Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
त्या जयदीपला कुठल्याश्या
त्या जयदीपला कुठल्याश्या गोळ्या देऊन त्याची अशी अवस्था करून ठेवली आहे. का नाही साॅन्या विसला सांगत की आमचा ५०% वाटा आहे तर उद्यापासून मी पण ईबाळाबरोबर ऑफिसला येते?
कृपया श आईसाहेबांच्या टोन
कृपया श आईसाहेबांच्या टोन मध्ये वाचावा .>>>>
मागे कोणीतरी लिहिलंय तसे आ.सा.,सगळ्या श "चा उच्चार "ष" करतात.
हलकी शिटी येते.
हलकी षिटी हो.
हलकी षिटी हो.
हलकी षिटी हो>>>>
हलकी षिटी हो>>>>
पाचेक एपि पाहिले नाहीत. पण इथे वाचुन सगळ्ळं कळ्ळ्म.
प्रतिसाद भारी आहेत.
बाजीगरमधलं काजोलचं नाव मला अगदीच लक्षात आहे. कारण छुपाना भी नही आता गाण्यात सिद्धार्थ ने हातावर लिहिलंय तिचं नाव.
हथेली पर तुम्हारा नाम लिखते है मिटाते है
माझं आवड्तं गाणं.
हलकी षिटी हो. >>>>>
हलकी षिटी हो. >>>>>
आणि बाझिगर ओ बाझीगर गाण्यात
आणि बाझिगर ओ बाझीगर गाण्यात शाहरुख ने छातीवर लिहिलेलं असतं.. मुझको गलत ना समझना मैं नही बादल आवरा .. दिल की दिवारो पे मैने नाम लिखा है तुम्हारा
मैत्रीखातर नाही पण विसचा
मैत्रीखातर नाही पण विसचा प्लॅन कळल्यावर तो उघड करु नये म्हणून तरी झेंडेला पैसे मिळतील विसकडून.
सोन्याला कष्ट न करता पैसे हवेत ना, म्हणून तिला ऑफिसमधे जाणं वगैरेमधे इंटरेस्ट नाहीये.
विस जसा कर्जत-मुंबई ईझीली ये-जा करतो ते बघून त्या मालिकेची आठवण झाली, सुभाच होता त्यात, नवरा-बायको नातं लपवतात. त्यातही बांद्रा-विरार (का असच कुठेतरी) ते दोघे पटापट येजा करायचे.
आजचे वेदरः
आजचे वेदरः
ईशाच्या जिवाला धोका: ऑ? ते काय असते? तुम्ही आम्हाला हा प्रश्न का विचारत आहात प्रेक्षकहो? तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?
विक्याचे डाएट कंट्रोलः सध्या ईशा त्यांच्या आवडीचे पदार्थ करते यावरून काय ते समजून घ्या.
काय रिग्रेसिव्ह होत चालली आहे ही सिरीज. इतके दिवस अनेक वर्षांपूर्वीच्या कादंबर्यांमधल्या गृहिणींचे संवाद वगैरे बोलत तोपर्यंत ठीक होते. आता "आपण बायका...", "पुरूषांना...." छाप वाक्ये सुरू झाली.
आता तर आईसाहेबांनी ईशाला "तुझं लग्न झालंय ना? मग पहिलं कर्तव्य काय आहे? नवर्याकडे लक्ष देणं" वगैरे सुरू केलं आहे. काय भंकस.
एकतर ईशाला मुळात ऑफिस मधे यायला पटवावे कशाला लागेल? तिने नोकरी सोडलेली नाही. मधे यांनी एक रॅण्डम कारण सोडून दिले होते हवेत की तिच्या म्हणजे जिवाला धोका असल्याने ऑफिस मधे जात नाही.
ईशा सरांच्या कामात हातभार लावणार - हा संवाद या सिरीज मधला सर्वात मोठा विनोद आहे.
आता तू उद्यापासून ऑफिसमधे यायला सुरूवात कर इतक्या साध्या वाक्यावरून जे होउ शकले असते, त्याकरता आख्खा एपिसोड खाल्ला.
(No subject)
विस कोणतीही गोष्ट सरळपणे करत
विस कोणतीही गोष्ट सरळपणे करत नाही, संपत्ती सरळ हडप करायची नाही ती ईशाकरवी मिळवायची. तसं ईशा ऑफिसला यावी म्हणून विसरणे-थकणे हे नाटक.
