तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

https://youtu.be/cCw-43-uHmM

वर त्या tv18 च्या मुलाखती ची लिंक दिले ती बघा, 14.25 ला ईशा चे हसणे आहे इतके विचित्र आहे की ते खरे असू शकेल ह्यावर विश्वास बसत नाही

क्लिपमधले हास्यही प्लेबॅक आहे असे वाटले.>>> दोन्ही क्लिपमधले हसणे प्लेबॅक आहे असं वाटायला वाव आहे. पण दोन्ही हास्याची स्टाइल एकच आहे. मग दोन वेगळ्या चॅनलवर एकाच हास्याचा प्लेबॅक असू शकेल ? काहीही असो! तिचं ते हास्य विचित्र आहे खरं!

पण इतकं भयान हास्य ती तिच्या नावावर कशाला खपवेल?
सुमार अभिनय +अशी ती जर मालिकेत हसली तर किती अन्याव होईल बघणार्‍यांवर..... नशीब ...ती लाजते, दात दाखवत खाली बघते, कुचक्यासारखी -लबाड वाटेल अशी स्मायली देते ते आता चांगलेच आहे असे वाटते आहे.

ये मोह मोह के धागे लावून मग पुढे कपापाच. आय ट्रस्ट यू वगिअरे आधी आनंदी गोपाळ वगैरे स्टोरी फ्लॅस बॅक. मग एकदम कट टू आईसाहेबांना आईचा फोन अस्सा मुलगा जावई मिळायला नशीब लागते. मग कार मधून घरी. आईसाहेबांनी घरी मीटिंग ठेवली आहे. व प्रॉपर्टी बद्दल चर्चा आहे
इषाच्या नावावर १५००० कोटी करून देणार असतील. प्रांजपे कागद पत्र घेउन निघालेत कर्जतला. इषाला एक विचित्र फीलिन्ग येते मीटिन्ग ला जायच्या आधी. सर्र्र्र तिला केसांचा कंगवा बेड वरून उचलून हातात देतात. व खांद्याला धरून आपल्याकडे वळवतात. व खाली गेल्यावर कळेलच की असे सांगून सर्व मीटिंगला निघतात. द एंड.

पण सकाळी उठल्यावर चाळीत तयार कसे होतात, ब्रेफाला पोला, दाणे घातलेले पोहे नाहीतर फोडणीचा भात खातात का वगैरे डीटॅल्स दाखवले नाहेत. त्याहून माझी उस्तुकता दाटून आली होती. पण एकदम आंघोळ करून कारमधून घरीच जातायत असे दाखवले. सुभा सर्व जगात पापविलर झाला आहे म्हनून आईसा हेब त्यांची दृ ष्ट काढतात. तो जावई का मुलगा ते आज कळेल.

बंद खोलीत दुसरा सुभा लपवलेला आहे कॉय? धूम थ्री सारखे? केड्याची इन्स्पिरेशन फार दूर नाय जानार.

मला सुभा आणि इशा एकत्र बघवत नाहीत हल्ली. फारच बोअर दिसतात. तो तर तिला कसाबसा सहन करतोय असं वाटत होतं चहयेद्या बघताना. गायत्रीपेक्षा चहयेद्याच्या इशाबरोबर जास्त कंफर्टटबल वाटत होता.

चहयेद्या मध्ये जयदीप best . मस्तच entry होती त्याची.
Sugar diamonds चा joke मनापासून आवडला
श्रेयाने , सोन्या पण छान केली असती

गायत्रीपेक्षा चहयेद्याच्या इशाबरोबर जास्त कंफर्टटबल वाटत होता>>>
अभिज्ञाबरोबर पण कंफर्टेबल वाटतो सुभा..
गायत्री ठोकळाच आहे शेवटी.. ती trekker आहे म्हणे.. हिमालयात आणि इतर कुठे कुठे ट्रेक्स घेऊन जाते.. तिच्या पर्सनॅलिटीत अज्जिबातच रिफ्लेक्ट होत नाही ते.

तुपारे टीमच्या एका जेन्यूईन आणि प्रसिद्ध व्यक्तीकडून कळलं की गायत्री दातार चेन स्मोकर आहे. त्यामुळे तिचा आवाज असा फाटक्या स्पीकरमधून आल्यासारखा येत असावा का? ,कारण चेन स्मोकर पुरुषांचे आवाज असेच वेगळे असतात, जळके आणि थोडे जाडसर.

