Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Sahaj eka divasa sathi aaleli
Sahaj eka divasa sathi aaleli astana sadi blaouj kase kay ishakade,
ष्टोरी मधला मायरा चा रोल
ष्टोरी मधला मायरा चा रोल संपला की काय
आता सोन्या ला जास्त फूटेज असेल असं दिसतंय
रच्याकने , ईआई , रात्री
रच्याकने , ईआई , रात्री जमिनीवर झोपली तेव्हा अंथरूण-पांघरूण जांभळ्या रंगाचं होतं .सकाळी उठली तेन्व्हा बिस्कीट कलर..>>> ते पांघरुण डबल कलरचे होते.
केड्या स्वतः साठी भूमिका
केड्या स्वतः साठी भूमिका बेतण्याच्या तयारीत होताच... गजा पाटील उर्फ "मी वाघ आहे" असे म्हणणारे माकड म्हणजेच केड्या असू शकतो...
सॉन्या सोडल्यास (जयदीप कन्फ्यूज्ड) मायरा सहित मालिकेतील सदोदित डोक्यावर पडलेली तमाम मंडळी त्या तोतयाला(माकडाला) गजा पाटील-गजा पाटील(वाघ-वाघ)मानायला लागतील..
..... निमकर : बघ बरं पुष्पा, तु उगीचच विक्रांत सरांवर संशय घेत होतीस, अग केवढा मोठा माणूस, काय त्याचं कर्तृत्व,...ब्ला ब्ला ब्ला.........
पुष्पा : खरंय हो निमकर तुमचं, मी आपली त्या सोनिया ताईंच्या नादी लागून माझ्या गुणी जावई बापूंना दोष देत होते... आता एक काम करा, कालच्या पोळ्या बर्याच शिल्लक आहेत मी त्यांचे आवडीचे लाडू बनवते तेवढे देऊन या.. "
आता परांजपे - त्यांचा एक तर
आता परांजपे - त्यांचा एक तर ईशाच्या कौतुकात ओथंबलेला चेहरा नाहीतर एरंडेल प्यायलेला चेहरा - करून "गजा पाटील" कोण ते सांगणार तेवढ्यात काहीतरी होऊन बोलू शकणार नाहीत.
तो राजेश आणि फॅमिली गेले ह्याची बातमी अजून ईबाळापर्यंत किंवा जनरल बाहेर कशी आली नाही ?
तो राजेश आणि फॅमिली गेले
तो राजेश आणि फॅमिली गेले ह्याची बातमी अजून ईबाळापर्यंत किंवा जनरल बाहेर कशी आली नाही ?>> तेच तर. असल्या गुन्ह्यांचे शोध मुंबई पोलीस १८ तासात वगैरे लावते. इशा पण जबाबदार आहे त्या फ्यामिलीच्या खुना ला. काल पण किती पिडत होती मिळाला का मिळा ला का म्हणून. अरे ते काय हरवलेले खोड रबर आहे का?
हे अनाडी पण गो ड मुलीला काहीतरी दाखवून फसवायचे हे केड्याचे टेक्निक जुनेच आहे. गुरू टॅक्सी चालवतो तेव्हा शनायाला त्याचे मोठ्ठे ऑफिस बघायचे असते तर ते चक्क एक सेट भाड्याने घेउन दाखवतात. व तिला पन पटते ते. रिडिकुलस
विक्रांत ची अॅक्टींग मस्त
विक्रांत ची अॅक्टींग मस्त होती जेव्हा ईशा विचारते.., "सर, मिळाला का तो?"......


बहुतेक त्याला नॅचरलीच तसे हाव भाव जमत असतील...ई बाळाच्या वैतागातून....!
वर च्या मेधावि च्या सग ळ्या उपमा मस्त!
भारीच चालुये चर्चा,
भारीच चालुये चर्चा,
एपि बघत नाही, पण इथे वाचते सगळ
बघावा असा एपि आला कि सां गा लोकहो
बघावा असा एपि आला कि सां गा
बघावा असा एपि आला कि सां गा लोकहो
Submitted by किल्ली on 28 March, 2019 - 13:32 >>>> वाट बघा !! येतोय !! तुमची पतवंडं आली तरी.... असा एपि नाही येणे..... सत्य हे त्रिवार !!!
