तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मायराच्या कॅबिन(?) मधून एक केळं आणि एक सफरचंद घेऊन झेंडे कर्जत च्या बंगल्यावर? आणि तेही सरंजामे चहा पीत असताना? मग मायरा पहाटे पाच वाजता ऑफिसला जाते का? की सेम बंगला मुंबई मध्ये आहे? काय ताप करुन ठेवलाय केड्याने... खरंच तोच इसरलंय... की केहना क्या चाहते हो.!

आजचे वेदरः
ईशाच्या जिवाला धोका: मॉडरेट
विक्याचे डाएट कंट्रोलः आज लागू नाही.

काल रात्री जी मीटिंग झाली, त्यानंतर मधे एक किमान सकाळ होउन गेली (त्या बंदुकीच्या गोळ्या वगैरे). त्यानंतर विक्या पुन्हा नॉर्मल ला येउन हॉल मधे सर्वांबरोबर कॉफी वगैरे घेण्याइतका वेळ होउन गेलेला दिसतोय. मग अचानक जयदीप ला लेट करंट प्रेमाचे भरते आलेले दिसत आहे. अचान्क भावुक वगैरे. हे सरंजामे लोक बहुधा मधल्या काळात एकाच घरात राहून एकमेकांशी बोलत नाहीत का? कॅमेरा रोल व्हायला पुन्हा सुरूवात झाली की शमीच्या झाडावर ठेवलेली स्वतःची फीलिंग्ज पुन्हा काढून पुढे सुरू होतात असे दिसते. गेले दीड-दोन दिवस जयदीप काय करत होता?

पेन ड्राइव्ह! विक्याचा काही संबंध नसताना आईसाहेबांच्या बोलावण्यावरून आलेला आणि विक्याला कसलाच हक्क नाही हे माहीत असलेला वकील सगळ्या मालमत्तेचे डीटेल्स विक्याकडे कशाला देउन जाईल? तो आईसाहेब आणि जयदीपकडेच नाही का देणार. बहुधा इतके दिवस विक्याच मालक आहे असे ठरवून कथा पुढे सरकत होती म्हणून पेन ड्राइव्ह त्याच्याकडे असावा. किंवा त्याला उगाच भाव खाउ सीन द्यायचा म्हणून तसा लिहीला असेल सीन.

प्रॉपर्टीचे विभाजन म्हणे. अरे किमान एखाद्या विल वाल्या वकीलाचा सल्ला तरी घ्यायचा संवाद लिहीताना. त्यांनी मालमत्ता वगैरे फक्त "नावावर" केली आहे. तिचे विभाजन वगैरे नाही केले.

जयदीप पेन ड्राइव्ह नको म्हंटल्यावर "ठीक आहे. आत्ता माझ्याकडे ठेवतो. तुला वाटेल तेव्हा माझ्याकडून घे". इथे सस्पेन्सफुल म्युझिक. काहीतरी मोठी कावेबाज हालचाल दाखवत विक्या पेन ड्राइव्ह खिशात ठेवतोय. जणू काही ज्याच्याकडे पेन ड्राइव्ह तो मालक असे होणार आहे. तुपारे लॉजिकप्रमाणे असेलही.
"मिलॉर्ड, माझ्या अशिलांच्या नावावर मालमत्तेचे "विभाजन" केलेले आहे. हे पाहा"
"पण मिलॉर्ड, मी असा एक पुरावा आज कोर्टापुढे आणणार आहे, की ज्याने विक्रांत सरंजामेच मालक आहेत हे सिद्ध होईल"
ट्याम ट्याम टुम टुम. झेंडे क्लोजप. निमकर क्लोजप. विक्या खुनशी, सॉन्या तुसडा चेहरा, ईशा सरांकडे आदराने पाहात आहे. कोर्टात परांजपे, वाडकर, ते एफएम पर्यंत सगळे बसलेले आहेत. ते चार डीलर व निमकरांच्या दुकानाचे मालक, तसेच चाळकरी. "ते मी तुला सांगते, हे विक्रांतसरच मालक असणार." - इति पटेल. ईशाची आई ते ऐकून मान डोलावत आहे.
"हे पाहा युअर ऑनर, विक्रांत सरंजामे यांच्याकडे मालमत्तेचे डीटेल्स असलेला पेन ड्राइव्ह आहे"
कोर्टात शांतता. ईशाच्या चेहर्‍यावर समाधानी, तृप्ती वगैरे भाव.
केस सॉल्व्ह्ड. तोंड गोड करायला ते आपले नेहमीचे यशस्वी - पोळीचे लाडू.