तुपारे टीमच्या एका जेन्यूईन आणि प्रसिद्ध व्यक्तीकडून कळलं की गायत्री दातार चेन स्मोकर आहे. त्यामुळे तिचा आवाज असा फाटक्या स्पीकरमधून आल्यासारखा येत असावा का? ,कारण चेन स्मोकर पुरुषांचे आवाज असेच वेगळे असतात, जळके आणि थोडे जाडसर.>>>
माझी एक एक्स कलीग होती चेन स्मोकर.. पण तिचा आवाज नव्हता फाटला.. ही तर वयाने बरीच लहान आहे..
म्हणजे स्मोकिंग सुरु करून पण फार वर्षं नसतील झाली.
हिचा आवाजच असा वाटतोय

काल 'हवा येऊ द्या' मध्ये ओडियन्समध्ये आर्या आंबेकरला पाहिलं. लीड रोल मध्ये ती किती छान दिसली असती. ईशा फक्त लहान दिसते पण छान दिसत नाही. Acting पण शून्य. चेहरा सुंदर नसेल तरी पर्सनॅलिटी छान असावी तर ते ही नाही. फिगर, काकूबईसारखी आहे. ट्रेकर सारखी फिट तर नक्कीच नाही.

विक्रांत सरंजामे, मला इशा अजिबात पसंत नाही. Proud

पण ती हसते फारच हॉरीबल!
कण्हल्या- विव्हळल्या सारखं....!!! अं..अहह ..अ हहह......अहहह......अं...अहहहह
Angry
खरे तर ही गोष्ट तिने लपवायला पाहीजे....कुणाला कळायला नको असं पाहायला पाहीजे......पब्लिक मधे न हासून.....तर ती त्याचाही गाजावाजा करत्येय....!! आणि कौतुक एक्स्पेक्ट करतेय!

कैच्या कैच!
मीरा..खरंच..ती अजिबात आकर्षक दिसत नाही. आर्या तर सुंदरच शोभली असती अगदी......
ही वशिल्याने आली आहे असे वाटते..अन्यथा इतक्या गुणी, गोड मुली पडल्या आहेत.....

आर्या तर सुंदरच शोभली असती अगदी......
ही वशिल्याने आली आहे असे वाटते..अन्यथा इतक्या गुणी, गोड मुली पडल्या आहेत.....>>>> मनकी बात बोली.आर्या अभिनयही चांगला करते.ही ना अभिनय करते ना संवादफेक.परत तो आवाजही महान आहेच.

मी मागे एकदा लिहिल होतं.. ती वाशील्याने आली असावी.. बरेच सेलिब्रिटी तिच्या ओळखीचे/ जवळचे आहेत

सस्पेन्स ओपन करण्याआधीच केड्याच काहीही .....हं चालू आहे.
प्रॉपर्टी विक्याच्या नावावर करता येणार नाही हे आईसाहेबांना माहित नसेल
विक्याच्या नावावर काहीच नाही तर मग इतकी वर्ष हाच तर सरंजामे घराचा आणि SGI.चा सर्वेसर्वा आहे,सगळे डिसिजन्स हाच तर घेतो
मग प्रोमोमध्ये हा अस का म्हणतो की जे माझ नाही ते आता माझ होणार
म्हणजे याला आधीच त्या विलमध्ये काय आहे ते माहित होत आणि आईसाहेबांना माहित नाही,की मुद्दाम नाटक करत आहे?
म्हणजे ही म्हातारी पण सामील आहे का विक्याबरोबर?
आणि मग हा काय एवढी वर्ष फक्त निमकरांच्या बेबीसाठी थांबला होता
की असा क्लॉज आहे की जोपर्यंत चाळीतली 20वर्षांची बिनडोक मुलगी स्वत:हून विक्याच्या प्रेमात पडत नाही तोपर्यंत याने लग्नाचा विचार करायचा नाही.
केड्या ,अरे आताच हा सगळा घोळ घालून ठेवत आहेस,प्रत्यक्ष शितुची स्टोरी चालू होईल तेव्हा काय करणार आहेस?

