तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सिरियल रेगुलरली पाहात नाही पण सैराटची कॉपी करण्याचा अक्षम्य गुन्हा घडलाय आणि नेमका तो एपिसोड चालु असताना टि.व्ही लावला, चहा करायला सांगून सगळ्यांना मारले, झी कडे सैराटचे कॉपी राइट्स आहेत म्हणून अशा फालतु सिरीयलमधेही कोंबले कैच्याकै ! Uhoh
#कपाळबडविती #देवात्यांनामाफकरतेकायकरातायेत्त्यांनाचमाहितनाही

असं तर नाहीये ना , आईसाहेबही खोट्या आहेत म्हणजे सरंजामे नाहीच आहेत, त्या पण विक्याला सामील आहेत , जयदीप च काही माहीत नाही, नंदू आणि तिचे वडील गेले तेव्हा तो लहान होता म्हणजे किती ते कळत नाहीये, त्याला स्वतःची खरी आई आठवत नसेल आणि तोतया आईला तो आईसाहेब म्हणत असेल.

#केड्यासाठीअजूनएकआयडीया

मर्डर प्रकरण डिस्गस्टिंग वाटले. बघितलाच नाही तो सीन. इथे आधी वाचल्यानी कल्पना आली होती. धन्यवाद पोस्ट्कर्ते.

कालचा बघितला. सॉन्या व आई किचन मध्ये खलबते करत असताना मंदा जवळच उभे राहून ऐकत असते व निघून जाते. आता ती आईसाहेबांना सांगेल व इशाई सॉन्या खोलीच्या दाराचे कुलूप उघडायला जाताना आई साहेबा व मंदा दुसृया बाजूने येउन मोडता घालणार. जयदीप सॉन्या चकल्या जगात विकायच्या मोडात आहे. खूप दिवसांनी मायरा दिसली. छान दिसत होती. इशाबद्दल काय बोलावे खरेच खूपच इरिटेटिन्ग आहे. कार्लयाची भाजी काय खुन्याला देते. त्याला ऑफिसात फोन करून पिडते तेव्हा त्याचा वैताग खरा वाटतो. तो सीन मी दोनदा पाहिला

आईसाहेबांच्या खोलीत मोठी फुलदाणी ठेवली आहे विथ फुले व त्याच्या वरच लगेच फुले फुलदाणीत ठेवली आहेत अशी तसवीर आहे. हे मला फार गूढ रम्य वाटले. ह्यातही काही रहस्य असावे.

तो विक्या खोलीत जायच्या आधी घड्याळ फोन काढून ठेवतो ते बघून मला नेहमी तो रेस्टरूम ब्रेक घेतो आहे असेच फील्स येते.

बरे काम फार आहे तर लॅपटॉपला चार्जर जोडलेला नाही. काय एम्डी गिरी करतो कोण जाने.

असं तर नाहीये ना , आईसाहेबही खोट्या आहेत म्हणजे सरंजामे नाहीच आहेत, त्या पण विक्याला सामील आहे >>>>> अशी शक्यता मला पण वाटते... कारण जेव्हा संपाच्या वेळी ईशा ओटी भरत नाही , तेंव्हा विस पेक्षा आईसाहेबच जास्त नाराज होतात. आणि तेव्हापासून त्या ईशाला राजनंदिनी बनवायच्या मागे लागल्यात. आता जयदीप ला पण पटवून देताहेत त्या.

तिथे जाताना घड्याळ आणि पाकीट, मागच्या वेळी चपला बाहेर काढून ठेवायचे काय कारण?>>>>> त्याला अस दाखवायच असेल... कि मी घरात च आहे .... आणी काल दाखवल तस लपुन बाहेर जात असेल...

ईशा एव्ढी का panic होतेय. गजा पाटील बद्द्ल ... स्वत:च्या नव्हर्या बद्द्ल ई त के प्रश्न हिला कधीच पड्ले नाही

सध्या हे दळण बघणं थांबवलंय.. पण इथल्या चर्चा वाचून असं वाटतंय की लवकरच गुंडाळतील आता.
मर्डर प्रकरणात बेबी suo motu तपास करायला लागेल. आणि कधी नाही ते तिचं डोकं चालून राजेशबद्दल आपण सरांना सांगितलं आणि लगेच त्याचा खून झाला या गोष्टींची सांगड घालेल. मग तिला कळेल गजा पाटीलही सरंजामे है.
पूर्वजन्म आठवून सूडपण घेईल त्याचा

