Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पण सुभाला या रोलमध्ये बघायला
पण सुभाला या रोलमध्ये बघायला नक्की आवडेल.सोन करेल तो या संधीच.फक्त केड्याने गोंधळ नाही घातला म्हणजे मिळवल
म्हणजे बेबी नंदूचा पुनर्जन्म आणि हा गरा विक्या नसेल तर.मग ही लव्हस्टोरी खरी नंदू आणि विक्याची प्रेम कहाणी आहे का ज्यात नंदू विक्यापेक्षा २० वर्षांनी मोठी होती.
बेबीने पण जरा आता अभिनयावर लक्ष द्याव.आतापर्यंत मख्ख चेहरा आणि ते सर्र ठीक होत पण आता अशा कथेत तरी बाई,नीट अभिनय कर.
"अगंबाई, निमकरांनी मलाही पान
"अगंबाई, निमकरांनी मलाही पान आणलं वाटतं" टाइप >>>
बेटा, तुमसे ना हो पायेगा !
उगीच पलंगतोड पान दिलं. प्रत्यक्षात पाहीलं ना? >>
केड्याकडून फार अपेक्षा
केड्याकडून फार अपेक्षा नाहीयेत, शितु जिवंत असेल, तिचा मिहिर विराणी झालेला असल्याने ती कधीही परत येऊ शकते
मला वाटतं खरा वीस आणि नंदू
मला वाटतं खरा वीस आणि नंदू त्या खोलीत बंद असतील .. खोटा वीस (ग पासून नाव असणारा ) प्रॉपर्टी साठी इशा शी प्रेमाचं नाटक करत असेल . आईसाहेब त्यांच्या वाटची सगळी प्रॉपर्टी ईशाच्या नावावर करतात .. असा नवीन प्रोमो मध्ये दाखवलं आहे .. मग ईशाला बाजूला करून ह्याला मिळेल.
हो आणि शेवटी खर्याखोट्याचा
हो आणि शेवटी खर्याखोट्या सुभाचा निवाडा पोळीचा लाडू आवडतो की नाही त्यावर ठरेल.
पुढच्या स्ठोरीत सुभ्याचं व्हीलनरुप दिसणार ह्याची उत्कंठा, इबाळाचं रडगाणं ऐकावं लागेल म्हणून भितीत कनव्हर्ट होतेय.
शितू ला फक्त फ्लॅशबॅक साठी
शितू ला फक्त फ्लॅशबॅक साठी आणणार नाहीत.. ती नक्कीच जिवंत असेल..
बाकी इथले प्रतिसाद खूप धमाल आहेत.. खूप मजा येते वाचायला सिरीयल बघण्यापेक्षा
खरा विस आणि खोटा विस ही काय
खरा विस आणि खोटा विस ही काय भानगड आहे..? हाच विस ....ग्रे शेड मधे कंव्हर्ट होणारे ना?
सुभा व्हिलन आहे असं वाटतंय.
सुभा व्हिलन आहे असं वाटतंय.
आज प्रोमो पाहिला.
जालिंदरने शितुला लपवून ठेवलं
पुनर्जन्मच असेल.. नाहीतर शितु आणि बेबीच्या एकसारख्या सवयी, बेबीला पडणारी स्वप्नं यांचं काय स्पष्टीकरण देणारे केड्या?
बंद दाराआड विक्याची कंट्रोल अँड प्लॅनिंग रूम असेल
ही तर राम और शाम ची किंवा
ही तर राम और शाम ची किंवा सीता और गीता ची कथा
ज्याच्या नावावर संपत्ती त्याला मानसिक दृष्ट्या दुर्बल बनवणं, मग कारस्थान रचून ते हडपणं ई ई
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/major-twist-in-tula-pahate-re-s...
अय्यो रामा !
पुनर्जन्म असेल तर वीस ने
पुनर्जन्म असेल तर वीस ने नंदू ला मारलं असेल आणि ती इशा च्या रूपाने बदला घायला आली असेल..
पण मग
१. ईशाच्या नवऱ्याचे नाव ग पासून कसे ? त्या ज्योतोषीने सांगितले होते तसे
२. त्या खोलीत काय असू शकेल .. नंदू च्या मर्डर चे पुरावे ?
संपत्ती तर तशीही वीस ला मिळत आहे
ती इशा कसली डेंजर हसते! काल
ती इशा कसली डेंजर हसते! काल `चला हवा ये उ द्या' मधे आली होती टीम सगळी. धमाल चालली होती.