विसं , ईशाची नक्कल भारी करतो. >>>> बहुतेक भाव भावेंचे.... व्यक्त सरंजामे करतात. त्यामुळे खरे / भारी वाटत असावेत. काय करणार, आपण बघणे बंद करू शकतो.... त्यांना काही पर्याय आहे का ते मेषपात्र न बघण्याचा?
आज त्या फेमस कपाटातून अंथरूण पांघरूण पण निघालं Proud कपाट आहे का जादूगाराची हॅट? >>>>> इ! श्या! ला गिफ्ट देण्यासाठी ससा आला त्यातून की हॅट... तोपर्यंत कपाटच
बाकी गंडलेली टाईमलाईन + मेकप + सुसूत्रता अजून तसेच आहेच का? धन्य आहेत.
त्या मायराचे स्कर्ट पुढून मागून इतके घट्ट दिसतात ती उभे असताना पण.... बहुतेक मेहनतीने जपलेली फिगर, सपाट पोट इ दाखवायला.... पण बसल्यावर ताण येऊन शिवण कशी उसवत नाही किवा बक्कल तुटून येणे वगैरे?
तुमची पतवंडं आली तरी.... असा
तुमची पतवंडं आली तरी.... असा एपि नाही येणे..... सत्य हे त्रिवार !!!>> जाउ देत मग
इथेच वाचत राहीन.. तुमचे प्रतिसाद विशेष आवडतात कारवी
फारएण्ड कुठे आहेत?
ते भारी चिरफाड करतात सीरीयेल्ची इथे
साडी पण झोपताना गुलाबी सकाळी
साडी पण झोपताना गुलाबी सकाळी टेबल पाशी चहा पिताना व्हायोलेट रंगाची (घरातल्या कुणाची तरी दिली असेल असं मी समजून घेतलंय . )
ना आधणाचं पाणी ना त्यात तेलाचं मोहन घालून काढलेली उकड 
आणि चकली साठी पीठ असं भाकरीचं पीठ भिजवल्यासारखं !! साधं गार पाणी ओतून ??
आज त्या फेमस कपाटातून अंथरूण पांघरूण पण निघालं Proud कपाट आहे का जादूगाराची हॅट?>> खरंच कहर होता तो ..
मेधावि .. अख्या पोस्टला + १११
@UP परांजप्यांना पण माहित आहे, गजा पाटील कोण आहे ते... >> असा संदर्भ आला होता का ? लक्षात नाही माझ्या ..
@anjali_kool...आज
@anjali_kool...आज प्रीकँपमध्ये विक्या झेंडेंना सांगताना दाखवल आहे तेव्हाच बेबी परांजप्यांना विचारत असते पाटलाबद्दल.
मेधावि
मेधावि
चकल्या ईआईने केल्या, नाव सॉन्याच. विसला ईआईच्या हातची चव कळली असणार म्हणून " छान झाल्या चकल्या" अस खोट ( अॅझ युझ्वल) बोलला.
तरी बर सॉन्याने चकल्यान्च क्रेडिट ईआई आणि ईशाला दिल. चुक झाली तेव्हा सॉरीही म्हणाली. हि मुलगी दिसते तशी वाईट नाही.
विक्रांत ची अॅक्टींग मस्त होती जेव्हा ईशा विचारते.., "सर, मिळाला का तो?"... >>>>>>> +++++++ अगदी अगदी. दोन्ही मायलेक सारख्याच. नको त्या गोष्टी सर्वान्समोर पचकतात. ईआईने ' त्या खोलीत' इतक्यावेळी आईसाहेबान्समोर उच्चारल, सावध झाल्या त्या!
बादवे, जनरली आपण माणुस 'सापडला' आणि वस्तू 'मिळाली' अस म्हणतो. हिच काय सारख गजा पाटील मिळाला का, गजा पाटील मिळाला का. सुभा बरोबर ' गजा पाटील नक्की सापडेल' म्हणतो.
कालच्या पोळ्या बर्याच शिल्लक आहेत मी त्यांचे आवडीचे लाडू बनवते तेवढे देऊन या.. " >>>>>> त्या लाडवान्च्या भीतीने विस स्वतःहून ' मीच तो गजा पाटील' असल्याची कबूली देईल.
ईशा आई इथे राहायला आली आहे दोन चार दिवस म्हटल्यावर विसने "अरे व्वा!" म्हटले, तेव्हा त्याच्या मनातले " अरे बापरे" किव्वा " हि आणखी एक कटकट" असे एक्सप्रेशन्स स्पष्ट दिसत होते.
