मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>बिबॉ टीम ला मानलं . प्रत्येक घटनेतून टी आर पी खेचतात<<
प्रत्येक खेळात (रियॅलिटी शोज याला अपवाद नाहि) खेळाडु खेळापेक्षा मोठा होणं हे चांगलं लक्षण नाहि, कालांतराने दोघेहि आपटतात. बिबॉच्या हाते अशी चूक होते का, ते आता पाहुया... Happy

आस्ताद बरेच इंटरव्ह्युज देत असतो सध्या, पण हे बेस्ट आहे !
‘ एक घर १२ भनगडी ‘ दर आठवड्याला पुष्कर- सई करतात हा प्रोग्रॅम, यावेळी आस्तादला आणलय, मस्तं बोललाय खास अस्ताद स्टाइलमधे !
https://youtu.be/ACxb52ipB74

परागला आरोपी म्हणून उभं केलं विकेंडच्या डावात.

मुळात त्याने न दाखवण्याइतपत केलं असेल तर त्याला परत सगळ्यांसमोर उभं करायचा अट्टाहास का आणि त्याने तरी का यावं. पडद्यामागे असं काय अजून घडामोडी घडतायेत हे सांगू शकत नाही. पण आता सगळे विरोधात बोलतायेत त्याच्या अगदी रुपालीपण. बिग बॉसवर जे आरोप केले लोकांनी ते पुसुन काढायला परागला सर्व कबुल करायला बोलावलं का.

नेहा वैशाली सुरेखाताई यांच्या चुका ममांनी अगदी खालच्या सुरात सांगितल्या.

परागने म्हणे रागाने उठून नेहाच्या पोटात बुक्कि मारून तिला खाली पाडले,नंतर लाथा मारल्या,मग थोबाडीत मारली आणि सगळ्यात वाईट म्हणजे तिचे कपडे धरून फाडण्याचा प्रयत्न केला,वैशालीला ही मारले.केळकर,माधव थांबवायला गेल्यावर त्यांनाही मारले.तो कंट्रोलमध्यैच येत नव्हता,शिवने कसतरी कंट्रोलमध्ये आणल.

नेहाची देखील तितकीच चुकी आहे. नेहाने परागला मारण्यास प्रवृत्त केले.. टाळी एका हाताने वाजत नाही . नेहा देखील शिक्षेस पात्र आहे.. पराग ने जे कृत्य केलं ते अत्यंत चुकीचे आहेच ..पण आजच्या भागात नेहा /वैशाली आणि केळकरला तसच माधवला काहीच बोलले नाहीत. उद्या बोलतील कदाचित . आणि त्या संचालिकेला तर अगदीच गुळमुळीत . मी डंबेल्स काढायला बोलले नाही कारण म्हणे मला वाटलं बिग बॉस मला रागावतील . तुमची काही चुकी असेल तर बिग बॉस सांगतील तुम्हाला पण तुमची संचालिका म्हणून जिथे चूक दिसेल तिथे बोलण्याची जबाबदारी आहे कि नाही ? नेहा ला पण आत मध्ये बोलावून सांगितलं गेलं शारीरिक इजा करू नका . बाहेर येऊन सांगते "हो बिग बोस ला सांगितलं आम्ही नाही करत आहोत "आणि परत परागच्या पोटावर बोट खुपसायला सुरवात ?

परागने म्हणे रागाने उठून नेहाच्या पोटात बुक्कि मारून तिला खाली पाडले,नंतर लाथा मारल्या,मग थोबाडीत मारली आणि सगळ्यात वाईट म्हणजे तिचे कपडे धरून फाडण्याचा प्रयत्न केला,वैशालीला ही मारले.केळकर,माधव थांबवायला गेल्यावर त्यांनाही मारले.तो कंट्रोलमध्यैच येत नव्हता,शिवने कसतरी कंट्रोलमध्ये आणल. >> कोणाकडून कळलं हे . काही खात्रीचा सोर्स ? बिग बॉस ने एवढं लपवूनही ? Happy

पराग ला आत घेतले का मग का फक्त बाहेरुन च परत स्वतः च्या घरी पाठवणार ? >>>

उद्या त्याला आत पाठवणार पण ठेवणार की नाही माहीती नाही. आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्याच्यावर आरोप मग त्याचं माफी मागणे सुरु आहे.

परागने म्हणे रागाने उठून नेहाच्या पोटात बुक्कि मारून तिला खाली पाडले,नंतर लाथा मारल्या,मग थोबाडीत मारली आणि सगळ्यात वाईट म्हणजे तिचे कपडे धरून फाडण्याचा प्रयत्न केला,वैशालीला ही मारले.केळकर,माधव थांबवायला गेल्यावर त्यांनाही मारले.तो कंट्रोलमध्यैच येत नव्हता,शिवने कसतरी कंट्रोलमध्ये आणल. >>> इतकं केलं असेल तर त्याने स्वत:च यायला नको होतं. फार लज्जास्पद आहे ही गोष्ट आणि मग bb नेहाला मोठ्या मनाने माफ कर का सांगत होते indirectly.

