तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी आता नव्या टीव्ही च्या चॅनेल निवडीनुसार झीचे चॅनेल न घेण्याच्या निर्णयावर ठाम झालो आहे! >>> मी नाही घेतलं झी मराठी. अजून सगळीच channels दिसतायेत मात्र.

दक्षे Lol

दक्षे, तू ती तोंडल्याची कोशिंबीर खाल्लीस काय गं? >>> Lol

दक्षि झी मराठीच्या सिरीयलवर लिहिताना, तोंडली तोंडात ठेऊन लिहिते नेहेमी Wink .

मला वाटतं ईशासारखी मठ्ठ अभिनेत्री घेऊन मालिकेचा TRP वाढविण्याचा त्यांचा मनसुबा असावा! Lol
च ह ये द्या बघावे लागेल. यु tube वर त्यांनी एपिसोड टाकले की बघता येईल कारण आमच्याकडे अजूनतरी झी मराठी घेतले नाही.
धाकटी लेक भारतातून आल्यापासून सतत शनायाची काळजी करत असते. आजीला मधून मधून फोन करून शनायाचे काय झाले हे विचारत असते.
त्या सिरियल चं ठाण्यात शूट सुरू होतं तेव्हा नेमकं तिने गुरु आणि शनायाला बघितलं होतं. Lol

दक्षि झी मराठीच्या सिरीयलवर लिहिताना, तोंडली तोंडात ठेऊन लिहिते नेहेमी >>>>>>>>> Rofl

फेसबुकवरची रेसिपी मात्र मस्तय Happy

धाकटी लेक भारतातून आल्यापासून सतत शनायाची काळजी करत असते. आजीला मधून मधून फोन करून शनायाचे काय झाले हे विचारत असते. >>>>>>>>> नवीन प्रोमोमध्ये राधिका शनायाला कारल्याचा ज्यूस भरवताना दाखवलीये.

हे बघा:
https://www.youtube.com/watch?v=mLVGD9yetHo&t=15s

मिथुन चक्रवर्तीच्या सायकलच्या मागे "लपून" गोळी मारण्याचा पोस्टर फेमस आहे. काल त्याच्या तोडीचे लपणे विक्याने आणि ईशाने सादर केले. त्या इंग्रजी यू आकाराच्या, व दोन खांबाच्या मधून विक्या सहज दिसेल अशी गॅप असलेल्या जागेमधे विक्या "लपला" आणि ईशाला तो तीन हाका मारूनही दिसला नाही. एकतर ती हाकेच्या दिशेलाही पाहात नाही. फक्त सरळ रेषेत मागे पाहते. परवाही जशी फ्रेम पडलयवर भिंतीकडे न पाहता सरळ स्वतःच्या पायाशी पाहात होती.

बाकी ते विक्याच्या कोट/जॅकेटशी बोलणे, सॉन्याची भंकस वगैरे सगळेच बोअर.

ईशाला असलेल्या धोक्यामुळे ऑफिसला जात नाही म्हणे. परवा मुंबईच्या गल्ल्यांमधे फिरत होती रॅण्डम, बाबांना शोधायला. बहुधा ४-५ दिवस घरगुती ड्रामा दाखवल्यावर यांना लक्षात आले असेल की तिच्या ऑफिसला न जाण्याचे काहीतरी कारण दाखवायला हवे. मग तो हंगामी धोका आठवला. वास्तविक एकाच घरात राहणारे आईसाहेब आणि विक्या हे सगळे हा विषय तो ऑफिसला जात असताना फोनवर कशाला बोलतील? ईशाच्या हातात ते चेकबुक देताना किंवा त्या आधी कधीतरी हा विषय निघालाच असेल की.

मात्र सर्वात भन्नाट रोमॅण्टिक भाग म्हणजे ईशाला मोठ्ठे सरप्राइज हे की तिला माहेरी आणणे! कल्पना करा. तुम्ही काही दिवस बाहेर कोठेतरी राहून मग टॅक्सीने घरी येत आहात. तुम्हाला आपण आपल्या घरी चाललो आहोत हे कधी लक्षात येइल? एखादे ओळखीचे वळण, नेहमीचे दुकान, नेहमीच्या येण्याजाण्याचा परिसर कोठेतरी क्लू लागेल. ईशाला केव्हा कळते? गाडी पार चाळीसमोर येउन त्यातून ती दार उघडून बाहेर येउन समोर चाळीकडे पाहते तेव्हा. तोपर्यंत नाही.

