तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुभा काल निमकरांना मला सर म्हणु नका, आपल्यात काय नातं आहे तरी तुम्ही मला सर का म्हणता वैगेरे डायलॉग मारत होता. जे डायलॉग आधी इशाला बोलायला पाहिजे. >>>>>>>> खर तर त्याने म्हणायला हव होत निमकरान्ना की ' आणि जरा तुमच्या मुलीला सुद्दा बजावून ठेवा, म्हणाव, बाई ग, घरी मी नवरा आहे तुझा, बॉस नाही. मला नावाने हाक मारायला जमत नसेल तर निदान नुसत अहो, जाहो कर की. हिच सर सर ऐकून वैतागलोय मी. घर ऑफिस वाटायला लागत मला.'

नशीब काल बेडरुममध्ये येताना 'मे आय कम इन सर' विचारल नाही.

ईशा इतकी हुश्शार राजकारणी निघेल अस वाटल नव्हत. मायराविरुद्द भडकावून सॉन्याला आपल्या बाजूने केल तेही एक दिवसात! सॉन्यासुद्दा एका फटक्यात, आढे वेढे न घेता तयार झाली सुद्दा!

तिकडे मानबा, इकडे तुपारे. केडयाला हेच ठसवायचय की ज्या बाईला कुकिन्ग येते तीच खरी सून. आईसाहेबान्नी 'माझ्या दोन्ही सुना' म्हटल का तर सॉन्यानी किचनमध्ये पाऊल ठेवल ना. आधी हि ह्यान्ची सून नव्हती का?

ईशाच सारख सारख काय 'सॉन्याताई, सॉन्याताई' , आपण मोठी जाऊ आहोत हे तिला कळत नाहीये का?

मायराच भारतीय भाज्यान्शी शत्रुत्व आहे वाटत.

कधीपासूनच आणि का पाहते रे. >>>>>>> सुभासाठी Wink

मायरा घरातल्या भाज्या पण ठरवते हे काल ठरलं वाटतं. मेन्यूचं ठरलं तेव्हा तर बेबी मेथी निवडत बसली होती.
मायरा फक्त exotic vegetables ऑर्डर करते ना

इशा झाली, बाबा झाले आता इशाची आई...तिला 'मला विक्रांत सर म्हणू नका' असे समजावण्यात १ भाग घालवतील.
सॉन्यासुद्दा एका फटक्यात, आढे वेढे न घेता तयार झाली सुद्दा!>> सॉन्याला तिच्यात आणि मायरात आग लाऊन विक्रांतची मजा बघायची आहे असे ती जयदीपला सांगते.
आता या बायका किचन मधे भाजी काय करायची यावरुन भांडणार काय? या सरंजामेने इबाळाच्या घरी पोळीचे लाडू, गाड्यावरची पावभाजी, लंडनमधे इआईच्या हातचा फराळ, ऑफिसमधे इबाळाचा डबा खाताना मायरा काय झोपलेली का? काहीही.

भारी धमाल.
मस्त स्ट्रेसबस्टर धागा आहे हा. Happy
अजून फुले आपटली नाहीत म्हणजे नक्की हे खोटे लग्न असणार. आता कोणाकडून आणि कशासाठी हे अजून झी चे ठरायचे असेल.
जर तो बेत बारगळला तर आपटवतील फुले एक महाएपिसोड खर्ची घालून. Happy

मस्त स्ट्रेसबस्टर धागा आहे हा. >>>>>>
अगदी खरे !! सिरीयल बघितली अथवा नाही बघितली तरीही या धाग्यावर दिवसभराचं तुफान हसायला मी ही येतेच येते Happy
काय जबरदस्त प्रतिक्रिया आहेत सगळ्यांच्या !!!!!!

काल मैत्रीणीला हा धागा वाचून दाखवला .. चुकुनही ती तुपारे बघणार नाही म्हणाली Proud

तो भाजी विकत घेण्याचा सीन पाहिला नेमका झी५ वर, डोक्यात गेला राव.. ब्रोकोली का रीटर्न केली
स्पीकर्वरून घासाघीस म्हणजे कहर...
बन्द करून टाकला व्हीडीओ आणो ईजीप्त ची माहीती विकी वर वाचत बसले

मी आता नव्या टीव्ही च्या चॅनेल निवडीनुसार झीचे चॅनेल न घेण्याच्या निर्णयावर ठाम झालो आहे!
एकतर सगळ्यात महागडा चॅनेल आणि सगळ्या टुकार सिरेली आणि कार्यक्रम!