या विक्यानेच मारल नसेल ना
या विक्यानेच मारल नसेल ना नंदूला.
केड्या कोण आहे?
केड्या कोण आहे?
सिरियल बघितली नाही तरी इथे वाचायला मजा येते.
इशाला आधी भेटलेला वेगळा विस
इशाला आधी भेटलेला वेगळा विस असेल आणि हा नकली.. अस केल्याने आधीच्या प्रसंगांचं एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही.. आधी चा विस गरीब असावा.. असाच कोणीतरी रस्त्यावर भेटलेला सेम दिसणारा.. त्याच नाव 'ग' वरुन सुरु असावं खरा श्रिमंत विस खडुस असेल आणि त्याने नंदुला मारलं असावं..
केड्या कोण आहे? >> अगं मानबा
केड्या कोण आहे? >> अगं मानबा मधला केडी, शनयाचा मित्र, तो लेखक आहे ह्या मालिकेचा , त्याला आपण "प्यार से" केड्या म्हणतो
ईशाला लग्नानन्तरच्या बेसिक
ईशाला लग्नानन्तरच्या बेसिक गोष्टी कळत नाही का? लुन्गीत तुम्हाला Comfortable वाटत असणार म्हणार्या मुलीला 'पलन्ग तोड' पान म्हणजे कळू नये? विस जेव्हा ' शेजार्यान्ना (चाळकर्यान्ना) आपण जे बोलायचय अपेक्षित आहे ते आपण बोलत नाही आहोत' त्यावर हि बावळटासारख 'हो आपण इथे राहण्याविषयीच कधीपासून बोलत आहोत' म्हणाली. तेव्हा विसला उचकटून सान्गाव लागल की, 'अग बाई, मला अस म्हणायच होत की, आपण अजून चावटपणे, रॉमेन्टिक बोललो नाहीत आणि हेच त्यान्ना ऐकायच आहे.' तेव्हा कुठे बाईसाहेबान्च्या डोक्यात प्रकाश पडला.
ईशाला जानूतैचा किडा चावलाय का? हल्ली तिच्या तोन्डी 'काहीही हा सर' चालू असत.
विस लुन्गीत बरा दिसत होता. तो टिशर्ट घातला असता तर हॅन्डसम दिसला असता. पण निमकरान्चा शर्ट त्याला फिट होणार नाही ना.
विक्याला पलंगतोड पान देतात तेव्हा ते तो तेथेच खातो हे नशीब. >>>>>>> ते पान त्याने खाल्ल सुद्दा? कधी? मला नाही दिसल ते.
ते पान विस आणि ईशा दोघान्नी खायच होत ना. विजय दिनानाथ चौहानचा दावा खोटा ठरला. त्या पानाचा विसवर काहीच इफेक्ट जाणवला नाही. 
सुभा कुशीवर असताना ईशाकडे बघत होता तेव्हा क्यूट दिसला.
कालचा चहयेद्याचा एपिसोड अशक्य होता. ईशाच्या फनी (?) हसण्याची खुप टर उडवली गेली. सागर कारन्डेचा जयदीप छान झाला.
याचसाठी सुभाने केला होता अट्टाहास,ही मालिका करण्याचा. >>>>>>> प्रोमो भारी आहे. युटयूबवरच्या एडिटिन्गला दाद दयायला हवी. राणा आणि अन्जली विसकडे विस्फारुन बघत होते.
इशाला आधी भेटलेला वेगळा विस असेल आणि हा नकली.. >>>>>>>> चाळकर्यान्नी जर नकली विसला खायला घातल असेल तर चाळकरी आणि निमकरान्च आता काही खर नाही.
रुपाली व बिपिन नेहमीप्रमाणे छान. >>>>>>>> +++++++११११११११
पलंगतोड पान च्या दुसर्या
पलंगतोड पान च्या दुसर्या दिवशीची सकाळः
"सर?"
(झोपेतून उठत) "हम्म्म"
"अहो सर उठा सकाळ झाली"
"हो उठतो"
"मी तुम्हाला एक विचारू का?"
"मला?"
"हो तुम्हालाच"
"हो विचार"
"सर त्या पानवाल्याने आपल्याला फसवलं"
"फसवलं? ते कसं?"
"अहो तुम्ही खाली झोपायचा प्रयत्न करत होतात. मी म्हंटले बघू ते पान खाउन तुम्ही पलंगावर झोपलात तर पलंग तुटतो का. पण तो तुटलाच नाही"
(यावर काय बोलायचे म्हणून गप्प बसतो) "!"