मात्र सर्वात भन्नाट रोमॅण्टिक भाग म्हणजे ईशाला मोठ्ठे सरप्राइज हे की तिला माहेरी आणणे! >>आत्ताच लग्न झाले आहे ना....इतक्यात माहेरी परत आणलीही?
हे बाळ तिकडे भातुकली खेळते आता विस इकडे चाळ-चाळ खेळणार.

विक्या तिला बाहेर फिरायला घेऊन गेला का की सरळ चाळीतच आणून सोडलं. निमकर आधीच्या चाळीतच राहतात की घर बदललं त्यांचं. श्रेयाने जी काही मायराची नक्कल केली आहे त्यावरून सोमवारचा एपि धमाल असणार आहे.

मात्र सर्वात भन्नाट रोमॅण्टिक भाग म्हणजे ईशाला मोठ्ठे सरप्राइज हे की तिला माहेरी आणणे! कल्पना करा. तुम्ही काही दिवस बाहेर कोठेतरी राहून मग टॅक्सीने घरी येत आहात. तुम्हाला आपण आपल्या घरी चाललो आहोत हे कधी लक्षात येइल? एखादे ओळखीचे वळण, नेहमीचे दुकान, नेहमीच्या येण्याजाण्याचा परिसर कोठेतरी क्लू लागेल. ईशाला केव्हा कळते? गाडी पार चाळीसमोर येउन त्यातून ती दार उघडून बाहेर येउन समोर चाळीकडे पाहते तेव्हा. तोपर्यंत नाही. >> Biggrin .. हे भारीए..!!
फार एंड तुमच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीला दाद द्यावीशी वाटते.
फारच मस्त.
Happy

बहुतेक शितु ला वेळ नसावा किंवा ती ह्या मालिकेत काम करावे की नाही ह्याचा पुनर्विचार करत असेल म्हणून हे अस विस चाळीत येण्याचे सीन्स दाखवत आहेत. कोणी नोटीस केलय का, त्या रूपालीचे वडील लग्नापासून गायब आहेत. बाकी चाळकरी आधी विकिशा ला नावं ठेवायचे ते दिड लाखाची पत्रिक वगैरे बघुन पाघळले तसे ते वागणार नाहीत म्हणून त्यांना गायब केलं का ?

ते ईशा हाक मारुन किचन मधे लपुन रहाणे.. काय वेड्यासार्ख होतं.. ईशा पण एकतर सरळ बघत होती आणि ४-५ पावलंच पुढे जात होती.. आपण नॉर्मली झपझप पुढे जाउन बघु ना कोण आहे ते..

शितु येणार तर आहे.. तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट्वर नवर्यासोबत फोटो टाकुन तिने तुला पाहते रे लिहिलं आहे आणि सुभा पण टॅग केलं आहे..

रुपालीचे वडील कधी दाखवले? >>>> ओह्ह सॉरी, ते बिपिनचे वडील आहेत, ते कायम पडीक असायचे ना माझा गोंधळ झाला........

ती दार उघडून बाहेर येउन समोर चाळीकडे पाहते तेव्हा. तोपर्यंत नाही.>>> तो प्रसंग पाहताना हेच वाटलं आणि मग तुझाच चित्रपट विषय नियम आठवला -
१. कॅमेर्‍याच्या फ्रेम मधून आपल्याला दिसले तर त्या प्रसंगातील कलाकारांना कोठूनही दिसते, आपल्याला दिसले नाहीतर त्यांनाही कोठूनही दिसत नाही.
Biggrin

सॉनयाचा मुद्दा पटणेबल होता. विसने त्या खोलीबद्दल आपल्या हक्काच्या बायकोला सान्गायला नको का? एरव्ही ' आय ट्र्स्ट यू, आय ट्रस्ट यू' करत असतो.

जयदीप छान बोलला परवा . सॉन्याला व्यवस्थित समजावून सान्गितल. मग बाकी हा वेडयासारखा का वागतो? त्याला खरच गोळयान्ची गरज नाहीये अस वाटत. फक्त त्याने विसला मदत करावी बिझनेसमध्ये. भयानक आयडियाज देण बन्द कराव.

बाकी ते विक्याच्या कोट/जॅकेटशी बोलणे >>>>>>> आवडल मला ते. पण गायत्रीऐवजी दुसरी असती तर सहणेबल झाल असत बघायला/ ऐकायला. सासूबाईन्ना मॅनर्स नाहियेत का, नवीन सुनेच रोमॅन्टिक बोलणे चोरुन ऐकत होत्या. Sad

काल त्याच्या तोडीचे लपणे विक्याने आणि ईशाने सादर केले >>>>>>> +++++++++११११११११ ईशाने मागे वळून पाहिल्यावर विसने जी काही स्माईल दिली ती मात्र किलर होती.

