मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परागला माफी मागायला लावली तरी ज्यांची माफी मागायची ते लोक निर्दोष होते, असं अजिबात नाही. > +१११
नेहा ने माफी दिली नाही म्हणुन तिला बेक्कार नाही म्हणलय. तिने जे काही केलं टास्क करताना आणि तरीही त्या बद्दल जराही दिलगिरी स्वतः व्यक्त केली नाही आणि वर माफी मागणार्या माणसाला कसा माज आहे ई ई जे चित्र उभं केलं या वृत्तीला बेक्कार म्हणतेय. आणि शिवाय तो माणूस माफी मागत असताना तिने जो काही अ‍ॅटीट्युड दाखवला की डोळ्यातच दिसत नाही न याव न त्याव ते पण योग्य नव्हतं. असो कर्मा बाउन्स बॅक. बाहेर आल्यावर तिला सोमी वर पडलेल्या शिव्या पाहिल्या की ताळ्यावर येइल बाई.
शिवाय मी पहिलच वाक्य लिहिलय की पराग गेला याचं दुख नाही. पण बाकी लोकांना महान करयचा प्रयत्न झाला याचं दुख. त्यांच्या चुका पण तेवढ्याच आहेत. ढकलुन देणं, चिमटे काढणं, ऑपरेशन च्या जागी त्रास देणं, बिबॉ च्या मेसेज कडे दुर्लक्ष करणं हे सगळं टास्क च्या नावाखाली कुठेही जस्टीफाय होत नाही.

शिवाय मी पहिलच वाक्य लिहिलय की पराग गेला याचं दुख नाही. पण बाकी लोकांना महान करयचा प्रयत्न झाला याचं दुख. त्यांच्या चुका पण तेवढ्याच आहेत. ढकलुन देणं, चिमटे काढणं, ऑपरेशन च्या जागी त्रास देणं, बिबॉ च्या मेसेज कडे दुर्लक्ष करणं हे सगळं टास्क च्या नावाखाली कुठेही जस्टीफाय होत नाही.> +१११
कार्य करताना बळाचा वापर करायचा नाही हे स्पष्ट लिहलले. तरिही दुसर्या टीम ने बळाचा वापर केला हे उघड आहे . तरिही त्याना ही जाणिव सुध्दा करुन दिल्ली गेली नाही की पराग चे अशा वागण्याचे कारण तुम्हीच आहात. आणी पराग ला ही तेंव्हाच काढून टाकायला हवे होते.ज्यावेळी त्यानेहिंसा केली. या सगळ्या मुळे दुसर्या टीम ला आपली चुकही साधी लक्षात आली नाही. म असेच बळाचा वापर होतच राहणार आणी स्पर्धक नियम मोडातच रहाणार . कदाचित हेच बिग्ग बॉस ला हवे आहे. राग हा पराग ला माफ न करण्या बद्दल नाही आहे . बिग्ग बॉस आपलेच नियम स्वतच पाळत नाहिये . कार्य करताना नियम मोडले तरिही चालतात . म नियमावली द्यायचीच कशाला. वागू दे स्पर्ध्कना हैव तसे.नियम मोडले तेंव्हा ते buzzer वाजवू शकत होते. पण त्यानि हे ताणले कारण त्याना अशीच reaction हवी होती . शीव च्या वेळी तर हीना ला उतरायला सांगितले होते ना . म पराग च्या वेळे ला का सन्चलिके वर का अवलंबून होते.

शिवाय मी पहिलच वाक्य लिहिलय की पराग गेला याचं दुख नाही. पण बाकी लोकांना महान करयचा प्रयत्न झाला याचं दुख. त्यांच्या चुका पण तेवढ्याच आहेत. ढकलुन देणं, चिमटे काढणं, ऑपरेशन च्या जागी त्रास देणं, बिबॉ च्या मेसेज कडे दुर्लक्ष करणं हे सगळं टास्क च्या नावाखाली कुठेही जस्टीफाय होत नाही.
Submitted by स्मिता श्रीपाद on 1 July, 2019 - 08:05 >>
Exactly.... चांडाळ चौकडीच्या चुका दाखवतानाही मांजरेकर ज्याप्रकारे अगदी लाडाने, आंजारून गोंजारून दाखवत होते तो प्रकार अगदी डोक्यात गेला. परागची चूक असेलही, पण या लोकांनी जे केलय, आणि सगळ्यांनी टीव्हीवर बघितलय ते justifiable होत नाही. वीणा vs शिवानी च्या वेळी तर म्हणत होते की action ची reaction म्हणून तिने लाथ मारली. तर आता त्या रूल चं काय झालं. चॅनेल जर काही लोकांनाच नेहेमी झुकते माप देणार असेल तर voting ची नाटकं कशाला ? डायरेक्ट बेडूक/काळुंद्री/केळ्या यातील एखाद्याला विनर घोषित करा.

