मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या गदारोळात पुन्हा एकदा शिव आणि वीणा ऑडियन्सची मनं जिंकून गेले, योग्य ठिकाणी स्टँड घेतला, दोन्ही गृपमधे समतोल राखला, शिवने भांडणं सोडवली, वीणानेही शेवटी सॉरी म्हणून मध्यस्थी केली ! >>> मम.

बाकी परागवर अ‍ॅक्शन घ्याच पण हिना नेहाने शिवची सेक्शुअल हरासमेन्ट केली म्हणून त्यांच्यावरही करा कारवाई >>> अगदी अगदी आणि परागला पण किती वाईट प्रकारे torcher केलं नेहा वैशालीने त्यावर पण action हवीच आणि संचालिकेवर पण घ्यायला हवी.

सोशल मिडिया परागच्या बाजूने आहे जास्त. त्याच्या बाजूने बऱ्याच जणांनी पोस्टस टाकल्यात, अगदी योग्य केलंय.

हा अख्खा सिझनच डिझॉल्व्ह करा शिवला विनर अनाउन्स करून , बिगबॉस टिम फेल झाली आहे. >>> जबरदस्त कमेंट, लय भारी.

पण मला आता उलट भीती वाटते सुरेखाताई, किशोरीताई या घेतील trophy.

वैशाली नेहा आणी हीना ने अगदी चुकिच्या पध्दतिने गेम खेळला आहे . उद्या हीना ने शीव सोबत जे केले . किन्वा वैशाली ने पराग सोबत केले ते पराग ने त्यांच्या बरोबर केले असते तर चालले असते का? लगेच आरडाओरडा केला असता हा कुठपन हात लावतो म्हणूण.
पण आजच्या एपिसोड मधली आवडती गोष्ट म्हणजे केळकर शिवला उगीच ज्ञान देत होता डाइनिंग टेबल वर आणी शिवने त्याचे एकून न घेता मस्त सुनवले त्याला की तुम्ही छोट्या गोष्टीला मोठे करता आणी मोठी गोष्टी विषयी बोलतच नाही .

https://www.facebook.com/virendra.malekar.1/videos/122374245680499/

वैशाली माढे गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळात किती चिप गिरीने वागु शकतात याच सत्य उदाहरण परागच्या किडनी काढलेल्या ठिकाणी जोरजोरात दाबून त्याला त्रास दिला गेला आणि कोणी बघत आहे समजल्यावर दिखाऊ बाई गुदगुल्या करत आहे अस दाखवते

पण मला आता उलट भीती वाटते सुरेखाताई, किशोरीताई या घेतील trophy. :: हे अजिबात शक्य नाही . ट्रोफ़ी शीव किन्वा वीणा लाच मिळेल.

कोणी बघत आहे समजल्यावर दिखाऊ बाई गुदगुल्या करत आहे अस दाखवते :; ती गुदगुल्या करत होती असे अजिबात वाटत नाही.

एकीकडे वाटतंय परागने इतका टीआरपी दिलाय "शो "ला का आता कशाला ते काढतील त्याला बाहेर ?. बर आताच्या केस मध्ये प्रेक्षकांचा पण भरघोस पाठिंबा आहे परागला. आणि वैशाली -नेहावर राग . काही नाही त्याला मस्त सिक्रेट रूम मध्ये ठेवतील आणि सोमवार पासून बिचुकले येणार आहेत म्हणे .. मग हिना बिचुकलेची पाठ दाबून सेवा करायला मोकळी आणि शिवची सुटका . पराग पण सिक्रेट रूम मधून काही दिवसांनी बाहेर कि मग परत पहिल्यापासून राडे सुरु . बिग बॉस ला ज्यांना ज्यांना काढायचंय त्याच लाईनीत काढतील जे टीआरपी देणार नाहीत असे मेम्बर्स Happy

फार खालच्या पातळीला उतरले होते हीना, नेहा, वैशाली आणि अ के.

