तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राज नंदिनी गजा पाटील या व्यक्तीची बायको होती की विक्रांत सरंजामे याची.. .>>>>>>>> राजनन्दिनी ही सरन्जामेची सून असेल. ती अनाथ मुलगी असेल. गजा पाटीलला दादासाहेबान्नी दत्तक घेतल असेल. त्याच नाव ' विक्रान्त सरन्जामे' अस चेन्ज केल असेल. दादासाहेबान्ना डाउट येऊ नये म्हणून विसने तो प्रॉपर्टीचा क्लॉज स्वतः हून ठेवायला सान्गितला असेल. नन्तर दादासाहेबान्ना त्याच खर रुप कळल्यावर विसने त्यान्ना मारल असेल किव्वा त्या बन्द खोलीत डाम्बून ठेवल असेल. मरण्याआधी दादासाहेबानी ती प्रॉपर्टी विसच्या हातात पडू नये म्हणून काहीतरी तजवीज केली असणार आणि ते विसला माहित असणार. नन्दूला ही खर काय ते कळल्यावर मारल असेल. ते नेमक लहानग्या जयदीपने बघितल असेल. त्याला काहीही आठवू नये म्हणून विस त्याला गोळया देत असेल. त्याची भलतीच रिएक्शन होऊन जयदीप मेन्टली अनस्टेबल झाला असेल. विसला त्याच्या अस असण्याचा फायदाच झाला. सगळी सत्ता त्याच्या हाती. जालिन्दरला हे सगळ माहीत असत. सो, त्याला खोटया आरोपात अडकवून जेलमध्ये पाठवल असणार. जालिन्दरच्या बायकोचा खूनही विस किव्वा झेण्डेने केला असणार. हुश्श!

आता बहुतेक केड्या अजून एक कुंभकर्णी झोप काढेल, त्याला जाग येईपर्यंत त्याची लेखणी गजा पाटील या अक्षरांच्या गर्तेत गोल गोल गटांगळ्या खात बसेल, त्यासोबत प्रेक्षक सुद्धा गुदमरून जातील.. राजनंदीनी गजा पाटील दगडी शिदोबा बेडकीहळ्ळीकर दगडी निमकर दगडी सरंजामे>>>>>>> Rofl

सुलु ताई, तुमची story नुसार जर खरच झी ने मालिका पुढे नेली तर जरा तरी काही logical बघायला मिळेल . पण.......
झीमराठी आणि लाँजिकचा 36 चा आकडा आहे.

सूलू, तुमची ष्टोरी भारीये.. तुम्ही खात असलेल्या ब्रॅण्डची अक्रोड बदामाची पाकिटे केड्या साठी पाठवून द्या..कथानकात असंच काहीतरी सुसंगत लॉजिकल लिहायचं असतं याचा त्यालाही साक्षात्कार होईल

"Radha prem rangi rangali" Chya valanavar jatey Ka hi serial? Ti pan jaam pakaoo ahe..

सरंजामे आईसाहेब गुन्हेगाराच नाव विचारताना, त्यांच्या चेहेऱ्यावर जो उत्साह दिसत होता तो.... लॉटरी लागल्यासारखा, किंवा काहीतरी आनंदाची बातमी ईबालकडून मिळतेय कि काय? असा होता. आणि पेढे काय वाटते गुन्हेगाराच नाव कळल्यावर.

डोळ्यांनी अभिनय कसा करायचा ते अमृता कडून शिक ईबाळा. >>>>>> अनुराज, ती जे काय करतेय ते गुमान बघावं हे बरे. ८:३० ला जेवता जेवता बघणारे ठसका लागून मरतील तिचा नेत्राभिनय पाहून....कारवी >>>>>मस्तच!

धन्स मनिम्याऊ, अन्जू, किल्ली, सुषमाताई Happy

सरंजामे आईसाहेब गुन्हेगाराच नाव विचारताना, त्यांच्या चेहेऱ्यावर जो उत्साह दिसत होता तो.... लॉटरी लागल्यासारखा, किंवा काहीतरी आनंदाची बातमी ईबालकडून मिळतेय कि काय? असा होता. आणि पेढे काय वाटते गुन्हेगाराच नाव कळल्यावर. >>>>>> अगदी अगदी

विसने आईसाहेबान्ना नाव नको सान्गू सान्गितल होत. हिला जयदीप- सॉनयाकडे नाव लपवण्याची काय गरज होती?

