Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेहा बऱ्याच जणांच्या मनातून
नेहा बऱ्याच जणांच्या मनातून उतरली असं दिसतंय सोशल मिडियावर. तिला चान्स आहे आता परागला माफ करून महान होण्याचा.
मला खरंतर नेहा पराग दोघेही आवडत नाहीत. पण अशा पद्धतीने पराग जायला नको इतकंच.
११ व्या पानावर मी लिहिलं होतं
११ व्या पानावर मी लिहिलं होतं शिवला वोट देणार, तो मात्र अजून अजून आवडत चाललाय. बाकी पराग नाही आवडत आता.
हा सिझन बरेच जण बघत नाहीयेत बहुतेक म्हणून पोस्टस दिसत नाही. खरं तर good डिसिजन. पुंबा, मामी पोस्टस अजिबात दिसत नाहीत. मागच्यावेळी असायच्या. पुंबा आधी येऊन गेले. अजून बरेच जण होते मागच्यावेळी, सर्वांची नावं नाही लिहित. पण बघत नसतील तर चांगलं करतात असं वाटायला लागलंय
मी एकदा बघायला सुरुवात केली की बघितलं जातच. नको बघायला असं वाटलं तरी बघतेच.
>>नको बघायला असं वाटलं तरी
>>नको बघायला असं वाटलं तरी बघतेच.<<
यातंच शोचं यश आहे. न्युज/सोशल मिडीया मध्ये धुमासान चर्चा होतेय म्हणजेच शो हिट आहे. विकेंडचा घाव व्युअरशिपचे सगळे रेकॉर्ड्स मोडणार...
पराग नेहा वादात काहीजण अति
पराग नेहा वादात काहीजण अति लिहितायेत सो मि वर, मारलं ते छान केलं अजून दोन चार मारायला हव्या होत्या, एकट्या नेहालाच नाही वैशाली, केळकर वगैरेना पण मारायला हवं होतं.
फार चुकीचे आहे हे. परागची बाजू घेताना नेहाला मारलं त्याचं समर्थन करणे योग्य नाही.
मी एकदा बघायला सुरुवात केली
मी एकदा बघायला सुरुवात केली की बघितलं जातच. नको बघायला असं वाटलं तरी बघतेच:: +111 हो माझेही असेच होते .
विकेंडचा घाव व्युअरशिपचे सगळे
विकेंडचा घाव व्युअरशिपचे सगळे रेकॉर्ड्स मोडणार.. >>> खरं आहे.
फक्त अगदी tv समोर बसूनच नेहेमी बघते असं नाही, कामं सुरु असतात एकीकडे पण नेमकं काहीतरी मिस्ड होतं म्हणून कधी कधी बसते tv समोर बघत पण फार आरडाओरडा होतो तेव्हा mute करते.
बापरे, केवढ्या पोष्टी, पाहिला
बापरे, केवढ्या पोष्टी, पाहिला एकदाचा एपिसोड.
>> टॉर्चर होताच इन्टेन्स अर्थातच पण ऑनेस्ट्ली मला नाही वाटत जितका कांगावा झाला तितकं कोणी परागला टॉर्चर केलं म्हणून !>>
>>मला परागपेक्षा शिवला जे केलं त्याचा निषेध करावासा वाटला, त्याला सेक्शुअल हरासमेन्ट म्हणतात !>> या दोन्ही वाक्यांना +१. तो ग्रूप पारच सुटला होता. बाकी हिंदीतल्या टॉर्चरच्या तुलनेत हा काही प्रमाणात कमी होता हे नक्कीच. सहन होत नसेल तर परागने तिथून उठण्यात शहाणपणा होता असं ही जाणवलं. कदाचित किशोरी पूर्णवेळ बसून टास्क पूर्ण करु शकत असेल तर मी का नाही हा इगो प्रॉब्लेम उठू देत नसावा त्याला.
कालच्या सिच्युएशन हँडल करण्यात तर मला शिव व वीणा आवडून गेले. वीणा चक्क सुधारायला लागलीये सध्या.
