तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लेकरांनो उगाच डोक्याला ताण देउ नका, मूळ कथा तिच आहे आधीची पण केडयाच्या लक्ष्यात आलं की आपली कथा खपत नाहीये तर त्याने हुशारी दाखवली Wink आणि पलटी मारली आणि ट्विस्ट च्या नावाखाली ही कथा आपल्या माथी मारली.. आधीचाच ताण कमी होता की काय म्हणून आपला ताण अजून वाढवला Uhoh आणि आपण प्रेक्षक पामर सहन करतोय Sad

टाईम मशीनवाला ट्रेलर पाहिला का कोणी? निव्वळ फालतू... नाही! काय दाखवलं?>>>
विक्याच माणसं पेरतोय जयदीपला गंडवायला .
एक माणूस- तोच तो गेट वे ऑफ इंडिया विकणारा- जयदीपला 4 कोटीला टाईम मशीन विकतो. तो जयदीपने दिलेला चेक एका पांढरा कोट घातलेल्या पाठमोऱ्या माणसाकडे आणून देतो..
आता तो पांढरा कोट घातलेला विक्याच आहे हे न समजायला आम्ही म्हणजे काय हे वाटलो?

विक्याच जर माणसं प्लांट करत असेल तर वीस वर्षे तरी का थांबला ? आपल्या समोरच गेल्या सहा महिन्यात जयद्यानं चारपाचशे कोटी आणलेच की विक्याकडे. ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी सोडून ती मठ्ठ मैना कशाला गळ्यात बांधून घेतली उगंच?

मेधावि... Biggrin
मठ्ठ मैना...!! खरंच की.......
नस्ता ताप करुन घेतलान...वरतून पुन्हा पोळीचे लाडू खावे लागताहेत....!!
टाईम मशीन : हरे राम! केड्याला बुद्धीभ्रंश झालाय! Angry

तो जयदीप फारच रोडावलेला वाटला मला काल! विक्या बहुतेक खायला देत नाही की काय! बिचारा सारखा दादा दादा करत असतो प्रेमाने......

जयदीपने ते time machine वीस साठी घेतलं आहे , या वेळी ते work करेल आणि वीस २० वर्ष मागे जाऊन मगच अपल्याला शितू दर्शन होईल .. शितू चा ट्रॅक आणायला हे time machine कल्पना Sad

>>आपल्या समोरच गेल्या सहा महिन्यात जयद्यानं चारपाचशे कोटी आणलेच की विक्याकडे. ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी सोडून ती मठ्ठ मैना कशाला गळ्यात बांधून घेतली उगंच?

खरच की.. याला म्हणतात काखेत ईस्टेटीचा कळसा अन सरंजाम्यांचा दोन रूपयाचा वळसा.

खरच की.. याला म्हणतात काखेत ईस्टेटीचा कळसा अन सरंजाम्यांचा दोन रूपयाचा वळसा. >>>>>>>> ++++++++११११११११

बाईच लग्नानन्तर प्रथम कर्तव्य - नवर्याच्या गरजान्कडे लक्ष देणे

हो आईसाहेब , म्हणून तर मी किचनमध्ये रोज ह्यान्च्यासाठी वेगवेगळे पदार्थ करते

कोण लिहत असले डायलॉग्ज? डायलॉग्ज लिहिणार्याने निदान विसकडून तरी प्रेरणा घ्यावी, विस विलन असूनही कित्ती काळजी आहे त्याला आपल्या बायकोच्या करियरची. Proud

ईशा ऑफिसमध्ये अस कुठल स्पेशल काम करणारेय ज्यामुळे ती राजनन्दिनी आहे हे सिद्द ( माझा द्द सुभासारखा आला Lol ) होईल?

मठ्ठ मैना >>>>>> Rofl

विक्याच जर माणसं प्लांट करत असेल तर वीस वर्षे तरी का थांबला ? आपल्या समोरच गेल्या सहा महिन्यात जयद्यानं चारपाचशे कोटी आणलेच की विक्याकडे >>>>>> नैतर काय.

टाईम मशीन >>>>>>> त्या टाईम मशीनमध्ये स्फोट झालेला पाहून वाटल की विक्याचा जयदीपला स्फोट घडवून मारण्याचा प्लान आहे की काय?

पण ईशा ला कसं बाई जमणार बावळटपणा सोडुन बदला बिदला घ्यायचा अभिनय >>>>>>> मला तर त्याचीच काळजी वाटतेय. इथे तर तिला राधिका पार्ट २ केलय. अस वाटतय की आधीची चॅप्टर ईशा बरी होती.

ए पोरांनो उगाच विक्याच्या नावाने बोटे मोडू नका बरका >>>>>>> का बरे?

