मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो नक्कीच पण उद्या नेहावर सोपवलं आहे, निर्णय घेणं असं आज दाखवलं precap मध्ये. Youtubeवर काही कन्फर्म्ड बातमी आली नाहीये अजून evict झाल्याची.

मागे एकदा पुनित इस्सर ( तोच कुलीच्या शुटीन्ग मधे अमिताभला मारल )ने एका स्पर्धकाला मार्शल आर्ट स्टाइलने जाम केल होत ( इजा होत नाही पण माणुस अनकॉश्नस होत मानेची कुठली तरी नस दाबली होती) तेव्हा त्याला एव्हिक्ट केल अस स्पर्धकासमोर दाखवल पण प्रॉपर मेन डोअरने बाहेर नेवुन सिक्रेट रुमला टाकल त्याने हे का केल त्याला कस इन्स्टीगेट केल गेल हे अ‍ॅनालाइझ करुन त्याला मग परत आणून गार्डन मधल्या जेल मधे टाकल होत २ विक
(मला तरी स्क्रिप्टेड वाटतय हे सगळ)

स्क्रिप्टेडच असेल... पण जोरदार रिटेक न घेतलेली कानफटीत दाखवली असेल तर मरेको देखनी है! Biggrin बरेच दिवसात कानाखाली आवाज काढलेला नाही पाहिला. Lol

पण जोरदार रिटेक न घेतलेली कानफटीत दाखवली असेल तर मरेको देखनी है! >>> नाही ना दाखवला तो शॉट.

(मला तरी स्क्रिप्टेड वाटतय हे सगळ) >>> असेलही कारण परागचा छळ अगदी व्यवस्थित दाखवला पण नेहाला दिली ठेऊन तो कट केला सीन.

शिवने हिनाला पण मस्त सुनावलं. ती तर काय वाटेल तसं शिवला बडबडायला लागली. परागचं किडनी ऑपरेशन झालंय त्याजवळ डम्बेल्स का काहीतरी ठेवत होती. वर म्हणे यायचं कशाला परागने असं होतं तर या गेममध्ये.

संताप..संताप..संताप होतोय.. हा बिग बॉस नेहेमी.राडे होईपर्यंत झोपून असतो..मग शनिवारी गुंड लोकांना फक्त झापून काय होणार आहे..
सुरवातीला शिव वर अती प्रसंग होता होता वाचला.. हेच कोणत्या पुरुष स्पर्धकांनी केल तर केवढा गहजब करतील..
नंतर किशोरी शहाणे.ला सुध्हा moisturiser काय.अंड काय..टाकल.. तेव्हा नाही अन्न वाया जात का?? आणि त्यात भाव किती खुनशी.. घ्या respect म्हणे.. वैशाली खुपच डोक्यात गेलिये..
आणि तो केळ्या साला स्वत मागे उभा राहुन खेळत होता..म्हणजे मी काहिच नाही केल..
विचारत घेतलं तर या दोघांचा टास्क टाईम 1 ते1.5 तास होता तोच पराग साठी 3 तास.. म्हणजेच बिग बॉस चाहते है की राडा हो जाये..
सकाळी सगळे फ्रेश होऊन हाळळ करायला टपलेच होते.. आधी खुर्ची वर vim gel टाकल..मग फ़ोम.. पराग ने आपल्या भाच्या ला किडणी दिली आहे..सो त्याचा core area तो प्लास्टिक bags आणि टॉवेल ने गुंडा ळू न ठेवला होता..वरतून ईन शर्ट केले होते.. तर या नालायक वैशाली म्हशीने अक्षरशः ओढून ओढून काढलं प्लास्टिक आणि टॉवेल..यात काय बळाचा वापर झालाच नाही का...आधी मेक अप केला..shaving क्रिम फासल ते पण एक वेळ जाऊ दया.. काय फालतू पणे हीना ने weights आणून त्याच्या सर्जरी झालेल्या पोटा कडे ठेवला.. मागून वैशाली गुदगुल्या न्च्या नावावर बोट बरोबर उजव्या किडनी कडे रुतवत होती.. तर बघवत नव्हत.. भयानक त्रास झाला असेल तेव्हा.. मागून हात घालून पाडल आहे त्याला.. आणि जर तरी त्याने नेहा च्या कानाखाली मारली हे जर बिग बॉस ला चुकिच वाटत असेल तर फक्त बिप बीप xxxxx शिव्याच खायचा लायकीचा आहे बिग बॉस अणि क्रू.. ती लोक कस्काय हे कंटिन्यू ठेवू शकली.. trp मिळण्याकरिता काहिही कराल काय..