वाट बघा !! येतोय !! तुमची पतवंडं आली तरी.... असा एपि नाही येणे..... सत्य हे त्रिवार !!! >>>>>> +++++++११११११ फक्त एकच दिवस हॅपनिन्ग अस काहीतरी दाखवतात ( सोमवारचा एपिसोड डिस्गस्टिन्ग होता तरीही) , नन्तर उरलेला आठवडा कन्टाळवाणा जातो.
त्या मायराचे स्कर्ट पुढून मागून इतके घट्ट दिसतात ती उभे असताना पण.... बहुतेक मेहनतीने जपलेली फिगर, सपाट पोट इ दाखवायला.... पण बसल्यावर ताण येऊन शिवण कशी उसवत नाही किवा बक्कल तुटून येणे वगैरे? >>>>>> कारवी, कित्ती ते भारी निरीक्षण!
हे अनाडी पण गो ड मुलीला काहीतरी दाखवून फसवायचे हे केड्याचे टेक्निक जुनेच आहे. गुरू टॅक्सी चालवतो तेव्हा शनायाला त्याचे मोठ्ठे ऑफिस बघायचे असते तर ते चक्क एक सेट भाड्याने घेउन दाखवतात. व तिला पन पटते ते. >>>>>>> अमा, तुम्हाला नवीन शनाया गोड कशी काय वाटते हो?
आज ईशा ऑफिसात आल्यामुळे विससकट मायराचा दारुण अपेक्षाभन्ग होणार आहे.
काल ई बाळ ऑफिस ला जाताना आई
काल ई बाळ ऑफिस ला जाताना आई ला सांगत असते की मी जाउन येते माझं महत्वाचं काम आहे. ईथे आहेत सगळे तुझ्यासोबत.
तर ईआई तिला निरोप देताना म्हणते .."हळु जा"... हळु जा काय....हे कसलं मराठी ? ..
आपण बाहेर जाणार्या लोकांना जे स्वत: गाडी चालवत जातात तेव्हा म्हणतो की "सावकाश जा" ...हे हळु जा काय असतं...? कोण लिहितं असले कृत्रिम संवाद..
कोण लिहितं असले कृत्रिम संवाद
कोण लिहितं असले कृत्रिम संवाद..>>> तेच ना.. त्यातलच एक ; 'माझी मदत करा' .. बरं लिहिला असेल संवाद चुकीचा .. तर कलाकार दुरुस्त करून नाही योग्य शब्द म्हणू शकत का ?त्यांना ते अलाऊड नसतं का बहुतेक?
रात्री जमिनीवर झोपली तेव्हा
रात्री जमिनीवर झोपली तेव्हा अंथरूण-पांघरूण जांभळ्या रंगाचं होतं .सकाळी उठली तेन्व्हा बिस्कीट कलर.>>>> अगदी अगदी. हेच लिहायला आले होते. इतकी ढळढळीत चूक.
साडी पण झोपताना गुलाबी सकाळी टेबल पाशी चहा पिताना व्हायोलेट रंगाची (घरातल्या कुणाची तरी दिली असेल असं मी समजून घेतलंय . )
बहुतेक ईबाळ आईला म्हणते ना तू आवरून ये चहा घ्यायला मग आंघोळ करून साडी बदलून आली असेल.
पण बसल्यावर ताण येऊन शिवण कशी
पण बसल्यावर ताण येऊन शिवण कशी उसवत नाही किवा बक्कल तुटून येणे वगैरे? >>>> अचानक ओढवलेला प्रसंग , हतबल होऊन खुर्चीतच चिकटून बसलेली पण अस्वस्थ होउन चुळबुळ करणारी मायरा आणि समोर मान वाकडी करून "मायराजी?,any problem?" असं विचारणारे झेंडे , असा काहीतरी सीन डोळ्यासमोर आला.
सकाळी उठली तेन्व्हा बिस्कीट
सकाळी उठली तेन्व्हा बिस्कीट कलर.>>> हो पण ते आतून बाहेरून असं २ रंगांचं होतं ..
कारवी, तुम्ही स्कर्ट बद्दल
कारवी, तुम्ही स्कर्ट बद्दल म्हणताय नि मला असाच अचंबा तिच्या टॉप बद्दल वाटतो नेहमी. इथे अधिक बोलणे योग्य नाही म्हणून थोडक्यात उल्लेख केला आहे. मटेरियल फारसं ठीक नसतं टॉप साठी वापरलेलं.
