तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

विक्या खलनायक आहे माहीत असूनही त्याचीच दया इली प्रोमो पाहून. Wink जालींदरचाही केड्याला आपल्याला यायला हवाय तेवढा राग येत नाहीये अजून.
(मंद मठ्ठ सत्शील ) इशापेक्षा (खलप्रवृत्तीचा) सुभा मऊ.
(दगडापेक्षा वीट मऊ च्या चालीवर)

हे कुठे दिसलं>>> झी मराठीच्या फेबु वर नवीन प्रोमो आलाय.
सुभा उत्तम अभिनेता असल्यामुळे गायत्री दातारचा अभिनयातला मठ्ठपणा अजूनच हायलाईट होतो

नवीन प्रोमोप्रमाणे आता बेबी गायब होणार आहे >>>>> किती छान बातमी... आनंदी आनंद गडे.... धन्यवाद UP
आणि विक्या वेड्यासारखा तिला शोधणार आहे >>>>> कशाला ते ? गेला ना सुंठीशिवाय खोकला

https://youtu.be/0b3rMIWMRgE >>>>> हे आपल्याला का नाही सुचलं? आपल्यालाही सोडवलं असतं बाप्पांनी या घोर संकटातून

इथे लीड हिरोईन म्हणून काही अपेक्षा असतात >>>>> मीरा... प्रेक्षकात निरपेक्ष वृत्ती यावी हा उदात्त हेतू असू शकेल या निवडीमागे.

सरप्राईझिन्गली कालचा एपिसोड चान्गला होता ईशाचा आवाज सोडून. जयदीपने त्या गोळया घ्यायच बन्द केल वाटत, हल्ली शहाण्यासारखा वागायला लागलाय.

आला ग बाई आला ग सुभा आला ग ( आनन्दाने नाचणारी बाहुली)

रुपालीला विसने फोन केला असावा. ईशाला गणपतीच्या देवळात घेऊन ये म्हणून.

आणि विक्या वेड्यासारखा तिला शोधणार आहे >>>>> कशाला ते ? गेला ना सुंठीशिवाय खोकला >>>>>>>> अस कस अस कस विस सोन्याची कोम्बडी ( प्रॉपर्टी) अशी कशी जाऊ देणार?

सुभा उत्तम अभिनेता असल्यामुळे गायत्री दातारचा अभिनयातला मठ्ठपणा अजूनच हायलाईट होतो >>>>>>>> ++++++११११११११

सॉन्याचे सगळे मुद्दे बरोबर होते. पण टेप अडकत होती त्याच त्याच मुद्द्यांवर. >>>>>>>>> सहमत

खरतरं कर्जत च्या देवळात भेटायला हवे होते दोघे. >>>>>>>>> विसला मग ईशा आणि रुपालीसाठी कार पाठवावी लागली असती. आधीच तो निमकरान्वर करवादलाय. त्यान्च्यावर आणखी उपकार कशाला करायला जाईल कार पाठवून. आधी केल ते खुप झाल.

"विक्रांत,तू ईशाच्या प्रेमात वेडा झाला आहेस का अस झेंडेने विचारल्यावर विक्या चक्कर येऊन कोसळणार आहे. >>>>>>>> ईथे कुणीतरी म्हटल होत त्याप्रमाणे विसला पुन्हा पॉझिटिव्ह दाखवतील वाटत.

बेबी बिपीनच्या बाइकवरून उतरून सरळ चालू पडली >>>>>> मी चुकून बेबी बिपिनच्या बाईकवरुन पडली अस वाचल. Biggrin

विपाशा >>>>>>> Rofl

शनिवारच्या भागात चक्क जरा जरा लॉजिक होतं - विक्याला तन्मणी प्रकरण माहीत नव्हतं त्यामुळे त्याने आल्या आल्या चिड्चिड सुरु केली, मेबी घर सोडून जायला काहीतरी कारण म्हणून, तेवढ्यात तन्मणी दिसला, आयतचं कोलीत मिळालं - असा माझा अंदाज >>>>> प्राजक्ता, तुमच लॉजिक योग्य होत. तन्मणीच्या किव्वा आणखी कुठल्या तरी कारणावरुन घर सोडण्यातून विसचे दोन हेतू साध्य झाले. १. निमकर राजनन्दिनीविषयी खोदून खोदून विचारतायत. आता ईशा त्याला नन्दिनी विषयी विचारेल. ईशाला ' तीच राजनन्दिनी आहे' हे पटवून देण्यासाठी तो नन्दूविषयी सान्गेल. २. ईशावर ऑफिसची जबाबदारी आली त्यातून ती सक्षम बनेल.