एखाद्याने ऑर्गन डोनेट केलेला माहिती असताना इतका त्रास द्यायचा, disgusting.

शिवने तर तक्रार करायला हवी होती हीना आणि नेहाच्या चीपगिरी बद्दल.

पराग काल फोटो घ्यायला उभा होता नेहासमोर तेव्हा तिने किती कांगावा केला, कसा उभा होता घाणेरड्या पद्धतीने असं म्हणाली.

मला वाटत सुरेखा पुणेकरला काही कळतच नसाव.त्या गार्डन मध्ये फिरायला आल्या आहेत अस वाटत होत.मख्ख चेहरा करून वावरत होत्या.

नेहा वर नक्की काय निर्णय सोपवला आहे ते काही नीट दाखवलं नाही.
पराग ला माफ करायचे का नाही असा काही निर्णय असेल तर बिबॉ धन्य आहे. म्हणजे पराग एवढीच ज्या व्यक्तीची चूक आहे तिच्याच हातात निवाडा असेल तर काहीच अर्थ नाही त्यात.

नेहा आवडायला लागली होती मला. ..पण या अशा वागण्याने सगळं पाण्यात घालवलं तिने.
वैशाली गायिका म्हणुन कितीही "महान" असली तरी माणुन म्हणुन अतिशय चीप आहे. काल म्हणत होती की मला कोणी त्रास द्यायला आलं तर मी त्याच्या तोंडावर थुंकणार. केळ्या चं पण हे वाक्य होतं ...सिरीअसली ? थुंकणार ? हा विचार मनात तरी कसा येउ शकतो कोणाच्या ?

शिव खरच खुप जास्त सज्जन मुलगा आहे. हिना, नेहा ने इतका फालतुपणा केला पण शांत राहिला तो. काल केळ्या ला पण मस्त सुनावलं.
आणि वीणा समोर रडं आवरत होता तेव्हा खुप दया आली त्याची.

पराग ने कानाखाली मारली म्हणुन वीणा नेहा ला सॉरी म्हणत होती पण पराग ला या सगळ्या जणी जेव्हा त्रास देत होत्या तेव्हा एरवी पॅ पॅ पॅ पॅ करुन कांगावा करणारी वीणा शांत का होती ? त्याला प्रोटेक्ट करायचा ती प्रयत्न करत होती मान्य. पण समोरुन ईन्स्टिगेट करणार्याला तिच्या नेहेमीच्या आवाजात उत्तर देत बोलली असती तरी पराग ला जरा आधार मिळाला असता आणि नेहा , वैशाली शांत बसले असते.
एकटा शिव बाहेरुन हिना ला ओरडत होता असं दिसलं. एरव्ही किंचाळणारी रुपाली पण गपचुप होती.
सुपु तर काय बोलायलाच नको.किशोरी त्यांच्या परीने प्रयत्न करत होत्या पण त्यांचं कधीच कोणी ऐकत नाही.

आणी ते परफ्युम चोरी प्रकरण काय आहे ते एक कळलच नाही राव. हे काय मधेच.

नेहाचे या कालचा अथवा या पुर्ण वीक चा च खेळ अजिबात आवडला नाही. काल पण शीव चेयर वर बसला होता तेंव्हा काहीही बोलत होती ती
पुर्ण वेळ त्या ग्रुप ला नावे ठेवत होती परागला ही बोलत होती . त्या विरुध टीम आता पर्यंत मनात साचलेले 1महिन्याचे बोलून घेतले. ज्याची त्यावेळी कहीच गरज न्हवती.
नेहा रुपालिच्या ड्रॉवर मध्ये तिचे काही सामान शोधत होती तिला घाबरवण्यासाठी तेंव्हा तिला तिचा perfume त्यात मिळाला. म्हणून तिने चोरला असे बोलत होती. अरे सगळे चांगल्या बैकग्राउंड मधून आलेत कोण चोरी कशाला करेल तर नेहाने उगीच त्याचा इश्यू केला.
एकेकाळी नेहा मला का आवडली याचे मला आश्चर्य वाटत आहे.
बाप्पा ने वाचल्या पासुन नेहा सातवे आसमान वर गेलिये.
अजिबात आवडतनाहिये आता नेहा.

