तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काल फार काही झाल नाही.विक्या त्या सॉनियाला नंदूची जुनी ऑडियोकँसेट देतो ज्यामध्ये कधीकाळी ऑफिसमध्ये बाळाने जयदीपला सांगितलेली हिरकणीची स्टोरी नंदू लहान जयदीपला सांगत असते.विक्याचा प्लँन हा बिळाला नंदू दाखवण्याचा.आता तो ती कँसेट आईसाहेबांना दाखवेल.
बाकी काही नाही,रुपालीची कथा ऐकवली तिने बाळाला आणि विक्यावर विश्वासठेवायलि सांगितला
आता वरच्या प्रोमोप्रमाणे बाळाला गजा पाटील कोण ते कळत मग ती रस्त्यातून जित असताना तिला अपघित होण्यापासून ती जोगवाबाई वाचवते आणि डायरेक्ट तिच्या गुहेत घेउन जाते जिथे ताटातील पाण्यात तिला नंदूचा चेहरा दिसतो.

काय आहे आता त्याना सिरियल गुंडाळायची घाई झाली आहे... सो जे आपल्या पदरी पडेल ... ते कोणतही लॉजीक न लावता बघा यला लागणार आहे....

सीरियल गुंडाळली तरी चालेल.. पण आता ई बाळाला किमान भूत, आत्मा, पुनर्जन्म इ. इ. मध्ये अडकवू नये,एवढीच अपेक्षा आहे...तिची डिटेक्टिव गिरी अशीच बहरू दे रे केड्या!!
बाकीच्या पत्रांना अशा अंधश्रद्धा फॉलो करताना दाखवावे.. पुनर्जन्म पुनर्जन्म खेळत बसू देत.. हिरविणीचा फोकस ढळू देऊ नये
... कालच्या भागात रुपालीचा अभिनय उत्तम पण प्रसंग बिन्कामाचा वाटला...
सॉन्या: "सॉरी ब्रो इन लॉ, मला असं करायला नको होतं..."
असलं मराठी कोण शिकवत असेल यांना.. की संवाद लिहिताना असंच लिहितात..
बरं पाठांतर किंवा वाचन करताना कोणी सुधारणा का नाही करत..
असो... थोडसं इंट्रेस्टिंग वाटायला लागलंय... आता परत कथेने माती खाल्ली नाही म्हणजे मिळवली..
सुभा खलनायक छानच...

आता वरच्या प्रोमोप्रमाणे बाळाला गजा पाटील कोण ते कळत मग ती रस्त्यातून जित असताना तिला अपघित होण्यापासून ती जोगवाबाई वाचवते आणि डायरेक्ट तिच्या गुहेत घेउन जाते जिथे ताटातील पाण्यात तिला नंदूचा चेहरा दिसतो.>> अर्रर्रर्र !! म्हणजे आता प्लॅस्टिक सर्जरी / अपघातामुळे स्मृतिभ्रंश आणि नंतर अचानक अंगात राजनंदिनी शिरून तिच्यासारखं वागणं .. वगैरे नाही दिसणार ! श्या !!

इतके दिवस पाणीच ओतत होते...आता उरलेलं वाटीभर दूध संपवतील मे पर्यंत. मे पर्यंत संपणार ही बातमी कुठे मिळाली?

फायनली नन्दूचा आवाज ऐकायला मिळाला. आता परातीतली नन्दू कधी बघायला मिळते ते बघायच.

ती रस्त्यातून जित असताना तिला अपघित होण्यापासून ती जोगवाबाई वाचवते आणि डायरेक्ट तिच्या गुहेत घेउन जाते जिथे ताटातील पाण्यात तिला नंदूचा चेहरा दिसतो. >>>>> पण जोगवाबाईकडे ईशा असते तेव्हा तिचे कपडे वेगळे दाखवलेत आणि वरच्या प्रोमोमध्ये तिचे कपडे वेगळे दाखवलेत. Uhoh

रुपालीची कथा ऐकवली तिने बाळाला >>>>>> तरीच म्हटल, रुपालीची आई भावाकडे का राहतेय? हिचा नवरा कुठे गायब होता? वै वै

ईशाने तिच आणि आईवडिलान्च ऐकल नाही ते चान्गल केल. गजा पाटीलला शोधायला निघाली.

