तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एका व्यक्तीकडे आपलं दुर्लक्ष होतंय.. ती देवीवाली बाई, जर विस ईबाळाला फसवत आहे तर मग यात देवीची कसली इच्छा आणि कुठलं देणं म्हणजे काही संबंधच वाटत नाहीये

तॉस्स नॉयरे पोरांनो. इबाळ खरीच राजनंदिनी पुनर्जन्म आहे आणी विक्याला धडा शिकवेल असे आहे ते. मंजे मला असे वाटतंय
कालचा भाग एकदम कॉफी ब्रेक मध्ये लिहिल्यावाणी होता. अर्धावेळ अ‍ॅपल व बनाना. मग दार बंद करून चर्चा. मध्ये बाळाने आईला फोन करून त्यांना टेन्शन येते आहे असे सांगितले. आई आता धडपडत पोला चा डब्बा घेउन ऑफिसात. पदराने विक्याचे डोके पुसून लाडू खायला देणार. पण तत्पुर्वी दार तर बंद आहे मग रिसेप्शनिस्ट बरोबर मोठ्य आवाजात भांडान करणार मला आत्ता आत सोडा. मग विक्या व झेंडेची धावपळ. फोटो लपवायला व जोकाय सिस्टिम डायग्राम आहे चीटिम्गचा तो लपवायला.

बाळ व कडुनिमकर फॅमिली अजून सर्र्र किती ग्रेट मोड मध्येच आहेत. कधी हवेतून खाली येतील??!

कालचा चला हवा येउद्या भाग एकदम रिफ्रेशिंग होता. ललित प्रभाकर जेन्युइन तरूण व हँडसम मुलगा बघोन बरे वाटले. सुजलेला सर बघून डोळे पिकले. व नाटुकले, विनोद वेगळे व छान होते. जुनी गाणी पुणेरी भाषा ऐकूनही मजा आली.

त्याला विश्वासात घेऊनच विक्याने हा प्लॅन करायला हवा होता. इथे तर झेंडेला या प्लॅनबद्दल काहीही कल्पना नाहीये, तो पार भंजाळून गेलाय. + १ अगदी हेच वाटलं बघताना.. झेंडेला काहीच कसं माहीत नाही? विस चं त्याला सांगणं कन्विंसिंग वाटतच नव्हतं..!

अमा .. Happy कालचा बराचसा भाग फ्लॅश बॅकच तर होता.... ही एक बरी सोय आहे सिरीयल वाल्यांना फीलर म्हणून..काही नसले की मारा फ्लॅश बॅक..!! (कडू) निमकर जेव्हा धावत पळत येतात कॉलेज मधे.. "अगं तुझे हे सरंजामे डब्यातच राहीले.." म्हणत.... ते सांगताना विक्या फार मस्त जेन्युईनली हसला...अगदी खरे खुरे हसू येत होते त्याला!! Happy
बाकी काहीही विशेष नव्हतं काल........... तोच तो फुसका प्लॅन.... आणि लिंका लावणं.....
ललित प्रभाकर फार मस्त दिसतो...केस फार छान आहेत त्याचे..झुलपं अगदी!

अमा मलाही असेच वाटतेय... इ बाळाला विकल्या कसंबसं खोतखोट सिद्ध करेल राजनंदिनी म्हणून... आणि इकडे नंदू च भूत खरंच बाळात शिरून बदला घेईल विक्याचा ...एकदम ओम शांती ओम टाईप ... केड्या नाहीतरी सगळी ढापाढापीच करतोय... Angry

तॉस्स नॉयरे पोरांनो. >>> अमा Lol तो सगळा पॅरा धमाल आहे.

इतका बुद्धिमान सीईओ पाहिला नाही. ईशाची जन्मतारीख लग्नाचा निर्णय घेइपर्यंत माहीत नाही ते एकवेळ सोडा. पण ती जाणून घ्यायला लंडन ट्रिप चा बनाव, पासपोर्ट अर्ज वगैरे?
- कंपनीच्या एच आर रेकॉर्ड्स मधे प्रत्येक एम्प्लॉयी ची जन्मतारीख वगैरे असते हे याला माहीत नाही? इतक्या कंपन्या कशा चालवतो हा?

नाहीतर ईशाला सहज विचारता आले असते.

बाकी महाबोअर एपिसोड. आधी पडलेल्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. उलट त्या सगळ्या प्लॅन मधला फोलपणाच जास्त जाणवतो.

सर्वात गंमत म्हणजे तो सगळा पुनर्जन्म प्रकारच निरर्थक आहे. आईसाहेबांना विक्रांत आणि ईशा लायक आहेत हे लक्षात आल्यावर एनीवे त्यांनी स्वतःची इस्टेट त्यांच्या नावावर करायचा प्रयत्न केला. त्याकरता पुनर्जन्म वगैरे ची मुळातच गरज नव्हती.