हो पण ते आतून बाहेरून असं २
हो पण ते आतून बाहेरून असं २ रंगांचं होतं ..>>>> हो पण ते रात्री असं उलट्लं जातं का एवढं

जाऊदे किती किस पाडतोय आपण
इषामाॅम पचकली.
इषामाॅम पचकली.
मी मेधाविंचा एपिसोड वाचलाच
किल्ली, सगळेच फारएण्डच्या तालमीत तयार झालेत. त्रुटी टिपण्यात. ते बहुतेक वरसंशोधन करतायत इ श्या साठी.
हे अनाडी पण गो ड मुलीला काहीतरी दाखवून फसवायचे हे केड्याचे टेक्निक जुनेच आहे.>>>>>>> अमा, ते शनाया प्रकरण मी नाही पाहिलेले. पण इथे --- अनाडी ठीक आहे पण गोड????!!!!!! कुठल्या अँगलने??
प्राचीन, स्वस्ति, >>>>> तिचे एकूणच कपडे तिच्या पदाच्या मानाने अयोग्य वाटतात. मटेरिअल रीचनेस, ग्रेस, काहीच नाही. रिसेपशनिस्ट / सेक्रेटरी सुद्धा याहूम जास्त डिसेंट ड्रेस कोडमध्ये पाहिल्या आहेत. त्या साडीतल्या बायका अख्ख्या दाखवल्या की बघा -- पायाकडे मागे साडीला घेरच नसतो. खेचल्यासारख्या दिसतात. बहुतेक परकर न घालता जीन्स / लेगिंग्स / सलवारवरच नेसतात.
संवादाचा आनंदच होता मी जेव्हा बघितले तेव्हा.
ते चॉपर पायलटविरहित मोडमध्ये टाकून, इशा, केड्या, दिग्दर्शकाला त्यात बसवून बर्म्युडा ट्रँगलमध्ये जाण्यासाठी कसं प्रोग्रॅम करता येईल विचारायला हवे कोणाला तरी.
खोखो
बापरे कारवी, विस सारखाच विचार केला आहे हा.. फिदी
इषामाॅम पचकली >>>काहीतरी
इषामाॅम पचकली >>>काहीतरी happening असणार उदयाचा एपिसोड.
जानूआई असती तर एव्हाना ती
जानूआई असती तर एव्हाना ती खोली काय गजा पाटील चं पण पितळ उघडं केलं असतं
मुळात ईआईला "गजा पाटील" हे
मुळात ईआईला "गजा पाटील" हे नाव कुठून कळलं ? आता एका नावाची २ माणसं नाही का असू शकत ? आपल्या कंपनीत किती एकाच नाव आडनावाची माणसं असतात , लगेच गपा म्हणजे विस च असणार असं का वाटावं सगळ्यांना ?
आईसाहेब विसच्या गोटातल्या आहेत म्हणून चक्कर आली का विरुद्ध पार्टीत असून धक्का बसून चक्कर आली हे जाणून घेण्यासाठी बघत रहा "तुला पाहते रे" सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता आपल्या लाडक्या झी मराठी वर !!!!!!
काय ती इशाची पर्स.. आणि ती
काय ती इशाची पर्स.. आणि ती एका हातात घेउन ramp वर चालल्या सारखी ऐक्शन... कोण जात अस ऑफ़िस ला?? ही कुठे सत्यनारायणाच्या पुजेला चालली आहे की काय असे कपडे घालून वावरते . काही नाही तर laptop bag तरी द्यावी.. तसही ती राजिनामा देणार आहे सो खर्च वाचवाला असेल
परवा इशाच्या आईला झोप येत
परवा इशाच्या आईला झोप येत नसते तेव्हा ईशा म्हणते: "आई, बाथरूम ला *लागली* आहे का?? " असं कस स्क्रिप्ट लिहू शकतात..एटलीस्ट बाथरुम ला जायच आहे का असं तरी कानाला बर वाटल असतं!!
"आई, बाथरूम ला *लागली* आहे का
"आई, बाथरूम ला *लागली* आहे का?? " >>>
(गडाबडा लोळत हसणारी स्माईली कशी द्यायाची )

हो ना....असं लिहीण्या पेक्षा.
हो ना....असं लिहीण्या पेक्षा..., "आई तुला पाणी हवं आहे का? " असा सोपा प्रश्नच लिहयचा ना , केड्या!!

काहीही........!!
Pages