मी बिग बॉस बघायचं सोडलं आहे तरी इथे वाचत राहणारच आहे Proud

उरलेल्या सदस्यांच्या चाहत्यांनी आम्हाला अपडेट करत राहावं.

मी पण कुठेतरी वाचले की वीकेन्ड च्या डावातल्या प्रेक्षकांना ऐकायला मिळाले नक्की काय झाले ते. त्यात पण डीजे ने लिहिले आहे तसे वर्णन होते. तेच अ‍ॅक्युरेट आहे की कसे ते माहित नाही.
लोक अफवा खूप पसरवत आहेत. त्या टास्क मधे ते लोक त्याला गुदगुल्याच्या नावाखाली बोटाने ढोसत आणि मागून ढकलत आहेत हे दिसत होते तरी पण अगदी त्याच्या ऑपरेशन च्या जागी चिमटे काढत आहेत असे कुठे दिसले नाही. सिरियस हेल्थ हजार्ड वगैरे नाही वाटला. पण तोइन्स्टिगेट झाला आणि त्याचा तोल सुटला.
सो असे दिसतेय की पराग ला हाकलणे इनेविटेबल होते. बाकी सगळा माफी ड्रामा चॅनल ने स्वतः ला सेफ करायला केला असावा. शिवानीच्या बाबतीत पण तसेच केले होते. एकूण हा सीझन फारच वादग्रस्त ठरलाय. बिबॉ टीम चे फेल्युअर जास्त आहे यात.
आता आधी सुपु ना घालवतील असे वाटते. किशोरी, रुपाली, माधवनेही आवरा आवरी करायला घ्यायला हरकत नाही.

आता आधी सुपु ना घालवतील असे वाटते. किशोरी, रुपाली, माधवनेही आवरा आवरी करायला घ्यायला हरकत नाही> > हो आजची nomination प्रक्रिया अशीच आहे जे गेम मध्ये कहीच करत नाहित ज्याना गेम समजला नाही आहे . जे स्वताचे डोके वापरत नाहीयेत त्याना nominate करायचे आहे. सो रुपाली सुरेखा किशोरी होतिल nominate
त्या टास्क मधे ते लोक त्याला गुदगुल्याच्या नावाखाली बोटाने ढोसत आणि मागून ढकलत आहेत हे दिसत होते> >
वैशाली चा चेहरा तसे करताना किती विचित्र कसा दिसत होता.

त्या टास्क मधे ते लोक त्याला गुदगुल्याच्या नावाखाली बोटाने ढोसत आणि मागून ढकलत आहेत हे दिसत होते तरी पण अगदी त्याच्या ऑपरेशन च्या जागी चिमटे काढत आहेत असे कुठे दिसले नाही. सिरियस हेल्थ हजार्ड वगैरे नाही वाटला. पण तोइन्स्टिगेट झाला आणि त्याचा तोल सुटला.

ज्या अर्थी शिव पुन्हा पुन्हा warn करत होता त्याअर्थी ते लोक त्याच्या ऑपरेशनचाच वापर त्याला उठवायला करत असावेत. Dumbbells पण ठेवले होते. त्याने तर नॉर्मल ऑपरेशन न झालेल्या व्यक्तीच्या पोटाला पण इजा होऊ शकते.

"माझ्याकडून जे झाले ते रागाच्या भरात झाले त्याबद्दल मी माफी मागतो आणि म्हणून मलाच या घरात रहायचे नाही" असे जर तो म्हणाला असता तर ते खऱ्या अर्थाने डॅमेज कंट्रोल झाले असते >>> एक्झॅक्टली. मी असंच लिहिलंय.

पण चॅनेलची पण इच्छा दिसली म्हणून मोठं मन करा असं सारखं सांगत होते.

एखाद्या टास्कमध्ये केला जाणारा बळाचा वापर >>> टास्कमधे पण चुकीच्या पद्धत्तीने सुरु होतं सर्व, तेही चुक होत. डंबेल्स वगैरे हे चुकच ना. नेहा चुकीचंच करत होती, फालतू आयडीया देते आणि फॉलो करतात सगळे. शिवशी पण काय चाललं होतं नेहा आणि हिनाचं. बोलणी हिनाने खाल्ली पण नेहा पण वल्गॅरीटीच करत होती शिवशी भले हिनापेक्षा कमी पण करत होती. परागचा गुन्हा मोठा आहेच नक्कीच तरी ह्या गोष्टी किरकोळ ठरत नाही.

