तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एकतर गजाकडे असे काही गुणच दिसले नाहीत ज्याने राजू इंप्रेस व्हावी. खरतरं त्याला चान्स होता गरीबांचा कैवारी वगैरे होण्याचा ह्या संपात , तिथेही त्याने मातीच खाल्ली.

सुषमा ताई 11>> Lol
'भयमूल्य' यादीत, मित्रों नंतर 'सर' चा क्रमांक लागतो. >> Biggrin
म्हणजे जे ज्या वेळी जसे कसेही अ‍ॅव्हेलेबल असतील तसे शूटींग ऊरकून टाका.>> अगदी असच चाल्लंय
मोबाईल होता का तेव्हा>> हो असावेत काळे, मोठ्ठे-मोठ्ठे ,जाडे-धबाडे काहींचा अँटेना बाहेर ओढायला लागायचा .. इनकमिंग ला पण पैसे होते तेव्हा .
फारेंड,>>दादासाहेबांचे घर मशीद कन्व्हर्ट केल्यासारखे का दिसते आतून? त्या निळ्या व तपकिरी बॅकग्राउण्ड वर उभे असलेले दादासाहेब आधी दिसतच नाहीत. तो सगळा सेटप एखाद्या इलेक्ट्रॉनिक गेम सारखा दिसतो. मग दादासाहेब एकदम हलले/बोलले की >> हो ना !! खरंच ! Rofl

काल सुद्धा #कंटिन्युटीच्यानानाचीटांग>> गपा परांजपे शी बोलल्यावर परांजपे नि १ रुपया टाकून बोलतात्त तसल्या फोन वरून का कॉल केला ? भले चहाडी सांगायची असेल कि गपा ने असं असं केलं .. म ते ऑफिस मधल्या फोन वरून सांगू शकत नव्हते का ?! कि उगाच जुना काळ दाखवायला १ रुपयाचा फोन दाखवला ? काहीही!! ... बरं त्यानंतर लगेच संपाचा सीन .. लगेच त्याच दिवशी पण फोन करताना परांजपे चा शेर्ट आणि डासांना भेटतानाचा शर्ट वेगवेगळा ..
आणि परांजपे त्या लीडर ला जाऊन असं सांगतात "डासांना तुमच्या मागण्या मान्य नाहीत .. जा तुम्ही संप करा ".. अरे!!! असे संवाद !? आपण कैक पटीने चांगलं लिहू नक्कीच .. बरं !! संप ठरल्यावर त्याचा फोन लगेच गजा च्या बेडरूम मधे वाजला !!! काय चमत्कार आहे .. काय मजा आहे !!
आणि फोन आणला नवीन तर तो असा बॉक्स मधून फोटो किंवा पॅकबंद बाहुली पहिल्यासारखा का बघत होते ?! (कारण त्यात फोन नसणारच आहे .. ) त्याबद्दल ना उत्सुकता, ना प्रश्,, ना हातात घेऊन तो कसा वापरायचा वगैरे ..का sss ही नाही ..
त्या अंबाबाई च्या बाई ला कसं कळलं १का क्षणात .. नवऱ्याचं नाव गाव फळ फुल न सांगता .. लग्नं झालं म्हंटल्याबरोब्बर ..सांभाळून राहा वगैरे.!! क ह र !! आहेत सगळे

संप झालाय म्हणजे आता केव्हातरी नंदू सगळ्या कामगारांच्या घरी जाऊन त्यांच्या बायकांच्या ओटी (ओट्या !?) भरणार .. म्हणजे अजून खूप सहन करायचंय आपल्याला ..

सुभाने आतून पिन मारली असावी की खूप सहन केल बाळाला आता नाही,तेव्हा लवकर काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावा आणि मला मोकळ करा.
तसही फेसबूक चँटवर सुभा म्हणाला की आम्ही,म्हणजे तो आणि शितु आता जातो पुढच्या सिनसाठी ,तुम्ही बाळाशी बोला कारण ईशा हिरवीन आहे, त्यामुळे ती असणारच आहे
म्हणजे थोडक्यात त्याच म्हणण असाव की तुम्हाला बाळालाच सहन.कराव लागणार आहे.
कदाचित आपलाही त्रास कमी करण्यासाठी झीम ला तंबी दिली असेल म्हणून शिरियल राजधानीत धावत आहे.