फार खालच्या पातळीला उतरले होते हीना, नेहा, वैशाली आणि अ के.
एखाद्याने ऑर्गन डोनेट केलेला माहिती असताना इतका त्रास द्यायचा, disgusting.
शिवने तर तक्रार करायला हवी होती हीना आणि नेहाच्या चीपगिरी बद्दल.
पराग काल फोटो घ्यायला उभा होता नेहासमोर तेव्हा तिने किती कांगावा केला, कसा उभा होता घाणेरड्या पद्धतीने असं म्हणाली.>>>>>>>
अच्छा हेच का ते ज्या बद्दल केळ्या म्हणत होता कि मला सांगायला पण लाज वाटते :अआ: खरच केळ्या आणि वैशाली डोक्यात जातात.
आणि शिव साठी बदाम Happy चांगला स्टँड घेतला त्याने. विणा पण आवडते मला.

सर्व पोस्ट>>>> ++++११११

एकच निष्कर्ष वाटतोय....शिवने म्हाड्केळ नावाच्या अभिजा(जी)त वि(वै)श्व विद्यालयातून शिक्षण घेणे बंद केले तर तो विनर नक्की आहे..

एकच निष्कर्ष वाटतोय....शिवने म्हाड्केळ नावाच्या अभिजा(जी)त वि(वै)श्व विद्यालयातून शिक्षण घेणे बंद केले तर तो विनर नक्की आहे..
++++++++++++1111111111111++++++++++++

बिबॉ पराग ला सिक्रेट रूम मधे पाठवणार याची मला जास्त शक्यता वाटते. काल नेहाची टीम अगली खेळत होतीच नो डाउट पण पराग ची पण कांगावा करणे स्ट्रॅटेजी होती. तो मुद्दामच सारखा ओरडत होता. जितके बोलले जातेय तित्का शारिरीक त्रास दिला गेला असे मला तरी वाटले नाही. चिमटे घेतले असेही वाटत नव्हते. ते लोक त्याने घेतलेले टॉवेल आणि प्लास्टिक पिशव्या खेचत होते. त्यांना काय माहित याची ऑपरेशन ची वुंड कुठे असणार आहे? अन तसेही केव्हा झालीय ती सर्जरी? तो तर तसे काही म्हणत पण नव्हता. इतका हेल्थ हजार्ड असता तर त्याने टास्क केला नसता आणि बिबॉ ने त्याला करू दिला नसता. तिथे नियम हे नेहमी ग्रे ठेवतात, राडा होणेच अपेक्षित असते. नियम तुटले तरी शेवटी सगळे काही बिबॉ च्या हातात असते. त्यांना जर त्याला नियमभंगासाठी काढायचे असेल तर ताबडतोब हाकलतील . सोफ्यावर बसवून लेक्चर देऊन मग आता नेहाच्या हातात फैसला वगैरे ड्रामा कशाला करतील? तो ड्रामा मुद्दाम केला जातो आहे असंच वाटतंय.
बाकी हिना च्या चीप हॅरेसमेन्ट स्ट्रॅटेजी बद्दल डीजेला अनुमोदन!

