तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पण केड्या डोक्यावर आपटलेला असल्याने त्याला चहयेद्या मध्ये पिसं काढतायत म्हणजे आपण फार भारी दाखवतोय असं वाटतंय..
आज तसाच खिदळत होता तो

कारवी कुठे होतीस ग इतके दिवस, काय धमाल लिहिलंयस
आजकाल शिव्या द्यायचंही त्राण नाही मला, इतके भंपक आणि मूर्ख कसे असू शकतात लोक , काहीहीहीही दाखवताहेत!
खरच झी चा प्याक कोणीही घेऊ नका सिलेक्शन मधे, चांगली अद्दल घडेल भिकार चॅनेल ला!!

कारवी आणि farend, काय भारी लिहिलंय.
हसून हसून पुरेवाट झाली.
गड्डा आणि घाणेरी :-):-)
तुम्ही दोघे ही सिरियल बघायचं अजिबात सोडू नका.

आजचा भाग एकदम हाजमौला एपिसोड. सास र हून माहेरी आल्याने ते ही पहिल्यांदाच सर्व शेजारी चाळ्प्रेमाने जावयाला खायला घालतात. शिवाय घरचा पोळीचा लाडू आहेच. जावयाला शिळे कसे द्यायचे हा विचार येत नाही का? आणि रोज पोळ्या उरतात कश्या ? परिस्थिती सुधारलेली दिसतेय. एक दिवस पोळीचा लाडू सासूला फेकून मारेल रागाने बहुतेक. शिवाय आल्यावर पाच दहा मिनिटे बोलत वगिअरे बसतत कि नाही का लगेच मारा चालू?

मॅ ट्रिक्स रीलोडेड सिनेमात कसे निओ व ट्रिनिटी झायान सीटीत परत येतात तेव्हा त्यांच्या खोली समोर अनेकानेक झायान वासी अन्नाच्या प्लेटी घेउन उभे राहतात . माझामुलगा ह्या बोटीत आहे मुलगी त्या बोटीत आहे त्याच्याकडे बघा असे सांगून् निओला अन्न ऑफर करतात लायनीने.
तो सीन इथूनच ढापलेला आहे.

नवा विक्या कोणाला राहुल महाजन सारखा नाही का वाटत ? तोच सुजलेला चेहरा. तश्याच टाइपचे केस.
रूपाली बघून फ्रेश वाट ले. ती आडून आडून विचारते लग्नानंतर कसे वाट्ते आहे. तरी ही काही बाही उत्तरे देत असते. कप्पाळावर पाप्पा ह्या भांडवलावर काय बोलणार आणि किती खेच णार नाही का?!

आई पोळीचा लाडू
सावंत घरचा चिवडा
माइण कर का माहीम कर : कचोरी बाजारात जाउन आणलेली.
बिपिन शाही मिठाई
पटेल जिलेबी
ढोकळा व चटणी.
तीन चार रँडम बायका असेच काय काय स्नेक्स.
एक माणूस त्याची कोकणी बोलणारी बायको( जावईबापू इल्यात) पोहे दाणे घालून केलेले व त्यानंतर कोकम सरबत
एक कर्नाटकी मानूस : चंदनाच रिसायकलड हार.

कोणतरी दुकानातून मग पाचक रस.
मग एक माणूस हार मिठाईवाला हेल्प्फुली सांगतो की आमच्याक डे वेस्टर्न टॉयलेट आहे म्हणून.

मग बाबा म्हणतात रात्री पिठले भाकरी व ठेचा कर. व विक्या म्हणतो रात्री इथेच राहायचे म्हणून. हाउ क्वीट.
मग एक सो कॉल्ड कसे रात्री तुम्हाला झोप येइल वगैरे संवाद होतात. त्यातही शेजारी मध्ये मध्ये येतातच.
सुभा इज लुकिन सिक.

मग इशा हॅज अ वरिईड लुक इथे संपतो एपिसोड. उल्लू बनवतात प्रेक्षकांना ही ही.

मायराला माहिती आहे का ?? Calories किती भरल्या ???
एक कर्नाटकी मानूस : चंदनाच रिसायकलड हार.>>>> हा कोणाच्या फोटोला घालायला ?????