रोमँटिक अँगल सुटल्यावर काय
रोमँटिक अँगल सुटल्यावर काय स्पेश ल आहे इशा व विक्या संसारात? एक सुमार दर्जाचा मॅन अपघाताने संपत्तीच्या संपर्कात आला आता त्या संपत्तीला चिकटून बसायचे आहे. स्पेशल टॅलेंट काहीच नाही. ज्याने धंद्यात किंवा इंडस्ट्रीत नाव होईल, मान मिळेल. त्याची तशीच अतिसामान्य लहान वयाची बायको. श्रीमंत पण अति सामान्य घरचे लोक. त्यांच्या प्रोपर्टीचा किस्सा. लग्ना नंतरचे गुलाबी सुखी दिवस तर दिसले ही नाहीत. त्यापेक्षा अच्छे दिन ची हवा तरी काही जास्त दिवस होती लोकाम्च्या डोळ्यात.
आईला पण आता काम नाही. स्ट्रेस घालवायचे उपाय लिहून घेते. हिला गूगल माहीत नसावे.
अगदी बरोबर. खुला राजमार्ग
अगदी बरोबर. खुला राजमार्ग समोर असताना ड्रेनेजच्या पायपावरून चढून घरात यावं तसं आहे. आणि इशा रोज ऑफीसात येणार म्हणून केबिन तयार केली होतीस ना रे दादा तू?
माहीमकर पहील्यांदा बोलला काल.
विक्यासाठी व केड्याला एक प्रष्न. ते बंगलोरच्या वेळेस इषाच्या जवळ जाऊनचे संवाद म्हणायच्या आधी, त्या लांबच्या खुर्चीत बसून म्हणलेले ते प्रेमाबद्दलचे संवाद, मनाची उलाघाल वगैरे बद्दलचं स्वगत काय होतं मग? ए सांगा ना, लाजायचं नाही.
ते प्रेमाबद्दलचे संवाद, मनाची
ते प्रेमाबद्दलचे संवाद, मनाची उलाघाल वगैरे बद्दलचं स्वगत>>>तो सगळा वोक्याच्या प्लॅनचाच भाग होता. तेलाचे डबे आणणं पण.
अगदी बरोबर मेधावी.. उगाच फापट
अगदी बरोबर मेधावी.. उगाच फापट पसारा करून ठेवलाय
प्रेमाबद्दलचे संवाद, मनाची
प्रेमाबद्दलचे संवाद, मनाची उलाघाल वगैरे बद्दलचं स्वगत काय होतं मग>>>>
आणि हे प्रेमळ संवाद सुरू असताना बेबी गाढ झोपेत आहे असं विक्याला वाटतं असं आपल्याला दाखवलंय. म्हणजे बेबी जागी आहे हे विक्याला माहीत होतं म्हणूनच ती झोपलीये असं त्याला वाटतंय असं नाटक करून बोलत होता का??
(हुश्श.. केड्याच्या illogical दलदलीत आपणच अडकतोय.. तो बसलाय खिदळत)
भारी कमेंट्स!
भारी कमेंट्स!
केड्याच्या इल्लॉजीकल दलदलीत............. !!!
म्हणजे बेबी जागी आहे हे विक्याला माहीत होतं म्हणूनच ती झोपलीये असं त्याला वाटतंय असं नाटक करून बोलत होता का...म्हणजे प्रेक्षकांना माहिती होतं की ती जागीए, त्यालाही माहिती होतं आणि ऑब्वियसली तिलाही...!! आँ ?! मग कुणाला दाखवत होते हे सर्व?...........
प्रेमाबद्दलचे संवाद, मनाची
प्रेमाबद्दलचे संवाद, मनाची उलाघाल वगैरे बद्दलचं स्वगत काय होतं मग>>>>

आणि हे प्रेमळ संवाद सुरू असताना बेबी गाढ झोपेत आहे असं विक्याला वाटतं असं आपल्याला दाखवलंय. म्हणजे बेबी जागी आहे हे विक्याला माहीत होतं म्हणूनच ती झोपलीये असं त्याला वाटतंय असं नाटक करून बोलत होता का??