पण कधी कधी काही काही कटाक्ष तो एक्दम भारी टाकतो. >>>>>>> अगदी अगदी

बाकी त्याला साबण , राख, विम बार कश्याने तरी घासून पुसून लख्ख करावे असेच कायम वाटते .. तेलकट चिकट वाटतो >>>>>>> +++++++२२२२२२२२२२ कोणीतरी त्याला कोलगेट सुद्दा दयाव.

तिचा आवाज किती चिरका आणि गळ्यात कफ अडकल्यासारखा येतो. एक पुडी ड्रेनेक्स टाकून घशात अडकलेला कचरा मोकळा करावा का? की गोल ब्रशने घासून घ्यावा?>> अगं हे करता करताच तिच्या घश्यात घासणी अडकली .. आणि कायमचा असा झाला आवाज ..

सुभा साठी डोळ्यात बदाम वगैरे नाहीयेत.. पण कधी कधी काही काही कटाक्ष तो एक्दम भारी टाकतो.. तेव्हा तेवढ्यापुरते थोडे बदाम येतात डोळ्यात ..
बाकी त्याला साबण , राख, विम बार कश्याने तरी घासून पुसून लख्ख करावे असेच कायम वाटते .. तेलकट चिकट वाटतो

पुण्याला असं काय गूढ आहे ? त्या गुप्त खोलीतून पुण्याला जायला भुयार आहे की काय ? गुपचुप जायचं असेल तेव्हा तसं जातो आणि चिडून जाताना नॉर्मल माणसांसारखा जातो ?

बाजीगर मध्ये कशी शाहारूखची आई राखी असते,तशीच पुण्याला विक्याची आई असेल.
केड्याच बहुतेक कन्फर्म झालेल दिसत आहे की बाजीगरच करायचा.
शितुला फेकून दिल असेल गच्चीवरून आणि आता बेबीला फसवत असेल ,पण बेबी लई शाहणी निघेल आणि त्याचा डाव पलटवेल,मग शेवटी राखीसारखी धापा टाकत त्याची आई येईल आणि मग सरंजाम्यांमुळेच विक्याच कुटुंब देशोधडीला लागल ,म्हणून विक्या असा वागला हे कळल्यावर बेबीला एकदम अस भरुनच येईल ,आणि ती ते जगप्रसिध्द भोकाड पसरेल आणि म्हणेल"सर्, आई ट्रस्ट यू"
ही साठा उत्तराची कहाणी,पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

पुण्याला जाताना इतका सस्पेंस...? Uhoh
पुणे गुन्हेगारांचं आणि समस्त आतल्या गाठीच्या लोकांचं इतकं आवडतं ठिकाणे हे नव्हतं माहित!

आज ईशाचा रागावल्याचा अभिनय छान झाला. हि मुलगी रागावल्यावरच चान्गली अ‍ॅक्टिन्ग करते. मालिकाकर्त्यान्नी बदला घेण्याच्या प्लॉट मध्ये हिच्या रागाचा वापर करावा.

ईआई जेव्हा ' बघ जावईबापू तुझी किती काळजी करतात' तेव्हा ईशाने ' माहित्तीये, उपकार केले' ह्या अर्थाचे एक्सप्रेशन्स दिले. ते एक्सप्रेशन्स चक्क तिला जमले. फक्त चिडल्यावर तिचा मुळचा चिरका आवाज आणखीनच असहणीय होतो.

कालची देवळातली सुभाची स्माईल छान होती. मला वाटल, आता शाहरुखची सिग्नेचर स्टाईल देवळात देतो की काय.

ह्यान्च्या प्रदक्षिणान्ना वैतागून एका प्रदक्षिणा घालणार्या माणसाने चक्क ईशाचा हात धरुन विसपुढे तिला उभी केली. Lol

समहाऊ, काल मला विसच छद्दमी हसण 'छदमी' वाटल नाही.