यांच्या ऑफिसमधल्या महत्त्वाच्या फायली घरी न्याव्या लागतात, तसा घरातही लॉकर दिसत नाही तो पेन ड्राइव्ह ठेवायला.

"(ईशाची) कुठली नस दाबल्यानंतर ती हसते, चिडते, काळजी करते हे सगळं मला माहीत आहे" - विक्या. तेवढे ते जरा दिग्दर्शकालाही सांगा. त्यांनाही अजून जमलेले दिसत नाही.

"ईशा ही राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे सिद्ध झाले, तर आईसाहेब आणि जयदीप आपली इस्टेट तिच्या नावावर करतील." - किस खुशी मे?

"ईशा ही राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे सिद्ध झाले, तर आईसाहेब आणि जयदीप आपली इस्टेट तिच्या नावावर करतील." - किस खुशी मे? >>>> अनुक्रमे लाडकी मुलगी आणि बहीण परत आली म्हणून. आईसाहेब करतील ठीक आहे पण जयदीपला आगापिछा आहे की, तो कशाला सगळी इस्टेट देईल ?

फा Biggrin
शमीच्या झाडावर>> एक सेकंद भर समजलंच नाही की मोहम्मद शमीचा इकडे काय संबंध ! Happy

मस्त पोस्ट फा. ते अ‍ॅपल बनाना मध्येपण टायमिंग गंडलेलं पहाटे ऑफिसात अ‍ॅपल बनाना, मायरा ऑफिस झाडा य्ला आली बहुतेक. मग लगेच अ‍ॅपल बनाना कर्जतला नेक्स्ट सीन मध्ये. हेलीकॉप्टर ऑफिस हेलीपॅड वर पार्क असेल रात्रीचे व स्कूल बस सकाळी कशी रिकामी क्लीनर बरोबर मुलां ना आणायला जाते तसे झेंडे बॉसला आणायला रिकाम्य चॉपर मधून कर्जतला. पण मग बॉस कार मध्येच बसतो? आय मीन दीज पीपल
रिअली नीड द वॉल.

फारेंड.. Biggrin
आताच्या ट्विस्ट नुसार ईशाच्या जीवाचा धोका तर सुडोच होता असं वाटतंय........
तो जालिंदर का तिच्या जीवावर उठलाय याचे काहीच लॉजीक नाही!!! (ते कशाचे आहे म्हणा!!) Angry

तो विक्रांतच्या जीवावर उठला असता तर समजू शकतो...
आणि झेंडे इतका लॉयल आहे का?
पण ईशावर प्रेम करायचे नाही म्हणून खरोखरीच विक्रांत रिलॅक्स्ड वाटतोय. तिची नक्कल काय करत होता... आणि एकूणच तिची उडवत होता....
हिच्यात काय पाहीलं याने....याचं उत्तर मात्र मिळालं..... !!

हिचे वय, राजनंदिनी गेल्यावर हिचा झालेला जन्म, हिची तत्वं , दो रुपये बडी चीज वगौइरे वगैरे.

आईसाहेब विस ला नाही देऊ शकत असा क्लॉज असेल, ईबाळ देऊ शकणार असेल किंवा मग ईबाळाचा काटा काढण्यात येईल.

केड्याच्या मना आले तर इशा हा राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे म्हणून जायदाद इशाला मिळावी असं कोर्टालाही पटवू शकेल.

मायराच्या कॅबिन(?) मधून एक केळं आणि एक सफरचंद घेऊन झेंडे कर्जत च्या बंगल्यावर? आणि तेही सरंजामे चहा पीत असताना? मग मायरा पहाटे पाच वाजता ऑफिसला जाते का? की सेम बंगला मुंबई मध्ये आहे?....>>>>>> मि काल लेडिज स्पेशल म्हणुन एक सिरीय्ल मधे हाच कर्जत वाला बंगला दाखवला, झी वाल्यानी सोनि ला विकला वाटत हा

जालिंदर त्याच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी विक्रमला बाहेर जाऊ देण्यात येत नाही व त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येते. मग पिझ्झा घेऊन येणारा ‘डिलिव्हरी बॉय’ थेट त्याच्यापर्यंत कसा पोहोचतो? ........ या वेळी जालींदर कडून विक्यालाच धोका होता ना? तो अचानक कसा काय नाहीसा झाला? की तो फक्त 'हंगामी' धोका होता...कधी सोयी प्रमाणे ईशाला अथवा विक्रांत ला......
केड्या फारच भंजाळला आहे असं दिसतं.....
नक्की कशी स्टोरी जावी हेच त्याला ठरविता येत नाहीये.