दादासाहेबांनी विल करताना विक्या पचकला नसता, तर तेव्हा एकतर विक्या आणि जयदीपला ५०-५० टक्के मिळाली असती. नाहीतर आईसाहेब व हे दोघे अशी ३३% मिळाली असती. मग आईसाहेबांनी पुन्हा वाटणी केल्याने, किंवा त्यांच्या पश्चात त्यांचीही मिळून याच्याकडे ५०% आली असती. जयदीपची याला तेव्हाही मिळणार नव्हती व आताही नाही.

आताही सुमारे २०-२५ वर्षे निरनिराळी नाटके करून मिळणार फक्त ५०%, ते ही आईसाहेबांनी पुन्हा दिली तर.

दीवार मधे दार मुळात उघडे असताना ते बंद करून त्याला कुलूप लावून ती किल्ली पीटर कडे फेकून, मग त्याच्याशी फायटिंग करून ती किल्ली पुन्हा हस्तगत करून मग अमिताभ तेच दार उघडून बाहेर जातो. तो या विक्याचा आदर्श असावा. पण तिकडे त्या पीटर ला धडा शिकवणे हा मुख्य हेतू होता. इथे तसे काहीच नाही Happy

इतका द्राविडी प्राणायाम करून विक्याला प्रॉपर्टी मिळेल नव्वदाव्या वर्षी
तेव्हा काय मग लोणचं घालणारे इस्टेटीचं?

इतका द्राविडी प्राणायाम करून विक्याला प्रॉपर्टी मिळेल नव्वदाव्या वर्षी
तेव्हा काय मग लोणचं घालणारे इस्टेटीचं?

इतका द्राविडी प्राणायाम करून विक्याला प्रॉपर्टी मिळेल नव्वदाव्या वर्षी
तेव्हा काय मग लोणचं घालणारे इस्टेटीचं?

फा...
दीवार इतका बारकाईने पाह्यलाय तुम्ही? Happy
मला अशा लोकांचं फार कौतुक वाटतं...जे मारामारी वगैरे दिलखेचक गोष्टी सुरु असतानाही त्यामागील (मूर्ख!) लॉजीक पटकन हुडकून काढतात....व नंतर त्यांना ते बरोब्बर वेळी आठवतंही! ग्रेट!

विक्या काल किती वेळा तरी निमकर फॅमिली ला मूर्ख म्हणत होता......!!!
त्यावरुन मला तो हॉटेल मधला प्रसंग आठवला विक्या शेफ बनून आला तो.... ! खरंच मूर्ख लोक!

दक्षिणा,
नव्वदाव्या वर्षी का? आताच मिळेल की तीन चार वर्षांत...इफ एव्हरी थिंग गोज अ‍ॅज पर हिज प्लॅन....!!

आधी दादासाहेब गेले की राजनंदिनी तेही कळायला मार्ग नाही.राजनंदिनी जिवंत असताना विल केलं असेल तर विक्याच्या नावावर प्रॉपर्टी असण्याचा प्रश्न येतोच कुठे?
केड्याचं आपलं उचललं बोट लावलं कीबोर्डला सुरू आहे.

विक्या ईतकेवेळा त्या ईशाला बावळट वगैरे म्हणाला , आपली या रोलसाठी निवड अचूक असल्याचा अभिमान वगैरे वाटला असेलं का त्या गायत्रीला ??? बर झालं हा रोल त्या उर्मी ला नाही मिळाला .

व्हाया व्हाया जाण्याला, ती म्हण आहे ना 'वाईवरुन सातारा' तसं चालालय.. आत्ता सगळी सत्ता त्याच्याकडे असताना.. काहितरी लिगल घोळ करुन पण तर कंपनी मिळवता येईल ना.. असही नाही की ईशा नंदिनी आहे हे सिद्ध झालं की कुठेतरी क्लॉज मधे असं काही आहे ज्यामुळे आपोआप ती संपत्ती ईशाला मिळणार आहे.. म्हणजे ईशा नंदिनी झालीच तर आईसाहेब दुसरं काहितरी करतिल.. सिद्ध झाल्या झाल्या लगेच संपत्ती देउन का टाकतिल?.. आणि तसच ईशानेच नंदिनी न बनता आईसाहेबाना इम्प्रेस्स केलं तर काय प्रॉब्लेम आहे?

all he has to do is take loans to the tune of 3150 x 2 crore and vanish to antigua . he does not need Isha He needs Chanda. Chanda Kosher. not a very koshar plan though.