प्रोमो मध्ये बघितल्या प्रमाणे बिग बॉस ने नेहाच्या हाती निर्णय सोपवलाय " परागच काय करायच ? " एक तर ती त्याला बाहेर काढा म्हणून सांगेल किव्वा सगळ्यांची माफी मागायला सांगेल. माफी मागायला सांगितली तर पराग काही मागणार नाही . कारण त्याच म्हणणं आहे " या लोकांनी मला त्रास दिलाय मी का माफी मागू ? "मग एकतर त्याला खरंच बाहेर काढतील किव्वा सिक्रेट रूम मध्ये ठेवतील . कारण बिग बॉस चा निर्णय अंतिम निर्णय . बिग बॉस ला वाटलं पराग भरपूर टीआरपी देतोय तर बिचुकले सारखं त्यालाही माफ करू आणि सिक्रेट रूम मध्ये घालून गेम मध्ये परत आणू .पण टीआरपी पाहिजे म्हणजे पाहिजेच .तर तस . बिग बॉस काय ठरवेल ते .

बि चुकलेचा जामीन अर्ज फेटाळला...abp माझा आणि टीव्ही 9 वर दाखवले 20 मिनिटांपूर्वी

एनीवे बिचुकलेवरून चर्चा परागवर गेली हे खरं. कारण काल त्याने actually आधी irritate केलेलं उगाच तो रुपालीला बोलतात माझ्यावरून हा मुद्दा काढून. किशोरीताईपण म्हणाली हे तू नाही रुपालीने सांगायला हवं होतं. नंतर एवढं सर्व झाल्यावर हे असं झाल्याने सर्व सोशल मिडीयावर परागबद्दल चर्चा फक्त.

केळ्या, वैशाली आणि नेहा खूप शिव्या खातायेत सोशल मीडियावर..
सगळ्यात जास्त शिव्या केळ्या खातोय

सोशल मीडियावर परागला प्रचंड सपोर्ट आहे. नेहा वैशाली हीना केळकर चं खरं विकृत रूप दिसलं. नेहा आणि वैशालीला तर असं टॉर्चर करायला आवडत होतं. म्हणजे केवळ टास्क करायचा असं नाही, त्यांना दुसऱ्याला त्रास देण्यातूनच आनंद भेटतो बहुधा.
वीणा आणि रुपाली पण परागला सपोर्ट करत नव्हते. फक्त शिव आणि किशोरीचं डोकं जाग्यावर होतं आणि त्या दोघांनी टास्क पण नीट केलं.
आज कोणी बघणार असेल तर अपडेट लिहा प्लीज. मी बघणार नाहीये, आय मिन मला बघवणारच नाही नेहा आणि वैशालीचे माजोरडे चेहरे.

सोमी वर #IsupportParag असा हॅशटॅग चालु आहे Happy ..पराग ला खुप जास्त सपोर्ट आहे पब्लिक चा त्यामुळे नाही काढणार त्याला असं वाटतय.
आणि नेहा, वैशाली आणि केळ्या ला फुल टु शिव्या....पराग ला ढकललं ती क्लीप फिरते आहे सगळीकडे.

शिवानी, वीणा मारामारी मद्धे दोघींना शिक्षा झाली मग आता पण दोघांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणण आहे लोकांचं.
बघु आज काय होतं ते.

बिचुकलेचा जामीनअर्ज फेटाळला असं मीही आत्ताच बघितलं. कितपत खरं माहिती नाही पण तसं असेल तर तो येऊ शकणार नाही मग परागला काढायचे नाहीत कदाचित.

लगेच निर्णय घेतील ते bb कसले, ह्या सर्वांचा पुरेपूर trp साठी उपयोग करून घेणार. रुपाली आणि किशोरी पण बोलल्या म्हणे खूप त्याला आणि सर्वांची माफी माग आणि bb ची पण, तर त्याने bb ची माफी मागितली youtube वर बघितलं.

पराग पण आपण जाणार ह्या शनिवारी गृहीत धरून थोडा बिथरला होताच, पण त्याने संयम ठेवायला हवा होता, त्याची झापड जबरदस्त असणार. मुळात ह्याऐवजी ढकलले मला, पाडलं ह्या लोकांनी हा कांगावा करायला हवा होता, कदाचित bb चा मोर्चा नेहा वैशालीकडे वळला असता.