तसं असेल तर खरा जयदीप आपण सगळे असू.>> ए पोरांनो उगाच विक्याच्या नावाने बोटे मोडू नका बरका. Happy

खरच की.. याला म्हणतात काखेत ईस्टेटीचा कळसा अन सरंजाम्यांचा दोन रूपयाचा वळसा. >>+१
ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी सोडून ती मठ्ठ मैना कशाला गळ्यात बांधून घेतली उगंच>>> Lol

टाईम मशीनचा पण शोध लावला या लोकांनी? Uhoh
मी आता ही मालिका बघनेच सोडून दिले आहे. पण इथे वाचायला मजा येते.

अजून केड्याच ठरत नसाव बहुतेक की पुनर्जन्म दाखवायचा की नाही.
विक्या काय आता फक्त टिपिकल डेली सोपसारखी कटकारस्थान करण्यासाठीच जाणार आहे का?गेले दोन भाग तर तेच चालू आहे.
जालिंदर नावाच एक कँरँक्टर या मालिकेत आहे,जे अतिशय महत्वाच आहे,हे केड्या विसरला का?

>>राजमार्ग आणि ड्रेनेज चा पाईप
Lol

जयदीप ईषाला बसवणार टाईम मशिन मध्ये आणि तिला आठवणार सगळं
लग्ना अदोदर ईषाला स्वप्नं पडायची तेव्हा १०० डेज ची स्टोरी असेल असे वाटले होते.

लोकं केड्या केड्या करताहेत तो अभिजीत गुरु आहे, अभिजीत खांडकेकर नाहीये... त्यामुळे मानबाचा केड्याशी काहीच सबंध नाहिये.

लोकं केड्या केड्या करताहेत तो अभिजीत गुरु आहे, अभिजीत खांडकेकर नाहीये... त्यामुळे मानबाचा केड्याशी काहीच सबंध नाहिये.>>
ऑऽऽऽऽऽ, किती हे अज्ञान. Uhoh आणि तरीही ठामपणे विधान करताय.
झंपी, केड्या (अभिजीत गुरु) हाच मानबाचा लेखक आहे. आणि त्याच शिरेलीत तो केड्याचा रोल पण करतोय. म्हणूनच लोक त्याला केड्याच म्हणतात.

दादासाहेबाच्या पोटात शिरून विक्याने व्यवसाय व बायको मिळवली असणार. नंतर दादासायबाच्या लक्षात आल्यावर दादासानं विल मधे त्याचं नाव उडवलं म्हणून त्यानं दादाचा आणि शितुचा गेम केला असणार व जालिंदराला त्यात अडकवून स्वतः नामानिराळा राहीला असणार. आईसाहेब इषा इतक्याच चतुर, चपळ, चाणाक्ष व चुणचुणीत असल्यामुळे त्यांना हे सगळं इतकी वर्षे समजलं नसावं.

आईसाहेब इषा इतक्याच चतुर, चपळ, चाणाक्ष व चुणचुणीत असल्यामुळे त्यांना हे सगळं इतकी वर्षे समजलं नसावं.>>>>>. Rofl +११११

मलाही तेच वाटतं की दादासाहेबना वि.सं.चे true colors कळल्यामुळे त्यांनी प्रॉपर्टी त्याच्या नावे केली नाही, एवढंच नाही तर पुढेही कधी कोणी त्याच्या नावावर ट्रान्सफर करू शकणार नाही अशी सोय केली. पण आता ते जिवंत नाहीत त्यामुळे सत्य कोण सांगणार? मग सुभाने चान्स पे डान्स करून, मीच दादासाहेबना अस करायला सांगितलं अस स्वतःच जाहीर करून स्वतःला महान करून घेतलं आहे. पण मेधावीने म्हटल्याप्रमाणे आईसाहेब इषा इतक्याच चतुर, चपळ, चाणाक्ष व चुणचुणीत असल्यामुळे त्यांनी डोळे मिटून विश्वास ठेवला. तिथे बसलेल्या, अगदी लॉयर सकट कोणीही मनात किंतु न आणता लगेच त्याला महात्मा करून टाकलं.

मग सुभाने चान्स पे डान्स करून, मीच दादासाहेबना अस करायला सांगितलं अस स्वतःच जाहीर करून स्वतःला महान करून घेतलं आहे. पण मेधावीने म्हटल्याप्रमाणे आईसाहेब इषा इतक्याच चतुर, चपळ, चाणाक्ष व चुणचुणीत असल्यामुळे त्यांनी डोळे मिटून विश्वास ठेवला. तिथे बसलेल्या, अगदी लॉयर सकट कोणीही मनात किंतु न आणता लगेच त्याला महात्मा करून टाकलं. >>>> हे लिहून आपण केड्याला आयडिया देत आहोत, त्याच्या मनातही नसेल हे असं काही कदाचित.