रच्याकने, हा बिबॉ नक्की काय ठरवून अशा टीम्स बनवतो? त्यातही पहिल्यांदा टास्क करणार्या टीमला कायम एक disadvantage राहतो की आपण करतोय ते कितपत बरोबर आहे, नियमांना धरुन आहे व आपण समजा हे नाही केलं तर कशावरुन विरुद्ध टीम उद्या आपल्याबरोबर हे करणार नाही? त्या टास्कच्या आदल्या दिवसापासून केळ्या, माधव, नेहा व वैशालीच्या बोलण्यात सारखं हेच येत होतं की अमूक करुया की नको, नाही केलं तर कशावरुन उद्या ते आपल्याशी करणार नाहीत...मला वाटतंय त्यातूनच त्यांची कुठल्याही अगदी काय सुचेल ते करायची हिम्मत झाली. अर्थात हे संचालक सहज आडवू शकला असता जर तो समर्थ असता तर....इथे सुरेखाताईंना काहीच घेणंदेणं नसल्यासारखं वाटत होतं.
वैशाली गायिका म्हणुन कितीही
वैशाली गायिका म्हणुन कितीही "महान" असली तरी माणुन म्हणुन अतिशय चीप आहे. काल म्हणत होती की मला कोणी त्रास द्यायला आलं तर मी त्याच्या तोंडावर थुंकणार. केळ्या चं पण हे वाक्य होतं ...सिरीअसली ? थुंकणार ? हा विचार मनात तरी कसा येउ शकतो कोणाच्या ? >>>>++१ मूर्ख आहे ती वैशाली ती थुंकल्यावर बाकीचे काय गप्प बसतील काय? सगळे एकदम तिच्यावर थुंकायला लागले की काय होईल तिचे? यक्क!!!
नेहा आणि रुपाली एवढा आरडाओरडा
नेहा आणि रुपाली एवढा आरडाओरडा करतात की सहनच होत नाही. बघायच ठरवते पण दोन मिनिटांच्याआत बंद करते. त्या माधवला काय झालेलं आज, कर्म कर्म करून ओरडत होता.
आजच्या एपिसोड मध्ये काय झाले
आजच्या एपिसोड मध्ये काय झाले कुणी तरी अपडेट लिहा ना
प्रचंड चिडचिड होतेय, या नेहा
प्रचंड चिडचिड होतेय, या नेहा ला कसं बाहेर काढता येईल प्रेक्षकांना
पराग ला बाहेर काढलंय.
पराग ला बाहेर काढलंय.
नेहा वर सोडला होता निर्णय त्याला माफ करायचं का नाही ते पण तिने लगेच त्याला माफ करणार नाही म्हणून जाहीर केलं
इथेच जर केळ्या किंवा माधव असते तर लगेच माफ केलं असतं
बाकी पराग बाहेर गेला की सिक्रेट रूम मध्ये ते नाही कळलंय अजुन
पराग बाहेर पडल्या पडल्या बाकी लोकांनी लगेच डिनर टेबल वर मस्ती सुरू केली म्हणून रुपाली चिडली.वीणा पण त्यांच्यात सामील झाली. पराग गेला म्हणून वीणा खुश झालेली दिसतेय.
नक्की पराग ने काय केलं हे अजूनही कळलं नाहीये. पण लोक असे react करत होते की त्याने कोणाचातरी खून केलाय
माधव , वैशाली आणि केळ्या ला काढा आधी यार. खरच नीच वृत्तीचे आणि आम्ही किती महान असं दाखवतात.
माधव, केळ्या आणि वैशाली ला पण सुनावलं बिबॉ ने. त्यांनी पण हात साफ केला बहुतेक पराग सोबत.
ओके थँक यू स्मिता . नेहा माफ
ओके थँक यू स्मिता . नेहा माफ करणारच नाही परागला. त्या टीम ला तर तो बाहेर जायला हवा आहे. मला पराग नाही आवडत पण तो अशा पध्दतिने जायला नको होता.
सुरेखाताइना हा गेम कितपत
सुरेखाताइना हा गेम कितपत कळलाय हे खरच कळत नाही, त्याना सन्चालक असण म्हणजे आपण बहुधा न्युट्रल राहण किवा जे होइल ते पाहत राहण अस वाटलेल दिसतय, टोटल मिसफिट आहेत त्या बीबॉ मधे, कुठलेही काम्,टास्क काहिच करण्यात त्याना रस नसतो.
कालचा एपिसोड नाही पाहिला, सतत राडा-गोन्धळ नको वाटतो पाहायला.
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/bigg-boss-marathi-2-...
इथे त्याला (अजून)बाहेर नाही काढले असे म्हणत आहेत.