काहीतरी गोम आहे. पराग नक्कीच bb साठी महत्वाचा आहे आणि सोशल मिडियाचं प्रेशर पण आहे bb वर. त्यात बिचुकलेला जामीन मिळाला नाही म्हणून आणू नाही शकत.

ते जे काही घडलं आहे ते दाखवत का नाहीत. ते दाखवलं आणि परागने एवढं केलं असेल तर नक्कीच बाहेर त्याच्याविरोधात कम्प्लेंट होईल आणि हे प्रकरण पुढे गेलं तर bb आणि सुरेखाताई, नेहा, वैशाली, हीना, माधव, केळकर यांनाही दोषी धरले जाणार थोडंफार. परागला जास्त मोठी शिक्षा होईल न्यायालयात पण ह्यांनाही दोषी धरलं जाईल म्हणून दाखवत नसावेत.

Thanks अन्जू.
नेहा आणी टीम ने खर तर खुप चिडण्यासारखे केले होते त्याला चिमटे काडत होते बळाचा वापर केलेला.पण त्याने सयंम ठेवायला हवा होता .
तर आज आरोपी नेहा आणी टीम असती.

म्हणूनच ममां म्हणाले की तचझे प्रताप बाहेर दाखवलेले नाहीत ,नाहीतर प्रेक्षक आत आले असते.
पण आज ममां पार्शियल आहेत हे सिध्द झाल,अगदी खालच्या स्वरात नेहा,वैशाली आणि केळकरशी बोलत होते.
माधव मंद वाटतो मला
आणि ती रूपाली गेले दोन दिवस एवढ तावातावाने बोलत होती वीणाला,प्रत्यक्ष ममांपुढे, राईट सर,यस सर अस करत होती.
घ्यायचा ना स्टँड वीणाविरोधात,मत मांडायच स्वत:च.

उद्या आत पाठवणार परागला.
त्याच्यासाठी खूपच कठीण असणार आहे. जर तो धडा शिकून डोकं शांत ठेवून खेळला तर ग्रेट.

महेश मांजरेकर आज समुपदेशकाच्या भूमिकेत होते.

परागने एवढं सगळं केलं असेल तर तिथे बाउन्सर्स नसतात का बाहेर? हिंदीत असायचे बहुतेक. इतकं सगळं करून माफी मिळवायची संधी आणि रिएंंट्री मिळाली असती असं वाटत नाही. पसरवलेल्या गोष्टी असणार.

आज ममां पार्शियल आहेत हे सिध्द झाल,अगदी खालच्या स्वरात नेहा,वैशाली आणि केळकरशी बोलत होते.>> किती गुळमुळीत बोलत होते..अग अस नाही ग.. त्याना काय डॉक्टर ने सांन्गितल आहे का ओरडू नका..मला वाटलं आत्ता बोलतील..नंतर बोलतील..पण नाही..पराग वरच आला मग एपिसोड..बाकी सगळ्या सुटल्या.

इंन्स्टाग्राम अकाउंटवर व्हडिओज मध्ये ही न्युज असून confirmed by sourcesअस लिहिल आहे।
असू शकेल कारण इतक भयानक असल्याशिवाय ते कट करणार नाहीत.

परागने म्हणे रागाने उठून नेहाच्या पोटात बुक्कि मारून तिला खाली पाडले,नंतर लाथा मारल्या,मग थोबाडीत मारली आणि सगळ्यात वाईट म्हणजे तिचे कपडे धरून फाडण्याचा प्रयत्न केला,वैशालीला ही मारले.केळकर,माधव थांबवायला गेल्यावर त्यांनाही मारले >> हे खरे नसावे. कारण काल बिबॉ ने स्पष्ट शब्दात वैशाली, माधव आणि केळ्याचा पण निषेध केला. सो आधी पराग ने नेहाला मारले असावे आणि मग या तिघांनीही त्याच्यावर हल्ला करून त्याला मारले हे जास्त लॉजिकल वाटते.
सोमि वर अफवा पसरवत असणार लोक आता. हे खरे असते तर त्याला रीएन्ट्री नसती मिळाली. शिवाय ते माफी करणारा मोठा असतो वगैरे तर अजिबात नसते म्हटले बिबॉ ने.

समथिंग फिशी असं वाटतंय. का आणतायेत परागला परत. त्याला खरोखर आतून काही त्रास झालाय की वळ आहेत जे तो prove करू शकतो आणि हे तपासणी केल्यावर दिसलं का. हे प्रकरण त्याच्यासह सर्वांवर शेकेल ही भीती आहे का bb ला.