त्यांना काय माहित याची ऑपरेशन ची वुंड कुठे असणार आहे? >>> शिव सांगत होता की, वीणापण सांगत होती. शिवचा तर वाद झाला हिनाशी कि डाव्या बाजूला डम्बेल्स ठेवायचे नाहीत, पाहिजे तर दुसऱ्या बाजूला ठेव. ती बडबडत होती, तू सांगू नकोस, कशाला यायचं ह्याने bb मध्ये.

बिबॉसच्या क्रीएटिव्ह टीमला मात्र मानल.इलेक्शनची पण एवढी चर्चा झाली नसेल.
परागने तर स्वप्नातही विचार केला नसेल की एक थपडेमुळे आपण टॉक ऑफ टाऊन होऊ
एक थप्पड भी बहोत बडी चीज होती है बाबू.

मागच्या वेळी या task मध्ये फिजिकल टच allowed नव्हता आणी यावेळी गुदगुल्या पार मागे हाथ ठेवणे कसे काय allowed होते काय माहिती. आणी पराग चा task खुप वेळ चालू होता असे वाटले. बिग्ग बॉस हे थांबवू शकले असते. Buzzer वाजवून .
पण पराग ने उगीच मारले शान्त राहिला असता तर त्याला सांगत आले असते धक्का देऊन पाडलेय ते . आता इतका त्रास देऊन पण फैसला नेहाच्याच हातात गेला.

बिचुकलेचा जामीन अर्ज फेटाळला...abp माझा आणि टीव्ही 9 वर दाखवले 20 मिनिटांपूर्वी >> कोर्टाच्या निर्णयावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत . चॅनल ची टीम कोर्टाबाहेर तळ टाकून आहे असं एका सातार कराकडून वाचलं . चॅनल ला फक्त टीआरपी ची पडलेली असते. बाकी कुणाच्याही वागण्याशी तस त्यांचं देणं घेणं नाही . टीआरपी जी लोक देणार ती लोक पाहिजेत . विषय संपला

आणि कांगावा माझ्या मते सगळेच करत असतात. नेहा तर त्यात नंबर वन . नेहाने किशोरी ताईंचा फोटो पाण्यात भिजवायला म्हणून घेतला तर पराग तिला अडवून तिच्या समोर उभा होता . तिच्या पासून डिस्टन्स ठेऊन उभा होता तरी नेहाने नंतर माधवला आणि केळकर ला सांगितलं . कि पराग माझ्या खूप जवळ उभा होता . अगदी छातीला छातीला लावून वगैरे . सगळेच कांगावा करतात . . बर सुरेखा ताईंनी वेळीच ऍक्शन घेतली असती तर त्याला ओरडून बोलायची जरुरी पण नव्हती . पण सुरेखा ताई नुसत्याच उभ्या

सगळ हॉरिबल होत काल. Sad नेहाचा ग्रुप चिप आहे. Angry सन्चालिका तर धन्यवाद आहे.

या सिझनमधला बेस्ट सन्चालक असेल तर तो शिव आहे. Happy

फक्त शिव आणि किशोरीचं डोकं जाग्यावर होतं आणि त्या दोघांनी टास्क पण नीट केलं. >>>>>>>>>>> अगदी अगदी. हे दोघे टास्क खेळत होते तेव्हा शान्तपणे टास्क चालू होता. ( हिना नेहाची हॅरासमेण्ट सोडून)

परागची सुद्दा तेवढीच चूक होती. सिरियस हेल्थ इन्ज्युरी असताना टास्कमध्ये पार्टिसिपेट करायला नको होत त्याने.

वीणा आणि रुपाली पण परागला सपोर्ट करत नव्हते. >>>>>>>> ++++++++१११११११११ वीणा तर हिनाबरोबर पकडापकडी खेळण्यात दन्ग होती. रुपाली नुसत खुर्चीवर बसून परागला ऑल द बेस्ट म्हणत होती. एरवी आमच छान बॉण्डिन्ग आहे, छान बॉण्डिग म्हणणारी रुपालीने उठून सपोर्ट नको का करायला तिने?