आमच्या बॉसच्या घरी तर त्यांचे नोकर जातात भाजी आणायला.
'चला हवा येउ द्या' मधे घ्या म्हणा कालचा सीन!
काय तो भाजी विकत घेण्याचा सोहळा. आईसाहेब, दोन्ही नोकर सगळे भक्तिभावाने बघत आहेत. दोघी सुना बसुन भाजी बघत आहेत. एवढ्या मोठ्या सरंजामे मेन्शनमधे आलेला तो भाजीवाला. आणि बेबी मोठ्या हुशारीने भाजी घेते. .
आह्हा.. कित्ती कित्ती व्यवहारी आणी चतुर आमची मोठी सूनबाई.. असे भाव आईसाहेबांच्या चेहर्यावर.
बेबी फोन स्पिकर ऑन करुन आईला भाजीचा भाव विचारते. आणि इआई तिकडुन भाजीवाल्याला धमक्या देते.
काय फालतुपणा नुसता! Angry
इबाळ आधी त्याची चुक दाखवून मग त्याला पाणी काय, सरबत काय...
आणि सीनचा एन्ड काय तर सिक्युरीटी गार्डस पळत येउन भाजीवाल्याला ओढत घेउन जातात.

शेवटी शेवटी... घरचे सगळे व्यवहार आणि किचन सॉन्याच्या माथी मारुन इबाळ कसं कृतकृत्य हसतं.

मी आता होर्दिन्ग लाव्नारे. सोन्याला घरची जबब्दरि अधिक्रुत्पने मिलाली म्हनून हार्दिक अभिन्द्न्न
देक्कन चौकात लाव्नारे.
हि शिरेल म्ला इत्क्या लव्कर या पतलिवर अनेल असे वातले नव्ह्ते.

झेन्दे दबल धोल्की. दोन्हीकदून बोल्तो. मयराकओदोन पन अनि सरकदून पन.

मी हापिस काह्दून त्यात एक एव्हिपी अपोईन्त कर्नरे.
के आर ए - घर्ची फर्शी नीत पुसली का पाहने, बाईचा पगार वेलेत द्देने, भाजी आन्ने, ग्यास बुक कर्ने. दर्वज्याला तेल्पनि करने. रात्री कच्रा बाहेर थेवने. कॅल्र्या क्याल्क्युलेत करने. Proud

दक्षु ताई जाम चिडल्यात.. कीप काम... Happy
आज शुक्रवार आहे, खुश व्हा Happy

कारवी, कम्माल्ल आहात तुम्ही.. Proud
तुमचे एपि येउ द्यात... मज्जानी लाईफ

बा द वे, ते किल्लीबेन वगिरे वाचून मला गोकुलधाम मधली दयाबेन आठवली

तोन्द्ल्याची दह्यतली कोशिब्मिर म्हने. बाकी कोशिम्बिरीत काय घ्लत्तात मग? Uhoh
अम्हि सग्ल्य कोशिम्बिरित धैच घालतो.
आनि तोन्द्ली कच्चीच का? Uhoh

बाकी कोशिम्बिरीत काय घ्लत्तात मग>> Lol
भाजीच्या सीन मधला ड्रेस्स चान्गला होता

एकाच रन्गाचे ड्रेस्स देतात का ईशाला
मन्गळ्सूत्र तर वेगळच आहे काहीतरी

एकाच रन्गाचे ड्रेस्स देतात का ईशाला >> एका कुथ्ल्यातरी द्रेस वरची ओध्नी तिने एका पर्कर पोल्क्यावर पन घात्ली होती एकदा. भग्वी रन्गाची

