मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आता वैशाली आणी केळ्या जाम म्हणजे जामच आवडत नाहियेत. वैशाली तर एक नंबरची नाटकी, आगलावी आणि भंपक बाई आहे.

माधवची कामगिरी सिनेमातल्या एक्स्ट्राची किंवा climax झाल्यावर येत णाऱ्या पोलिसाची दिसतेय.
<<
Rofl

बस क्या, शो स्क्रिप्टेड वाटतो अजुनही तुम्हाला? शक्यं आहे का इतके दिवस स्क्रिप्ट्स पुरवत रहाणे ?..........।हो का नाही ,सहज शक्य आहे.
हा तर फक्त 100दिवसांचा सवाल आहे.इथे हे लोक तीन तीन चार चार वर्ष मालिका चालवतात,त्याच स्क्रिप्ट लिहिणार्यांपैकी आणल असेल एखाद्याला पकडून.
फक्त तुम्ही म्हणता तस ,इथे"बिबॉ खेल गये"अस म्हणायच.
बाकी सगळ ठरलेल.
जर बिबॉसला परागला ठेवायच असत तर मुळात हे सगळ एडिट केल असत ना,त्या अनसीन मध्ये इतके छान आनंदाचे क्षण आहेत,ते का निही दाखवत.कारण बिबॉस ना राडा घालणार स्क्रीप्ट लागत.
मागच्या वर्षीसुध्दा अशाच पध्दतीच्या टास्कनेच तर पहिला कंटेंट दिला होता.
मग इता ही अस टाळू शकले असते ,हा टास्क न आणून.पण नाही.
नंतर बघा आता,तो फुल लावण्याचा टास्क पण आणतील,जिथे मागच्या वेळी धक्काबुक्की झाली होती .

मला एक कळत नाहीये की परागकडून मोठी चूक झाली असेल तर त्याची पी आर टीम सपोर्ट पराग हा hashtag का promote करतेय आणि लोकंपण तो लावून पोस्टस लिहितायेत.

असं करू नये ना प्रकरण शेकू शकतं कारण जरी दाखवलं नसलं तरी टीमकडे तो शॉट आहे.

परागला मांजरेकर मागच्या वेळी बोलले की बिचुकले रुपालीला घाण बोलत होता तेव्हा तू त्याच्यावर हात का नाही उचललास? हात उचलणाऱ्या पुरुषाला मी वाचवलं असतं (eviction पासून), असंही ते म्हणाले होते. तेव्हा तो बिचुकले पर्सन नुसतं तोंडाने बोलत होता तरी मांजरेकरांना फार इच्छा होती की त्याला कोणीतरी तुडवून मारावे. कसले तुम्ही पुरुष, बांगड्या भरल्यात का वगैरे बोलून झाले. म्हणजे मारामारी व्हावी ही बिग बॉसचीच इच्छा होती का?

आणि इथे नेहा-वैशाली-केळकर या तिघी रुपालिबद्दल आक्षेपार्ह बोलत तर होत्याच पण शिव आणि परागच्या अंगावर हातही टाकत होत्या. नेहा तर शिवच्या पाठीवर किस करत होती असं दिसलं. मग परागने हात उचलला तर त्यात काय इतकं?
योग्य कारणासाठी मारहाण केली तर मी वाचवेन असं मांजरेकर का बोलले मग? का बिचुकले हा पुरुष, साताऱ्याचा आणि गुन्हेगारी बॅकग्राउंडचा असल्यामुळे त्याला एक न्याय पण नेहा ही महिला आणि पुण्याची असल्याने तिला एक न्याय?
पराग नसेल तर शो बघणार नाही असं भरपुर लोक बोलतायत.

अख्खा ग्रुप नॉमिनेट झालेला असताना च व्होटिंग लाइन्स बंद असणं>>अरे ते पूर्ण nomination scripted च होत..जोड्या बिग बॉस ने.केल्या होत्या..आणि ज्या प्रमाणे ग्रुप्स होते त्यावरून कोणीही सांगू शकल असतं की कोण कोण नोमिनेट होणार. का वैशाली आणि केळ्या ला आमने सामने नाही आणलं . लास्ट वीक दोन जण गेल्या मूळे हा वीक nomination बंद च राहणार होत.. फक्त पराग ने फार seriously घेतलं..आणि मीच जाणारच अस गृहित धरल ..सो जाणार तर राडा करुनच जाऊ असा विचार असेल.. bdw पराग जे बोलतो ते खर होतय..आधी बिचुकले 2 वीक ची warning आणि आता स्वत..मीच जाणार बोलत.होता

परागकडून मोठा राडा झाला असला तर नेहाला मागच्या महिन्याभराचं त्याचं वागणं आणायची गरज पडली नसती.
दाखवलेल्या शॉट्समध्ये नेहा अगदी कंपोज्ड दिसतेय. माफ न करतानापण.