हा पण एका गोष्टीबाबत मी नेहाचं कौतुक करेन, तिने कमीतकमी परागचं ऐकून घेतलं आणि स्वतःचं म्हणणं शांतपणे सांगितलं त्याला. रुपाली त्याची मैत्रीण असून नीट वागली नाही. वैशाली त्याचं तोंड बघायला तयार नव्हती पण नेहा तेव्हा नीट वागली त्याच्याशी, नंतर तरी.

पराग गुन्हेगार आहे पण नेहा, वैशाली, केळकर आणि सुरेखाताई हे सर्व चुकलेच. एखाद्या गुन्ह्यामागे एखादी बँकग्राऊंड अगदी तसं. पण म्हणून गुन्हा क्षम्य ठरत नाही. त्याला प्रवृत्त केलं गेलं पण जसं त्याने शिवानीच्या वेळी केलेलं तसं करायला हवं होतं. शांत राहून मला पाडलं हीच तक्रार करायला हवी होती.

ज्याअर्था त्याने वूट वरच्या व्हिडीओमधे मला अमानुषपणे त्रास दिला म्हटलं आहे आणि वुटने तो व्हिडीओ प्रसारीत केलाय ह्याचा अर्थ काय होतो. त्यांनाही ते मान्य आहेना.

भरत तुमची पोस्ट मस्त आहे, बहुतेक सर्वांना काय म्हणायचं आहे ते तुम्ही थोडक्यात मुद्देसुद मांडलं आहे.

अंजू Happy वर स्मिता श्रीपाद यांनीही नेमकं लिहिलंय.

वैशालीने किशोरीच्या कानात बोट घातलं होतं आणि सुरेखांनी ते किशोरीच्या सांगण्यावरून थांबवलं, असं किशोरीने सांगितलेलं. सो बोटं खुपसणं केलं असेल असं वाटतं., त्याचं सगळं प्रोटेक्टिव्ह गिअर ही काढून टाकलं. शिवाय त्याला खुर्चीवरून ढकलून आणि ओढून पाडलं हे तर स्पष्ट दिसतेय.
नेहा इज ऑन रेकॉर्ड - त्याला त्या (ऑपरेशनच्या ) बाजूला काही करू न कोस असं मी हीनाला चार वेळा सांगितलं.

हे प्रकरण पुढे कोर्टात गेलं तर ह्या सगळ्या बाबी तपासल्या जातील आणि परागला शिक्षा होऊ शकते पण बिग बॉससकट बाकीच्यांवर कडक ताशेरे तरी ओढले जातील जे इथे ओढले गेले नाहीत.

वर स्मिता श्रीपाद यांनीही नेमकं लिहिलंय. >>> हो. आत्ता नीट वाचलं सर्व, छान लिहीलंय. नेहा आधी बेकार वागली ते बरोबर पण नंतर तो परत आल्यावर तिने नीट ऐकून घेतलं मात्र.

पण नेहा खरंच टास्क मधे माणुसकी हरवून अशा एकेक आयडीया देते, जिंकण्यासाठी काहीही करते. हिनालापण आयडीया तिनेच दिलेली, हिना म्हणाली ना आम्ही ठरवलं.

नखे, थुंकणे ह्या आयडिया वैशालीच्या डोक्यातून निघतात. त्यांच्यात माधव बरा आहे खरंतर. त्याने स्वत:चा गेम खेळावा आणि ह्या तिघांपासून दूर व्हावं.

सुरेखाताई माफ करा का सांगत होत्या, कुठेतरी गिल्ट होतं त्यांना पण बाकीच्यांना नाहीये.

नेहा इज ऑन रेकॉर्ड - त्याला त्या (ऑपरेशनच्या ) बाजूला काही करू न कोस असं मी हीनाला चार वेळा सांगितलं. >>> ह्याचा अर्थ बाकीच्या जागी कर असाही होतो.

ते शिव सांगायला आला होता, डंबेल्स ठेवत होते तेव्हा तर हीना किती भांडली त्याच्याशी. मग नेहा म्हणाली. तेव्हा शिवने त्या बाजूला ठेवले तरी चालतील असं म्हणायला नको होतं. हे वापरायचेच नाहीत सांगायला हवं होतं.