कवठ च आणते >>> सीझन बॉल आणा आणि हलकेच मारा Lol

त्यांच्या कडे काकडी असेल तोंडल्याच्या आकाराची!>>> Biggrin

तोंडली कच्ची खाल्ली तर बोबडे पणा येतो म्हणतात. मग सगळे सरंजामे बोबडे होणार.
दक्षे, तू ती तोंडल्याची कोशिंबीर खाल्लीस काय गं? Wink

दक्षे, तू ती तोंडल्याची कोशिंबीर खाल्लीस काय गं? Wink>>> Lol

बहुतेक सरंजाम्यांकडे जेवायला गेली असेल तेंव्हा असेल तोंडल्याची कोशिंबीर ! Proud

सुबोध आणि बाकी गॅन्गही ट्रोलिंगमधे सामील होते आहे बहुतेक. त्यांनी तरी काय पाप केलंय?

चला म्हणजे आता बेबी पुनर्जन्म हे फिक्स. >>>>>>>> तरीच म्हटल, ईशाला अचानक अक्कल कशी काय आली? काल सॉन्या आणि विसमध्ये भान्डण लावून स्वत: साळसूदपणे बसली होती.

कारवी Rofl

किल्ली, काल विसने शेवटच्या क्षणी तुमची आठवण काढली.

जयदीप आणि त्याच्या भयानक आयडिया Proud सॉन्याच नाव सुर्वणाक्षरात कोरणार आहे म्हणे.

New promo >>>>>>> विसने कर्जतचा बन्गला विकला की काय? Uhoh बाकी त्याची स्माईल अ‍ॅज युज्वल किलर होती.

फेसबुकवरून साभार:

आम्ही सारे खवय्ये
Yesterday at 5:49 PM ·

काल झी टीव्ही वरील तुला पाहते रे या सिरियलध्ये इशा तोंडल्याची कोशिंबीर करना असे दाखवले आहे
तर ही घ्या तोंडल्याच्या स्वादिष्ट कोशिंबीरीची सचित्र रेसिपी.

#तोंडल्याची स्वादिष्ट #कोशिंबीर

साहित्य : १० ते १२ ताजी हिरवीगार कोवळी तोंडली,दोन टेबलस्पून शेंगदाण्याचे भरड कूट,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या,चवीनुसार मीठ व साखर ,वाटीभर मलईचे दही,तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,अर्धा चमचा जिरे
चिमुटभर हिंग,४-५ कढिपत्त्याची पाने,बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती : प्रथम तोंडल्याची दोन्ही बाजुची शेवटची टोकं काढून घेऊन प्रत्येक तोंडल्याचे सुरीने उभे चिरून चार भाग करुन घ्यावेत.
नंतर मिक्सरच्या ग्राईंडरच्या भांड्यात हे तोंडल्याचे तुकडेव सोबत हिरव्या मिरच्या भरड वाटून घ्याव्यात. आता हे मग कुकरमध्ये भाताप्रमाणे हे भरड वाटण शिजवून घ्यावे.
कुकर गार झाल्यावर एका बाउलमध्ये हे शिजवलेले वाटण काढून घेऊन त्यात दही, मीठ, साखर, कोथिंबीर, दाण्याचे कूट घालावे व चमच्याने ढवळून छान मिक्स करून घ्यावे. वरुन जिरे, हिंग, कढिपत्त्याची फडणी द्यावी.

नवीन प्रोमो पाहता तुपारे चा घसरता trp वर आणण्यासाठी हे सगळे केविलवाणे प्रयत्न असावेत.
बाकी सोनियाला घराची जबाबदारी दिली,पण मग बेबी काय करणार घरात कारण तिने ऑफिसलाही जाण बंद केल आहे.
आणि आता तर काय चाळीत राहणार आहेत.
म्हणजे शिळ्या पोळ्यांचा लाडू,फो ची पो,कदाचित शिळ्या पोळ्यांचु कोशिंबीर सुध्दा विक्याला खायला लागेल....देवा रे दे
माझा पुन्हा तोच प्रश्न....बिपिनला नोकरी वगैरे नाही का.रुपाली ग्रँज्युएट झाली का?

तुपारे चे अजून पीस काढताना बघायचं आणि आपला राग शांत करायचा असेल तर चला हवा येऊ द्या बघा- 4 फेब्रुवारी ला..

Pages