परागला तडकाफडकी निलंबित केलं
परागला तडकाफडकी निलंबित केलं आहे .
चला आणखीन एक अध्याय संपला. शो मस्त गो ऑन
1 + 1 + 1 - 1 = 1 + 1
1 + 1 + 1 - 1 = 1 + 1
K + R + V - P = K + R
यावेळी वोटिंग ने कोण जास्त
यावेळी वोटिंग ने कोण जास्त बाहेर जात नाहिये सगळे असेच गेले शिवानी पराग बिचुकले. आणी फक्त 34दिवस झालेत.
मला पराग नाही आवडत पण तो अशा
मला पराग नाही आवडत पण तो अशा पध्दतिने जायला नको होता.>> अगदी. चांगला प्लेअर आहे तो. नसेल गेला तरच बरं आहे. बर्यापैकी टीआरपी खेचणार्या लोकांमधे तो आहे. शिवानी व बिचुकले तर आधीच गेले...आता जर तो ही गेला तर काय शिव वीणा लवश्टोरीतून खेचणार ट्यारपी?
यावेळी वोटिंग ने कोण जास्त
यावेळी वोटिंग ने कोण जास्त बाहेर जात नाहिये सगळे असेच गेले शिवानी पराग बिचुकले>>खरंच गेला का तो? आता बिबॉ ने वोटिंग लाइन्स कायमस्वरुपी बंद कराव्यात व असेच टास्क देवून काय करतील ते करु द्यावे घरातल्यांना. असेच सगळे बाहेर जातील एक एक करुन...मग अंजूताई म्हणताएत तसंच होईल... सुरेखा अथवा किशोरी होतील विजेत्या!
बिचुकलेचा जामीन फेटाळला आहे
बिचुकलेचा जामीन फेटाळला आहे कोर्टाने
सिक्रटरुममधे जाऊन डोकं थंडं
सिक्रटरुममधे जाऊन डोकं थंडं झालं तर कदाचित बेटर खेळेल पराग , जसा पहिल्या आठवड्यात खेळला !
किंवा श्रीसन्त सारखा अजुनच अॅग्रेसिव्ह होईल, थोडक्यात चॅनलला मसाला पुरवेल!
नाहीतर सरळ चांगली वाइल्डकार्ड एंट्री आणून खेळ चालु ठेवावा बिबॉने.
बाकी इथल्या मेजॉरीटी पोस्ट्स आणि सोशल मिडीया वाचून फार आश्चर्य वाटतय आणि हेच समजतय कि मुळात मराठी ऑडियन्सच तयार नाहीये बिबॉ पहायला, एक टॉर्चर काय दिसलं आणि ईमोशनल फुल लोक लागले ट्रेंड्स काढायला , ये तो कुछ भी नही , काय काय टास्क येतात !
मागच्या वर्षी मेघा स्मिता सई पुष्कर सोडून कोणाला गेम समजलाच नव्हता त्यामुळे पब्लिकला झेपला आळशी गेम, यावेळी सगळेच बघून आलेत, त्यामुळे टास्क्स होणारच आहेत अशी !
अगदी मेघालाही मागच्या वर्षी समज मिळालीच होती म.मां कडून कि कच्च दूध +पाणी याने तुझं पोट बिघडतं तर प्यायलीस कशाला नंतर पुष्करला ब्लेम करण्यापेक्षा ?
झेपत नसेल तर स्पर्धकांनी भाग घेऊ नये आणि कमकुवत मनाच्या लोकांनी मुळीच पाहु नये, हे बिगबॉस आहे , मंगळागौरीचे खेळ नाहीत
इथे अशी टॉर्चर टास्क्सच येतातच , ती कामया पंजाबी तर वाइट अशक्य टॉर्चर सहन करत बन्द खोक्यात ३ दिवस बसून राहिली होती म्हणे !
हिन्दी बिबा मध्ये लोक टॉर्चर
हिन्दी बिबा मध्ये लोक टॉर्चर करतात पण लास्ट दोन्ही सीज़न चे वीनर हे जास्त task न करणारे झाले होते दिपिका कक्कर आणी शिल्पा शिंदे.