शिवाय त्याला खुर्चीवरून ढकलून आणि ओढून पाडलं हे तर स्पष्ट दिसतेय. >>> अगदी अगदी. तो विषय म मां नी काढला पण नेहाने गुंडाळला.

प्रेक्षकांना जे प्रत्यक्ष दाखवलं आहे त्यापेक्षा जास्त लपवलं गेलं असलं तरी नेहा हीना वैशाली आणि केळकर जे वागलेत ते दिसलं आहे. पहिल्या तिघी जास्त.

मी काल bb च्या पेजवर पण लिहून आले की परागचे समर्थन नाहीच पण मागच्या आठवड्यात पराग आणि शिवला त्यांच्या चुकांसाठी जितकं सुनावलं त्यापेक्षा ह्या लोकांची चूक खूप मोठी होती पण फार गुळमुळीत ऐकवलं गेलं त्यांना.

मला यावेळीं पहिल्यांदाच मेजर युट्युब रिव्ह्युअर्स आणि सोशल मिडियच्या रिअ‍ॅक्शन्स फार टोकाच्या वाटतायेत आणि फॉर अ चेन्ज म.मां चं बरोबर वाट्तय.
नेहा वैशाली अ‍ॅग्रेसिव झाल्या असतील पण मुद्दाम त्याचा सर्जरी एरीआ टार्गेट करु असं बघताना मुळीच वाटलं नाही, त्यांचं कामच होतं त्याला इन्स्टीगेट करायचं, त्यात त्या १०० टक्के यशस्वी झाल्या, त्यांना का शिक्षा व्हायला हवी त्याची?
पराग जेंव्हा प्लॅस्टीक बॅग्ज/ टॉवेल गुंडाळत होता, मला तरी वाटलं कि टॉर्चर मधे हे लोक अंगावर बर्फ, कचरा इ. काय काय फेकतील म्हणून बांधल्या आहेत, ऑपरेशन झालेली जखम वगैरे जुनी असेल आता, फ्रेश असती तर भाग घेईल का तो ? प्रॉपर ड्रेसिंग केलं असतं मग, पिशव्या टॉवेल कोण असं काही का बांधेल ?
टास्क मधे अ‍ॅग्रेसिव होणे आणि पर्सनल स्कोअर्स सेट्ल करण्यासाठी अंगावर धाऊन जाणे/ पेशन्स संपून रागाने मुद्दाम मारणे यात पब्लिकला फरकच कळत नाहीये , इन्स्टीगेट करणार्यांनाही शिक्षा द्या म्हणजे काय ? बिबॉ नी टास्कच दिलं होतं इन्स्टीगेट करायचं, त्याची लेव्हल स्पर्धक ठरवणार, ऑडीयन्स नाही ! त्यातून जर एक्स्ट्रिम झालं असेल तर चूक बिबॉ ची.
बघायला आवडो /न आवडो परागला गेम समजला नाही आणि वैशाली -नेहा अँड कंपनीला बरोबर समजलय !
ऑडीयन्सलाही बघताना गेम झेपत नाहीये हेही तितकच खरय.
असो, आता जायचा नं सुरेखाताईंचा, नॉमिनेशनची अ‍ॅडच तशी आहे, अत्ता पर्यन्त महिना भरात सर्वात निष्क्रिय सदस्यांना/गेम समजला नाही अशांना नॉमिनेट करा !
माधव कॅप्टन झालाय, तेंव्हा तो वाचला !

नेहा ने बरोबर केले असे मला वाटते. माफी मागणारा फॉर्मलिटी म्हणून माफी मागत होता, त्याच्या चेहऱ्यावर फुल atttitude, हात काय मिळवतोय, सॉरी काय बोलतोय, लगेच नेक्स्ट व्यक्ती कडे काय वळतोय.. का माफ करायचे त्याला, काय effort घेतले?
नेहा बरोबर बोलली, पराग स्वतःच ठरवतो समोरच्याच्या मनात काय आहे, की हे मला माफ करणार नाहीत, थोडा वेळ लागेल मग मी त्यांची मने जिंकेन मग ते माफ करतील.
समोरच्याला ठरवू दे ना..
ओव्हरकॉन्फिडस नडला त्याला.