संप झालाय म्हणजे आता केव्हातरी नंदू सगळ्या कामगारांच्या घरी जाऊन त्यांच्या बायकांच्या ओटी (ओट्या !?) भरणार .. म्हणजे अजून खूप सहन करायचंय आपल्याला ..>>>>मी हीच पोस्ट टाइपत होते... हहपुवा

इथे लॉजिकल पोष्टी फाऊल आहेत हे माहिती आहे तरीही....
एक लॉजिकल शंका... नंदूचा पुनर्जन्म म्हणजे ईशा...
म्हणजेच राजनंदिनीने जे पाहिले रादर तिच्या आयुष्यात जे काही घडले ते ईशाच्या स्वप्न स्क्रीन वर दिसत आहेत...
तर प्रश्न असा आहे की आसा - डासा, गजू विलु, जाळ्या डासा, कामगार निरोप्या- परांजपे - डासा..
असे सीन ती कस्काय बरं पाहू शकते?
जे नंदूने आयुष्यात कधीही पहिलेच नाही ते ईशाला क्लियर दिसणे हे काय आहे?
नंदूचा चमत्कारिक आत्मा

म्हणजेच राजनंदिनीने जे पाहिले रादर तिच्या आयुष्यात जे काही घडले ते ईशाच्या स्वप्न स्क्रीन वर दिसत आहेत...
तर प्रश्न असा आहे की आसा - डासा, गजू विलु, जाळ्या डासा, कामगार निरोप्या- परांजपे - डासा..
असे सीन ती कस्काय बरं पाहू शकते? +11 Lol प्रेक्षक बालबुद्धी चा आहे अस वाटत त्याना.. प्रत्येक कैरेक्टर च्या perspective ने प्रसंग रेखाटले तर मग मालिका किती लाम्बेल..

सुषमा ताई>> मी हीच पोस्ट टाइपत होते... >> काय जुळलीये आपली "होमिओपॅथी"..आपलं ते "टेलिपॅथी".. सॉरी "तुपारेपॅथी" Rofl
नुसता फाऊल नाही ;लॉजिकल प्रश्न विचारणाऱ्याकडून ,त्याला मिळालेल्या बालूशाह्यांपैकी एक बालुशाही काढून घेण्यात येईल Biggrin
जे नंदूने आयुष्यात कधीही पहिलेच नाही ते ईशाला क्लियर दिसणे हे काय आहे?>>काय माहित कसं काय . मे बी आपल्यासाठी फ्लॅशबॅक चालू असेल .. आणि इशा तो आपल्यासोबत बघत असेल .. LOL
किंवा तिला मारायच्या आधी तिला हे सगळं कोणीतरी सांगितलं असेल ..असं असं घडलं आणि ते तिला सीनरूपात आठवत असेल .. जाऊदेत आपलं ठरलंय डोकं बाजूला काढून बघायची सिरीयल ..
प्रसंग रेखाटले तर मग मालिका किती लाम्बेल..>> नको रे बाबा .. एवढ्या चुका कोण झेलणार

खरे तर हे संप प्रकरण म्हणजे गजा, विलु व युनियन लिडर मिळुन खेळलेला डाव असावा असे वाटते. दासं चा विश्वास मिळवण्या साठी.. वगैरे..
आता ऊत्सुकता एव्हडीच आहे:
१. जालींदर जेल के अंदर कसा गेला.
२. रानं का व कशी गेली.
३. ईशा ला सगळे कळल्यावर तीने विस चे काय केले.
४. विस चे काही झाल्यावर ईशा चे काय झाले.
(दादा मुनी 'हम लोग' मोड ऑन):
देखते रहीये, हर रोज, ईसी समय, आपका मनपसंद धारावाहिक 'तुपारे'..!