पण तरीही अँक्चुअली काय झाल हे आपल्याला शेवटपर्यंत दाखवणार नाहीत.
एबीपी माझा या वाहिनीला महाराष्ट्रातल्या बातम्या देण्याएवजी बिबॉच्या घरातल्या बातम्या देण्यात जास्त इंटरेस्ट दिसत आहे.बातमी मध्ये बाहेर काढल अस सांगत आहेत.
पण वर लिहिल्याप्रमाणे अस झाल तर ते बिबॉच अपयश आहे.
पण तरीही स्लप करण हे सोल्युशन असू शकत नाही.
एकतर उठून जाऊन त्याने बिबॉकडे रितसर तक्रार करायला हवी होती.
परागला जर काढल तरीही बिबॉसमोर मोठा प्रॉब्लेमच आहे कारण मग तो ग्रुप तिघींचाच होणार,कंटेट कमी मिळेल.
बघू काय करतात ते.

confirmed news,parag is evicted from bb house.abp maza.

ट्विटर, न्यूज चॅनेल, युट्यूब वगैरे वरच्या बातम्या, eviction आणि nominations च्या खबरी इकडे एपिसोडच्या आधीच टाकून आपण आपलाच शो बघण्यातला surprise element घालवून बसतोय अस वाटत नाही का कुणाला?

म्हणजे अंदाज वगैरे व्यक्त करणे वेगळे पण कंफर्म न्यूज वगैरे माहित असली की एपिसोड बघायचा इंटरेस्टच संपतो ना राव!

स्पॉयलर अलर्ट तरी टाकत चला.... म्हणजे मग पोस्ट ओलांडून पुढे जाता येईल!

पराग ला एवढे टॉर्चर केले म्हणणारे किंवा इथे गळा काढणारे पब्लिक "तो तिथून उठला असता तर प्रश्न मिटला असता" हे ध्यानात का घेत नाही ?
भावा, तुला एवढा त्रास होतोय तर उठ ना !! याची गेम हरण्याची तयारी नाहीये , पण फॅन्सच तावात आलेत .

परागने एक किडनी डोनेट केली आहे आणि त्याच ठिकाणी दाबल जातय डंबेल्स ठेवातयत.चिमटे काढतायत माणुसकी आहे की नाही. शेवटी सहनशक्ती संपली आणि कानाखाली आवाज आला.

https://www.instagram.com/p/BzPVm8jnJVj/?igshid=gc86rz7sk03i
हा ह्विडिओ बघा.सरळसरळ ढकललेल दिसत आहे.
परागला जरी बाहेर काढल असल,तरी हा ह्विडिओ प्रचंड व्हायरल होत आहे,जनमत परागच्या बाजूने जात आहे.त्यामुळे बिबॉसला विचार करावा लागणार अस दिसत आहे.

पराग ला एवढे टॉर्चर केले म्हणणारे किंवा इथे गळा काढणारे पब्लिक "तो तिथून उठला असता तर प्रश्न मिटला असता" हे ध्यानात का घेत नाही ?.....।।प्रश्न याचा नाहीच आहे,तुमच बरोबर आहे पण ते कधी जर समोरचा ग्रुप नियमात राहून खेळत असेल तर.पण इथे तस होत नव्हत.
शिवच्या बाबतीतही तेच झाल ,तिथे मात्र बिबॉसने स्वत:च हीनाला खाली उतरायला सांगितलं.
संचालकाला पराग वारंवार सांगत होता की बळाचा वापर होत आहे.पण संचालकाला बहुधा कळतच नसाव.

@शाहीर पराग उठलाच ना ? का दिसलं नाही का तुम्हाला ? त्याच्या सीटखाली हात घालून घालून चिमटे काढले गेले नेहा आणि वैशाली कडून . त्याला उठावच लागलं . हेच जर त्या दोघींच्या बाबतीत आणि इतर बायकांच्या बाबतीत एखाद्या पुरुषाने केलं असत तर ? आणि संचालिका मॅडम काय करत होत्या ? एवढं सांगूनही .

