तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हवा येऊ द्या मी पण नाही बघत नेहमी.. त्यामध्ये विनोद वेचावे लागतात... चांगले निघाले ते गोड मानून घ्यायचे .. काही पंच सही बसतात.. ऍक्टर्स पण चांगले आहेत..
कालचे ईआई वरचे जोक्स खरच ऑकवर्ड होते.. जरा अतीच झालं.. शर्वरी पाटणकर हिरमुसली दिसत होती..
ईशा .. मायरा .. सुभा.. आणि एकूण कथेची उडवलेली मज्जा आवडली

ईबाबानी खऱ्या आयुष्यात लग्न केलं नाहीये.. त्यांचं लग्न लावलं खोटं खोटं .. ते पण ऑकवर्ड होतं..
इशाला तिच्या अनुभवाबद्दल विचारलं असता काहीही बोलली ती

बाकी इशाने अभिनयात नाही पण हसण्याच्या बाबतीत मात्र प्राथर्ना बेहरे ला टक्कर दिली @चहयेद्या >>>>>>>> ++++++++११११११११

आजचा भाग एकदम हाजमौला एपिसोड. >>>>>>> कहर होता कालचा एपिसोड. वाटल होत, थोडयाच वेळात ईनोची जाहिरात करतील की काय आता. 'जमाईबाबू, एक और लड्डू' Lol बर निमकर सुद्दा जावयाची मज्जा पाहत बसले होते. विस म्हणत असेल, 'कुठल्या जन्मीचा सूड उगवतायत निमकर आपल्यावर?

आईसाहेब विसच्या सासूबाई आहेत याची हिन्ट काल विसनेच दिली, " जावई सासूच्या घरी राहू शकत नाही का?"

विसच्या गळयात हारतुरे काय घालतात, दोन शब्द सन्देशपर बोला विचारतात. अरे, विस काय तुमच्या चाळीच्या वेस्टर्न टॉयलेटसचे उदघाटन करायला आलाय काय?

रुपाली सुद्दा विसला 'जिजू' न म्हणता सर म्हणते. Sad ती विसला 'एकदम टकाटक' म्हणाली, 'कडक' शब्दाचे कॉपीराईटस फक्त कलर्स मराठीकडे आहेत वाटत.

मायराला माहिती आहे का ?? Calories किती भरल्या ??? >>>>>>> आता कशाला ती Calories मोजत बसेल. विक्याने तिच्याकडून (ईशाने त्याचे कान भरल्यामुळे) डाएटिशियनच पद काढून घेतलय ना.

नवा विक्या कोणाला राहुल महाजन सारखा नाही का वाटत ? तोच सुजलेला चेहरा. तश्याच टाइपचे केस. >>>>>>>> मला वाटला
बहुतेक गोळ्यांमुळेच तो विचित्र वागत असावा. त्यामुळे विसला त्याला बिझनेसपासून लांब ठेवणे सोपे जात असेल. >>>>>>> +++++++२२२२२२

अरे तुपारेचा चला हवा येउद्या मधला पहिला प्रहसनात्मक भाग मसत आहे >>>>>>>> अगदी अगदी श्रेयाची मायरा परफेक्ट झाली होती. श्रेया अभिज्ञाची मैत्रीण असल्यामुळे तिच्या लकबी उचलणे तिला सोप्प गेल. बिपिनचा डान्स मस्त होता.

कालचे ईआई वरचे जोक्स खरच ऑकवर्ड होते.. जरा अतीच झालं>>>
अगदी अगदी...
कालच्या चहयेद्या पेक्षा त्यांनी मागे १-२ वेळा सुभा आला होता तेव्हा तुपारेची उडवली होती ते जास्त भारी होतं..
काल बॉडी shaming च वाटलं जास्त.

>>>>इशाला तिच्या अनुभवाबद्दल विचारलं असता काहीही बोलली ती
सुबोध दादा असे संबोधून बाळाने मालिकेच्या टीआरपी च्या फुग्याला टाचणी नाही कुदळ लावली आहे. Proud

चहेद्या नक्कीच स्ट्रेस्बसटर आहे... प्रासंगिक विनोद आणि शाब्दीक कोट्या या बहुतांशी मनोरंजक असतात पण काही काही वेळा तेही घसरतात...! चालायचेच.

काही काही वेळा तेही घसरतात...! चालायचेच.>> हो मी पण सोडून देते. पूर्ण राज्याचा लसावि आहे करमणुकीचा.
माझं वजन कमी केल्याने मला आपल वैयक्तिकली वाट्ते त्यांनी कमी करावे बाई. इतके वजन बरोबर नाही. पोळीचा लाडू चकल्या बंद म्हणजे बंद. बट हर लाइफ. नो जजिंग. अ‍ॅक्टिंग करतात छान . आमच्या एक काकू होत्या अश्या प्रेमळ अघळ पघळ व जाड. उरले सुरले संपवत . गरीबीचा चार पोरांचा संसार. काही वाया देउ जायचे नाही. असतात अश्या स्त्रिया.