सुबोधला काहीतरीच काम करावं लागतंय. चांगला पण दिसत नाहीये सद्ध्या. पूर्वी गोड गोड फ्लर्ट करायचा ते छान होतं पण आता लग्न झाल्यामुळे त्यांची गोची झालीये. ते दोघे एकमेकांबरोबर फारसे कंफर्टेबल वाटत नाहीत. चेहर्यातून, डोळ्यांतून प्रेम दाखवणं ठीक आहे पण खरा खरा रोमान्स दाखवणं कठीणच आहे तिच्याबरोबर त्यामुळेच रोज एक पापावर तोडपाणी केलंय.

अरे तुपारेचा चला हवा येउद्या मधला पहिला प्रहसनात्मक भाग मसत आहे. मी ऑफिसला तयार होताना लावला होता. रात्री परत बघीनच. पुण्यात म्हणून त्यांनी चांगले जोक्स घातले आहेत. इशाची आई प्रत्यक्षत् पण जा डी दिसते. औवा. सर्व कास्ट आलेली आहे. इशाच्या हसण्याचा साउंड इफेक्ट एकदम जबरी बेकार आहे. ती काळा ड्रेस व विक्या बहुतेक लाल धोतर व ओढणी व पांढरा सदरा आहे. काय वेळ आली एक्टर वर नुसती
शिळी आय कँडी बनून आहे. म्हणजे आयांसाठी आय कँडी. ही ही ही. फॅन्स हलके घ्या. प्यार एक धोका है.

काल ती त्याला सुबोध दादा म्हट ली तर प्रेक्षकांतू न कोणी तरी सर म्हणा सर ओरडले. सुरू केले बोलायला तेव्हा आवाज खरखरीत आला मग तिने काहीतरी अ‍ॅडजस्ट केले. भरपूरच मेक अप केला आहे.

चला हवा येऊ द्या पाहणं कधीच बंद केलय पण तुपारे वर होतं म्हणून पहिलं. हसून हसून मेले मी. याच तर दिवसाची वाट पहिली होती.
मध्ये इथेच कुणीतरी लिहिलं होतं एका एपिसोड मध्ये तुपारे ची वाट लावली आहे तेंव्हा पाहिलं होतं पण त्यावेळी इशा नव्हती . आज इशाही होती आणि बाकी टीम ही . तिने आणि टीमने स्वतः वरचं स्किट बघणं आवश्यकच होतं .
इतकी उडवली आज कि बास !!
पण सुधारतील का हे लोक ?

ती गायत्री किती भयाण हसते.>>> +१११११११
आणि तिचं भयाण हसणं ही कव्हर केलं that was the best part.
Shreya Bugade was at her best as Myra and the another Issha

इशा भयाणच हसते, स्किट चालु असताना मधुन मधुन तिचे हसणे इतके भयाण वाटत होते, तुला पहतेच रे! इकडून चोरल का हवा वाल्यानी? श्रेयाची मायरा मस्तच होती.

फ्रेम-प्रेक्षक-सीन मधले लोक नियमाप्रमाणेच या सिरीजचा आणखी एक नियम आहे: डोळ्यासमोर असलेली व्यक्ती जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत दिसत नाही. ओपनिंग सीन मधे खिडकीतील ईशा-विक्या तिच्या आई च्या पासून निमकर बसले होते तशीच अगदी भौतिकशास्त्राप्रमाणे सरळ रेषा पुढे खेचली, तर जेथे उभे असतील तसे उभे आहेत. पण ईशा बोलत नाही तोपर्यंत स्वतःच्या घराच्या खिडकीत समोर असलेले हे दोघे ईशाच्या आईला दिसत नाही.

घराच्या खिडकीत कोणी आले तर अगदी इन्स्टिंक्ट वर लगेच आपले लक्ष जाते. इथे त्याचाही पत्ता नाही.

आज संवाद आणि त्यावर माना डोलावणे याचा ताळमेळ गंडला आहे. सर ब्रेकफास्ट करून आलेत यावरही निमकरांनी आश्चर्याने मान डोलावली.

लग्नानंतर कसे वाटत आहे यावर ईशा लाजली. सभ्य ठिकाणी कमरेखालचे विनोद करत नाहीत तसे या सिरीज मधे गालाखालचे विनोद करत नाहीत.

ईशाच्या घरापलीकडेच सार्वजनिक टॉयलेट्स असल्याने चाळकर्‍यांना त्या जनरल एरियात लाइन लावायची सवय असावी.