ओके, पाहिला एपिसोड, टॉर्चर होताच इन्टेन्स अर्थातच पण ऑनेस्ट्ली मला नाही वाटत जितका कांगावा झाला तितकं कोणी परागला टॉर्चर केलं म्हणून !
केळकर, नेहा अँड वैशाली टिम त्यानी टीशर्टच्या आत ओले होऊ नये म्हणून बांधून आलेल्या प्लॅस्टिक पिशव्या आणि टॉवेल खेचत होते, त्याच्या ऑपरेशनच्या जागेवर अ‍ॅटॅक वगैरे मुद्दाम कोणी इन्टेन्शनली करत होते असे दिसले नाही मला तरी , आणि चुकून धक्का लागत होता किंवा त्रास होत होता त्रास तर उठायचे ना मग , अ‍ॅज सिंपल अ‍ॅज दॅट, कशाला बसला सहन करत मग ?
खुर्ची सम्राटला टॉर्चर होणार ही मेन्टल तयारी हवीच, हिन्दीत तर चेहरा झाकायला परवानगी नवह्ती, एवढ्या वेगानी थोबाडावर पाणी फेकायचे कि माणूस पाण्याच्या धपाट्यानेच २ मिनिटात उठेल, अंगाला तिखटाचा लेप वगैरे प्रकारही झालेत हिन्दीत कि भलामोठा वळु सारखा बॉडी बिल्डरही जळजळ नाही सहन करु शकणार आणि काही मिनिटात उठणार, तेच तर टास्क आहे !
मुळात परागला एकही टास्क करता येत नाही, दर वेळी फक्त रडीचा डाव खेळतो, ना त्याला मेन्टल स्ट्रेंथ आहे ना पेशन्स आणि जर सर्जरीमुळे परवानगी नसेल तर त्यालाच संचालक बनवायच होतं बीबॉ ने , भाग का घेतला त्यानी ?
परागने मुद्दाम सिंपथी कार्ड खेळून कांगावा केला असं मला तरी दिसायला दिसलं , पब्लिकची सिंपथी घेणे ही त्याचीच स्ट्रॅटेजी आहे, कालच त्यानेच बोलुन दाखवले वीणाला !
किशोरीलाही काही टॉर्चर केलं नाही, मॉइस्चराय्झर ,शँपू , लेफ्टोव्हर भाजी वगैरे टाकत होते, ती बाई तर इतकी कांगावेखोर माठ्ठ आहे, काहीही अक्कल नाही स्वतःची.
परागचे टॉर्चर बिगबॉसने थांबवले नाही त्या अर्थी बिगबॉसलाही त्यात काही डेंजर वाटले नाही , कारण बिबॉ ने स्वतः टास्कच राडा होणारा केला होता, त्या टिमने केले ते अ‍ॅग्रसिव्ह नक्कीच असेल पण तो टास्कचा भाग होता, त्याला खरच ढकलले कि लिक्विडसोप टाकून केलेल्या घसरड्या सिटमुळे पडला हे स्पष्ट दिसले नाही !
पण लुक्स लाइक परागने मात्रं जे केले तो मुद्दाम अ‍ॅटॅक केला /मारझोड केली असावी म्हणून ते सेस्न्सॉर कट झाले , कदाचित चॅनलविरुध्द कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून असेल.
अर्थात एपिसोडमधे झालं त्यापेक्षा परागवर अधिक टॉर्चर झाले असेल आणि त्याच्या तब्येतीला त्रास होणारं काही झालं असेल तर परागही करुच शकेल त्यांच्यावर कारवाई !
सहन करण्यापेक्षा उठणे हे बरोबर होते,
मला परागपेक्षा शिवला जे केलं त्याचा निषेध करावासा वाटला, त्याला सेक्शुअल हरासमेन्ट म्हणतात !
अर्थात आपल्याला ९० मिनिटात अख्खा दिवस दाखवतात, त्यातून खरच त्रास ज्यांना झाला त्यात चूक कोणाची असेल तर बिगबॉस टिमची !

बिग बॉस आणि संचालिका दोघे झोपले होते, पराग वारंवार सांगत होता. खरं तर बिग बॉस दोषी आहे as usual. नेहाला उशिरा आत बोलाऊन तंबी दिली पण तिने बाहेर कुठे नीट निरोप सांगितला.

शिवानीने ढकलत नेलं वीणाला तेव्हा वीणाने पायावर मारलं विरोध करत आणि नंतर शिवानीने लाथ मारली तेव्हा action ची reaction होती तशीच आता होती खरंतर. तेव्हा असंच सांगितलं होतं ना म मांनी.