परवाच्या एपिसोडमधला मायराचा विसला विचारलेला ' तुमच्या आयूष्यात माझे स्थान काय?' प्रश्न फालतू होता. विसने तिच्याविषयी थोडा कन्सर्न काय दाखवला ( स्वत:च्या मतलब साधण्यासाठी), हिला नको त्या आशा वाटू लागल्या. हि अस विचारतेय जस काय विस ईशाच्या नकळत तिच्याशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केल आहे आणि माझा जास्तीत जास्त वेळ तुला देईन अस वचन तिला दिलेल आहे. तिच ऑफिसमध्ये स्थान काय हे विचारण पटतय. मायराकडून इतक पर्सनल वागण्याची अपेक्षा नव्हती.

पण आता ई बाळाला किमान भूत, आत्मा, पुनर्जन्म इ. इ. मध्ये अडकवू नये >>>>>> आ, पण मग तिच्या अष्टमीच्या स्वप्नाच काय? Uhoh

बाकीच्या पत्रांना अशा अंधश्रद्धा फॉलो करताना दाखवावे.. पुनर्जन्म पुनर्जन्म खेळत बसू देत.. >>>>>>> पुनर्जन्म ही अंधश्रद्धा आहे की नाही यावर माझ कन्फयूजन आहे. Uhoh

... कालच्या भागात रुपालीचा अभिनय उत्तम थोडसं इंट्रेस्टिंग वाटायला लागलंय... आता परत कथेने माती खाल्ली नाही म्हणजे मिळवली..
सुभा खलनायक छानच. >>>>>>>>> +++++++++११११११११११

तर कॅसेट घ्यायच्या आधी जयदीप बेडरूम मध्ये आतून दार लावून बसतो >>>>>>> जयदीप बरा झाल्यावर अतिशहाणपणा करायला लागला आहे. त्याच्या दादाची माफी नाही मागितली तर तो बोलणार नाही म्हणे.

पण मग तिच्या अष्टमीच्या स्वप्नाच काय? Uhoh>>>> केड्याला बदाम मिळाले नाहीत, सो तो विसरला आहे सर्व... कंटीन्यूईटीच्या नावाने ठणाणा आहे सुरुवातीपासूनच.... जाऊदे, माफ करूया.. कारण एकदा का अश्रूंची फुले चे प्रयोग सुरू झाले की आपल्याला रोज रोज सुभा दर्शन नाही देऊ शकणार

तुमच्या आयूष्यात माझे स्थान काय?' >>> नाही, मला वाटतं ती विचारते "ऑफिसमधल" आयुश्यातल नाही .
पण मग तिच्या अष्टमीच्या स्वप्नाच काय? >>> रच्याकने , होळीनंतर आता पाडवा येईल , आष्टमी नाही का आली परत ?

तरी नंतर हातात टेपरेकॉर्डर घेऊन सॉन्या आपोआप बेडरूम मधे जाते !(>>>> हो ते नोटीस केलं
किती चुका असतात खरंच

मी मधले भाग पाहिले नाहीत त्यामुळे घटना प्रसंगांमध्ये किती तास /दिवस /काळ गेला आहे कळत नाही. पण ज्या दिवशी मी पाहिलं त्यादिवशी ईशा आईला खोली उघडण्यावरून झापत होती आणि तिने तो हिरवा निळा ड्रेस घातला होता. आज मी परत पाहिलं तर ती सर्राच्या गळ्यात पडून ट्रस्टच्या गप्पा मारत होती आणि परत ड्रेस तोच. बिलिएनरची बायको ना ही?

आता घरच्यांना नॉशीया येऊन ओकार्या येईपर्यंत रोज scrambled eggs खायला घालणार का?

1.हिरवा निळा
2.काळा
3.भगवा लाल
४. पिस्ता
५.एक lavender colorचा नाईट ड्रेस
६.आज लाल रंगाचा.
इतके ड्रेसेस आहेत तिच्या कडे

मला एक कळत नाहीये जयदीप आणि राजनंदिनी चं नेमकं नातं काये? आईसाहेबांचा मुलगा म्हटला तर रानं त्याची मोठी बहिण मग तो विसं ला दादा कसा म्हणतो? आणि विसं चा लहान भाऊ असेल तर रानं त्याची वहिनी मग आईसाहेब आणी जयदीप त्याच्या लहानपणापासून कसे कनेक्टेड? नात्यातले घोळ काही समजेना... कोणाचे कोण ते? आणी तो लहान असल्यापासूनच रानं नोकरी करणारी मग वयाचा ताळमेळही काही बसत नाही.