ईशा आता ऑफिसमध्ये येणार नाही हे विक्या मायराला सांगतो. तर मायरा म्हणते की एक दिवस ती अ‍ॅडजेस्ट करेल. तर विक्या म्हणतो की ईशा यापुढे कधीच ऑफिसमध्ये येणार नाही. पण ईशा ऑफिस मध्ये येणार नाही हे खुद्द ईशाला माहीत आहे का? की विक्यानेच हे पर्स्पर ठरवले? Uhoh

#केड्यासाठीअजूनएकआयडीया
प्राजक्ता_शिरीन, अगदी अगदी (ई आईने असा शब्द वापरला #copycat तुपारे #)..
असो, "कॉपी कर, ढाप, कायपण कर पण हे केड्या, आता तरी लॉजिक दाखव."
रानोमाळ भरकटलेल्या लॉजिकला रस्ता मिळतोय असे वाटते आहे.... माबो कर लगे रहो.. तुपारे वाल्यांना अशा छान छान आयडिया देत रहा..

आईसाहेबांच्या खोलीत मोठी फुलदाणी ठेवली आहे विथ फुले व त्याच्या वरच लगेच फुले फुलदाणीत ठेवली आहेत अशी तसवीर आहे. हे मला फार गूढ रम्य वाटले. ह्यातही काही रहस्य असावे.>> केड्या एवढा सुक्ष्म आणि खोल विचार करत असता तर आपले भाग्यच म्हणायचे .. मग लॉजिक रानोमाळ भटकले नसते ! ते आपण अनेक पुस्तकं वाचतो आणि रहस्यमय चित्रपट पाहतो म्हणून आपल्या डोक्यात असल्या गोष्टी येतात Lol
पण ईशा ऑफिस मध्ये येणार नाही हे खुद्द ईशाला माहीत आहे का? की विक्यानेच हे पर्स्पर ठरवले? >> ते आधीच ठरवलं असतं कि या प्रकरणाचा तपास संपला कि मग इशा ने घरीच थांबायचं ..
प्राजक्ता_शिरीन #केड्यासाठीअजूनएकआयडीया हा हॅशटॅग भारीये Lol

प्राजक्ता_शिरीन #केड्यासाठीअजूनएकआयडीया हा हॅशटॅग भारीये >>>> सिरियसली Happy

आईसाहेबांच्या खोलीत मोठी फुलदाणी ठेवली आहे विथ फुले व त्याच्या वरच लगेच फुले फुलदाणीत ठेवली आहेत अशी तसवीर आहे. हे मला फार गूढ रम्य वाटले. ह्यातही काही रहस्य असावे. >>> भलतचं काहीतरी. मिळेल तो सेट वापरतात बिचारे. हॉल, घराची एंट्री कितीवेळा बदलत असते.

त्यावरून आठवलं - होळी खेळायच्या आधी शेजारची मैत्रीण आणि ईबाळ बाहेर बोलत असताना, सलग संवाद असून मैत्रीणीच्या गालावरचे रंग लक्षात येईल इतके बदलले होते. कंटिन्युईटी च्या नानाची टांग !!

विक्याचं घर कर्जत ला दाखवावं असं केड्याला का वाटलं असेल ? गेलाबाजार डोंबिवली / ठाणे का नाही सुचलं ? देवी काय कुठेही असतेचं. मागे उंच उंच इमारती दाखवायच्या कशाला मग कर्जतला घर अहे तर ?

प्राजक्ता_शिरीन #केड्यासाठीअजूनएकआयडीया हा हॅशटॅग भारीये Lol >>>> वरती दिपांजलीच्या पोस्ट वरुन सुचलं Happy

एकीकडे विस 'ईशा किती निरागसतेने खोलीबाहेर वाट बघता बघता झोपून गेली' असा विचार करुन तिच्या डोक्यावर हात ठेवतो, दुसरीकडे त्याला राजीवच्या मुलाला मारताना काहीच कस वाटल नाही? Sad

ईशा एव्ढी का panic होतेय. गजा पाटील बद्द्ल ... स्वत:च्या नव्हर्या बद्द्ल ई त के प्रश्न हिला कधीच पड्ले नाही >>>>>> तेच ना

कालचा बघितला. सॉन्या व आई किचन मध्ये खलबते करत असताना मंदा जवळच उभे राहून ऐकत असते व निघून जाते. आता ती आईसाहेबांना सांगेल व इशाई सॉन्या खोलीच्या दाराचे कुलूप उघडायला जाताना आई साहेबा व मंदा दुसृया बाजूने येउन मोडता घालणार. >>>>>>>> सॉन्याने आपल्या प्लॅनसाठी चुकीचा माणूस निवडला आहे. जानूताईच्या आईसारखी खमकी बाई असायला हवी होती तिथे. तिने रुपालीला बोलवून घ्यायला हव होत. ती हुशार आहे.