गटणे किती गोड वाटले चहयेद्यामध्ये. त्यांच्या व्यैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायची काही गरज नव्हती, तरी त्यांनी विषय शक्यतो टाळला. गार्गी किती छान आहे, एकदम संयत व्यक्तिमत्व. तिलाही जाडेपणावरून किती बोलले. सुभाला ईशा अजिबात आवडत नाही वाटते. तिचा काही जबरदस्त वशिला असेल, निर्मात्याची लागत असेल कोणी. किती भयंकर हसते ती. आईसाहेब अशा काय दाखवल्या विचित्र, त्यापेक्षा सोनिया तरी दाखवायची. एकंदरीत सगळ्यांची कामे छान होती.

ईशाला नदीकाठच अपूर्ण राहिलेल 'कार्य' आठवल. ते कार्य पुर्ण करण्यासाठी हि त्याला गच्चीवर घेऊन जाते की काय अस वाटल, पण कसल काय, गच्चीवर आनंदी गोपाळच प्रमोशन सुरु केल.

हि ईशा भलत्याच गोष्टीवर लाजते. बायकान्नी आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवर्यान्नी त्यान्ना पाठिम्बा दयायला हवा अस विस म्हणाला. आता ह्यात लाजण्यासारखे काय आहे? Uhoh

विस म्हणाला. आनंदीबाईन्ना स्वतःच्या पायावर उभ करण्यासाठी प्रसन्गी गोपाळरावान्ना कठोर व्हाव लागल. आनंदीबाईन्ना माराव लागल ( खर आहे का हे? :अओ:) अस विस बोलल्यासारख मी ऐकल. म्हणजे विस सुद्दा असाच कठोर होणारे का ईशाशी? तिच्या भल्यासाठी? नाहीतरी त्याच खर रुप लवकरच समोर येणार आहे म्हणा.

गच्चीच इन्टेरिअर बदलल्यासारख वाटतय. बाकी शेवटी ते कुठे झोपले, गच्चीवर की घरात ते दाखवल नाही.

ईशाच्या आईने जेव्हा ' असा मुलगा तुमच्या पोटी जन्माला हे तुमचे भाग्य' अस आईसाहेबान्ना म्हणाल्या तेव्हा आईसाहेब टेन्स झाल्या. त्यानन्तर त्यान्नी मिटिन्ग बोलवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे विस हा आईसाहेबान्चा मुलगा नाहीये हे जवळ जवळ स्पष्टच झालय तर.

सॉन्याच 'विस हिटलरगिरी करतो' स्टेटमेन्ट पटल नाही. कधी केली त्याने घरात दादागिरी? नाटक म्हणून का होईना, विस सर्वान्शी, विशेषतः सॉन्याशी आदरानेच वागत आलाय. ती त्याच्याशी कशीही वागत असली तरीही. तिला तो मोठा असून 'वहिनी' बोलतो. कदाचित विसच खर रुप सॉन्याने जवळून पाहिल असेल. म्हणून ती म्हणते , " त्याच्या सारखा कनिन्ग माणूस आजपर्यत मी पाहिला नाही.'

किती भयंकर हसते ती. आईसाहेब अशा काय दाखवल्या विचित्र, त्यापेक्षा सोनिया तरी दाखवायची. एकंदरीत सगळ्यांची कामे छान होती. >>>>>>> +++++++ १११११११११११ त्या हसण्याचा गायत्रीलाही त्रास होत होता. तिच्या डोळयातून पाणी येत होत. अभिज्ञाने तिला सावरल. बादवे, अभिज्ञासुद्दा सुभाला दादा म्हणते.

लहान मुलान्चे हेल्मेट चे स्कीट छान झाल. सान्गलीच्या मुलीने उनाचा आवाज परफेक्ट काढला.

काहीही म्हणा, पण नवाजुद्दीन सिद्दीकी कुणालाच ओळखू आला नाही या मालिकेत हे त्याच्या अभिनयाचे यशच नाही का ?
एकीकडे ठाकरे एकीकडे ईबाबा... मराठीतही केव्हढी छाप सोडली त्याने.