ईआईला मुलीच्या लहानपणीच्या आठवणी अडगळ वाटते? त्याच अडगळीतून विसला 'सोने' सापडू शकते. ( विससारखी छदमी हसणारी बाहुली)

ईशा रागावली आहे , सो तिच रुपालीच्या मदतीने गायब झाली असेल. नाहीतर रुपालीने तिला ' विसच तिच्यावर खर प्रेम आहे की नाही.' हे चेक करण्यासाठी गायब व्हायला सान्गितले असेल.

सुभाचा कालचा अभिनय छान होता. ईशावर त्याच खरच प्रेम आहे का तिला तो फसवतोय हेच काल कळत नव्हत.

ड्रेनेक्सची पुडी , ब्रश, गोल ब्रश, घासणी, विम बार, साबण, राख... .>>>>> Lol

. प्रेक्षकात निरपेक्ष वृत्ती यावी हा उदात्त हेतू असू शकेल या निवडीमागे.>>>>>> कारवी भन्नाट सुचतं ग तुला

बाकी काहीही म्हणा पण ईआई आणि ईबाबांचे संवाद खूप गोड असतात.
खरंतर किती धकाधकीचे जीवन आहे आपलं. इथे ईबाबा वेळेत घरी येतात. घरात टिव्ही बंद असतो. त्या दोघांत संवाद होतात. माझ्या आईवडिलांचा असाच साधारण दिनक्रम असायचा. वडील वेळेत घरी यायचे. रात्रीची जेवणं, बायकांची झाकपाक झाली की काॅलनीतले लोकं एकत्र शतपावली करायला जायचे. पैसा मर्यादित होता तरी एकमेकांना वेळ देणं हिच खरी श्रीमंती होती.

बेबीला तिच्या साबांनी घरातच लपुन ठेवले होते. आणि हा इबाळाचाच प्लॅन! अश्याने विसं ठिकाणावर येणाराय होय! Biggrin

अनुभव खरे तर चांगलाच. निदान काही ड्रामा घडतो आहे. मला गुरू शनाया बद्दल काहीच जजमेंट नाही. दे आर सिंपली डिफरंट पीपल अँड इन लव्ह. राधिका आणि सासू कधीच आवडल्या नाहीत. मला नागपुरी लोकांपासून दूरच राहवे असे वाट्ते. गुप्ते आवड तात पण रेव्ती नाही.
शनाया ची आई किती खादाड दाखवली आहे व फुकटी. पुण्याचे लोक असे नसतात अहो. गुरू ची प्रायवसीची डिमांड एकदम बरोबर आहे.

सौमित्र परत गेला तर बरे होईल.

ईआई आणि ईबाबांचे संवाद खूप गोड असतात. >>>>>>>> ++++++++११११११११ ईआईचे लग्नानन्तरच्या जीवनावरचे डायलॉग्ज छान होते.

अखेर ईशालासुद्दा कळल तर की लग्न म्हणजे केवळ रोमान्स नाही. ती म्हणते की डिडिएलजे मध्ये लग्नानन्तरच दाखवल असत तर आपल्याला शाहरुख- काजोल एकमेकान्च्या झिन्ज्या उपटताना दिसले असते. हिने 'कुछ कुछ होता है' बघितला नाही का? त्यात हे दोघे दाखवलेत की झिन्ज्या उपटताना. Biggrin

ईशाचा विसला धडा शिकवण्याचा प्लॅन खरतर इतका वाईट नव्हता. पण हा प्लॅन तिच्यावरच उलटणार आहे. आईसाहेब पुन्हा उखडणार आहेत तिच्यावर. खरतर विसलाही तिचा डाव कळला असेल. म्हणूनच बेशुद्द पडण्याच नाटक करुन तिला दुसर्यान्दा शिक्षा देत असेल.

विस आणि रुपालीच नक्की काय चाललय? ती घाबरत घाबरत त्याच्याशी बोलत होती. तो तिला हात खेचून नेत होता. अस तर नसेल ना, रुपालीलाही त्याने ' राजनन्दिनी प्लॅनमध्ये' सामिल करुन घेतल नसेल ना? Uhoh

झेण्डे म्हणतोय की ईशा हि टिपीकल बायको आहे, राजनन्दिनी अशी नव्हती. म्हणजे? ती विसच्याबाबतीत केअरलेस होती का?