काल बाळाला खर कळल्यावर,म्हणजे खरतर तिचा अभिनय बघून अस ग्रुहीत धरल आहे की तिला खरच पटल आहे की विक्या हाच गजा आहे.नशीब खर काय ते विक्याकडे यावेळी तरी पचकली नाही.
पण ती सतत रुमालाने कपाळावरचा घाम पुसत होती,मला तर घामाचा एक थेंबही दिसत नव्हता.असो
पण अशी रिअँक्शन मी एस्पेक्ट केली नव्हती.म्हणजे इतक मोठ सत्य कळल्यावर निदान तिला गरगरल्यासारख होईल,तोल जाईल,हात कापतील,घशाला कोरड पडेल,कदाचित विक्याचा फोनही ऐकू येणार नाही,अशी रिअँशन असायला हवी होती.पण तस काही झालच नाही
मानबा जेव्हा बघत होते तेव्हा राधिकासमोर गुरुच सत्य आल्यावर तिने छान रिअँक्शन दिली होती.
गायत्रीला छान संधी आली होती पण वाया घालवली.

विस, आईसाहेब आणि जयदीप एक कुटुंब आणि दादासाहेबांच्या मुलीशी (रा न) शी विस नि लग्न केलं. >>> हे खरेच आहे? हे आणखीनच गोलमाल होईल Happy

विस, आईसाहेब आणि जयदीप एक कुटुंब आणि दादासाहेबांच्या मुलीशी (रा न) शी विस नि लग्न केलं. >>> हे खरेच आहे? हे आणखीनच गोलमाल होईल. >> हो ना.
आणि मग हे तिघेही पाटलांचे सरंजामे कसे काय झाले?? आईसाहेबांनी दादासाहेबांशी लग्न केलं की काय???

पण मग सगळे सरंजामे कसे ?
गजा पाटील हा माणूस किती वर्शापूर्वी नामशेष झाला? तितके वर्शात एकदाही मतदार याद्या अपडेट झाल्या नाहीत ???

मग कोणत्या सत्याबद्दल गजाने आईसाहेबांना आठवण करुन दिल्यावर त्या गप्प बसल्या ? आणि गजा फ्रॉड आहे हे कळल्यावर आसांनी विसला जाब नको विचारायला ?

आणि गजा फ्रॉड आहे हे कळल्यावर आसांनी विसला जाब नको विचारायला ?>> विचारला असेल जाब..पण हे सगळे त्यांनी बाकीच्यांना सांगेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला असेल or murder झाला असेल.

प्रोमोवरून तर सगळा सस्पेन्स आधीच ओपन होत आहे आणि मुख्य म्हणजे हे सगळ्यांना माहित आहे
नंदू दादासाहेबांच्या पहिल्या बायकोची एकुलती एक मुलगी आणि गजा जावई ,दादासाहेब त्याला नाव देतात हे तर जयदीप आणि सोनियाला पण माहित आहे
काय भंकस आहे ,मग तो जालिंदर,नंदू कशाला पाहिजेत
बर,जिवलगा मालिका पुढे ढकलल्याची बातमी आहे,खरी आहे का?

कालच्या मतदार यादीत गजाच्या शेजारी " जयदीप दादासाहेब सरंजामे" असं नाव होतं. म्हणजे दादासाहेब हे त्या वडिलांचं पाळण्यातलं नाव दिसतंय. आईसाहेबांचं काय असेल असं कुतुहल आहे. आईसाहेब दादासाहेब सरंजामे असं नसलं म्हणजे मिळवलं Happy

मेधावि..किती ते बारीक निरीक्षण! Happy
मला आता असं वाटतंय की आईसाहेब व विस हे माय लेक...पाटील आडनाव मूळ असलेले!!! जयदीप व राजनंदिनी ही दादासाहेबांची मुलं. आईसाहेबांनी दादा साहेबांशी दुसरं लग्न केलं व विस ला दादा साहेबांनी घरी आणलं! पण याने राजनंदिनी सोबत प्रेम करुन लग्न केलं..व तो दादा साहेबांचा सावत्र मुलगा कम जावई बनला!!!
Lol

आणि गजा फ्रॉड आहे हे कळल्यावर आसांनी विसला जाब नको विचारायला ?>> विचारला असेल जाब..पण हे सगळे त्यांनी बाकीच्यांना सांगेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला असेल or murder झाला असेल.>> आईसाहेब अजून जिवंत आहेत. Happy

चिंचे, काय बी डोकं लढवते. Rofl

Pages