ईबाळाला सध्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेण्टचे धडे देण जोरात चालू आहेत. ऑफिसमध्ये विस आणि घरात सॉन्या.

प्रिकॅप पाहिला, बिच्चारा राजेश! विसने त्याला मारल नाही म्हणजे मिळवल. Sad

प्रिकॅपमध्ये विस बन्द खोलीत गेल्यानन्तर राजेशच्या घरी त्याची एन्ट्री दाखवली. वाटल, हा डायरेक्ट त्या खोलीतून राजेशच्या घरी गेला की काय! Lol

काल शेवटी विस खुर्चीत लहान मुलासारखा झुलत होता.

विसला ईशाच्या सन्गतीत राहून तिची हवा लागली वाटत. हल्ली गोष्टी सान्गायला लागलाय. ती वाघ आणि मा़कडाची गोष्ट राजनन्दिनी कन्वर्टेड टू ईशा प्लॅनला सुद्दा पर्फेक्ट बसते.

आइग्ग...विक्या एवढा निर्ढावलेला असेल अस वाटल नव्हत.त्या राजेशला,त्याच्या बायकोलि मारल,पण त्या बिचार्या लहान मुलालाही मारला.आज पहिल्यांदाच विक्याची भीती वाटली.
सुभा मात्र बेस्ट++++++++++++111111111+++++++++

ईशा ने राजेश ला गुन्हेगाराचे नाव सांगायला भाग पाडले आणि त्याला लटकवले आहे. त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिला काहीही करावंसं वाटलं नाही.
आज गुप चिळी खेळ सुरू आहे. ईआई ची ईबाबांपुढे गुपचिळी, साॉन्या ची जयदीप पुढे गुपचिळी. फक्त ईशा विसपुढे गुपचिळी ठेवत नाही म्हणून राजेश लटकलाय

ईशाचा दर दिवसाआड तो काळा ड्रेस काय घालते? दिवसा काळा रंग? तो ही मुंबईत? आणि ऑफिसला काळा ड्रेस?

आधी रस्त्यावरून घेतलेली रेड/ऑरेंज चिप पर्स बाळगायची आता ग्लॉसी गोल्डन पार्टीला नेण्याची छोटीशी पर्स ऑफिसला नेते. हिला स्वतःला काही स्टाईल किंवा फॅशन सेन्स नाहीच बहुतेक.

आज पहिल्यांदाच विक्याची भीती वाटली.
सुभा मात्र बेस्ट++++++++++++111111111++++++++>>>>>>> खरच... भीती वाटली...... तो त्या लहान मुला शी कसा बोलत होता...चिड आली.... सुभा. साँलिड... ईशा बरोबर बोलताना पण एक्शप्रेशन मस्त... +++++++1111222211111111111++±++++
सोन्या ची पण अँक्टींग छान आहे

काल सैराटची आठवण झाली Sad , इतक्या सगळ्यांना मारलेलं कशाला दाखवायचं ? राजेशने नाव सांगताना सरळ विक्रांत सरंजामे का नाही सांगितलं ? का तो अजून विसला गजा म्हणूनच ओळखतो ? झेंडे सुद्धा विक्रांत म्हणतो - जो लहानपणापासून ओळखतो विसला .

मेधावि : काल पुष्पा कुठेतरी जायची तयारी करत असते. अरुण निमकर येतात तर त्यांना ती सांगत नाही व घराबाहेर पाठवून सॉन्या ला फोन करते की मी येतेच म्हणून (वाड्यावर? :-)).
तिकडे विस ईशाबेबीला लाडात घेऊन तिच्या कडून राजेश चे नाव काढून घेतो व त्याच्या त्या खोलीत अंतर्धान पावतो. ईशा कार्ल्याच्या काचर्‍या करायला घेते! तिथे येउन सॉन्या म्हणते की ब्रो इन लॉ तर गेले बाहेर! ईशाचा विश्वास बसत नाही. सोन्या म्हणते कि चल...खोलि उघडून खातरी करुन घेऊ!