(दार उघडून) "अगं आई! अगं तो पानवाला आहे ना, त्याने आम्हाला काल रात्री एक पान दिले आणि म्हंटला...."
पलंग तुटतो का. पण तो तुटलाच
पलंग तुटतो का. पण तो तुटलाच नाही"
(यावर काय बोलायचे म्हणून गप्प बसतो) "!">>>>>
पलंगाच्या काळजीनेच तो आधी
पलंगाच्या काळजीनेच चतुराईनं तो आधी खाली झोपला होता. इकडून तिकडे कूस बदलताना तिला वाटलं की बाबाला फरशीमुळं झोप येईना. मग त्या मठ्ठ इशाला कुठं सगळं समजाऊन सांगणार म्हणून त्यानं गिव्हप मारला.
सुभा कुशीवर असताना ईशाकडे बघत
सुभा कुशीवर असताना ईशाकडे बघत होता तेव्हा क्यूट दिसला. Blush>>>>
+++++++-11111122222222222
Even चाळकरी बरोबर जो सिन होता.... तेव्हा पण त्याची स्माईल एकदम किलर होती.... प्रत्येक वेळी
सुभा ला आता अस निगेटिव्ह राेल मध्ये बघायला मजा येणार आहे
कालचा एपिसोड उगाचच घुसवला होता..अस मला वाटत...प्रेक्षकांना अप्रत्यक्ष उत्तर देण्या साठी
तो निगेटिव्ह रोल वगैरे एकतर
तो निगेटिव्ह रोल वगैरे एकतर पुचाट टर्न असणार, नाहीतर सिरीज च्या आत्तापर्यंत च्या कथेच्या दृष्टीने अत्यंत विसंगत/ इल्लॉजिकल टर्न असणार - ज्याने आधीचे अनेक एपिसोड्स आणि सीन्स निरर्थक ठरतील.
<< ती इशा कसली डेंजर हसते >>
<< ती इशा कसली डेंजर हसते >>
मला तर वाटतंय की ती तशी हसतच नाही मुळी. ते हसणे रेकॉर्डेड वाटते चक्क. नीट लक्ष देऊन बघा की कळेल. (काल ईबाळ स्टेजवर आली होती तेव्हा पटकन मला जाणवले तसे).
फारएण्ड......पटतय तुमच.पण
फारएण्ड......पटतय तुमच.पण अगदीच पांचट आणि बोथट झालेल्या मालिकेत काही एपिसोडपुरती तरी सुभा जान आणेल,अशी आशा आहे.
निदान त्या निमित्ताने कदाचित शितुची झलक तरी पाहायला मिळेल.
मलाही काल वाटले की ते हसणे
मलाही काल वाटले की ते हसणे कोणाचेतरी रॅण्डम रेकॉर्डेड आहे.
आता ते चहयेद्या पहात होतो.
आता ते चहयेद्या पहात होतो.
कसली भिषण हसते...
कण्हण, रडणं, ओकण, पादण नक्की कसला आवाज होता तो?
अभिज्ञाला विचारतो ते खरं हसण होतं का थट्टा म्हणून रेकॉर्डेड होतं
ईबाळ किती वेळा म्हणते सुभाला
ईबाळ किती वेळा म्हणते सुभाला सर तुम्ही वर झोपा... खाली झोपायची सवय नाही. (किमान ५ वेळा)
एक कानाखाली द्यावीशी वाटली म्हटलं गप ना बाई आता त्याला वाटतंय कंफर्टेबल तुझ्याशेजारी खाली झोपावंस तर हीचं एकच पालुपद चालू. मंद कुठली. मी एकटा झोपू? असंही त्याने विचारलं.. आता अजून किती हिंट देणार सुभा?
ते बिचारे आई-बाबा बाहेर झोपले यांच्या नादात...
अरे , ते पान घेताना पण ,
अरे , ते पान घेताना पण , रूपाली आणि बिपिन खिदळत होते आणि ही मंद , " पलंगतोड पान म्हणजे ? काय स्पेशल आहे ??
सिरियसली ?????? is she's so naive ?????
ते रेकॉर्डेड नाही.....ती
ते रेकॉर्डेड नाही.....ती भयानक हसते.... हा घ्या पुरावा...... https://www.youtube.com/watch?v=EqlcUE0FRSI @1.38
Pages