तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

{मग एक भोळी भाबडी गरीब मुलगी शोधायची. तिच्याशी लग्न करून "सरंजाम्यांच्या घरात आणायची". मग ती आपल्या मनमिळावू ई. स्वभावाने आईसाहेबांना इम्प्रेस करणार. मग कधीतरी त्या त्यांच्या वाटणीची प्रॉपर्टी तिच्या नावावर करणार. मग याला ती मिळणार}
ही राजेश खन्ना, इशा पारेख, विनोद खन्नाच्या आन मिलो सजनाची स्टोरी.

पण मुळात बेबीच्या नावावर जरी प्रॉपर्टी झाली तरी क्लॉजनुसार ती कुठल्याही परिस्थितीत विक्याला मिळणारच नाही आहे.मग हा हे सगळ का करत आहे.की क्लॉज बदलण्याची पॉवर फक्त नंदिनी कडे आहे.म्हणून हा बेबीला नंदिनी बनवत आहे.

काल मी एकट्यानेच क्लक क्लक डान्स केला. लग्न होताना बघताना मला सारखे वाटत होते डझ शी नो व्हॉट शी इज गेटिण्ग इन्टू?! त्याचा उलग्डा काल झालाच. विक्या काही विकेड वाटू न नाय राहिला. सिकच दिसतो. झेंडेच बेस्ट अ‍ॅक्टिंग. मस्त झापड लावली चॉकोलेट हिरोला.

इशाचा फोटो ला धरून संवाद एकदम सेवंटीज माहेर टच. किम्वा कुमुदिनी रांगणे कर कादंबरिका टच. तिचा ड्रेस छान होता. विक्या घरी क्याजुअली बंदुक फिरवत असतो काय? हाउ फन्नी आणि ही समोर उभी राहते मला मारा सर्र्र्र्र करून. तिला हा सायको आहे अशी शंका पण हेत नाही.

झेंडे इशा मूर्ख आणि बेअक्कल मुलगी आहे म्हणतो तेव्हा टाळ्या पिट ल्या. हिअर हिअर करून.

त्या आधीच्या भागात आईची सो कॉल्ड मीटिन्ग होती त्यात आईने इतक्यावेळा आयु श्य इशा कश्ट वगैरे बोलली की श संपून जातात कि काय असे वाटले. तिथे सुद्धा विल वगैरे नाही फक्त कागद पत्र असा शब्द प्रयोग ते ही वकिला कडून. अरे आम्ही सूट्स अन प्रॅक्टिस बघितलेली लोके आहोत. सी एन एन बघून सुद्धा सध्या लीगलीज चांगली अंगवळणी पडली आहे. पण हे फक्त काप. सिनेमाला तसे हॉटेल मध्ये जेवायला तसे कागद्पत्र. हाउ वीअर्ड.

काल किती महिलांना तो इशाला जवळ घेउन अंगाई म्हणतो ते क्कित्ती रोमँटिक ग्ग्ग्ग बाई सर्र्र वाटले असेल?

:-).... इतके गाणे म्हणत असताना त्या ईशाला अजिबात जाग येत नाही? शक्य आहे का हे?
आणि मुळात ती किती अनकंफर्टेबली झोपलेली.... पलंगाच्या हेड रेस्ट वर डोके ठेऊन....!! अशा वेळी तर नक्कीच जाग येईल कुणी जवळ येऊन गाणे म्हटले व डोक्यावरुन हात फिरविला तर....!!
ती बहुतेक मनातल्या मनात हसत होती केड्या च्या असल्या आयडियांना........दिसत होतं!!

तुला पाहते रे - स्पुफ

जालिंदर हा विक्रांत सरंजामेचा लाडका मेव्हणा असतो. त्याच्या एकुलत्या एक बहिणीने राजनंदिनीचे विक्रांतसोबत लग्न लावून देतो. प्रॉपर्टी बहिणीकडे आली की आपणच तिचे मालक बनू, या आशेवर तो जगत असतो.

पण, विक्रांत हा सरंजामे कुटुंबात दत्तक असल्याने त्याला काही प्रॉपर्टी मिळणार नसते. मग, हे जेव्हा जालिंदरला कळते तेव्हा तो विक्रांतला सुनावतो. दाजी, तुमची प्रॉपर्टी बघूनच, बहीण सुखात राहील वाटलं, लग्न लावून दिलं. तेव्हा विक्रांत त्याला सांगतो, आईसाहेबांनी प्रॉपर्टी सुनेला द्यायचं ठरवलं आहे. बाकी, तुझ्या बहिणीत मला रस नाही, प्रॉपर्टी मिळाली की तिला घरी घेऊन जा..नाहीतर, दोघांना मारून टाकेल.