चहदेधमुळे विसला बरेच दिवसांनी नवीन (निळा) सूट मिळाला.आधी घातला असेल तर माहित नाही.या धाग्यामुळे बघायला सुरूवात केली.

विस इतका हुशार आहे तर ईशा सारखी मुलगी हेरणे.. तिच्याशी लग्न करणे.. तिला राजनंदिनी सिद्ध करणे.. मग तिच्या नावावर संपत्ती येणे आणि मग तिने ह्याला संपत्ती दिली तर ह्यांच्याकडे संपत्ती येणे.. एवढा द्राविडीप्राणायाम का करत बसला आहे?
हे सगळं होईपर्यंत तो 80-90 वयाचा होईल.. मग काय परत संपत्ती इशाच्या नावे करणार.? करना क्या चाहते हो?

विस इतका हुशार आहे तर ईशा सारखी मुलगी हेरणे.. तिच्याशी लग्न करणे.. तिला राजनंदिनी सिद्ध करणे.. मग तिच्या नावावर संपत्ती येणे आणि मग तिने ह्याला संपत्ती दिली तर ह्यांच्याकडे संपत्ती येणे.. एवढा द्राविडीप्रणायाम का करत बसला आहे? >>> अगदी अगदी , ते ही २० वर्षांनंतर Uhoh

एवढा द्राविडीप्रणायाम का करत बसला आहे? >> हे सगळं करायची काहीच गरज नाही. त्याच काही नसूनही सगळी सुख पायावर लोळताहेत. संपत्ती नावावरच कशाला असायला हवी. कुठे वारसदारां करता ठेवुन जायचीय? की बरोबर घेऊन जायचीय ?

फारएण्ड, त्या पेन ड्राईव्ह मध्ये काहीच नव्हत. विक्याने फसवल जयदिपला. पेनड्राईव्ह विसरल्याचा बहा़णा करुन ते सर्वान्च्या नकळत सोफ्यावर ठेवल , ईशाने ते परत दयायला विसकडे याव म्हणून. त्या पेनड्राईव्हमध्ये गाणी होती.

काल सॉन्या फक्त एक्सप्रेशन्सपुरती होती एपिसोडमध्ये.

मला काल विस एक डायलॉग कळला नाही. ' अण्णाची वडापाव गाडी चालवण्यापासून सरन्जामे इण्डस्ट्रीपर्यन्त आपला प्रवास आहे' अस तो झेन्डेला म्हणत होता. हयाचा अर्थ, विस आणि झेन्डे आधी वडापाव गाडीवर काम करायचे? Uhoh

"ईशा ही राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे सिद्ध झाले, तर आईसाहेब आणि जयदीप आपली इस्टेट तिच्या नावावर करतील." >>>>>>>>> पण ईशा खरच राजनंदिनीचा पुनर्जन्म निघते, विसच्या शिकवण्यामुळे ती हुशार बनते आणि ती विसला धडा शिकवते, त्याचाच प्लॅन त्याच्यावर उलटवते असा ट्रॅक असायला हवा. पण केडया त्यात सुद्दा माती खाईल, भरीस भर म्हणजे गायत्रीला हा कॅरेक्टर चेन्ज झेपेल का? Uhoh

अ‍ॅक्चुअली ना खरंतर ना विक्या पासून सर्वांनाच धोका आहे. >>>>>>>> +++++++१११११११११

पण ईशावर प्रेम करायचे नाही म्हणून खरोखरीच विक्रांत रिलॅक्स्ड वाटतोय. तिची नक्कल काय करत होता... आणि एकूणच तिची उडवत होता.... >>>>>>>> Lol क्षणभर वाटल, अचानक विसमध्ये बालगन्धर्व अवतरले की काय. पण तो बेस्ट सीन होता.