दादा सरंजामेचा खून विसनेच केला असेल. पण मरायच्या आधी त्याला फु क त्याला मिळणार नाही याची व्यवस्था त्यांनी केली असेल. आता मीच त्यांना तसे करायला सांगितले असे बोलून हा महान बनतो आहे.
तोच त्याच्या माणसांकरवी जयदीपला अधून मधून उल्लू बनवून त्याच्याकडून पैसे उकळत असणार. पण त्याच्या नावावरची मालमत्ता सॉन्या काही याला मिळू देणार नाही. मग राहील्या आईसाहेब...त्यांना आवडेल आणि आपण म्हणू ते ऐकेल अशी मंद बायको त्याला हवी असेल. म्हणून इबाळाशी त्याने लग्न केले असेल. मायरा बरीच हुशार आहे म्हणून मायराशी ल्ग्न केले नसणार.

अजून एक कूर्मगती एपिसोड. आईसाहेबांनी एक मेसेज दिला पाठवून संध्याकाळी मीटिंग आहे. मग विक्याला पिंग. की तो विचारणार आईसाहेबांनी का ठरवली असेल मीटिंग. मग ईशाला पिंग. मग ती विचारणार. मग इकडे सॉन्याला. अशा क्रमाने १५-२० मिनीटे खाल्ली.

"अहो इतका सोन्यासारखा मुलगा असल्यावर आई वाट पाहणारच" - इति ईशाची आई. सोन्यासारखी वगैरे नसलेल्या मुलांच्या आया त्यांची वाट नाहीत की काय.

मधेच गच्चीवर जाउन आनंदी गोपाळ चे मार्केटिंग. अचान्क विक्या व ईशा दोघांनाही १९व्या शतकातील महाराष्ट्रातील सामजिक व्यवस्थेबद्दल सखोल माहिती आहे असे निष्पन्न झाले.

ईशाला सांगायला हवे की आता १८९० नसून २०२० जवळ आले आहे. गोपाळरावांसारखा नवरा पाठिशी ठाम पणे उभा असल्यामुळेच स्त्रिया पुढे जाउ शकतात वगैरे आता लिहायची गरज नाही. नशीब एखाद्या क्रांतिकारकावर इतक्यात झी पिक्चर काढत नाहीये. नाहीतर ईशा सरकारविरूद्ध सशस्त्र उठाव करायला हवा वगैरे म्हंटली असती.

बाकी विक्याचा ड्रायव्हर पुण्यातील रिक्षावाला असावा. त्याच एका एरियामधे गोल गोल फिरवत होता. अनेकदा एपिसोड मधले संवाद गोल गोल फिरतात त्याचे ते प्रतीक असावे.

केड्या किती खिदळत होता चहयेद्यामध्ये, निर्लज्जम सदा सुखी आहे तो. समोर मालिकेचेे एवढे वाभाडे निघाल्यावर मालिका यशस्वी कधी आणि कशी झाली. मराठी येत नाही ही कौतुकाची नाही तर लाजिरवाणी गोष्ट आहे हे मराठी लोकांना कधी कळणार. रूपालीची आई आणि मामा नव्हते आले का. शर्वरीच्या लेखनाचा स्तर खालावला की उंचावला. शेखर ढवळीकर यांनी अनेक चांगल्या मालिका आणि नाटके दिली आहेत, त्यांच्या मूळ कथेची बरीच मोडतोड झाली असणार. बाकी खाली बसलेल्या मालिकेतल्या कलाकारांनाही मंचावर बोलवून त्यांची ओळख करून द्यायला हवी होती, विशेषत: रूपालीची.

चन्पा +१ पुर्ण पोस्टला अनुमोदन,
अभिद्याने दिलेले केसर कसे तयार होते हे एकूण चक्कर यायची बाकी होती मला, इशाचे विकट हासणे मधुनच चालु होते, आजचा चहयेद्या चा एपिसोड पाट्या टाकुच होता.. आपल्या लिखाणाची चिरफाड पाहुन शर्वरीचा चेहरा पडला होता बाकी केड्या निर्ल्लज सारखा खिदळत होता.

मी साधारण ३/४ भाग पाहिला तो हवा येउ द्या चा. आत्तापर्यंत तरी अतिशय भंकस वाटला आहे. मूळ कथानकाचे, कलाकारांच्या लकबींचे स्पूफ करणे बाजूला राहून अत्यंत पांचट कॉमेडी सुरू होती. ते निमकरांचे लग्न वगैरेचे काय लॉजिक होते समजले नाही. एरव्हीची हुकमी श्रेया बुगडे सुद्धा तेथे टुकार वाटली.

Pages