तेव्हा जालिंदर चिडतो अन विक्रांत सरंजामेला मारायला उठतो, पण बिचारी राजांदिनी दोघांच्यामध्ये सापडून मरते. विक्रांत, जालिंदर यांच्या वागण्याचा, कटाची माहीती न होताच बिचारी मरते.

विक्रांत आता दुसरं लग्न करून नव्या बायकोकडून प्रॉपर्टी मिळवायची खटपट करायला बघतो. खरंतर, मायरा त्याला आवडत असते, पण ती हुशारही असते. तिच्याशी लग्न केलं तर प्रॉपर्टी मिळवता येणार नाही, म्हणून तो साधं-भोळे कुटुंब शोधायचे ठरवतो. ज्यांच्या जगण्याच्या महत्वकांक्षाच छोट्या असतील. हे जालिंदरला माहिती झालेले असते. त्यावेळी तो विक्रांतला अशा कुठल्याही मुलीला धोका देऊ देणार नाही, अशी शपथ घेतो.

राजनंदिनी मरते. नेमकी तेव्हाच इशाची आई प्रसूत झालेली असते, पण काही चुकीच्या औषधांनी जन्मल्यावर इशाचे डोळे जातात. अन, राजांदिनी जिने आधीच डोळे दान केलेले असतात ते त्याच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात येतात. इशाला नवी दृष्टी मिळते. वीस वर्षे जातात. विक्रांत तोपर्यंत कंपनी उंचीवर नेऊन ठेवतो.

रिक्षामध्ये दो रुपयांना जीव लावणारी इशा विक्रांतला सापडते. इशाच्या वडिलांचे साडीचे गहाण टाकलेले दुकान पण हिसकावून घेतो. पण, इशाचे बाबा मोठे होऊ नये म्हणून त्यांना ते देतच नाही. टिल्लू जेव्हा त्याचे प्रॉपर्टीचे स्वप्न भंग करायला आलाय, हे बघितल्यावर विक्रांत त्यालाही धडा शिकवतो. इशाच्या रूपाने विक्रांतला सावज मिळाल्याची भावना निर्माण होते. इशाशी लग्न करून तिला प्रॉपर्टी मिळाली, की त्याची मालकी मिळवायची. या विचाराने विक्रांत सरंजामे खुश होतो. म्हणून वेळोवेळी जालिंदर इशाला सावध करायला येतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. विलास झेंडे जो त्याचा लंगोटी दोस्त असतो त्याला पण प्रॉपर्टीत हिस्सा मिळणार असतो. म्हणूनच जालिंदर विक्रांत अन इशाच्यामध्ये येऊ नये यासाठी झटतो. या सगळ्यांची काहीच कल्पना मात्र मायरा, सोन्या, जयदीप यांना नसते.

मात्र, एक दिवस जालिंदर इशाला पुराव्यानिशी विक्रांतचे सत्य सांगतो. तेव्हा इशा जालिंदरला दुसरा मुलगा शोधायला सांगते. विक्रांतला खुनी ठरवणारे पुरावे कर्जतच्या वरच्या खोलीत ठेवलेलं असतात. तिथं विक्रांत कुणालाही जाऊ देत नाही. पण, राजांदिनीच्या क्षणभरच्या आठवणीने तो त्या खोलीत रडतो.

राजनंदिनीला मिळणार असणारी सगळी इस्टेट इशाला मिळते. विक्रांत म्हणतो, तू तुझं ग्रॅज्युएशन, पीजी पूर्ण कर. इस्टेट मला देऊन टाक. तेव्हा इशा त्याला म्हणते, हे डोळे आहेत ना (सर) ज्यातून मी 'तुला पाहते रे' हे 'राजनंदिनीचे' आहे. जिला तुम्ही 'नजरचुकीने' ठार केले. आता तिला तुमचा 'मृत्यू' बघायचा आहे. तेव्हा इशा विक्रांतला मारून टाकते. अन जालिंदर काकांच्या आशीर्वादाने दुसऱ्या चांगल्या समवयस्क मुलाशी संसार थाटते.