ते बिपिनचे वडील आहेत, ते कायम पडीक असायचे ना >>>>>>>>>> त्यान्चा सप्लायचा का कसलातरी बिझनेस होता ना?

शितु कोण आहे? >>>>>>> शिल्पा तुळसकर. राजनन्दिनी विसची पहिली बायको

ते इशा हाक मारण्याच्या किचनवाल्या प्रसंगात.. इशा वळून बघते आणि म्हणते ''सर तुम्ही तुमच काही राहील का थांबा मी आणून देते'' आणि लगेच वळून रूमकडे जायला निघते आणि सुभा तिला थांबवतो "जे राहिलं ते इथेच आहे" म्हणून..
पण इशाला त्याच काय राहिलं ते माहीतच नाही तर काय आणायला निघाली होती..
पुढच्या आठवड्यात लग्न.. हॉटेलात जेवायला.. तसच काहीतरी राहिलं

फक्त त्याने विसला मदत करावी बिझनेसमध्ये. भयानक आयडियाज देण बन्द कराव.>>> बहुतेक गोळ्यांमुळेच तो विचित्र वागत असावा. त्यामुळे विसला त्याला बिझनेसपासून लांब ठेवणे सोपे जात असेल.

साईसुट्ट्यो... आनंदाचा दिवस.... पाहुणे गेलेले आहेत. आता हे शून्यरंजन बघणे गरजेचे नाही. काही प्रश्न --

१. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, कुणी निंदा कुणी वंदा, कडू कारले, गाढवापुढे वाचली गीता, निंदकाचे घर असावे शेजारी, दुनिया झुकती है, इत्यादि म्हणी सोदाहरण स्पष्ट करून मराठीची सेवा करणे हे सरंजामेंचे उद्दिष्ट आहे का?

२अ. कुकर घेताना असलेली 'खर्चासाठी प्रत्येकाला स्वतःचे कार्ड ' संकल्पना चेकबुकमधे कशी बदलली?

२ब. मायरा -- सॉन्या -- ईशा -- मग मोठेपणाचा अधिकार म्हणून आईसाहेब = चेकबुकच्या निर्णयाधिकारी, तर मग आधीपासूनच का नव्हते असे?
तेव्हा आईसाहेब पुरेशा मोठ्या नव्हत्या / मायरापेक्षा लहान होत्या? की मधल्या काळात त्यांनी MBA by Correspondence करून स्वतःला घडवले? घर सांभाळण्यासाठी...?

३. टेडी बेअर कवटाळ्णे आणि प्रेमपात्राला / नवर्‍याला बिलगणे यात फरक आहे का? 'हो' असल्यास तो दिसणे अपेक्षित आहे का? तसा वैयक्तिक अनुभव किंवा माहिती नसेल तर, इतर सिनेमात बघून शिकणे कठीण असते का?

४. नवर्‍याने सॉरी म्हटल्यावर मिठी मारताना, वशिंडावर जोर देऊन खांदा १-२ इंच वर उचलणे म्हणजे मिठी घट्ट / भावनाप्रधान करणे नव्हे, हे मुख्य नायिका म्हणवणार्‍या व्यक्तीला कळणे गरजेचे असते का?

नसल्यास दिग्दर्शकाच्या ते लक्षात आल्यावर तसे सुचवणे / रिटेक घेणे शक्य नसते का? ( तसेही, नवोदिताना अवघडल्यासारखे होऊ शकते म्हणून दोघांमध्ये धरायला कपड्यांचा गठ्ठा दिलाय ना? )

५. १५०-२०० भागांनंतरही आपण १०००% नवोदितच राहणार असू आणि भूमिकेचा अभ्यास, सहकलाकारांचे निरीक्षण, स्वतःचा विचार, आधीच्या चुका सुधारणे यासाठी कष्ट घ्यायचे नसतील तर मग घरीच बसायला काय हरकत आहे?

६. जिवाला धोका करणारी माणसे घरापर्यंतही आलीच होती. पावलीकम मेंबरं ऑफीसपेक्षा घरात जास्त संख्येने आहेत. मग घर जास्त सेफ, प्रवास / ऑफीस कमी सेफ कसे काय?