नेहा पक्की कांगावा करणारी आहे प्रत्येक बाबतीत. तो तिच्या गेमचा भाग असेल किंवा strategy असेल. त्या सर्वांना परागला काढायचंच होतं आणि परागने सर्व हातात दिलं त्यांच्या. परागने असं करायला नको होतं.

त्यामुळे आधीपासूनचे काढलं आणि परागने दगा दिला होता ना त्यांच्या grp मध्ये जाऊन, म्हणूनही असेल.

चुकून bb ने ठेवलं त्याला तर कारण bb इच्छा माफ कर अशी होती असं वाटतं.

काही काही गोष्टी समजत नाहीयेत. मुळात परागने अति मारामारी केली असेल तर bb नी लगेच काढायला हवं होतं. तो अधिकार नेहाला कशाला दिला आणि माफ करणारा मोठा असतो वगैरे मलमपट्टी कशाला. ती कशाला करेल तिच्यावर फिजिकल attack झाला असेल तर.

बाहेर पडल्यावर त्याला पहिले सांगितलं असेल की काय मूर्खपणा तुझा. कोणीही बाहेर जाणार नव्हतं, voting lines बंद होत्या.

पराग काल फोटो घ्यायला उभा होता नेहासमोर तेव्हा तिने किती कांगावा केला, कसा उभा होता घाणेरड्या पद्धतीने असं म्हणाली.>>>>>>>
अच्छा हेच का ते ज्या बद्दल केळ्या म्हणत होता कि मला सांगायला पण लाज वाटते : >>>>>>>>> नाही ते नाही धनुडी. स्वर्ग नरक टास्कमध्ये केळकर म्हणत होता की बायका किचनमध्ये असताना परागने अशी गोष्ट केली जी इथे सान्गायला मला लाज वाटते. >>>>>>> थँक्यु सूलू.
पण पराग ने नक्की काय केलय असं वाईट ते दाखवलं नाहीये. हे बाकीचे लोक पण खुपच कागावेखोर आहेत. अभिजीत केळकर वैशली तर उच्चाक
गाठताएत कुजकट पणाचा.

कांगावा करणारा तर परागही आहेच, कशावरून त्याला टास्क मधे इतका त्रास झाला हे म्हणायलाही वाव आहे जोवर नक्की काय झालं हे बिबॉ दाखवत नाहीत तोवर !
त्याने मारामार्या करून रिअ‍ॅक्ट करून कांगावा करण्या ऐवजी व्हिक्टिम बनून कॅमेरापुढे जाऊन या बायकांवर हारासमेन्टचे आरोप करत कांगावा केला असता तर आज कदाचित सिक्रेटरुममधे त्या असत्या पण थोडक्यात वाटतं तसा तो स्मार्ट नाही, नेहा इज स्मार्टर !
पहिल्या आठवड्यात शिवानीच्या पाणी उडवल्यावर शान्त राहून म्हंटला कि साबणही लव , तशी रिअ‍ॅक्शन द्यायला हवी होती !

अजून एक मला वाटतं की नेहाने माफ करावं असं bb ना वाटत होतं बहुतेक आणि पराग गेममध्ये हवा होता त्यांना पण काढायला लागलं असेल तर हे bb लक्षात ठेवणार आणि वेळेला एखादी चाल खेळू शकतात नेहा नामोहरम होईल अशी.

दुसरं नेहाने bb नी तिच्याजवळ दिलेला निरोप नीट दिला नाही, हेही लक्षात ठेवलं असेल. पराग असा वागला नसता तर प्रकरण नेहावर शेकवले असतंच bb नी. पण ते task तेव्हाही थांबवू शकले असते जेव्हा तिने नीट निरोप दिला नाही. बरं तिला एकटीला का बोलावलं, सुरेखाताईन्ना का नाही बोलावलं काय माहिती.

पहिल्या आठवड्यात शिवानीच्या पाणी उडवल्यावर शान्त राहून म्हंटला कि साबणही लव , तशी रिअ‍ॅक्शन द्यायला हवी होती ! >>> अगदी अगदी.

या आठवड्यात पराग स्वतःच हायपर होत गेला - नॉमिनेशन पासून.
त्यामानाने किशोरी व्यवस्थित थंड डोक्याने खेळतेय.
वीणाची अवस्था धोबी का कुत्ता अशी होऊ नये. तीआणि शिवानी यश, प्रसिद्धी डोक्यात गेल्यासारख्या वाटतात.

Rutuja Dharmadhikari fans,
Latest Twitter spoilers are mentioning Rutuja Dharmadhikari's wild card entry soon!

Wow great.

मी fan नाही तिची मात्र ती छान फायटर होती.

म्हणजे पराग नाही येणार परत हे नक्की.

Voot वर जाऊन परागला पाडल्याचा व्हिडियो पाहिला. टास्क चालू असताना सगळे घामाघूम झालेत. हीना तर वीणावरही बळाचा वापर करताना दिसतेय. कट केल्यानंतर लगेचच नेहाच्या टीममधले पुरुष चांगलेच हललेले दिसताहेत, पण ती नाही. लोकांनी सगळं पाहिलंय, वगैरे म्हणतेय.