नेहा.,केळकर,वैशालीचा गेम हा बरोबर नव्हताच.मुळात,वैशाली नख लावत होती,पराग वारंवार सांगत होता,बिबॉसने हे सगळ दुर्लक्षित केल.
नेहाला केळकरने तोंडाने मारल्यावर जर केळकर घरात राहू शकतो,शिव ने ढकलल्यावर तो घरात राहू शकतो,तर परागला सिक्रेट रुममध्ये ठेवायला हरकत नाही.
अर्थात यात परागने केल त्याच समर्थन नाहीच होऊ शकत,थोबाडीत मारण हे पूर्णपणे चुकीच आहे.
आणि बिबॉसने ज्या अर्थी नेहाला आत बोलावल त्या अर्थी बळाचा वापर होत आहे हे त्यांनाही.माहितच होत.
त्यामुळे बिबॉसच याला जबाबदार आहेत.
नेहाच्या ग्रुपनेही टास्क व्यवस्थित केलेला नाही.तो रद्दच केला हे तरी चांगल केल बिबॉसने.

ह्या सिजनला सगळी चिप लेवलची माणसं भरली आहेत घरात. पराग नाहिच आवडत, पण काल जे झालं त्याच्याबरोबर ते पुर्णपणे चुक होतं.

त्याने मारलं असेल नेहाला तरी मला त्यात काहि चुकीचं वाटत नाहि, कारण जर कदाचित त्याच्या जागी मी असते तर मीही तेच केलं असतं.

पुरुषाने टच केलं तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते, मग बायका मुद्दम त्याला नको तसा स्पर्ष करत होत्या तेव्हा बिबॉ काय करत होते??

म्हणजे हे सगळ स्क्रिप्टेड समजायच का.म्हणजे कदाचित बिबॉ न बघणारी लोक सुध्दा आज बघणारच.
कशी काय डोकी चालतात या लोकांची,कुठल्या ग्रहावरची माणस आहेत चँनेलच्या टीमचा.
मला या क्रीएटिव्ह टीमला बघायला नक्कीच आवडेल.
काय डोक्यात येत यांच्या,की आपण प्रेक्षक यांच्या जाळ्यात अडकतो,प्रेक्षकांंची नस यांना कळली असावी,न्युज चँनेल पण इन्वॉल्वह्ड असतात का?
टाईम्स ऑफ इंडिया, एबीपी माझा यांना दुसरेकाही काम नाही का.
आता प्रेक्षकांना वेठीस धरल जाईल की तुम्ही बघू नका.पण ते योग्य आहे का
विरंगुळा म्हणून एखादी मालिका न बघता वर्षातून एकदाच येणारा ,तो ही आपला मराठी शो बघण चुकीच आहे का.

काय फालतु होता कालचा एपिसोड. या वेळच्या कंटेस्टंट मुळे बिबॉ पण हतबल झालेत असं वाटतय.

हिना अत्यंत चीप बाई. शिव सोबत जे काही करत होते हे लोक त्याचा निषेध. बिबॉ ने लगेच थांबवायला हवं होतं. हा शो अ‍ॅडल्ट शो आहे का ?
अत्यंत घाण खेळले नेहा, वैशाली आणि हिना काल.
वैशाली कधीच आवडत नव्हती आता तर तिचा राग येतोय.
पराग ला खरच खुप भयानक टॉर्चर केलं. तो इतक्या वाईट पोझ मधे अवघडुन बसला होता कितीतरी वेळ. आणि शेवटी चक्क चक्क त्याला ढकलुन दिलं होतं नेहा नं तरीही ती नंतर कांगावा करत होती की तो मुद्दाम पडला. नेहा गेम साठी कुठल्याही थराला जातेय हे दिसलं काल.
बिबॉ ने वॉर्निंग देउनही तिनं त्रास देणं चालु ठेवलं. आणि पराग पोटावर पडला जोरात हे पण दिसलं काल. का नाही चिडणार कोणी अशा वेळी. नेहा, वैशाली सगळ्यानाच हाणलं असेल त्यानं असं वाटतय कारण शिव त्याला आडवत होता हेच दिसलं डायरेक्ट.