बहुतेक त्याला माफी मागायला सांगून सगळ्यांची, उद्या परत पाठवतील घरी, नीट निरोप देऊन.

आत पाठवल आहे पण कशासाठी कळल का?कारण शेवटचे पाच मिनिटे लाईट गेले होते >>> आज नाही दाखवलं. उद्या त्याला आत पाठवणार.

हो बिग्ग बॉस ने काल सांगितले होते की पराग ने जे केले त्याला प्रतिक्रीया म्हणून माधव वैशाली केळकर ने जे केले ते चुकीचे आहे.

कारण काल बिबॉ ने स्पष्ट शब्दात वैशाली, माधव आणि केळ्याचा पण निषेध केला. ..........।हो मारल ना,त्यांनी पण.तिथे अँक्च्युअल मारामारीच झाली.म्हणून आज ममां त्यांनाही थोडस का होईना ओरडले ना.

पण युपी लाथा मारल्या पोटात बुक्की मारली हे कुठल्या खात्रीलायक सोर्स कडून कळलं ते सांगतच नाहीयेत . आणि वैशाली /केळकर आणि माधव /नेहाला सुद्धा बिग बॉस बोललेले आहेतच . कि त्यांची पण चुकी आहे असं काहीतरी . म्हणजे परागने लाथा मारल्यावर या सगळ्यांनी पण त्याला मारलं असेलच . म्हणजे आधी नेहानी त्याला चिथावलं ( बोट खुपसून / पाठीमागे लोखंडी डंबेल्स ठेऊन ) म्हणून त्याने तिला मारलं आणि त्याने तिला मारलं म्हणून केळकर /वैशाली आणि माधवने त्याला मारलं असा सिन असावा. एकट्या त्याने मारलं असत तर त्याला घेतलं नसत . सगळ्यांचीच चुकी असावी आणि एवढ्या सगळ्यांना बाहेर काढणं शक्य नाही Proud

आज ज्या अर्थी ममां म्हणाले की तुझे प्रताप दाखवले नाहीत नाहीतर प्रेक्षक आत आले असते.म्हणजे नक्कीच अस काही झाल असेल

नेहाने actually task मध्ये जितके वाईट केलं तिला बोलले नाहीत तसं अजिबात. हिनाला निदान सुनावलं तरी.

चला निदान शिवचं तरी कौतुक केलं. तो एकटा छान खेळला असं.

शिव वीणा च्या मैत्रीला सगळ्यांचा विरोध का आहे, ते गेम पलीकडे जाऊन एकमेकांना धरून आहेत, दु:ख शेअर करतात.

अहो तुमच्या पोस्ट प्रमाणे त्याने नेहाला मारले, तिचे कपडे फाडले, मग वैशालीला ही मारले.केळकर,माधव थांबवायला गेल्यावर त्यांनाही मारले. हे इतके सगळे खरे असते तर त्या तिघांचा निषेध नसता ना केला बिबॉ ने. उलट अभिनंदन करण्यात आले असते स्टँड घेतला म्हणून Happy

त्याला पाडलेलं दिसतंय. हा त्या टीमने नाकारलंय.
तसंच वैशालीची भाषा बरेचदा घसरलेली आहे. मी कानाखाली वाजवीन, मग बाहेर जावं लागलं तरी चालेल असं ती कोणाबद्दलतरी बोलली होती.
तिने आरोप नाकारणं मला खोटं वाटलं.

हो तसच झाल म्हणे,पराग ने हे केल्यावर वैशाली,केळकर,माधव त्याला अडवायला गेले,त्यांच्यात मारामारी झाली .माधव आणि केळकळनेही मारल त्याला,बेसिकली तो खूप व्हॉयलंट झाला असावा,कारण अशा वेळी अशी माणस कंट्रोलमध्ये येत नाहीत.

अहो तुमच्या पोस्ट प्रमाणे त्याने नेहाला मारले, तिचे कपडे फाडले, मग वैशालीला ही मारले.केळकर,माधव थांबवायला गेल्यावर त्यांनाही मारले. हे इतके सगळे खरे असते तर त्या तिघांचा निषेध नसता ना केला बिबॉ ने. उलट अभिनंदन करण्यात आले असते स्टँड घेतला म्हणून Happy
.......त्याने मारल म्हणून यांनीही तस करायला नको होत अस बिबॉसला वाटत असाव.म्हणून त्याचा निषेध केला असावा.
नाहीतर मग त्यांना काहीतरी शिक्षा नक्कीच दिली असती.
केवळ परागने थोबाडीत मारली म्हणून एवढा राडा नक्कीच होणार नाही ना.

वीणा नेहाला मिठी मारून sorry म्हणत होती तेव्हा नेहाचे कपडे फाटलेत असं दिसलं नव्हतं मलातरी.

Pages