Whatsapp forward..

मी ही मालिका बघत नाही पण सगळ्या प्रतिसादातून काय चालू आहे याची कल्पना येते..
म्हणून आज एक msg मिळाला तो इथे चिकटवलाय..
इथल्या कोणी लिहिला असेल तर क्षमस्व..msg वर नाव नाही.

झेंडे इशा मूर्ख आणि बेअक्कल मुलगी आहे म्हणतो तेव्हा टाळ्या पिट ल्या. हिअर हिअर करून. >>>>> +१.
प्रत्यक्षात बोलता येत नसल्याने असा खुन्नस काढला.

नक्की विक्रांत सरंजामे पहिल्या लग्नात असतो तरी किती वयाचा?
आताचं वय सांगितले की, ४०? मग काय २० व्या वर्षी लग्न करतो?

स्टोरी इतकी फालतु आहे. २० वर्षे विसने मेहनत केली म्हणूनच कंपनी मोठी होते , ह्याची कमाई पण त्याचीच ना? त्याचे जीवन सुरळीत चाललेय मग कुठल्या प्रॉपर्टीसाठी हा असा फालतु “डाव” रचून लग्न करतो दाखवताहेत?

आईसाहेब विसला त्याच्या मेहनतीचे जराही कमाई देणार नाहीत आणि हा म्हातारा विस प्रॉपेटी घेवुन कुठे जाणार? मायराशी लग्न?

केड्या इथे आणि तिथे पांडुचे लिखाण भंगार....

मला तर वाटतं की वेगळ्याच स्टोरीचा विचार केला असेल सुरुवातीला . ईशाची acting बघून या स्टोरीवर घसरले..
बघा ना आत्ता आत्ताच्या भागात सगळा राग काढून घेतायत ईशावर.. झेंडे म्हणाले मूर्ख बेअक्कल मुलगी आहे.. पुढच्या भागात सुभा म्हणतो मातीचा गोळा आहे ही मुलगी.. दोघे ही 'कधीपासून सांगायचं होतं' अशा अविर्भावात सांगताहेत.. Lol

मला तर वाटतं की वेगळ्याच स्टोरीचा विचार केला असेल सुरुवातीला . ईशाची acting बघून या स्टोरीवर घसरले..
बघा ना आत्ता आत्ताच्या भागात सगळा राग काढून घेतायत ईशावर.. झेंडे म्हणाले मूर्ख बेअक्कल मुलगी आहे.. पुढच्या भागात सुभा म्हणतो मातीचा गोळा आहे ही मुलगी.. दोघे ही कधीपासून सांगायचं होतं अशा अविर्भावात सांगताहेत.. Lol >>>>>>> Rofl Rofl Rofl Rofl Rofl

कायच्या काय ट्विस्ट. >>>>>>>> +++++++++१११११११ अगदी अगदी जर विसला व्हिलनच दाखवायच असेल तर ट्विस्टसुद्दा तितका तगडा असायला हवा ना. इथे तर बळेबळेच डिडिएलजे च्या शाहरुखला बाजीगरचा शाहरुख केलय. बाकी काल सुभाचा अभिनय छान झाला.

मुळात जर त्यान्ना थ्रिलर लवस्टोरी बनवायची होती तर ' वय विसरायला लावणार प्रेम' ही टॅगलाईन चुकली. कारण हे प्रेम एकतर्फीच आहे ईशाच्या बाजूने.

जनरली बर्याच मराठी-हिन्दी मालिकान्मध्ये अस दाखवतात की, नायक आपला वाईट हेतू साध्य करण्यासाठी नायिकेशी लग्न करतो. पण नायिकेच्या अति चान्गल्या स्वभावामुळे आणि प्रेमामुळे नायक तिच्या प्रेमात पडतो आणि सुधारतो. आता ही फालतूगिरी या सिरियलमध्ये दाखवून नका म्हणजे झाल. विस व्हिलन आहे तर त्याला व्हिलनच राहू द्या.

विस झेन्डेला विश्वासाने एवढ सगळ सान्गतो, त्याला शन्का येत नाही की झेन्डे सुद्दा त्याचा कधी ना कधी विश्वासघात करु शकतो, त्याच बिन्ग फोडू शकतो.