केड्या बहुतेक विक्याला पहिले सहा महिने डिडिएलजे मधला शाहारूख दाखवून झाल्यावर आता बाजीगरमधला शाहारूख दखवणार अस दिसत आहे.एकदा अस ग्रुहीत धरल.तर सगळी लिंक लागते
तिकडे अजय शर्मा बनून शिल्पा शेट्टीला रंगशारदावरून शाहारूख ढकलतो,इकडे विक्या शिल्पा तुळसकरला(लोकहो,तिच सासरच आडनाव सुध्दा शेट्टीच आहे,काय तो योगायोग) कुठूनतरी फेकल असेल आणि मश तिकडे विकी मल्होत्रा बनून काजोलच्या आयुष्यात शाहारुख येतो.इकडे विक्रांत सरंजामे बनून बेबीच्या आयुष्यात येतो.बाजीगरमधल काजोलच नाव तेवढ आठवत नाही आहे
केड्या शाहारुख फँन आहे.त्यामुळे बहुतेक बाजीगर ,अथवा ओम शांती ओम.

केड्याच्या सो कॉल्ड काहाणी मधे जर थोडं मागे गेलं, जेव्हा ईशा अजुनएन्ट्रीच झाली नाहिये.. तेव्हा विस झोपा काढत होता का? नन्दिनी गेल्यानन्तर जी सम्पत्ती आपल्या नावावर नाही त्यासाठी मेहनत का करत होता? ईशा दिसल्यावर त्याला येवढा सोप्पा मार्ग सुचला .. पुनर्जन्म अ‍ॅन्ड ऑल.. नसती भेटली तर काय प्लॅन होता..

Happy गेली वीस वर्षं...विक्रांत सरंजामे झोपलेलाच होता का?
मे बी...त्याने इतर प्रयत्न केलेही असतील...पण मग तो आईसाहेबांच्या इतक्या गुड टर्म्स मधे कसा काय राहीला असता....?

बेबी आईला फोन करून , जावईबापूंबद्दल सांगते .
प्रॉपर्टीबद्दल ऐकल्यावर , ईआईची एवढी थंड रिएक्षन ???
आणि मी तुला नंतर फोन करते सांगून ठेउन दिला फोन ???

खरतरं , सॉन्याची रिअक्श्ननही थंडच होती .
आपला दीर ... सॉरी ब्रो-इन-लॉ - हा नवर्याचा सखा भाउ नाही , नणंदेचा नवरा आहे हे तिला अगोदर पासून माहिती असावं ??
मंदाताईपण वीसवर्श ईथेच काम करतायेत वाटतं. मागे ते साचे मिळाले तेन्व्हा त्यांचाही चेहरा पडलेला .

बर्थ डेट साठी पासपोर्ट हेही कैच्याकै लॉगिक झालं

च ह ये द्या मधे मस्त खिल्ली उडवली आहे या मालिकेची.
ईशाला काही उत्तरही देता आली नाहीत..
काहीही बोलत होती..सुबोध दादा काय, हसण्यावरून माझी उडवतो आणि काय काय....!
निलेश साबळे बोललाच तरी..तु प्राथ्र्ना बेहेरेचा रेकॉर्ड तोडणार बहुतेक..
अतिशय केविलवाणं आहे वास्ताविक .. झी वर.. झी च्या च मालिकेची ईतकी टर उडवली.
ह्यात काम करणार्याना काहीच वाटत नसेल का?
सुभा, अभा, झेंडे, गट्णे सारखे चांगले कलाकार, लेखक, दिग्द्र्श्क, निर्माता, स्वतः झी...कुणालाच काहीच कसं वाटत नाही ईतक्या सुमार दर्जा असलेली मालिका आपण करतोय..आणि वरून ईतकी टरही उडवली..!

केड्या बहुतेक विक्याला पहिले सहा महिने डिडिएलजे मधला शाहारूख दाखवून झाल्यावर आता बाजीगरमधला शाहारूख दखवणार अस दिसत आहे.एकदा अस ग्रुहीत धरल.तर सगळी लिंक लागते केड्या शाहारुख फँन आहे.त्यामुळे बहुतेक बाजीगर ,अथवा ओम शांती ओम. >>>>>>>>>> +++++++++११११११११

कडुनिमकर फॅमिली >>>>>>>>> Rofl

प्रॉपर्टीबद्दल ऐकल्यावर , ईआईची एवढी थंड रिएक्षन ??? >>>>>>> अगदी अगदी. कुठली प्रॅक्टिकल आई अश्या सिच्युएशन नन्तर 'जावई माझा भला' म्हणेल?

आपला दीर ... सॉरी ब्रो-इन-लॉ - हा नवर्याचा सखा भाउ नाही , नणंदेचा नवरा आहे हे तिला अगोदर पासून माहिती असावं ??
मंदाताईपण वीसवर्श ईथेच काम करतायेत वाटतं. मागे ते साचे मिळाले तेन्व्हा त्यांचाही चेहरा पडलेला . >>>>>>> मे बी

बाजीगरमधल काजोलच नाव तेवढ आठवत नाही आहे >>>>>>> शिल्पा शेट्टीच नाव सीमा असत त्यात. काजोलच नाव प्रिया किव्वा अन्जली होत वाटत.