तिकडे ब्रो इन लॉ व झेंडे त्या राजेश, त्याची बायको व मुलाचा सैराट स्टाईल ने खातमा करतात व त्याच्याच घरात चहा पीत बसतात. जाताना विक्रांत च्या पायाला स्टूल लागते व तो झेंडे चा आधार घेऊन लंगडत जातो..

त्या बंद दारातून घराबाहेर पडायला खुफिया मार्ग आहे का? मी मध्ये अनेक दिवस पाहिली नाहिये सिरियल.

बंद खोलीतून बाहेर पडण्याचा मार्ग चक्क घरातून आहे,सोनिया ने विक्याला बाहेर जाताना पाहिलेल असत,आणि तरीही गेली 20वर्ष हे कुणालाही कळत नाही.
इथे डायरेक्टर साहेबांनी माती खाल्ली आहे.
ती सोनिया जीवाच्या आकांताने सांगत असते की मी पाहिल आहे विक्याला बाहेर जाताना लपतछपत तर हे मंद बाळ म्हणत की सोनियाताई, तुम्हाला भास झाला असेल
राजेशच्या बायकोच्या गळ्यात फास दिसला पण राजेशला आणि मुलाला कस मारल ते मात्र नाही कळल.
कदाचित मिरल नसेल बेशुध्द करून नंतर तंबी देऊन दूर पाठवतील
त्यांना मारलेल दाखवल तर विक्या खुनी होईल मग वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेमकहिणी केड्या कशी बसवेल?
पण कालचा सुभाचा अभिनय लाजवाब.

काल विक्या जाताजाता म्हणाला कि आपण इथे आलेलो याचा काही पुरावा ठेवायचा नाही..अश्या अर्थाचं . .. सो ते हातातलं कड आणि अजून काहीतरी उचलतात असं दाखवलं .. पण कपाच्या कानावर यांच्या बोटांचे ठसे उठणार ना ?प्लस चेंडू वर , दाराच्या कडीवर ..
आणि आता वीस च्या पायाला लागलय ना काहीतरी .. म घरी काय सांगणार का लंगडतोय ? खोलीत बसून लागलं ? Uhoh

काल पुष्पा कुठेतरी जायची तयारी करत असते. अरुण निमकर येतात तर त्यांना ती सांगत नाही व घराबाहेर पाठवून सॉन्या ला फोन करते की मी येतेच म्हणून (वाड्यावर? >>>>>>>>> सॉन्याच ईआईला इथे राहायला या, आपण दोघी मिळून बन्द खोलीच रहस्य शोधून काढू सान्गते, अस दाखवलय.

ईशाचा विश्वास बसत नाही. सोन्या म्हणते कि चल...खोलि उघडून खातरी करुन घेऊ! >>>>>> ह्या दोघी त्या खोलीच्याबाहेर असे भान्डत होते, इतक्या वेळात विस तीन काय, सहा खून करुन पुन्हा खोलीत आला असता. Lol

जाताना विक्रांत च्या पायाला स्टूल लागते व तो झेंडे चा आधार घेऊन लंगडत जातो.. >>>>>>> पण मला खून करताना किव्वा झटापट करताना त्याच्या पायाला लागलय अस वाटत.

पण राजेशला आणि मुलाला कस मारल ते मात्र नाही कळल >>>>>>> विस आणि झेण्डे ' वहिनीने चहा छान केला. पण चहात चार चमचे साखर जास्त होती' असे काही तरी म्हणत होते. त्या चहाचा आणि खुनाच काहीतरी कनेक्शन असाव.

त्यांना मारलेल दाखवल तर विक्या खुनी होईल मग वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेमकहिणी केड्या कशी बसवेल? >>>>> हो ना. खर तर अश्या क्रुर माणसाचा 'बाजीगर' सारखा शेवट दाखवला तर ते योग्य होईल. ईशा राधिका स्टाईल विसला शेवटी माफ करते, विस तिच्या प्रेमाने सुधारतो असे दाखवले तर त्याला काय अर्थ राहील?