७. चावी पुढ्यात टाकण्यापेक्षा ओढत सोबत नेऊन समोर उघडून दाखवणे जास्त प्रामाणिक नव्हे काय? (अर्धा-एक डझन जास्तीचे सर, सsssर, सssर्र, सssर्रss ऐकले असते की लोकांनी निमूट. )

८. चावी फेकल्यावर जवळून दिसणार्‍या मॅगेझिनवरचा मजकूर ब्लर करायचा कळतो, पण ते नवे हवे, विटलेले, घड्या पडलेले, रद्दीच्या गठ्ठ्यातून आणल्यासारखे दिसू नये हे नाही कळत?

यांना बडवा रे..... बडवा कुणीतरी बेदम.....
फु. स. -- सगळी नावे आठवत नाहीत कोण कोण, पण इथे लोक फुलावर फूल आपटायची वाट बघतायत. त्यांनी स्वतःच कॉलीफ्लॉवरच गड्डा आणि घाणेरीचा गुच्छ एकमेकांवर आपटून पहावा. गुणात्मक दृष्ट्या दोन्ही सीन एकच.

मात्र सर्वात भन्नाट रोमॅण्टिक भाग म्हणजे ईशाला मोठ्ठे सरप्राइज हे की तिला माहेरी आणणे! कल्पना करा. तुम्ही काही दिवस बाहेर कोठेतरी राहून मग टॅक्सीने घरी येत आहात. तुम्हाला आपण आपल्या घरी चाललो आहोत हे कधी लक्षात येइल? एखादे ओळखीचे वळण, नेहमीचे दुकान, नेहमीच्या येण्याजाण्याचा परिसर कोठेतरी क्लू लागेल. ईशाला केव्हा कळते? गाडी पार चाळीसमोर येउन त्यातून ती दार उघडून बाहेर येउन समोर चाळीकडे पाहते तेव्हा. तोपर्यंत नाही. >> फा, अरे असं काय? थंड गाडी, शेजारी विक्या, असं असताना ईबाळ काय बाहेर मुंबईची घामट गर्दी बघणार थोडीच! ती विक्याकडे पहात खंडाळ्याची स्वप्नं रंगवत असणार , म्हणून सरप्राइज झाली! Wink Proud

तुम्ही काही दिवस बाहेर कोठेतरी राहून मग टॅक्सीने घरी येत आहात. तुम्हाला आपण आपल्या घरी चाललो आहोत हे कधी लक्षात येइल? एखादे ओळखीचे वळण, नेहमीचे दुकान, नेहमीच्या येण्याजाण्याचा परिसर कोठेतरी क्लू लागेल. ईशाला केव्हा कळते? गाडी पार चाळीसमोर येउन त्यातून ती दार उघडून बाहेर येउन समोर चाळीकडे पाहते तेव्हा. तोपर्यंत नाही<<हो ना तिला तर आधीच लक्षात यायला हवं होतं..आणि तसच दाखवायचं होत तर असं करायचं होतं की वीस तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधतो आणि घरी आल्यावरच सोडतो

पण इशाला त्याच काय राहिलं ते माहीतच नाही तर काय आणायला निघाली होती.. >>> Lol हे महान आहे. सिरीजच्या एकूण ढोबळपणाशी कन्सिस्टण्ट आहे.

या सिरीजवाल्याने तो 'इजाजत' मधला गाणे व प्रसंग लिहीला असता तर अनुराधा पटेलने 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' म्हंटल्यावर नासिर लगेच "थांब. आणून देतो" म्हंटला असता.

आजचा चला हवा येऊ द्या चा भाग मस्त होता.. मजा आली.. सही जोक्स होते.. गायत्री दातार स्वतःच थोडी बोअर वाटली..

Pan te ( zee Marathi) faarach katheshi pramanik rahun logically yogya dakhavayala lagale tar aapan ashi pise Kashi Kay Kadhanar? Ani karamanuk tar tya pisanni Ch mast hotey na?

अनुराधा पटेलने 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' म्हंटल्यावर नासिर लगेच "थांब. आणून देतो" म्हंटला असता.
#######
Lol

थंड गाडी, शेजारी विक्या, असं असताना ईबाळ काय बाहेर मुंबईची घामट गर्दी बघणार थोडीच! ती विक्याकडे पहात खंडाळ्याची स्वप्नं रंगवत असणार >> कसचं काय? गाडीपेक्षा थंड विक्या अन् फ्रोजन इशापेक्षा मुंबईची गर्दीच इंटरेस्टींग असेल.

Pages