ईआई आल्या आल्या ईशाच्या सन्सारात नको एवढ नाक खुपसते. ' जावईबापून्च्या खाण्याकडे लक्ष दे, स्वयमपाक नीट कर' म्हणे. हे सल्ले दयायला आलीय का इथे? खर तिने सान्गायल हव होत की, ' जावईबापून्ना घाबरु नको. त्यान्ना खोदून खोदून प्रश्न विचार. मी नाही का तुझ्या बाबान्ना कस फैलावर घेते आल्या आल्या. या वयातही ते मला घाबरुन आहेत ते उगीच नाही . तस तू वागायला शीक. "

जयदीप सॉन्या चकल्या जगात विकायच्या मोडात आहे. >>>>>> राधिका मसाले आणि गोखले गृहउद्योगला कॉम्पटिशन.

असं तर नाहीये ना , आईसाहेबही खोट्या आहेत म्हणजे सरंजामे नाहीच आहेत, त्या पण विक्याला सामील आहे >>>>> हो, अस पण असू शकेल. #केड्यासाठीअजूनएकआयडीया

कॉपी कर, ढाप, कायपण कर पण हे केड्या, आता तरी लॉजिक दाखव."
रानोमाळ भरकटलेल्या लॉजिकला रस्ता मिळतोय असे वाटते आहे. >>>>>>>> अगदी अगदी

आईसाहेबांच्या खोलीत मोठी फुलदाणी ठेवली आहे विथ फुले व त्याच्या वरच लगेच फुले फुलदाणीत ठेवली आहेत अशी तसवीर आहे. हे मला फार गूढ रम्य वाटले. ह्यातही काही रहस्य असावे. >>>>>>>>> अमा कित्ती ते खोल निरिक्षण! त्या फुलदाणीत खोलीची आणखी एक किल्ली असेल, ती वापरुन आईसाहेब सगळे झोपल्यावर रात्री त्या खोलीत जात असाव्या. #केड्यासाठीअजूनएकआयडीया

मर्डर प्रकरणात बेबी suo motu तपास करायला लागेल. आणि कधी नाही ते तिचं डोकं चालून राजेशबद्दल आपण सरांना सांगितलं आणि लगेच त्याचा खून झाला या गोष्टींची सांगड घालेल. मग तिला कळेल गजा पाटीलही सरंजामे है.
पूर्वजन्म आठवून सूडपण घेईल त्याचा >>>>>>>> #केड्यासाठीअजूनएकआयडीया पण ते पुर्वजन्म प्रकरण दाखवणार कधी? का केडया तेही विसरलाय? अजूनही गजा पाटील , कम्पनीमधला घोटाळा' ईथे सिरियल घोटाळत आहे.

खूप दिवसांनी मायरा दिसली. छान दिसत होती. >>>>>>> +++++++११११११११११

बरे काम फार आहे तर लॅपटॉपला चार्जर जोडलेला नाही. काय एम्डी गिरी करतो कोण जाने. >>>>>> सडकछाप गजा पाटील आणि एमडी? इतकी वर्ष हयाने कम्पनी कशी काय साम्भाळली अस राहून राहून वाटतय.

ईशा आता ऑफिसमध्ये येणार नाही हे विक्या मायराला सांगतो. तर मायरा म्हणते की एक दिवस ती अ‍ॅडजेस्ट करेल. तर विक्या म्हणतो की ईशा यापुढे कधीच ऑफिसमध्ये येणार नाही. >>>>>> हे ऐकून मायराला आनन्दाच्या उकळया फुटत असतील. Proud

सुरुवातीच्या एपिसोड मधे दाखवलेले गजा पाटीलचे (विकूचे) हेलिकॉप्टर, आलिशान गाड्यांची रांग, एस्कॉर्ट कार्स, बाउंसर सिक्यूरिटी गार्ड्स, गन मेन, कुठे गेले बरं? आणि
मुख्य वस्तू म्हणजे - या सार्‍यांना सूचना देणारे झेंडेचे
वॉकी टॉकी! फेकून दिले वाटतं.. किंवा
केड्याने रानात, दूर जंगलात लॉजिक शोधायला वापरायला घेतलंय बहुतेक
Lol Lol

नीसकारान्त
शनाया सबनीस
मायरा कारखानीस>>>>>
Biggrin

विस ईशाची कॉपी करताना "अमुक तमुक झालं का? "सार..सार." हे तोंड वाकडं करून म्हणतो ते फारच भारीये... Lol जेन्यूईन वैताग

आज पांघरुण काढताना सिनेमावाल्यांच्या स्टाईलनं काही तरी, निदान एखादं पिस्तुल बिस्तुल तरी खाली पडेल असं वाटलं होतं पण तसं काहीच नाही झालं.