इकडे विक्या शिल्पा तुळसकरला(लोकहो,तिच सासरच आडनाव सुध्दा शेट्टीच आहे,काय तो योगायोग) कुठूनतरी फेकल असेल >>>>>>>> टायटल सॉन्गमध्ये एका बिल्डिन्गवरुन कॅमेरा खाली सरसर उतरताना दाखवलाय. ह्याचा अर्थ विस शिल्पाला बिल्डिन्गवरुन फेकून देतो असा होतो.

सिद्ध झाल्या झाल्या लगेच संपत्ती देउन का टाकतिल?.. आणि तसच ईशानेच नंदिनी न बनता आईसाहेबाना इम्प्रेस्स केलं तर काय प्रॉब्लेम आहे? >>>>>>>> +++++++++२२२२२२२२२

निमकर जेव्हा धावत पळत येतात कॉलेज मधे.. "अगं तुझे हे सरंजामे डब्यातच राहीले.." म्हणत.... ते सांगताना विक्या फार मस्त जेन्युईनली हसला. >>>>>>>>> अगदी अगदी. कालचा लॉजिकलेस एपिसोड मी सुभाच्या अभिनयासाठीच पाहिला. कालचा एपिसोड सुभा आणि झेन्डेने खाल्ला. ईशासकट बाकीची मन्डळी कमी दाखवल.

मायराला ह्या प्लॅनबद्दल माहीत नसाव कदाचित. बादवे, काल तिची हेअरस्टाईल बदललेली दिसत होती.

विक्या काल किती वेळा तरी निमकर फॅमिली ला मूर्ख म्हणत होता......!!! >>>>>> हो ना. तो निमकरान्चा उल्लेख 'तिच्या बापाला' करत होता.

काल विस राजनंदिनी "गेली" असं म्हणत होतण, गेली म्हणजे वारली का ह्ह्यानेच गायब केली ? >>>>>>>>> काल राजनन्दिनी गेली अस झेन्डे म्हणाला तेव्हा विसने क्षणभर पॉझ घेतला. म्हणजे राजनन्दिनी कशाने गेली हे झेन्डेपासून लपवलय विसने.

बादवे, त्या व्हाईट बोर्ड वरची हॅन्डरायटिन्ग नक्की सुभाचीच होती का? Uhoh त्याचा 'द' कित्ती विचित्र दिसत होता.

आधिच्य कथेत होति. आता वेगल्या कथा चालू आहेत , गिरिजा आहे आत्ताच्या भागात >>>>>>> हो का. मला माहित नव्हत.

मी थोबाड पुस्तकावर जाऊन मुद्दाम या पेजची सभासद झाले आणि लिहून आले की केडी बेक्कार लिहितोय त्याला नारळ द्या.
सिरियल्स मध्ये चॅनलवाल्यांचा इंटरफियरन्स खूप असतो असं मी ऐकलं आहे पण इतका? अक्कल बाजूला ठेवण्या इतका? Uhoh

मला तुम्हा सगळ्यांच खूप कौतुक वाटतं की टायटल साँग, टॅग लाईन इ. बघून कथेचा अंदाज काढता आहात.
राखेचा च्या पहिल्या भागाचं काय झालं होतं? जी पर्दाफाश करणार म्हणून टॅगलाईन होती तिलाच दोषी ठरवलं.

बाकी सगळे प्रतिसाद वाचून मज्जा येते. Happy Happy

विक्या मुलीचा नवरा आहे तर नाव सरंजामे कस काय? प्रकाश पाडा लोक्स. इथल्या कमेंट इतक्या भारी आहेत कि बाकी स्टोरी ची ऐसी तैशी ...... कृपया श आईसाहेबांच्या टोन मध्ये वाचावा .

भगवती कशाला आयड्या देती त्या केड्याला. इथल्या आयड्या चोरून तो पैशे मिळवतोय.
हो विक्या जर जावई आहे तर त्याचं आडनाव सरंजामे नको होतं.

पण विकूला जायदाद मिळाली तर भेंडेंना(झेंडे) त्यातलं किती मिळणार ते पण दाखवावं. कोण केवळ मैत्रीखातर स्वत:चे वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून वेगवेगळे जॅकेट घालून विसबरोबर उभं राहिल? पाॅइंट है माय लॉर्ड.

भगवती कशाला आयड्या देती त्या केड्याला. इथल्या आयड्या चोरून तो पैशे मिळवतोय.>>> दक्षे, नुसते प्रश्न प्रश्न आणि प्रश्न पडतात गं.

Pages