मला यावेळीं पहिल्यांदाच मेजर युट्युब रिव्ह्युअर्स आणि सोशल मिडियच्या रिअ‍ॅक्शन्स फार टोकाच्या वाटतायेत आणि फॉर अ चेन्ज म.मां चं बरोबर वाट्तय.........
अजिबात टोकाच्या नाहीत.जर त्या फेअर गेम खेळत होत्या आणि इंन्स्टिगेट करून जर परागने काही केल तर क्लॉजप्रमाणे त्याला त्याच क्षणी बाहेर काढायला हव होत.नंतरचा ड्रामा कशाला?
ममांनीसुध्दा त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलच की हो आमची चुक झाली.
जर शिवानी आणि वीणा मध्ये दोघींना शिक्षा होत असेल तर यांनाही शिक्षा होण गरजेच होत.
बर त्यांनी ढकलल हे तर ममांनी पण मान्य केल,म्हणजे त्याही फेअर खेळल्या नाहीतच.
हिंदीमध्ये होत असेल अस टास्कच्या नावाखाली,म्हणूनही त्यांनी केल असेल ,म्हणून मराठीतपण लोकांनी ते बघाव हेच चुकीच आहे.हिंदी लोकांना ते चालत असेल,पण मराठी लोकांना नाही चालणार,हाच फरक आहे हिंदी आणि मराठीमध्ये.
जर हिंदीचच अनुकरण करायच असेल,मग मराठी बिबॉ कशाला,तसही मराठी लोक हिंदी बिबॉ बघतातच ना,मग कशाला परत मराठी?
हिंदीमध्ये जे चालत ते कौतुकास्पद आणि आदर्श अस नाहीच आहे.
तिथे तस होत म्हणून इथेही लोकांनी बघा,हीच मानसिकता बदलायला हवी.मराठी कंटेस्टंटनीही हे लक्षात ठेवायला हवे,बळाचा वापर म्हणजे इंन्स्टिगेट करण नाही
मुळात मराठी कलाकारांना सहजासहजी हिंदीत ओळखणारे कोणी नसल्यामुळे,त्यांनाही प्लँटफॉर्म मिळावा,पैसा मिळावा,असा एखादा इंटरनँशनल शो आपल्या मराठीतही असावा,म्हणून चालू केला ना,म्हणून दाखवा ना वेगळेपण आपल.ठेवु देत ना हिंदीला आपला आदर्श.
हिंदीत आलेले अर्धेअधिक लोक स्वत:च्या फिल्डमध्ये कंट्रोवर्सी करून आलेले असतात
स्रीशंत,त्याची योग्यता हिंदी बिबॉसचीच आहे,कारण क्रिकेटमध्येही तो तेच करत होता आणि हाकलला त्याला,राहुल महाजनबद्दल न बोललेच बर.आणखी बरेच आहेत.
पण निदान मराठीमध्ये निदान आतापर्यंत तरी बिचुकले सोडले तर असे लोक कोणीही आलेले नाहीत.
तेव्हा टास्क आहे म्हणून काहीही करा आणि बघा हे चुकीच आहे
हिंदीतले पाकिस्तानी कलाकार शेवटी मराठी माणसांनेच बंद केले..
तेकाहीही चालवून घेतील म्हणून मराठीत हे असल काही दाखवू नये.
याच भान मराठी स्पर्धकांनीही ठेवाव.

हिंदीमध्ये होत असेल अस टास्कच्या नावाखाली,म्हणूनही त्यांनी केल असेल ,म्हणून मराठीतपण लोकांनी ते बघाव हेच चुकीच आहे.हिंदी लोकांना ते चालत असेल,पण मराठी लोकांना नाही चालणार,हाच फरक आहे हिंदी आणि मराठीमध्ये.
जर हिंदीचच अनुकरण करायच असेल,मग मराठी बिबॉ कशाला,तसही मराठी लोक हिंदी बिबॉ बघतातच ना,मग कशाला परत मराठी?>> +111

हिंदीमध्ये जे चालत ते कौतुकास्पद आणि आदर्श अस नाहीच आहे.
तिथे तस होत म्हणून इथेही लोकांनी बघा,हीच मानसिकता बदलायला हवी.मराठी कंटेस्टंटनीही हे लक्षात ठेवायला हवे,बळाचा वापर म्हणजे इंन्स्टिगेट करण नाही >>> exactly