आपल्यापैकी कोणालाच आणि इशालाही बंद खोलीत इंटरेस्ट नसल्यानं नाईलाजानं तिच्या आईला त्यात इंटरेस्ट घ्यायला लावतायत.
ती जर अशीच असती तर काय काय विचारलं असतं आजवर..
अहो भेंडे, तुमची भेंडी कुठाय?
विक्रांतसर, तुमची पहिली बायको कधी अन् कशानं हो गेली? तुम्हाला मुलं वगैरे आहेत का हो?
आईसाहेब, तुमचे मिस्टर कधी?
इशाची आई असलं काहीही विचारु शकते.

परांजप्यांना पण माहित आहे, गजा पाटील कोण आहे ते.म्हणजे आता राजेशनंतर त्यांचा नंबर की काय.
शितुला आणण्यासाठी केड्याला काहीतरी बँकग्राउंड तयार करावीच लागेल ना,त्याशिवाय एकदम कशी आणेल केड्या?
म्हणजे आता केड्या स्वत:च्या बुध्दीने काहीतरी निर्बुध्द कल्पना दाखवून शितुला आणेल.
तिकडच्या फॉरिनातल्या लोकांना म्हण...जरा आमच्या केड्याच्या शिरियली बघा,फ्रेंड्स,गेम ऑफ थ्रोन कुणीही काढेल पण या अशा आयडियाज,वोनली इन इंडिया.इथे केड्या आणि हिंदीत कपूरांची एकता.

विक्रांतसर, तुमची पहिली बायको कधी अन् कशानं हो गेली? तुम्हाला मुलं वगैरे आहेत का हो?
आईसाहेब, तुमचे मिस्टर कधी?
इशाची आई असलं काहीही विचारु शकते. >>> Lol

आणि लग्नाच्या निर्णयाच्या वेळेस न विचारतात एरव्ही कधीही विचारू शकते.

मला तर आता विस आणि आईसाहेबांच्या चेहर्यात साम्य वाटू लागले आहे.

आणि लग्नाच्या निर्णयाच्या वेळेस न विचारतात एरव्ही कधीही विचारू शकते.>>अर्थातच Happy त्यातही खास करून हळदीकुंकु वगैरे असताना.

पुष्पा - विक्रांतसर, त्या वरच्या खोलीत राजनंदिनीला लपवलं असेल तर तिलाही बोलवा की हळदीकुंकवाला.
बाबा- अगं पुष्पा असं काय करतेस झोपमोड होइल ना गं तिची
इशा- आई अगं असं काय करतेस? ठरलंय ना त्या खोलीबद्लल विचारायचं नाही ते
( इथं जयदीप प्रश्नार्थक सोनियाकडे बघेल,
सोनिया स्वतःशीच मान वाकडी करून काहीतरी निर्णय झाल्यासारखे आविर्भाव,
सर्जेराव सहेतुक मंदाकडे,
मंदा काहीच बोध न झाल्यामुळे मठ्ठपणे आईसाहेबांकडे,
आईसाहेब फार काही समजलंय पण सांगता येत नाहीये अशा प्रकारचं (संजीवकुमारच्या अभिनयाची नक्कल ) काहीतरी अघटीताची चाहुल टाइप्स एक्सप्रेशन्स,
झेंडे (आंघोळ करताना पाणी गेल्यासारखं) मायराकडे,
मायरा (विमान चुकल्यासारखं) विक्रांतकडे,
विक्रांत - शिंक नुसतिच येतीये पण आआआ ....क्छी.... होतच नाहीये अशा प्रकारे सर्व एन्गल्समधून इशाकडे रोखून बघत (पाच मिनिटं) बघून नुसतंच फुसफुसत मग ऑफीसला निघून जाईल. (इशाची नेक्ट एपिसोडमधे साॅरी साॅरी म्हणत दहा मि खायची सोय).
पुष्पा - (वरील सगळं बघितल्यानंतरही तसंच गोड निरागस हसत हसत)
निमकर, अहो सांगा ना... बोलवायचं का आपण त्या खोलीतल्या राजनंदीनीला?