मूळाच चुक बिबॉची आहे. असे राडे करणारे टास्क देतातच कशाला?

त्यांना काय माहित याची ऑपरेशन ची वुंड कुठे असणार आहे? अन तसेही केव्हा झालीय ती सर्जरी? तो तर तसे काही म्हणत पण नव्हता. >>>>>>>> सान्गितल होत त्याने. तेच विरुद्द टिमने लक्षात ठेवल.

एकच निष्कर्ष वाटतोय....शिवने म्हाड्केळ नावाच्या अभिजा(जी)त वि(वै)श्व विद्यालयातून शिक्षण घेणे बंद केले तर तो विनर नक्की आहे.. >>>>>>>>> सुषमाताई, मस्त!

बि चुकलेचा जामीन अर्ज फेटाळला...abp माझा आणि टीव्ही 9 वर दाखवले 20 मिनिटांपूर्वी >>>>>>> येस्स! मेबी परागला ठेवतील मग. पण हि बातमी तरी खरी आहे ना? Uhoh

नेहा रुपालिच्या ड्रॉवर मध्ये तिचे काही सामान शोधत होती तिला घाबरवण्यासाठी तेंव्हा तिला तिचा perfume त्यात मिळाला. म्हणून तिने चोरला असे बोलत होती. अरे सगळे चांगल्या बैकग्राउंड मधून आलेत कोण चोरी कशाला करेल तर नेहाने उगीच त्याचा इश्यू केला. >>>>>>> रुपालीच टास्कवरुन लक्ष डायवर्ट व्हाव म्हणून मुद्दामहून नेहाने केल होत ते.

विणाने नेहाची माफी मागितली तेसुद्दा नाही पटल. अ‍ॅटलिस्ट शिवने स्टॅण्ड तरी घेतला हिना विरोधात.

हा अख्खा सिझनच डिझॉल्व्ह करा शिवला विनर अनाउन्स करून , बिगबॉस टिम फेल झाली आहे. >>>>>>>>> सहमत

पराग काल फोटो घ्यायला उभा होता नेहासमोर तेव्हा तिने किती कांगावा केला, कसा उभा होता घाणेरड्या पद्धतीने असं म्हणाली.>>>>>>>
अच्छा हेच का ते ज्या बद्दल केळ्या म्हणत होता कि मला सांगायला पण लाज वाटते : >>>>>>>>> नाही ते नाही धनुडी. स्वर्ग नरक टास्कमध्ये केळकर म्हणत होता की बायका किचनमध्ये असताना परागने अशी गोष्ट केली जी इथे सान्गायला मला लाज वाटते.

वैशाली गायिका म्हणुन कितीही "महान" असली तरी माणुन म्हणुन अतिशय चीप आहे. काल म्हणत होती की मला कोणी त्रास द्यायला आलं तर मी त्याच्या तोंडावर थुंकणार. केळ्या चं पण हे वाक्य होतं ...सिरीअसली ? थुंकणार ? हा विचार मनात तरी कसा येउ शकतो कोणाच्या ? >>>>>> अगदी अगदी. हे बोलण चालू असताना तिकडे सुपुही बसल्या होत्या. त्यान्नी एका शब्दानेही तिला विरोध केला नाही की , 'बाई ग, अस वन्गाळ वागू नकोस' म्हणून

पराग पण आपण जाणार ह्या शनिवारी गृहीत धरून थोडा बिथरला होताच, पण त्याने संयम ठेवायला हवा होता, त्याची झापड जबरदस्त असणार. मुळात ह्याऐवजी ढकलले मला, पाडलं ह्या लोकांनी हा कांगावा करायला हवा होता, कदाचित bb चा मोर्चा नेहा वैशालीकडे वळला असता. >>+++++++++ ३३३३३३३३३

Pages