काल विक्या जाताजाता म्हणाला कि आपण इथे आलेलो याचा काही पुरावा ठेवायचा नाही..अश्या अर्थाचं . .. सो ते हातातलं कड आणि अजून काहीतरी उचलतात असं दाखवलं .. पण कपाच्या कानावर यांच्या बोटांचे ठसे उठणार ना ?प्लस चेंडू वर , दाराच्या कडीवर ..
आणि आता वीस च्या पायाला लागलय ना काहीतरी .. म घरी काय सांगणार का लंगडतोय ? खोलीत बसून लागलं >>>>>>>>>>> सहमत

बंद खोलीतून बाहेर पडण्याचा मार्ग चक्क घरातून आहे,सोनिया ने विक्याला बाहेर जाताना पाहिलेल असत,आणि तरीही गेली 20वर्ष हे कुणालाही कळत नाही. >>>>> त्या बन्द खोलीच रहस्य आईसाहेबान्नाही माहित असाव. त्या खोलीचा विषय काढल्यावर एकतर त्या गप्प बसतात किव्वा विषय बदलतात.

गजा रे गजा काय तुझी मजा
इषाने वाजवला बेंडबाजा >>>>>>>> Rofl ईशा आणि गजाचा बॅण्डबाजा वाजवेल? तस झाल तर तो सुदिन असेल प्रेक्षकान्साठी.

सुभा मात्र बेस्ट++++++++++++111111111+++++++++ सुभा. साँलिड... ईशा बरोबर बोलताना पण एक्शप्रेशन मस्त. पण कालचा सुभाचा अभिनय लाजवाब. सोन्या ची पण अँक्टींग छान आहे .>>>>>>>> +++++++११११११११११११

ईशा ने राजेश ला गुन्हेगाराचे नाव सांगायला भाग पाडले आणि त्याला लटकवले आहे. त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिला काहीही करावंसं वाटलं नाही. फक्त ईशा विसपुढे गुपचिळी ठेवत नाही म्हणून राजेश लटकलाय >>>>>>> नैतर काय. नेहमी सेण्टी डायलॉग्स फेकते तस याही वेळी ईशाने बोलायला हव होत की " फ्रॉड करणारा जो कोणी असेल , त्याला जर त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला तर तो स्वत: हुन तुमच्यासमोर (विस) कबुली देईल" किव्वा " देव त्याला शिक्षा देईल" आणि तिने फ्रॉडची केस बन्द करायला हवी होती. बिझनेसमध्ये अस सुद्दा वागाव लागत हे शिकवल नाही का विसने हिला?

फेबुवरच्या प्रोमोखालचे निगेटिव्ह कमेण्टस वाचले. खर तर हि सिरियल आत्ता कुठेतरी पकड घेऊ लागली आहे. 'जिवलगा' चा प्रोमो पाहून तुपारेची टीम खडबडून जागी झाली वाटत. ह्याआधी विसचा खलनायक एकतर छदमी हसायचा किव्वा एका जागी बसून डाव रचायचा. दुसरे काही कामच नसायचे त्याला. आता कुठे तो हालचाल करु लागलाय. Proud

केडया माबोवरचे डायलॉग्स चोरायला लागला वाटत. माबोवरचा 'अगदी अगदी' ईआई तोण्डून काल ऐकला. आता केडया माझी स्टोरी सुद्दा चोरेल वाटत. आ़णि आता चोरण्याशिवाय दुसरा पर्यायही नाही त्याच्याकडे. जिवलगा आलाय ना! Wink

त्या प्रवाहवरच्या मोलकरीण नावाच्या सिरीअलला ओलांडून पुढे जाता जाता अचानक आपला जालींदर दिसला....हित्तं काम न्हाई म्हणून थित्तं गेला वाटतं. (तसंही इथला व्हिलनचा रोल सुभ्यानं घेतलाय.)

बंद खोलीतून बाहेर पडण्याचा मार्ग चक्क घरातून आहे,सोनिया ने विक्याला बाहेर जाताना पाहिलेल असत,आणि तरीही गेली 20वर्ष हे कुणालाही कळत नाही. >>>>> त्या बन्द खोलीच रहस्य आईसाहेबान्नाही माहित असाव. त्या खोलीचा विषय काढल्यावर एकतर त्या गप्प बसतात किव्वा विषय बदलतात.>>>>>> हो मला पण वाटत.... इशा नेहमी त्या रुम च्या बाहेर असली की त्या तिच्या मागे दाखवल्यात

मला कायम त्या बंद खोलीचा झाडूपोछा, डस्टिंग कोण करत असेल, बाकी कोणी जात नाही तर विक्याच करीत असेल काय असे प्रश्न पडतात.

Pages