पण आता ते जिवंत नाहीत त्यामुळे सत्य कोण सांगणार? मग सुभाने चान्स पे डान्स करून, मीच दादासाहेबना अस करायला सांगितलं अस स्वतःच जाहीर करून स्वतःला महान करून घेतलं आहे. >>> हा सरप्राइज एलेमेण्ट चांगला जमला असता. पण इतका सुद्धा ब्रिलियन्स या कथेत नाही. कारण झेंडेला आपण किती चलाख आहोत सांगताना विक्याने वेगळे कारण सांगितले - की त्याला त्यांचा विश्वास कमवायचा असल्याने त्यानेच तो क्लॉज सांगितला अ‍ॅड करायला. हे झेण्डेला सांगितले नसते तर हे सरप्राइज नंतर निर्माण करू शकले असते.

अर्थात तरीही करतील. सांगता येत नाही. सरप्राइज लॉजिकल असायला हवे असे कोठे असते यांचे.

डिस्ने च्या कार्टून्स मधे, टॉम अ‍ॅण्ड जेरी मधे ते हवेत मस्त तरंगतात. पण जेव्हा त्यांना कळते की ते हवेत आहेत, तेव्हा ते खाली पडतात. विक्याचे तसेच काहीतरी झाले आहे. हा प्लॅन अनेक वर्षे सुरू आहे. पण जेव्हा तो प्लॅन त्याने झेण्डेला सांगितला तेव्हापासून त्याला आपण व्हिलन आहोत हे रिअलाइज झाल्यासारखा तो वावरतो आहे. तो आधीचा विक्या आता दिसत नाही. असे बदलण्याचे स्क्रिप्ट मधे काहीच कारण नाही.

पहिल्या सीन मधे मला वाटले आता ते एखादी फांदी हातात घेउन एक एक पान तोडत she loves me, she loves me not करतात तसे झेंडे आणि विक्या "ईशा ऑफिसला येणार, ईशा ऑफिसला येणार नाही" खेळतात की काय.

जयदीप आणि विक्या हे भाउ आहेत हे आज ऐकले. म्हणजे जावई वगैरे नसावा विक्या. म्हणजे पुन्हा ती वारसा हक्क केस पूर्ण ओपन झाली.

एक सीईओ आणि त्याचा प्रमुख कस्टमर यांच्यात मीटिंग कशी ठरते याचा वस्तुपाठ घालून दिला आहे या सिरीज ने. खंडेलवाल ला "रात्री" फोन करायला सांगतो. किती वाजता वगैरे नाही. तो ही पठ्ठ्या रात्री म्हणजे विक्या झोपणार तेव्हा करतो. तेवढ्यात त्याने मीटिंगही ठरवलेली असते एक. मग "सकाळी घरी ये". पुन्हा किती वाजता वगैरे काही नाही.

आणि नवरा आधी ठरवलेले विसरला असेल, तर सर्वांसमोर आणि विशेषतः प्रमुख कस्टमर समोर त्याला असा उघडा पाडतात का. उगाच कायच्या काय.

बाकी ईशा, जयदीप वगैरे लोक पहिल्यांदाच ऑफिसला जात असल्यासारखे करत होते आज. या दोघांनाही काही रोल होताच ना तेथे? मग काय उगाच 'मला जमेल का' वगैरे.

मेधावि.....इंग्लिश मधे मिसेस च म्हणतात ना...? नवरा नसला तरी?
फारेंड... Happy

डिस्ने च्या कार्टून्स मधे, टॉम अ‍ॅण्ड जेरी मधे ते हवेत मस्त तरंगतात. पण जेव्हा त्यांना कळते की ते हवेत आहेत, तेव्हा ते खाली पडतात. विक्याचे तसेच काहीतरी झाले आहे. हा प्लॅन अनेक वर्षे सुरू आहे. पण जेव्हा तो प्लॅन त्याने झेण्डेला सांगितला तेव्हापासून त्याला आपण व्हिलन आहोत हे रिअलाइज झाल्यासारखा तो वावरतो आहे. तो आधीचा विक्या आता दिसत नाही. असे बदलण्याचे स्क्रिप्ट मधे काहीच कारण नाही.

हे एकदम परफेक्ट ऑब्झर्व्हेशन!
बळंच आपलं छद्मी हासणं, डोळ्यांत बनेल भाव, टेबलावर पाय पसरुन उर्मटासारखं बसणं चालू केलंय....!! Happy

इंग्लिश मधे मिसेस च म्हणतात》ह्या सिरीअलीत, जिथं लग्नानंतर स्त्रीचं परमकर्तव्य नवर्याचं हवं नको ते बघणं असं आहे त्यातल्या इंग्लिशमधे म्हणतील असं नाही वाटलं.

हे हे हे राधिकाचे फंडे इथेपण आले का?
ती नवरा, सासूसासरे, शेजारी, ऑफिस स्चटाफ, वॉचमन, दूधवाला, हॉस्पिटलमधली मावशी यांचं हवं नको ते बघते.

>>>तसंच आईसाहेबांचा उल्लेख आधी अनेकदा "मिसेस" सरंजामे असा केलाय. का बरे?
सावत्र/दत्तक/अनौरस मुलगा असणार विक्रांत

Pages