(हुश्श.. केड्याच्या illogical दलदलीत आपणच अडकतोय.. तो बसलाय खिदळत) >>>>>>>
माबद्दलचे संवाद, मनाची उलाघाल वगैरे बद्दलचं स्वगत झाल्या नतर .... ऑफिस मध्ये आल्या वर ... त्याने पासपोर्ट मागि तला होता. हे विसरला आहे केड्या....
"तसही ईशाला ऑफिसमधे काम
"तसही ईशाला ऑफिसमधे काम करायची सवय आहेच. तिची मदतच होईल विक्रांतना" - आईसाहेब
सगळ्यात महान जोक होता हा कालचा...नक्की कसली सवय आहे ईशाला ऑफिसमधे कामाची..
बाकी गेले काही एपिसोड मायरामॅडम नाही दिसल्या.
ईतक्या सगळ्या गोष्टी विक्या ने प्लॅन करायची गरजच काय आहे पण...स्वतः मस्त ऐटीत राहातोय, चॉपर ने हिंडतोय. संपत्ती नावावर नाही तरी सगळी हवी ती सुख मिळत आहेत..मग संपत्ती नावावर झाली की काय वेगळं घडणारे...चालतय ते चालु द्यायचं ना तसचं..कशाला ईतकी उस्तवार..
मेजर गंडली आहे कथा.
ती देवीचा मुखवटा घेउन वारंवार येणारी बाई पण विक्या ने प्लॉट केली होती का ?
तसं नसेल तर विक्याचा प्लॅन फसणार आणि ईशा खरी राज नंदीनी असणार..आणि बदला घेणार..पण ईशा ला कसं बाई जमणार बावळटपणा सोडुन बदला बिदला घ्यायचा अभिनय
कर्जत वरुन बदलापुरला शिफ्ट
कर्जत वरुन बदलापुरला शिफ्ट करा बंगला. मग इषा बदला घेईल कदाचित.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/186250454306/posts/10158119592629307/
शिल्पा तुळसकरला यात कस काय
शिल्पा तुळसकरला यात कस काय बसवणार आहेत ,हेच मुळात एक कोड आहे.
आता सगळ्यांना नंदूबद्दल माहित झाल आहे,पण टायटल ट्रँक सोडला तर तिचा एक साधा फोटोही दिसत नाही.
इषाला आता अधेमधे पुर्वजन्म
इषाला आता अधेमधे पुर्वजन्म आठवेल.
त्यात बॅकग्राउंडला षिल्पा दिसेल कदाचित.
in fact if the property is
in fact if the property is on his name he will havr to pay taxes and file returns that happiness is missing in his life.
ती देवीचा मुखवटा घेउन वारंवार
ती देवीचा मुखवटा घेउन वारंवार येणारी बाई पण विक्या ने प्लॉट केली होती का ? >>> विक्याला तिच्याबद्दल माहिती आहे का ?
तो घरी नसताना , ती येते नेहमी.
Submitted by UP on 13
Submitted by UP on 13 February, 2019 - 11:23
>>>
कोणीतरी लिहिलं होतं इथे जयदीपला गंडवणारी माणसं विक्याने प्लॉट केली आहेत असं..
केड्या आयडिया ढापतोय इथल्या.
बाबारे वाचत असशील तर आमच्या प्रश्नांची उत्तरं तरी दे
बाबारे वाचत असशील तर आमच्या
बाबारे वाचत असशील तर आमच्या प्रश्नांची उत्तरं तरी दे >>>> पुढच्या भागाची वाट बघा .
केड्याला सुचेना झालंय. थोडे
केड्याला सुचेना झालंय. थोडे दिवस आपण इथे चर्चा बंद ठेवली तर सिरियल बंद पडेल
टाईम मशीनवाला ट्रेलर पाहिला
टाईम मशीनवाला ट्रेलर पाहिला का कोणी? निव्वळ फालतू
>>केड्याला सुचेना झालंय. थोडे
>>केड्याला सुचेना झालंय. थोडे दिवस आपण इथे चर्चा बंद ठेवली तर सिरियल बंद पडेल
या अख्ख्या मालिकेत एकच लॉजिकल गोष्ट घडली. राजनंदिनीचा पुनर्जन्म (ईशा?) व्हायला नऊ + माहिने लागले.
टाईम मशीनवाला ट्रेलर पाहिला
टाईम मशीनवाला ट्रेलर पाहिला का कोणी? निव्वळ फालतू... नाही! काय दाखवलं?
Pages