तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कालच्या एपिसोड मधे आईसाहेबानी पराजपेना सान्गितल वकिलाना सान्गा सरजामे ची सगळी कागदपत्र घेवुन या? कसले कागदपत्र हा प्रश्न पराजपे आणी आपल्याला ही पडला पण आइसाहेब ताकास तुर लागु देत नाहीत मग पराजपे महाजनासमोर बसुन सगळी कागदपत्र असलेली एक फाइल चाळुन घेतात, निट बघा ह अशी तन्बी पण देतात, निट बघुन कागदपत्राची फाइल पराजपेना देतात , प राजपे निट न बघता कर्जत म्हणजे खूऊऊऊऊऊउ प लान्ब जायच म्हणून परत फाइल महाजनाना देतात , अशारितिने गोन्विद घ्या गोपाळ घ्या चा खेळ सन्पतो.
सगळि कागदपत्रे म्हणजे नक्की काय आणी पुर्ण तयारिनिशी या म्हणजे काय ते अतर्मनाने परजपे आणी महाजन ओळखतात.

सगळि कागदपत्रे म्हणजे नक्की काय आणी पुर्ण तयारिनिशी या म्हणजे काय ते अतर्मनाने परजपे आणी महाजन ओळखतात. >>> Lol हा भाग ते मीटिंग ठरवली आहे च्या नंतरचा का? त्या भागात पाहिल्याचे आठवत नाही.

एरव्ही एका घरात राहणारे लोक संध्याकाळी जरा वेळ ठेवा. प्रॉपर्टी, कंपनी वगैरेंबद्दल बोलू इतपत तरी सांगतील ना. इतके सस्पेन्स ठेवायची काय गरज आहे? एका एपिसोडची सोय झाली इतकाच उपयोग त्याचा.

त्या वकिलाचे काही आडनाव वगैरे नाही असे दिसते. कारण अशा मोठ्या कंपन्यांचे/कुटुंबांचे वकील वर्षानुवर्षे त्यांच्याबरोबर काम करणारे असतात. त्यांचा उल्लेख सहसा आडनावाने होतो.

नेहमीच्या ड्रायव्हरला "ड्रायव्हर गाडी रोको" म्हणण्यासारखेच ते वरवरचे आहे.

तरी नशीब सॉलिसिटर वगैरे म्हंटले नाहीत. नाहीतर ही सिरीज ६०-७० च्या दशकात असते नेहमी.

मालिकेची व कलाकारांच्या अकलेची लक्तरे केली हयेद्या वाल्यांनी. (त्याचंही भांडवल केलं म्हणूया. )
अभिद्न्या - केशर कस्तुरी, पावभाजी (हे सांगायला नको होतं. तिला ऑकवर्ड झालं फार ), तळे राखी तो पाणी चाखी (हे माहीत नसणं लाजिरवाणं होतं)
तिळगुळाच्या वड्यांवर व चकल्यांवर आठवडे च्या आठवडे कसे ढकलले.

गोविंद घ्या गोपाळ घ्या...........+++++++++++++++111111111111+++++++++++
मला काल वाटल होत ,बेबी विचिरेल आईसाहेबांना की नंदू कशाने गेली वगैरे पण काहीच नाही
सुभभने मात्र सि्सर मारायला सुरुवात केलेली दिसते.कदाचित काही भाग तरी या बेबीबरोबर रोमान्स करायचा नसेल म्हणून टेन्शन नसेल
काल मिटिंगमध्ये झेंडे बोलणार इतक्यात एक कटाक्ष टाकून त्याला थांबवतो.तिथे सुभा +++++++++++11111111++++++
काल सोनिया पण न बोलता बरच काही बोलत होती एक्स्प्रेशन्समधून.आधी आवडत नव्हती,कदाचित तेवढ काम नव्हत,पण आता सोनिया आवडायला लागली आहे.
ही बेबीच मख्खपणा कधी सोडणार काय माहित.तिलाही जरा निगेटिव्ह शेड देऊन बघावी,कदाचित बर करेल.

वाटतंय की, दादासाहेबांना विस च्या महत्त्वाकांक्षा वेळीच कळल्या असतील म्हणून त्यांनी ती अट ठेवली असेल आणि ती त्यांनी बदलावी म्हणून विस नी त्यांचा छळ केला असेल आणि त्यातच ते गेले असतील. हे राजनंदिनी ला माहीत असेल म्हणून पुढे तिला ही मारलं.
कदाचित जालिंदर ला सुपारी दिली असेल म्हणून तो जेल मधे गेला पण त्याला कळलं असेल खरं काय ते, जे कदाचित झेंडे ला ही महीत नसेल..

कर्जतच्या बंगल्याचा फ्रण्ट व्ह्यू दाखवतात तेव्हा सकाळ असेल तर पक्ष्यांची किलबिल आणि रात्र असेल तर रातकिड्यांचा आवाज असतो. आता रातकिड्यांचा आवाज आल्याने मीटिंगची वेळ झाली हे मी ओळखले. काहीतरी प्रॉपर्टी वगैरे बद्दल घोळ असणार याची अपेक्षा होती आणि अजिबात निराश केले नाही एपिसोडने Happy

पण आधी आईसाहेबांचे मीटिंग ओपनिंग भाषण थोडे आचार्य बाबा बर्व्यांच्या वळणावर जाउ लागल्याने "अरे मीटिंगचे काय, ह्या हे काय बोलतायत" असे झाले.