.

चॅनल नक्कीच dilemma मध्ये असणार.. सोशल मीडिया परागच्या बाजूने दिसतोय.. पण नक्की काय झालं आत ते त्यांनाच माहितेय..
आजच्या एपिसोडचा प्रोमोही आला नाही अजून..

परागने लाथा मारल्या हे कस आणि कुणाकडून समजलं ? आणि मग वैशाली /केळकर आणि माधव हे तितकेच दोषी आहेत असं का म्हणाले बिग बॉस ?

परागला मांजरेकर मागच्या वेळी बोलले की बिचुकले रुपालीला घाण बोलत होता तेव्हा तू त्याच्यावर हात का नाही उचललास? हात उचलणाऱ्या पुरुषाला मी वाचवलं असतं (eviction पासून), असंही ते म्हणाले होते. तेव्हा तो बिचुकले पर्सन नुसतं तोंडाने बोलत होता तरी मांजरेकरांना फार इच्छा होती की त्याला कोणीतरी तुडवून मारावे. कसले तुम्ही पुरुष, बांगड्या भरल्यात का वगैरे बोलून झाले. म्हणजे मारामारी व्हावी ही बिग बॉसचीच इच्छा होती का? +१११

बिग बॉस दोन्ही साईड ने खेळवतात स्पर्धकांना . कधी एखाद्या गोष्टीवरून त्यांना रागवतात . आणि त्याच आणि तशाच वागण्यावर पुढच्या शनिवारी दुसऱ्या स्पर्धकांची स्तुती करतात . जाम हरामी आहे बिग बॉस टीआरपी साठी Happy

बिचुकले येणार नाही म्हणून तुम्हाला आनंद का होतोय, हा लॉस आहे प्रेक्षकांसाठी.
मजा आली असती आला असता परत तर.
सगळेच गुडी गुडी असतील तर मजा काय येणार.

थँक्यु सूलू. >>>>>>>> तुमचे स्वागत आहे , धनुडी Happy

रुपालीचा पराग च्या कपड्यांवर अश्रू गाळणे ड्रामा पण टू मच आणि ओढून ताणून वाटला. ती बॅग वर झोपून रडली तर लगेच किशोरी पण दुसर्‍या बॅग वर आडवी होऊन रडायला लागली ते बघून हसायलाच आलं मला. >>>>>>>>>> मला ते बघून मागच्या सीझनमध्ये, राजेश गेल्यानन्तर रेशम आणि तिच्या ग्रुपने गार्डनमध्ये आयोजित केलेली शोकसभा आठवली. Proud

परागची किडनीची सर्जरी नक्की कुठल्या बाजूने झाली होती? कारण तो कॅमेराला जेव्हा पोटाची उजवी लाल झालेली बाजू दाखवत होता तेव्हा त्याच्या पोटावर डाव्या बाजूला कसलेतरी डाग दिसले. अस मला तरी दिसल.

पराग गेल्यावर सुपुन्ना कन्ठ फुटला.

आज ममाने शिवची स्तुती केली म्हणे:
https://www.youtube.com/watch?v=4eWwFBGJSWA

प्रोमो आला. पराग ला बोलवलय वीकेंड का वार मध्ये . त्याला आरोपीच्या पिंजर्यात उभे केलाय. वैशाली आणी केळकरचे चेहरे बघण्या सारखे झालेत.

पराग बिबॉ च्या सेट वर दिसतोय. आरोपी च्या पिंजऱ्यात. परत आत आणणार त्याला. इतका drama करून नक्कीच बाहेर नाही काढणार. सिक्रेट रूम ठरल्याप्रमाणे वीणा ला देणार या वीकेंड ला असं दिसतंय.
पराग ला बघून नेहा, वैशाली आणि केळ्या चे चेहेरे कसे होतात ते मला बघायचंय.
आज मांजरेकरांनी नेहा वैशाली आणि सु पु ची खूप शाळा घेतली असं म्हणे.
बघू
बिबॉ टीम ला मानलं . प्रत्येक घटनेतून टी आर पी खेचतात

इंन्स्टाग्राम माहितीनुसार परागने नेहाच्या थोबाडीतच नाही मारली तर खूप गैरवर्तनही केल जे टीव्हीवर दाखवायलाही लाज वाटत आहे.
जरी परागला बोलावल असल तरी मला नाही वाटत त्याला घरात घेतील कारण चुकीचा पायंडा पडेल.
आणि तसही आता तो विनर नक्कीच होणार नाही.
मला अस वाटत आहे की या वेळी शिव विनर होईल.

अनेक अफवा पसरतायेत परागच्या मिसबिहेवियर बद्दल कारण ती क्लिप दाखवली नाहीये/दाखवली जाऊ शकत नाही !
होईल तेच जे बिबॉ सांगेल !

Pages