इथे अशी टॉर्चर टास्क्सच
इथे अशी टॉर्चर टास्क्सच येतातच , ती कामया पंजाबी तर वाइट अशक्य टॉर्चर सहन करत बन्द खोक्यात ३ दिवस बसून राहिली होती म्हणे !>>+१. त्या बंद खोक्यावरुन आठवलं. बघितला होता तो सिझन. त्या सिझनमधे तर त्यांनी त्या खोक्यांत कचर्यापासून विष्ठेपर्यंत काय काय टाकलं होतं...मराठी त्यामानाने फारच सोबर आहे.
तरीही जर त्याने खरंच हात उचलला असेल तरी ती त्याची रिफ्लेक्स रिअॅक्शन मानून ठेवायला हवा त्याला.
परागला जरी काढल असल तरीही ते
परागला जरी काढल असल तरीही ते बिबॉस आहेत.काहीतरी जबरदस्त प्लँनिंग असणारच.
आता याचा आनंद व्यक्त करायचा की दु:ख ते कळत नाही,पण यूट्युबवरच्या एका व्हिडिओवरून अस कळत आहे की या सिझनने हिंदी बिबॉसलाही मागे टाकल आहे.जबरदस्त चर्चा सुरु आहे या शोची सगळीकडे.
मराठी म्हणून नक्कीच अभिमान आहे की 12 सिझनमध्ये जे हिंदीला जमल नाही ते या सिझनने केल
तीन टॉप कंटेंस्टंट विदाऊट नॉमिनेशन 34दिवसांच्या आत बाहेर.
एकंदरीत कंटेस्टंट एवढे खास नसूनही हे पर्व चांगलच गाजल
पण यात बिबॉस च्यि क्रिएटिव्ह टीमचाही समावेश आहे.
आज बहीण सांगत होती की ट्रेनमध्ये अगदी अमराठी मुली सुध्दा कालच्या प्रकाराची चर्चा करत होत्या.रेग्युलर हिंदी बिबॉ बघणार्या मुली ऐसा तो हिंदी मैं भी नही देखने को मिला ,अस म्हणत होत्या.
स्पोईलर
स्पोईलर
वीणा बिग बॉस विनर आहे.
बाकी इथल्या मेजॉरीटी पोस्ट्स
बाकी इथल्या मेजॉरीटी पोस्ट्स आणि सोशल मिडीया वाचून फार आश्चर्य वाटतय आणि हेच समजतय कि मुळात मराठी ऑडियन्सच तयार नाहीये बिबॉ पहायला, >>> कारण मराठीचे फक्त 1सीज़न झालाय आणी 2रा चालू आहे . हिंदीचे 12सीज़न झालेत. हिन्दीचे ही पहले सीज़न 1, 2हे असेच होते साधे . एवड्या मारामर्या आणी असे विचित्र टास्क नव्हेत.
मराठी चे ही 4 5 सीज़न झाल्यावर मराठी प्रेक्षकांना सगळे पाहण्याची सवय होइल.
पराग जर खराच बाहेर गेला तर मग
पराग जर खराच बाहेर गेला तर मग का बघायच बिग बॉस.. शिव वीणा चे वेडे चाळे..की वैशाली केळकर काकूंच्या कुचाळक्या ..छे! आजच्या एपिसोड वरुन झलक मिळाली च आज तर सगळे paid vacation वर आलेले वाटत होते.. टास्क cancel केला कशाला..बाकिच्या लोकांमध्ये किती हिम्मत आहे ते तर बघायला मिळाल असत.. आज फॉरवर्ड करत बघितला एपिसोड..ते शेवट च चित्र ओळखा निव्वळ टाईमपास..आजिबात बघितल नाही.. आज रुपाली च bag भरताना च रडणं genuine वाटलं..खरच डोळ्यात पाणी आलं..तिला वीणा चा आलेला राग अतिशय योग्य वाटला..अरे तुमचा मित्र तडका फडकी बाहेर गेलाय तर जरा तरी वाईट वाटू दया..at least acting तर करा.. वीणा सूरुवातीला रागात बोलत होति की कसे contestant आणले आहेत...नंतर पराग ला जाऊन मिठी मारत होती..साला एक नम्बर ढोंगी वाटते..आता सगळ्यात बरा फक्त शिव वाटतो .ते वीणा सोबतचे चाळे वजा केले तर.बाकीचे कोणीच नाही
इथे कोणीच नाही काही लिहिलं.