पुण्यामुम्बईत वकिलांचे मोर्चे वगैरे आले का? वारसाहक्क, विल वगैरेंबद्दल जे काय घोळ घातले आहेत या सिरीजने त्याबद्दल? इथे वकिलांपासून सगळे लोक महत्त्वाची माहिती योग्य एपिसोड आल्यावर जादूच्या पोतडीतून काढल्यासारखी अचानक उघड करत आहेत. ते दादासाहेब गचकले तेव्हाच जबाबदार वारसांना विल ची माहिती द्यायची गरज नाही पडली? आणि इतके दिवस ही मालकी नक्की कोणाची आहे हा प्राथमिक प्रश्न कोणीच विचारला नाही?

तो वकीलही आधी म्हणतो "तुम्ही ही मालमत्ता कोणाच्याही नावावर करू शकता. तो अधिकार आहे तुम्हाला", आणि दोन मिनिटांनी उगाच सस्पेन्स निर्माण करून ती अट सांगतोय. म्हणजे कोणाच्याही नावावर करा म्हण्टल्यावर आईसाहेब म्हणतात विक्रांत च्या. तर लगेच हे म्हणतात "ते होउ शकणार नाही". सार्वजनिक धक्का!! ट्याम ट्याम टुम टुम म्युझिक. जयदीप बघतोय. सॉन्या बघते आहे. "कारण या कागदपत्रात लिहीलेले आहे". पुन्हा ट्याम ट्याम टुम टुम म्युझिक. विक्या बघतोय. झेंडे बघतोय. आणि मग आडून आडून उलगडा. असला लाजत मुरकत मृत्यूपत्राचे वाचन प्रकार सुरू आहे.

विक्या दत्तक वगैरे असला, तरी वारस होईलच ना आपोआप नंतर? इतका ड्रामा करायची काय गरज आहे?

कंपनी मधे मालक कोण? सायनिंग ऑथोरिटी कोणाला? हे प्रश्न त्या वेळेस सोडवले नव्हते? मग इतके दिवस विक्या तेथे बसून काय करत होता? काही अधिकार नसतानाच सह्या करत फिरत होता? विक्याला पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी सारखे देउन काही मर्यादित अधिकार दिले असतील? मग त्याचे आधीच्या एपिसोडस मधले संवाद व इतरांनी त्याच्याबद्दल दिलेली माहिती तो मालक असल्यासारखी का होती?

आणि घरी परवा ते एक चेकबुक नाचवले त्यावर नक्की कोणाच्या सह्या केल्या जात होत्या इतके दिवस? दादासाहेब हयात नाहीत. संपत्ती अर्धी आईसाहेबांच्या तर अर्धी जयदीपच्या नावावर. मग ते चेकबुक विक्या सॉन्याला देण्याचा काय सिग्निफिकन्स?

आणि हे सगळे लग्नाच्या वेळेस ईशा व ईपालकांना न सांगताच लग्न केले?

विक्या हा 'नैसर्गिक वारस' नव्हे हे ईशाला माहीत नाही. तरीसुद्धा 'मालमत्ता हडप' बद्दलच्या त्याच्या लंब्याचौड्या वक्तव्यांकडे ती कौतुकाने पाहात आहे.

मी मधले काही भाग चुकवलेत पण विक्या हा त्यांचा मुलगा नाही हे अजूनही कथेत उघडपणे आलेले नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकारात काहीतरी महत्त्वाची माहिती आपल्यापासून लपवली आहे याचा काही अंदाज आल्याचा ईशाच्या चेहर्‍यावर पत्ता नाही. ती अजून आशा काळे, अलका कुबल मोड मधून बाहेर यायलाच तयार नाही.

आणि परवा विक्या मायराला त्याच्यानंतर ईशा ती कंपनी सांभाळेल कशाच्या जोरावर म्हणत होता कोणास ठाउक.

चन्पा +१ पुर्ण पोस्टला अनुमोदन,>>>+१.
तळे राखी तो पाणी चाखी (हे माहीत नसणं लाजिरवाणं होतं)>>>>> अगदी अगदी!

अभिज्ञा भावेचे सामान्य ज्ञान पाहून चीड आली.तरी नशीब, लाजून तरी बोलली.तेवढेच समाधान!

आचार्य बाबा बर्वे.. Biggrin .... फारएंड...हे असले संदर्भ केवळ मराठी वाचकांनाच समजू शकतात!
त्या चेक बुक बद्दल.... मला असे वाटते की काही लाख त्या अकाउंट मधे ठेवत असतील- पेटी कॅश -म्हणून डे टू डे खर्चाला...तेच चेक बुक नाचवले सॉन्यापुढे....... ! त्याने काही पूर्ण अधिकार दिले असे नाही होत!
Happy
एकेक वाक्य आडून आडून बोलायचे ही या सिरीयलची आधीपासूनचीच खोड आहे!
मधे मधे म्युझिक, लोकांचे क्रमाक्रमाने विस्फारणारे / दु:खी होणारे/ आश्चर्य चकित चेहेरे.....!!