सिंहासनावरून पडल्यावर नेहाच्या कानफटात मारणे वगैरे जे घडले तेवढ्या १५, २० मिनिटांसाठीच परागचे नियंत्रण गेले, तेसुद्धा चांडाळ चौकडीच्या तीन तास चाललेल्या अमानुष छळामुळे आणि बग बास त्याकडे दुर्लक्ष करून टास्कमध्ये हस्तक्षेप करीत नसल्यामुळे राग येऊन.
पण गेल्या महिन्याभरात परागची वागणूक सर्व त्याच्या विरोधात असूनही सज्जन, शांत, चांगला वागणारा, बोलणारा अशीच होती.
याउलट सर्व टास्कमध्ये बेडकी नेहा, कावळीण वैशाली यांची वागणूक खराब, वाईट तर होतीच, पण पूर्ण महिनाभरातली त्यांची घरातली वागणूक अत्यंत हलकट, नीच, sadist, कपटी, हलक्या शिवराळ तोंडाची, victim card, woman card खेळून कांगावेखोरपणा करणारी कावेबाज अशीच होती.

म्हणून पराग हा माणूस म्हणून फार चांगला आहे हे दिसून आले. वास्तव जीवनातही तो फार सज्जन आहे.

चांडाळ चौकडी माणूस म्हणायच्या लायकीची नाही.

ते किशोरी, रूपाली, वीणा, शिव चादरींचे लव्ह साईन्स करत होते तेव्हाही ती म्हैस वैशाली, केळकर तिथे येऊन पायाने तुडवून विस्कटून टाकत होते आणि कद्रुपणे खी खी करून हसत होते.

काय नीच मनोवृत्ती !

माफी देण्याच्या प्रसंगातही त्यांची वागणूक नीच, हलकट, sadist अशीच होती.
एखादा शत्रू मेल्यावर जसा आनंद साजरा करतात काही लोक, तसेच मित्रासारखा सहकारी असणारा पराग बाहेर गेल्यावर मिठाई वाटून हसत खिदळत ते साजरे करणे तर अत्यंत हीन दर्जाचे sadist वागणे होते.

भले पराग थोडा गर्विष्ठ असेल, पण माणूस म्हणून तो राहिला आणि ती चांडाळ चौकडी हीनपणाच्या खड्ड्यात आणखीन खोल पडली.

बाप्पा, मैथिली, पराग यांच्या तोंडून शिवी, घाण बोलणे, इतरांशी हीन वागणे झाले नाही. बरे झाले त्या नरकातून हे सज्जन लोक बाहेर पडले ते.

बिग्ग बॉस मध्ये स्वभाव कसा पण असू देत पण नेहा ला उंची वरुन आणी वैशालीला रंगा वरुन नावे ठेवणे योग्य नाही . तसे न करता पण मत मांडू शकतो .बेडकी कावळीण हे शब्द टाळलेले बरे.

ते शब्द बॉडी शेमिंग म्हणून वापरलेले नसून मनोवृत्ती दर्शवणारे उपमा म्हणून वापरलेले आहेत याची नोंद घ्यावी. जसे आपण लबाड कोल्हा वगैरे म्हणतो तसे.

ते शब्द बॉडी शेमिंग म्हणून वापरलेले नसून मनोवृत्ती दर्शवणारे उपमा म्हणून वापरलेले आहेत याची नोंद घ्यावी. जसे आपण लबाड कोल्हा वगैरे म्हणतो तसे.>>ओके

आजपर्यंत कधीही बिग बॉस हिंदी किंवा मराठी पहिला भागही पाहिले नाहीत.
या दुसऱ्या सिझनचे गेल्या आठवड्यातले काही भाग बिचुकलेमुळे फारच चर्चा झाल्यामुळे काय प्रकार आहे म्हणून पाहिले आणि खरेच अंगावर आले. असले काही पाहण्याची सवय नाही आणि आवडही नाही.
इथे कोणी म्हटले आहे तसे it is not my cup of tea.
लोकांमध्ये वावरताना आपण किती थोर हे दाखवणाऱ्या व्यक्ती पैसा आणि चीप प्रसिद्धीसाठी किती हलकेपणाने वागू शकतात ते हा रिअलिटी शो पाहून आश्चर्य वाटले. म्हणून ते शब्द मुद्दाम वापरले आहेत उपमा म्हणून. कसे विचित्र लोक असतात.

बिग्ग बॉस मध्ये वेगवेगळ्या स्वभावाची सवयी असणारी लोक येतात. प्रत्येकाला स्पर्धेत टिकून रहायचे असते . म्हणून ते असे वागतात. कारण इतके दिवस ते त्या घरात बन्द असतात बाहेर चा संबध नसतो . 24तास एकत्र म्हणून असे घडते. म्हणुन डोक्याला जास्त टेंशन न देता हा शो बघावा.

Pages