केलं परागला निलंबित. त्याने माफी मागताना उगाच attitude दाखवला असं वाटलं मात्र मला. बिग बॉसना तो हवा होता एकीकडे म्हणून माफ करणारा मोठा असतो वगैरे म्हणाले पण नेहाने आणि वैशालीने नाही केलं माफ. बऱ्याच जणांना तो नकोच होता. बाहेर interview द्यायला देतील की नाही माहिती नाही. हॉस्पिटलमध्ये तपासणी वगैरे करून मग पाठवलं असेल कारण तो बघा मला लागलंय दाखवत होता कॅमेऱ्याला, आणि पाठीमागे कमरेच्या जागी लागलंय असं वीणा रुपाली बोलताना म्हणाल्या.
नंतर लगेच डायनिंग टेबलवर शिवने मजा मस्करी सुरू केली, सगळे जेवत होते, वीणा पण सामील झाली त्यात, त्यामुळे रुपाली नंतर चिडली, तिच्यावर. रुपाली योग्य होती खरंतर, थोडा वेळ जाऊ द्यायला हवा होता, त्यांची टीम होती.
दुसरीकडे शिव विणाला सगळे शहाणपणा शिकवतायेत, त्यांच्यातली केमिस्ट्री बघवत नाहीये कोणालाही. बाकी काल जरा बोअर झालं, ते चादरीचे लवसाईन किशोरीताई आणि अजून कोणी करायचे, ते केळकर आणि वैशाली विस्कळीत करायचे, कुसके आहेत दोघे. काल माझा भाऊ, भाची आल्याने, मी येता जाता बघितलं. भावाला आणि भाचीला पण पराग गेला त्याचं वाईट वाटलं.
सगळे नॉर्मल होऊन खेळू लागलेत घरात आता.
सुरेखाताई सर्वात चूक होत्या, bb काहीच बोलले नाहीत त्यांना.
आता शिवने सारखं सारखं तेच तेच लव साईन करत बसू नये, काय मनात असेल ते सांगून टाकावं. त्यांच्या केमिस्ट्रीवर पूर्ण घरातले जळतात, वैशाली, केळकर आणि आता रुपाली जास्तच. पण काल विणाला रुपाली जे काही बोलत होती ते योग्य वाटलं. विशेषतः पराग गेल्यावर वीणा लगेच मजा मस्करीत सामील झाली, मलाही राग आला वीणाचा. शिवने पण लगेच मजा मस्करी सुरू करायला नको होती, तो पराग गेल्यावर. पण शिव कधीच परागच्या विरुद्ध फार बोलायचा नाही. पराग कायम बोलायचा. शिव मनाने खरंच चांगला आहे. वीणा तक्रार करत होती रूपालीची तर रुपालीची बाजू घेऊन छान समजाऊन सांगितलं त्याने. खरंतर आता वीणाने जास्तीतजास्त रुपाली आणि किशोरीताई बरोबर वेळ घालवायला हवाय काही दिवस तरी, तर तिचे भलतेच सुरू. वीणाकडे अजिबात maturity नाही असं काल वाटलं, लगेच चिडचिड सुरू हिची, रुपाली आणि किशोरीताईचे ऐकून तरी घे तर नाही. ती फक्त शिवचं ऐकते. तोच तिला छान समजावतो. काल काही बाबतीत राग आला वीणाचा. Bb नी पण तिला पुढच्या खेळात वेगळं केलं त्यांच्यापासून. तिला आणि शिवला एकत्र ठेवलं मात्र.
काल bb कडे पण दाखवायला फार काही नव्हतंच, बाकीच्यांना पण बराच वेळ उद्योग नव्हते काही म्हणून काही जण शिवला मदत करत होते, काहीजण त्यावर पाणी टाकत होते.
परागने माफी मागताना उगाच अवांतर टिपणी केली, असं करायला नको होतं त्याने. तोच धागा वैशालीने पकडून सुनावलं त्याला आणि वाहत्या पाण्यात हात धुऊन घेतले, पण परागची अवांतर टिपणी मलाही नाही आवडली.
आता अजून कोणालातरी आणायला लागेल wild card एन्ट्री.
शिव व्ह्यायला हवाय विनर, तोच
शिव व्ह्यायला हवाय विनर, तोच योग्य आहे. वीणा दुसरी चालेल. पण channel चं मत वीणाच्या पारड्यात असेल हे नक्की. अर्थात कधी हे दोघे फायनलला गेले तर.
आता एकेक घडामोडी बघून फायनलला कोण असेल predict करण्यात काही अर्थ नाही.
Pages