त्यामध्ये विनोद वेचावे लागतात... चांगले निघाले ते गोड मानून घ्यायचे .. काही पंच सही बसतात.. ऍक्टर्स पण चांगले आहेत.. >>> मला साधारण असेच वाटते. एका भागात २-३ जबरदस्त कॉमेन्ट्स्/पंचेस असतात. बाकी सगळा गाळ. मी अनेक दिवसांत पाहिलेले नाही पण ते मूळचे चार कलाकार - भाउ कदम, श्रेया बुगडे, कुशाल बद्रिके आणि भारत गणेशपुरे - आणि छोटे रोल करताना किंवा बाहेरून त्यांना जमिनीवर आणताना निलेश साबळे - हे खरे जबरी आहेत. पण स्क्रिप्ट मधे पाट्या टाकल्या की फालतू जोक वर निभावून न्यावे लागते. पब्लिकही कशालाही हसते.

मी पण मालिका बघत नसले तरी हल्ली हा धागा वाचते. धमाल आहे! काल चहयेद्या पण पाहिलं Happy काही काही जोक्स मस्त होते ( सिलेंडर वगैरे)
ईशा पण भारी जमली होती! एस्पे. कुशल बद्रिके मधेच धडकन मधल्या सुनिल शेट्टी चे बेअरिंग घेऊन ओरडायला लागल्यावर ईशा भोकाड पसरते तो भाग Lol मला झेंडे आणि पायजमे चा दोस्ताना अँगल पण फनी वाटला Happy

आजचा एपी इथे कुणीच पाहिला नाही का????

मी पाहिला, रादर बघावा लागला Angry

लो बिपिवर रामबाण उपाय आहे आजचा एपी, नाही वाढले न बिपी तर बघाच

काय ते लुंगी अन ऑल
अरे आजकाल अंकल लोकं देखिल लुंगी वापरत नसावेत, अन बाकीचे तिघे चांगले ड्रेसप असताना , हा म्हातारा लुंगी नेसून पान आणायला गेला.
बाकी ते चौघे एकत्र बघून मला रुपाली अन टिल्लू आवडले, छान वाटले एकत्र ☺️

अन तो झोपायचा प्रकार तर केवळ म हा न होता, चांगले मोठे आहे की घर, चार अंथरूण एकत्र घालून चौघेही आत झोपू शकले असते की, नाही मिळाली एक रात्र प्रायव्हसी तर त्यात काय एवढे.
कल्पनेची दारिद्र्य सीमा म्हणतात ती हीच असावी कदाचित

इशाचं हास्य....बापरे आहे अगदी..>>>>> हो खरंच.. ती अशी खरंच हसत होती का? की चुकीचा ऑडिओ पीस जोडला गेला होता? प्रार्थना बेहेरे अशी हसते ते माहितीये तिचाच प्रिरेकॉर्डेड आवाज वाटला. Proud
सुभा काय आणि खांद्यावर एक साईड शाल टाकून आला होता. फारच बेकार.
पान खायला जातात, एक चक्कर मारू म्हणतात हेच जरा नॉर्मल वाटलं आजच्या एपिमधे.
ईबाबा आता काय काम करायला जातात?
ईआई सारखे पोळीचे लाडू करते कारण ती कुठेतरी पोळ्या लाटायच्या कामाला जाते ना? तिथून उरलेल्या आणत असेल. Proud

प्रार्थना बेहेरे अशी हसते ते माहितीये तिचाच प्रिरेकॉर्डेड आवाज वाटला. >> प्रार्थना खुपच बेअरबेल आहे, तिच हसण फनी तरी वाटत हिच म्हणजे भयाणच आहे , प्रश्नाना उत्तर पण मन्दपणे देत होती.

पण़ खरेच ती इशा उर्फ गायत्री दातार रियल मध्ये पण अशी भयानक हसते. .अहअहअहह..
चला हवा येवु द्या ह्या आठवड्यात इतकी चेष्टा केली की कधी न्हवे ते चहयेव्या पहायला मजा आली.
तिथे तिचे हसणे स्पिकरवर एकदम एकु येत होते.
मी सिरियल रोज पहात नसल्याने सगळे पंचेस कळले नाही पण अभिज्ञा भावेची सगळ्या सिरियल मध्ये तशीच नाक फुगवायची अँक्टींग मस्त केली श्रियाने.