खरे तर हे संप प्रकरण म्हणजे गजा, विलु व युनियन लिडर मिळुन खेळलेला डाव असावा असे वाटते. दासं चा विश्वास मिळवण्या साठी.. वगैरे..>>असेल . मला पण तीच शंका आहे ..
१. जालींदर जेल के अंदर कसा गेला.>> शिवाय त्या आधी जाली ने गोळी झाडली विक्या वर ती अजून झेंडे ना झेलायची आहे ..

<<<<<<<<दागिन्यांच्या बॉक्स सारख्या दिसणार्‍या बॉक्स मधला मोबाईल कोणा कोणाला दिसला?...
मला तर नाही बाई दिसला!!!
त्या काळातील मोबाईल प्रेक्षकांना नाहीच दाखवला...<<<<<<<<
जुने मोबाईल मिळवणे एवढे कठीण आहे का? माझ्याकडे सुद्धा २००१-२ चा मोटोरोला हँडसेट चालू कंडीशन मध्ये आहे.

या मोबाईल ला या कथेत काम असणार बहुतेक. रानं ईबेबी ला कॉल करणार असावी.
=))

कावले बाबा सगळे Happy
योग, बाकी ठीक पण "" मनपसंद "" ???? कुणाची? कुठल्या अँगलने?
तुम्ही सगळे हे लिहीताय त्याने त्यांना एपिसोड-निर्माण-घटक आयते मिळतायत.
नाहीतर हे काहीही कव्हर न करता गाशा गुंडाळला असता. त्यांना नक्की आठवत नसणार हे सगळे प्रसंग.
मला तर स्नेहलताबाईपण दिसायला सोज्ज्वळ पण गजाच्या बाजूने असाव्या असे वाटतेय प्रॉपर्टी लेकाला मिळावी म्हणून.

मला तर नाही बाई दिसला!!!>> मला पण नाही .. आसानी हात लावताना बघत होते कळतंय का .. पण छे!
त्या काळातील मोबाईल प्रेक्षकांना नाहीच दाखवला>>> पण इथून पुढे केव्हा ना केव्हा दाखवावाच लागेल ना एकदा तरी .. ?
या मोबाईल ला या कथेत काम असणार बहुतेक. रानं ईबेबी ला कॉल करणार असावी.>> येस्स ! तुम्हाला माज्याकडच्या २ बालूशाह्या बक्षिस

लहानपणी आम्ही घर घर किंवा बिझनेस (बोर्ड गेम) खेळायचो त्याची आठवण येतेय हल्ली एपिसोड बघून. असेच कोणतेही शहर विकत घ्यायचो आणि घर वगैरे बांधायचो. एखाद्या कंपनीच्या कामकाजाची ही तऱ्हा असेल तर S. P. वा O. C. विषयांत चिंतनपूर्वक बदल करावे लागतील.

प्रत्येक कैरेक्टर च्या perspective ने प्रसंग रेखाटले तर मग मालिका किती लाम्बेल..>>>>नsssssहीssss(कानावर हात ठेवून किंचाळणारी बाहुली)

तुपारेपॅथी>>>>>:G Biggrin :

@योग >>>>सुभा ने डासांना ढगात पाठवणे तुम्ही गृहीतच धरलंय म्हणा की...
त्यांच्याबद्दल काहीच कसं कुतूहल वाटत नाहिये.... हा अन्याय आहे केड्याच्या लेखणीवर... Biggrin Biggrin :

..... मूर्ख मुलीच्या हट्टामुळे हतबल झालेला करारी बाप नाहीच जमला... उलट सो मी वर ट्रोल झालेल्या व्यक्तिरेखांच्या रांगेत डासांनी सर्वात वरचे स्थान मिळवले आहे
Sad Sad Sad Sad

>>त्यांच्याबद्दल काहीच कसं कुतूहल वाटत नाहिये.... हा अन्याय आहे केड्याच्या लेखणीवर... Biggrin Biggrin :
Happy
एकूणात कथेमध्ये दास हे पात्र निरर्थक ठरलय.. त्यांचं मृत्त्युपत्र मात्र हाय पॉईंट ठरलं सगळ्या रामायणात.
तशी ईतर कुतुहले / ऊपप्रश्ण आहेत, पण ऊगाच विचारले तर मालिका लांबवतील म्हणून नाही विचारले. Proud

Pages