शुक्रवारी त्याच्यात काशिनाथ घाणेकर अवतरला होता. ' माझ नाण खणखणीत वाजण्यासाठी मला ईशासारखी मुलगी हवी होती.' अस काहीतरी म्हणाला होता तो झेण्डेला.

राजनन्दिनी हुशार, महत्वाकान्क्षी होती म्हणे. तिचाही ईशासारखाच विसवर आन्धळा विश्वास होता अस विस म्हणाला. पण ती कशाने वारली, का तिला विसनेच मारल हे काही अजून विसने उघड केल नाही.

काल लेडिज स्पेशल म्हणुन एक सिरीय्ल मधे हाच कर्जत वाला बंगला दाखवला >>>>>> लेडीज स्पेशलमध्ये शितू सुद्दा आहे ना.

शमीच्या झाडावर>> एक सेकंद भर समजलंच नाही की मोहम्मद शमीचा इकडे काय संबंध ही भन्नाट कल्पनेची आयडिया कोणाची? ए, सांगा ना, लाजू नका! >>>>>>>>>> Rofl

लेडीज स्पेशलमध्ये शितू सुद्दा आहे ना. >>> हो का? पूर्वी प्रोमोज बघितले होते, kbc बघताना तेव्हा गिरीजा ओक होती. शितु नाही दिसली कधी कुठल्या प्रोमोत.

सुबोध आधी कमी हसायचा आणि दाढीमिशांमुळे सुद्धा वेगळा दिसायचा. तेव्हा मॅच्अर्ड लुकमुळे आवडायचा. आता तो परत सुबोध दिसायला लागल्राय, म्हणून बालगंधर्व दिसतोय.

फारएन्ड मानलं तुम्हाला बुवा.. काय बरोबर नस पकडली मालिकेची..ज्याप्रमाणे विस ला ईबाळाच कळत तसच तुम्हाला मालिकेचं कळत

कालचा भाग केड्याने इथल्या धाग्यांचा आणि चहायेद्याचा अभ्यास करुन लिहिला होता वाटतं.
झेंडे आणि विक्या मधे फूल टू सवाल-जवाब रंगला होता. इतक्या दिवसांतला फालतूपणा कालच्या भागात उलगडून सांगायचा प्रयत्न हास्यास्पद असला तरी तसा बरा होता ! Happy

लेडीज स्पेशलमध्ये शितू सुद्दा आहे ना...... आधिच्य कथेत होति. आता वेगल्या कथा चालू आहेत , गिरिजा आहे आत्ताच्या भागात

काल विस राजनंदिनी "गेली" असं म्हणत होतण, गेली म्हणजे वारली का ह्ह्यानेच गायब केली ? अर्थात इतका सस्पेन्स केड्याला झेपायचा नाही.

इतक्या दिवसांतला फालतूपणा कालच्या भागात उलगडून सांगायचा प्रयत्न हास्यास्पद होता... आणि काहीच लॉजीक कळत नव्हतं...

या केड्याने बेबीची जन्मतारीख जशी व्यवस्थित सांगितली तशा सगळ्या घटनांचा करेक्ट काळ सांगावा
विक्या आणि नंदूच लग्न नेमक कधी झाल ?त्यांचा संसार नेमका किती वर्ष झाला
झेंडे म्हणतात ते दोघ एकमेकांना 20वर्षांपासून ओळखतात.आता आताच विक्याच वय 42 धरल तर तो त्या वेळी 22चा असेल,हे तर वडापावाच्या गाडीवर काम करत होते,ते कधी मग?नक्की नंदू याला कधी भेटली?हा sgi मध्ये कधी आला,आणि हा जर वडापावावरून सरंजामेकडे आला तर सरंजाम्यांचा वडापावाच्या गाडीशी काही संबंध होता का
डोक फिरेल.केड्या ,किती छळशील?

इतक्या दिवसांतला फालतूपणा कालच्या भागात उलगडून सांगायचा प्रयत्न हास्यास्पद असला तरी तसा बरा होता !>> पण मुळात झेंडे विक्याचा क्राईम पार्टनर असताना त्याला हे सगळं उलगडून सांगावं लागतंय हेच हास्यास्पद आहे. त्याला विश्वासात घेऊनच विक्याने हा प्लॅन करायला हवा होता. इथे तर झेंडेला या प्लॅनबद्दल काहीही कल्पना नाहीये, तो पार भंजाळून गेलाय.

Pages