आत्ताच्या भागात सगळा राग काढून घेतायत ईशावर.. झेंडे म्हणाले मूर्ख बेअक्कल मुलगी आहे >>>>>>> काल विसनेसुद्दा झेन्डेला ईशा बद्दल सान्गताना डोक्याच्या च्या साईडला तर्जनी फिरवून ' हि मुलगी बावळट आहे' असे एक्स्प्रेशन्स दिले.

संपादन (4 hours left)
फोटो शी गप्पा मारताना >>>>>> बाकी ते तिने फोटोचा किस घेतला ते कपाळावर की ......... ते दाखवले नाही. Wink Lol

काल किती महिलांना तो इशाला जवळ घेउन अंगाई म्हणतो ते क्कित्ती रोमँटिक ग्ग्ग्ग बाई सर्र्र वाटले असेल? .>>>>>>> नाही अमा. रोमँटिक नाही वाटला. उलट भिती वाटू लागली विसची.

विक्या जावई असेल तर आडनाव सरंजामे कसे? >>> अर्थात! इबाबांना परवा म्हणाला ना तो 'मला मुलगा माना' तसं राबाबांना पण म्हणाला असेल. विश्वास मिळवण्यासाठी आडनाव बदलून घेतलं असेल. सिंपल >>>>>>>> ते काय आहे ना, विस स्त्री पुरुष समानता मानणारा दाखवलाय. ईशाला लग्नात मन्गळसूत्र घातल तेव्हा स्वतः ब्रेसलेट घालून घेतल. जनरली मुली लग्नानन्तर नाव- आडनाव बदलतात. तस विस ने केल असेल, लग्नानन्तर आपल नाव बदलून विक्रान्त केल असेल आणि मुलीकडच आडनाव लावल असेल. Proud

फोटो शी गप्पा मारताना, चक्क एखादा धडा वाचतेय किंवा पाठ केलेलं भाषण किंवा एखादं उत्तर रिवाईस करतेय असं वाटत होतं..
आणि किचन मध्ये गोळीचा आवाज ऐकून, आईसाहेबांना काय बिलगते.. खूप हसू आलं..
विस समोर जे काही संवाद आणि अभिनय होता तिचा.. बंदूकीच्या सीन मध्ये.. इतकं विनोदी वाटत होतं की विस च अस्वस्थ होणं इ. गांभीर्य च जाणवलं नाही..!

चक्क एखादा धडा वाचतेय किंवा पाठ केलेलं भाषण किंवा एखादं उत्तर रिवाईस करतेय असं वाटत होतं..>>>
ती रोजच इ. ४ थी च्या वक्तृत्व स्पर्धेत भाषण करते

मुळात जर त्यान्ना थ्रिलर लवस्टोरी बनवायची होती तर ' वय विसरायला लावणार प्रेम' ही टॅगलाईन चुकली. कारण हे प्रेम एकतर्फीच आहे ईशाच्या बाजूने. >>>> हे बरोबर

फोटो शी गप्पा मारताना, चक्क एखादा धडा वाचतेय किंवा पाठ केलेलं भाषण किंवा एखादं उत्तर रिवाईस करतेय असं वाटत होतं.. >>>+११११११

फार एंड-- बहुतेक दादासाहेबांना ह्याचे माहिती होते...सो ते विक्रांत ला एक छदामही द्यायच्या अगेंस्ट असावेत.... म्हणून तुमची ती ३३ टक्क्यांची थिअरी थोडी अ‍ॅप्लीकेबल होत नाही! कारण विक्रांत कशालाच लायेबल नाहीए.... >>> ते विरोधात असते तर समजू शकलो असतो. पण परवाच्या एपिसोड मधे तसे काही नव्हते. उलट हाच म्हणतो की मीच त्यांना तो क्लॉज घालायला सांगितला. त्या एपिसोड मधे विक्या वर मुळात काही कोणाला शंका होती असे काहीच नव्हते.