विकिशा लग्नाच्या वेळी TV18 वर त्यांची मुलाखत घेतली होती ती पाहिली नाही का इथे कोणी???
सुभा बोलला होता की तिला ब्लुटूथ गुदगुल्या होतात, अन त्याने नुसते बोट हिच्याकडे केले तर किती विचित्र हसली ती

#पुन्हापुन्हापोळीचालाडू

घरी आलेल्या जावयला शिळ्या पोळीचा लाडू ) अत्यंत जबरदस्तीने खायला घालणार्‍या सासुला तोच लाडू फेकुन का मारु नये?+111111

चहयेद्याचे कालचे पंचेस जबरदस्त होते.
विशेषकरून हे उगाच मोठे आकडे फेकतात त्याची मस्त उडवली. ४ देशातील हळद तर कहर होता. आम्ही मान्य केलंय तुम्ही श्रीमंत आहात उगाच काहीपण बोलू नका असा डायलॉग होता बद्रिकेचा

प्रार्थना बेहेरे अशी हसते ते माहितीये तिचाच प्रिरेकॉर्डेड आवाज वाटला. >> प्रार्थना खुपच बेअरबेल आहे, तिच हसण फनी तरी वाटत हिच म्हणजे भयाणच आहे , प्रश्नाना उत्तर पण मन्दपणे देत होती.>>>>> +१.
चहयेद्यामधे मस्त टर उडवली आहे.

प्रार्थना खुपच बेअरबेल आहे, तिच हसण फनी तरी वाटत हिच म्हणजे भयाणच आहे >>> म्हणूनच बहुतेक तिला सिरियलमधे रडायचे काम दिले आहे. हसली तर पंचाइत.

याचसाठी सुभाने केला होता अट्टाहास,ही मालिका करण्याचा.

Submitted by UP on 6 February, 2019 - 07:32>>>
अब आयेगा मज़ा..
फक्त केड्याने माती खाऊ नये.

केडी अति सुमार लेखक आहे. इथे जावयाला भरपूर खायला घालायचे आले. लगेच मानबा मध्ये श नाया घरात पाण्याचा नळ सोडून तशीच बाहेर निघून जाते गुरू ला भेटायला. आल्यावर पोट बिघ डले म्हणून डॉक्टर कडेगेले अशी थाप मारते तर राधाक्काने काय करावे? सर्वांना बोलवले ऑफिसातल्या व पार्टी ठेवली श्रिखंड पुरी व नागपुरी पदार्थ. गुरू व शनायाला बोलावले व तिला कार्ल्याचा रस दिला पोटासाठी. हा खरेतर मधुमेहींना देतात ना? व गुरूला काल सर्व पैजा मारून अन्न तोंडात कोंबत होते. त्याला ३२ वाट्या श्रीखंड खायला लाव णार आहे तो मॅड सौमित्र. एकच कल्पना एकाच दिवसी दोन्ही कडे!!!

बाकी तो चाळीत रूम मध्ये झोपायचा भाग अगदीच फिलर एपिसोड. रुपाली व बिपिन नेहमीप्रमाणे छान. इशाला लग्ना बद्दल खरेच काही माहीत नाही का? शाहरूख बरोबर पळून जाताना काजलला वाट्ते तसे वाट ले म्हटली लग्न झाल्यावर. पुढे काही असते वगैरे?
चहये द्या कालचा भाग मला सुमार वाटला. तेच तेच जोक होते. झेंडेचा नाच. लग्न पत्रिका, संगीत वगैरे जयदीपचा पार्ट चांगला बनला होता स्किट मध्ये.

काय बोअर एपिसोड. फक्त विक्या ची लुंगी एण्ट्री होते तेव्हा बॅकग्राउण्डला म्युझिक मस्त होते

आज पुन्हा मुंबईच्या गल्ल्यांमधे रमतगमत म्हणजे धोका पातळी शून्य दिसते. उद्या परवा अचानक वाढेल.

विक्याला पलंगतोड पान देतात तेव्हा ते तो तेथेच खातो हे नशीब. हे पान निमकर हाउस मधे टेबलवर ठेवले गेले तर त्यातून काय काय शक्यता निर्माण होतील कोणास ठाउक. "अगंबाई, निमकरांनी मलाही पान आणलं वाटतं" टाइप

याचसाठी सुभाने केला होता अट्टाहास,ही मालिका करण्याचा.
.>>>>>>>>>>>>
हो बर झालं.. खोटी खोटीची भातुकली बोअर झाली होती..
पण आधी जे काय काय दाखवलं आहे त्याच एक्सप्लेनेशन पण मिळायला हवं.. म्हण्जे असच होत तर मग सुभाने यावेळी असं का केलं ? त्यावेळी असं का म्हणाला ई.

येस्स..आनंदी..मलापण असं वाटतं.. की आधीच्या प्रत्येक प्रसंगाची कारणी मीमांसा द्यायलाच हवी जेव्हा एखाद्या भूमिकेला कलाटणी देता तेव्हा...!!

Pages