श्रेया मस्त होती मायरा म्हणून...विशेषतः तिचे अभिज्ञा सारखे वारंवार नाक ओढणे व रडणे......
"पण...मी पहिला नंबर लावला होता..." असं ती (मायरा)म्हणते...तेव्हा..." सर म्हणजे काय गॅस सिलेंडरे का नंबर लावायला...?" या डायलॉग ला फार हसायला आलं... मस्त एपिसोड होता च ह ये द्या चा.. काहीकाही अर्थातच अतिशयोक्ती!
पोळीचा लाडू.. !! Angry

आत्ताच थोडा पाहिला. सुरूवात एकदम भंकस. तेच ते उंची/जाडीवरचे टुकार विनोद. गार्गी फुले-थत्ते समोर असतानाही करत होते. जीवनसाथी निवडला म्हंटल्यावर कोणता इन्शुरन्स घेतला हा एकच चांगला जोक होता.

श्रेया बुगडे च्या एण्ट्रीनंतर जरा पिक अप घेतला आहे. पुढे पाहू. मायराची प्रतिक्रिया धमाल आहे. ईशा खरेच भयाण हसते.

#पुन्हापुन्हापोळीचालाडू#

घरी आलेल्या जावयला शिळ्या पोळीचा लाडू ) अत्यंत जबरदस्तीने खायला घालणार्‍या सासुला तोच लाडू फेकुन का मारु नये?

अरे जावई आलाय तर शिरा कर खीर कर काही नाही तर छान जेवण होईपर्यंत चहा बिस्किट चिवडा दे पुढ्यात. तर नाही ह्यांचे पो ला.
दोन माणसासाठी निमकरीण अशा किती पोळ्या करते ज्या उरतात आणि त्याचे लाडू घडतात. का मुद्दाम उरवते? द वर्ल्ड फेमस पो लाडू करण्यासाठी?

>>तेच ते उंची/जाडीवरचे टुकार विनोद.
हे प्रकार असतात म्हणून मी हे कार्यक्रम बघत नाही. फार चुकीच्या दिशेने चालू आहे सगळं.

>>#पुन्हापुन्हापोळीचालाडू#
त्याला शुगर आहे ना?? तरीपण गोड खायची बळजबरी? ह्यांना मायराच हवी.

या सिरीजवाल्याने तो 'इजाजत' मधला गाणे व प्रसंग लिहीला असता तर अनुराधा पटेलने 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' म्हंटल्यावर नासिर लगेच "थांब. आणून देतो" म्हंटला असता.
>>> Rofl Rofl Rofl

च ह ये द्या कुठे बघायला मिळेल
झी ५ वर लेटेस्ट एपि सापडले नाहीत.. तु नळीवर २ मिन चा व्हीडू आहे
घरी टीव्ही नाहीये

Happy
पण लॉजीकली...आपल्या घरात दुसर्‍याचं काही सामान 'पडलं' असेल तर आपल्याला कळेलच की ते.... आणि ते आपण ठेवून ही देतो एका बाजूला...तो पुन्हा आला की देऊ म्हणून! :-)... म्हणजे नसिरुद्दीन ने तसं खरं तर म्हणायला हवं होतं!

तसंच ईशाला ही वाटलं असेल की खोलीत गेल्यावर दिसेलच त्याची काय वस्तू राहिलीए ते...!!!

Biggrin
(हे उगीच आपलं केड्याला डिफेंड करायसाठी हं....!!!)....

चहयेद्या मध्ये लठ्ठपणावर जरा जास्तच टीका झाली, ती पटली पण नाही. पण काल शर्वरी पाटणकरचा चेहेरा खरच पडला होता. केड्या व शर्वरी लिहीत असलेल्या पटकथेची काय माती होतेय हे तिच्या लक्षात आले, पण केड्याच्या नाही. आणी ईशाबाळ अगा काही घडलेची नाही या अविर्भावात वावरत होतं. कुशल बद्रिकेची एंट्री धमाल होती. Proud

मला आवडते चहयेद्या. काही विनोद, प्रसंग ओव्हर होतात, पण चेहेर्‍यावर हसू येते ते कमी नाही.

तेच ते उंची/जाडीवरचे टुकार विनोद >>> खरच. Angry एरवी च ह ये द्या बघत नाहीच पण ईबाळाचे काम करणारा तो कलाकार भारी काम करतो म्हणून हे चार दिवस बघणार आहे.

Pages