एक समजत नाहीये, त्या सर्जेरावाला लंगडत चालावं लागतं व नीट बोलताही येत नाही तरी कायम निरोपा निरोपीसाठी एवढ्या मोठ्या घरात त्यालाच सगळीकडे वरखाली का करायला लावतात?

आई अगं असं काय करतेस? ठरलंय ना त्या खोलीबद्लल विचारायचं नाही ते ( इथं जयदीप सोनियाकडे बघेल, सोनिया स्वतःशीच मान वाकडी करून काहीतरी निर्णय झाल्यासारखे आविर्भाव, >>>>>> सॉलीड निरीक्षण आहे.

मेधावि .. अख्या पोस्टला + १००००
सर्जेरावबद्दल मला नेहमीच सहान्भूती वाटते .
खरतर ते पात्रच उगाचच वाटतय , value addition काही नाही , फक्त गूढ भाव चेहर्यावर दाखवायचे .

सगळे चकल्या खायला बसतात तेव्हा साधारण संध्याकाळ झाली असं समजू.
विसं ऑफिसमधून येतो , ईशा त्याच्याशी बोलून खाली येते तेन्व्हा बर्यापैकी रात्र झाल्यासारखं वातावरण आहे.
कधीतरी उशीरा ईआई घरी जायला निघते कारण त्यानंतर सगळे झोपायला जातात.
सगळी गडबड आहे टाईमलाईन्सची.

रच्याकने , ईआई , रात्री जमिनीवर झोपली तेव्हा अंथरूण-पांघरूण जांभळ्या रंगाचं होतं .सकाळी उठली तेन्व्हा बिस्कीट कलर.
विसं , ईशाची नक्कल भारी करतो.

आज त्या फेमस कपाटातून अंथरूण पांघरूण पण निघालं Proud कपाट आहे का जादूगाराची हॅट?>>>>> सिरियसली .
आणि गेल्या आठवड्यात त्याच ठिकाणी ईशाच्या साड्या रचून ठेवल्या होत्या , काल अंथरूण.
सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी असतात.
नशिब , ईशाने भाजणीची बरणी पण तिथूनच काढताना नाही दाखवलं . काय भरवसा नाही या लोकांचा .

हा सरंजामेंचा बंगला दूमजली आहे का?
ईशा/विसं रूममधून ये -जा करतात तेन्व्हा नेहमी जिन्यावरून चढत-उतरत असतात.
त्यादिवशी बेडरूम बोलत असताना , विस वरच्या दिशेला खूण करून म्हणतो , मी जरा रूमध्ये जाउन येतो.
"त्या" रूम मध्ये जायला जीना चढायला लागतो.

( इथं जयदीप प्रश्नार्थक सोनियाकडे बघेल, सोनिया स्वतःशीच मान वाकडी करून काहीतरी निर्णय झाल्यासारखे आविर्भाव, सर्जेराव सहेतुक मंदाकडे, मंदा काहीच बोध न झाल्यामुळे मठ्ठपणे आईसाहेबांकडे, आईसाहेब फार काही समजलंय पण सांगता येत नाहीये अशी संजीवकुमारची काॅपी करत काहीतरी अघटीताची चाहुल टाइप्स एक्सप्रेशन्स, झेंडे (आंघोळ करताना पाणी गेल्यासारखं) मायराकडे, मायरा (विमान चुकल्यासारखं) विक्रांतकडे, >>>>>> हहपुवा निरीक्षण आहे.

मला तर वाटलं रात्री ईआई "त्या" खोलीत जाऊन बघते की काय.

रच्याकने , ईआई , रात्री जमिनीवर झोपली तेव्हा अंथरूण-पांघरूण जांभळ्या रंगाचं होतं .सकाळी उठली तेन्व्हा बिस्कीट कलर../// लय भारी निरीक्षण
ईआई - ती व ईशा दोघीच खोलीत असतानादेखील हळदीकुंकवाला जातात तसा पदरपवित्रा घेऊन का होती कळले नाही!

नशिब , ईशाने भाजणीची बरणी पण तिथूनच काढताना नाही दाखवलं . काय भरवसा नाही या लोकांचा .>> राजनंदिनी पण येउ शकते त्यातून.

Pages