त्यामुळेच तर सगळा ट्विस्ट फोल होतो. विक्याने तो क्लॉज घालायला सांगितला नसता तर हे त्याला आपोआपच मिळाले असते. तो मुलगा नसून जावई वगैरे आहे हे मालिकेत अजून कोठेच आलेले नाही. ते सगळे आपण गृहीत धरतोय. आणि जावई लॉजिक धरले तर नंतर दत्तक वगैरे घेउन आडनाव बदलले का (त्याचे आडनाव सरंजामेच असेल हा एक अचाट योगायोग बाजूला ठेवला तर)

भिंतीवर ओले बोळे फेकण्याचा तो काहीतरी गेम असतो ना? जो बोळा चिकटेल तो चिकटेल. तशा प्रकारे कथानकात फाटे फोडत चालले आहेत. विक्रांत यांचा नक्की कोण, राजनंदिनीशी आईसाहेबांचे नाते - नो खुलासा. नंतर कधीतरी काहीतरी ड्रामॅटिक आणि इल्लॉजिकल एपिसोड्स असतील त्यावर.

आणि कंपनीला केअरटेकर वगैरेची मुळात गरज नाही. विक्याला सीईओ "पदावर" नेमले तरी बास आहे. कारण कंपनीचा एक बोर्ड आहे. एक मीटिंग दाखवली होती. आईसाहेब, परांजपे वगैरे मंडळी होती. केअरटेकर लागतो तो इस्टेटीला. पण तेथेही आईसाहेब हयात होत्या. त्यामुळे मुळात विल मधे इस्टेटीची १००% मालकी आईसाहेबांकडे दिली असती तरी काही फरक पडला नसता. नंतर वारसाहक्काने जयदीपला मिळालीच असती. आणि विक्या दत्तक असेल तर त्यालाही.

इतक्या मोठ्या कंपन्या आणि इस्टेट च्या मालकाचे विल असेल तर तो गेल्यानंतर काही दिवसांतच वकील ते घरच्या जबाबदार व्यक्तींपुढे वाचून समजावतो. कारण त्या कंपन्यांसंबंधी निर्णय लगेच घ्यायचे असतात. सायनिंग ऑथोरिटी लागते. बर्‍याच औपचारिक प्रोसेस असतात. ते विल असे अनेक वर्षांनंतर पोतडीतून एकेक आयट्म काढल्यासारखे सरप्राइज देत सांगत नाहीत.

मुळात कॉर्पोरेट प्रोसेस ज्या रीतीने दाखवली आहे यात, त्यातून असे जाणवते की हा सगळा afterthought आहे. सुरूवातीला ते वय विसरायला लावणारे प्रेम, मध्यमवर्गीय गोडगोडपणा वगैरे झाले. आता काहीतरी वेगळे दाखवायला हवे. मग मृत्यूपत्र, वारसा हक्क, कंपनी मालकी हस्तांतरण वगैरे शी संबंधित एक खुनशी प्लॅन तर दाखवायचा आहे. पण त्याकरता लागणारी माहिती न घेता ढोबळ काहीतरी दाखवून पटापटा एपिसोड्स पाडत पुढे जायचे आहे. अशा रीतीने चाललेले दिसते.

सुभाने या भागात काम मात्र चांगले केले आहे. झेंडेच्या कॅरेक्टरलाही एक धार आली आहे. मात्र ते सगळे करताना ते जे काही बोलतात ते निरर्थक असल्याने इफेक्ट येत नाही.

मालिका भलतीकडेच जात आहे असं वाटत आहे केडयाच्या डोक्यावर नकीच परिणाम झालाय अस वाटत आहे Uhoh कारण मालिकेचा मूळ विषयच बदलला..
आणि सुभा अस म्हटला की त्याने जेव्हा इशाला सुरुवातीला बघितलं कॉलेज च्या कार्यक्रमात तेव्हाच ठरवलं की हीच मुलगी योग्य आहे त्याच्या कामासाठी तर ते कसं काय कारण त्याला तेव्हा कशावरुन वाटलं की त्याच्यासोबत लग्न करेन.. आणि विस आईसाहेबांचा मुलगा आहे की जावई हे बहुदा केड्यालाच माहिती नाहीये अस वाटत आहे Lol

Subha ani ishala god batami milun subhache matparivartan honar ahe, ani mag title song picturise houn Malika sampel, hakanaka Wink

मायराच्या कॅबिन(?) मधून एक केळं आणि एक सफरचंद घेऊन झेंडे कर्जत च्या बंगल्यावर? आणि तेही सरंजामे चहा पीत असताना? मग मायरा पहाटे पाच वाजता ऑफिसला जाते का? की सेम बंगला मुंबई मध्ये आहे? काय ताप करुन ठेवलाय केड्याने... खरंच तोच इसरलंय... की केहना क्या चाहते हो.!

Pages