रच्याकने, काल पुर्ण वेळ पराग वरच कॅमेरा होता. Happy आधी नेहा ला किशोरी च्या वस्तु घेण्यापासुन अडवत होता तेव्हा , नंतर पराग ने रुपाली ला त्रास देउ नका सांगितलं त्यातच कितीतरी वेळ गेला आणि मग परत खुर्ची वर परत पराग पराग Happy
तो गेला तर विरुद्ध टीम कोणाबद्दल बोलणार आता Happy

बाकी मला मनापासुन पराग जाउ नये असच वाटतय. असतील त्याच्या चुका झालेल्या घरात बरेचवेळा पण तरीही तो बाकीच्यांपेक्षा चांगला आहे असं वाटतय मला.
शिव, पराग या दोघांना मला फायनल ला पहायचय

मला वाटतं न्यूजपेपर, channel वर येणाऱ्या बातम्या या बातम्या कम जाहिराती , कदाचित पेड न्यूज आहेत.
टीआरपी वाढवण्यासाठी पेरलेल्या बातम्या.
स्मिता श्रीपाद यांच्या वरच्या पोस्टला +१.
मला पराग, सुरेखा पुणेकर , वैशाली आणि किशोरी यांचेच नाव आणि चेहरा दोन्ही माहीत होते.
शिवानी, वीणा, रूपाली, नेहा यांना तर पहिल्यांदाच पाहिलंय किंवा नाव ऐकलंय.
शिव , बिचुकले सोडून इतरांचे चेहरे ओळखीचे होते, मैथिलीचं नाव ऐकलं होतं.

बिग बॉस ने वोर्निंग दिली होती नेहाला . कोणालाही शारीरिक इजा करु नये . काय झाल त्याच ? बाहेर येऊन सांगते बिग बॉस ला सांगितलं "हो आम्ही काही करत नाही आहोत ". आणि परत येऊन सीटखाली हात घालून घालून चिमटे काढायला सुरवात ? नेहावर पण कारवाई करा .जर सीटच्या खाली हात घालून घालून या बायका चिमटे काढणार असल्या तर कोण बसेल ? उठलाच ना तो ? आणि या पुरुषांकडून स्त्री दाक्षिण्याची अपेक्षा करतात ?
तसच जर त्याने किडनीची जागा प्रोटेकट करण्यासाठी तिथे टॉवेल गुंडाळला असेल किंवा प्लास्टिक च्या पिशव्या ठेवल्या असतील तर या बायकांना हात घालून घालून ते सगळं खुपसून काढण्याची काय जरुरी ? . कुठे हात घालत होत्या त्या ? पॅन्टच्या आत ?

>>तो गेला तर विरुद्ध टीम कोणाबद्दल बोलणार आता Happy

बिचुकलेंबद्दल पण लोक असेच बोलत होते!

कालचा भाग अजून पाहिला नाहीए, पण इथे वाचून पहावासा वाटत नाहीए.
जिथे पाळीपाळीने गेम खेळायचे तिथे परागच्या टीमवरच पहिल्यांदा डाव येतो का? चोरी, शाळा आणि आता हे.

आजच्या गदारोळात पुन्हा एकदा शिव आणि वीणा ऑडियन्सची मनं जिंकून गेले, योग्य ठिकाणी स्टँड घेतला, दोन्ही गृपमधे समतोल राखला, शिवने भांडणं सोडवली, वीणानेही शेवटी सॉरी म्हणून मध्यस्थी केली !
बाकी परागवर अ‍ॅक्शन घ्याच पण हिना नेहाने शिवची सेक्शुअल हरासमेन्ट केली म्हणून त्यांच्यावरही करा कारवाई किंवा हा अख्खा सिझनच डिझॉल्व्ह करा शिवला विनर अनाउन्स करून , बिगबॉस टिम फेल झाली आहे.
झेपत नाही बिगबॉसला हे स्पर्धक आणि खापर मात्र फोडतात संचालिकांवर, त्यापेक्षा पोलिस उभे करा प्रत्येक टास्कला !

>>आजच्या गदारोळात पुन्हा एकदा शिव आणि वीणा ऑडियन्सची मनं जिंकून गेले, योग्य ठिकाणी स्टँड घेतला, दोन्ही गृपमधे समतोल राखला, शिवने भांडणं सोडवली, वीणानेही शेवटी सॉरी म्हणून मध्यस्थी केली !

अगदी अगदी!

परवाच्या भागात शिव खुर्चीवर असताना सुरेखा किशोरीला अगदी हाताला धरून बाहेर काढताना दिसल्या.
पार्शल किंवा नाकर्ते संचालक जाणूनबुजून निवडतात का?

Pages