिचुकले काही परत येत नाही हे कन्फर्म्ड त्याच्या वकीलाकडून. बरं झालं.
राडा करण्याचं पोटेन्शल असलेले
राडा करण्याचं पोटेन्शल असलेले खेळाडू शोधून आणण्यापासून सुरुवात होते.
माधवची कामगिरी सिनेमातल्या एक्स्ट्राची किंवा climax झाल्यावर येत णाऱ्या पोलिसाची दिसतेय.
माधवची कामगिरी सिनेमातल्या
माधवची कामगिरी सिनेमातल्या एक्स्ट्राची किंवा climax झाल्यावर येत णाऱ्या पोलिसाची दिसतेय. >>>
पण हा मला चौघांच्यात बरा वाटतो.
Pages