सॉन्या नेहमीच खर बोलते पण जयदीपला हे पटत नाही.

सौमित्र परत गेला तर बरे होईल. >>>>>> सोबत त्याने राधिका आणि अर्थवलाही घेऊन जाव.

सुभाचा कालचा अभिनय छान होता. ईशावर त्याच खरच प्रेम आहे का तिला तो फसवतोय हेच काल कळत नव्हत.>> अगदी बरोबर सुलू..
पण ते तर अजून केड्यालापण माहिती नसेल Wink

आता मीनिन्ग लेस एपिसोड ची खैरात चालू आहे. सरांना चक्कर आली की पाच मिनिटात इशा कर्जतहून ऑफिसात हजर विथ जयदीप!!!
बीपी शूट होणे हा झीचा लाडका आजार आहे कारण त्यात फक्त चक्कर येण्याची अ‍ॅक्टिंग करावी लागते व पाच मिनिटात सर्व आलबेल.
हर सिरीअल मध्ये एकदा तरी असतो हा प्रकार.

फार एंड तुमचे दोन मार्कर आले. बायकोने फोन मागितला तर सर म्हटले जशी राणि सरकारांची आज्ञा. आणि त्याने टावेलच्या मिशाने बायकोला वर बोलवले तर साबा लाजत हसून म्हणे वेडाबाई तो तुला बोलव त आहे. क्रिंज वर्दी टु से द लीस्ट.

डिरेक्टरच्या बायकोला धमकी द्यायची हिम्मत कशी होते मायराची?!!

सरांना चक्कर आली की पाच मिनिटात इशा कर्जतहून ऑफिसात हजर विथ जयदीप!!! >>>>>

हो ना !
आणि आली सुद्धा घरी लगेच !
कसं काय जमतं बुवा कर्जत ते मुंबई ये-जा इतक्या सुपरस्पीड ने !

प्रेक्षकांना खूपच मूर्ख गृहीत धरलंय .

फार एंड तुमचे दोन मार्कर आले. बायकोने फोन मागितला तर सर म्हटले जशी राणि सरकारांची आज्ञा. आणि त्याने टावेलच्या मिशाने बायकोला वर बोलवले तर साबा लाजत हसून म्हणे वेडाबाई तो तुला बोलव त आहे. >>> Lol

मालिका आता अगदीच रटाळ,कंटाळवाणी होत आहे.
केड्याने स्वत: आठवढाभर बघावी,म्हणजे प्रेक्षकांना किती छळतो ते कळेल.

डिरेक्टरच्या बायकोला धमकी द्यायची हिम्मत कशी होते मायराची?!! >>>>>> अगदी अगदी आणि ही बावळट बर ऐकून घेते तिच. सान्गायच ना तिला, 'सरान्ची बायको मी आहे आणि हा आम्हा नवरा- बायकोमधला प्रश्न आहे. सो, तु तुझ्या कामाशी मतलब ठेव. अ‍ॅण्ड थॅन्कस फोर युअर कन्सर्न फोर सर.' एरवी ही चुरुचुरु बोलते ना नवर्याशी, मायरा समोर दिसली तर गप्प का राहते?

खर तर राधिका मसालेच्या मालकिणीने ईशाकडून ' नवर्याला धडा कसा शिकवावा' ( धडा लॉजिकलेस असला तरीही) हे शिकाव आणि बेबीने हिच्याकडून ' सवतीला चार प्रेमाचे शब्द कसे सुनवावेत' हयाचे धडे घ्यावेत.

विसने म्हणे चक्कर येण्याच नाटक केल, म्हणजे तो डॉक्टरसुद्दा खोटा होता? Uhoh

बायकोने फोन मागितला तर सर म्हटले जशी राणि सरकारांची आज्ञा >>>>>>> आणि त्याने दिला सुद्दा. अरे बाबा, व्हिलन आहेस ना तू, फोन तुझ्याजवळ ठेवायला नको? प्लॅन सक्सेसफुल होण्यापुर्वीच बायकोला सिक्रेटस कळायचे फोनमधून.

पण ते तर अजून केड्यालापण माहिती नसेल >>>>>>>>>> Lol सध्याचे एपिसोडस पाहता, तो 'ईशाला राजनन्दिनी म्हणून प्रुव्ह करायचय' हेही विसरुन गेलाय.

Pages