पाव भाजी चं काय आणि? अभिज्ञा चं....?

अणि कंपनीचा टर्नओव्हर पण काही हजार कोटींचा आहे म्हणजे दादाच्या प्राॅपर्टी व्यतिरीक्त ही पण संपत्ती आहे ना? तिथे तर विक्यालाच हक्क असणार की

आणि हे सगळे लग्नाच्या वेळेस ईशा व ईपालकांना न सांगताच लग्न केले?>> >> + १
इशा आणि इपालकांना तर विसची आधीची बायको होती. ती कशाने गेली? वैगेरेशी काहीही घेणंदेणं नाहिये.
विस आईसाहेबांचा मुलगा नसेल आणि हे पण इशा-इपालकांना सांगितलं नसेल तर ही शुद्ध फसवणुक आहे.
ह्या गोष्टी बोलल्याशिवायच लग्न पार पड्लंय.
निदान इशाने, शास्त्र म्हणुन तरी Wink ती कशी होती, कशाने गेली वैगेरे विचारलेलं तर दाखवायचं.
तिला काही पडलेलीच नाही. आताही प्रॉपर्टीतले घोळही आईसाहेब जगन घर बघ, कमल नमन कर शिकवताहेत त्या श्रद्धेने बघतेय.
द ग ड (हे टाइमपासमधल्या माधव लेलेल्या टोनमधे )

मजा येतेय वाचताना !!! प्रतिसाद वाचायला सुरुवात करतानाच कल्पना येते कि हा प्रतिसाद फारएण्ड नी लिहिला असावा, आणि ते खरेच होते. Happy

आणि परवा विक्या मायराला त्याच्यानंतर ईशा ती कंपनी सांभाळेल कशाच्या जोरावर म्हणत होता कोणास ठाउक. >> ते कारस्थानाचा भाग आहे विक्याच्या असं कालच्या प्रोमो वरून वाटलं
Isha is a stepping stone

काल मिटिंगमध्ये झेंडे बोलणार इतक्यात एक कटाक्ष टाकून त्याला थांबवतो.तिथे सुभा +++++++++++11111111++++++ >>>>> +++++१११११११ न बोलता खुप काहि बोलुन गेला... खरोखर सिक्सर मारायला चालु केलिय ..... ह्यानी त्याचे सिन्स नीट लिहीले म्हणजे मिळवल... ... केड्या ने... ना ही तर चागल्या कलाकारा ला फुकट घालवणार

काल सोनिया पण न बोलता बरच काही बोलत होती एक्स्प्रेशन्समधून.आधी आवडत नव्हती,कदाचित तेवढ काम नव्हत,पण आता सोनिया आवडायला लागली आहे.>>>>> हो खुप छान एक्स्प्रेशन्स देत हो ती.

प्रतिसाद वाचून मिळणार्या आनंदासाठीच खरतर ही मालिका मी अधूनमधून बघते.तरी बर ,आता इतक्यात कुठला सण नाही,त्यामुळे हळदीकुंकू,बेबी पालकांनी घरी येण वगैरे होणार नाही.
त्यामुळे पोळीचा लाडू बहुतेक सध्यातरी बाद.

त्यामुळे पोळीचा लाडू बहुतेक सध्यातरी बाद. >> ईथे बघून बघून आमच्या घरी पोळीच्या लाडू चं नाव काढलं तरी मुलं तोंड फिरवत आहेत

रागाच्य भरात (म्हणजे मी रागात आहे सिरीयलमुळे) फारेण्ड यांची लास्ट पोस्ट भारी आहे सांगायचं राहिलं.
ट्याम ट्याम टुम टुम>>. Lol

आता कथा नक्की काय वळण घेईल देव जाणे. माझी तर सुप्त शंका आहे की या सिरियलचा लेखक गट आपले धागे चोरून वाचत असावेत, त्यावरून त्यांना पुढील कथेची युक्ती सुचत असेल. मागच्या काही पोस्टस मध्ये कुणितरी सुभा निगेटिव्ह भुमिकेत असेल अशी शंका व्यक्त केल्याचं पुसट आठवतं आहे. Uhoh

subha ne swatahach eka surwatichya interview madhye sangitala hota ki hi negative bhumika aahe , nakki detail vicharu naka pan yewadha sangto ki purna negative shade role mi pahilyandach kartoy ,wagaire wagaire..

पले धागे चोरून वाचत असावेत, त्यावरून त्यांना पुढील कथेची युक्ती सुचत असेल. >>>

मला तर दाट शंका आहे ही! केवळ चोरून वाचत नसतील इथे एखादा आयडी घेऊन लिहीत देखिल असतील आणि लोकांना उद्यक्त करत असतील आयडिया द्यायला... Wink

तसेही मायबोलीवर डुआयड्यांची कमतरता नाही! Wink सकल डुआयड्यांनी कृपया दीपमाळ घ्यावी!

Pages