तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गजा पाटील>>>>>>>>>>> अर्र!! काय येडचाप एकेक गोष्टी. गणेश गायतोंडे ठेवायचं ना त्यापेक्षा. Lol

त्या बेबीला कुणाचातरी मेसेज येतो की फ्रॉड करणार्या माणसाच नाव गजा पाटील आहे आणि हे ती लगेच विक्या आणि झेंडेंसमोर पचकते.
हा प्रीकँप आहे

त्या बेबीला कुणाचातरी मेसेज येतो की फ्रॉड करणार्या माणसाच नाव गजा पाटील आहे आणि हे ती लगेच विक्या आणि झेंडेंसमोर पचकते. >>> ओह ओके.

आता लुक बदलला आहे म्हणून ठीके नाहीतर गणा पाटील पण चाललं असतं.+++++१११११
सुभाने 'नंदुची' साडी खाली पडताना पायाने उचलली. ते राजनंदिनी वर प्रेम नसल्यामुळे कि पोटाचा घेर वाढल्यामुळे.

ईबाळाला 'जिवलगाचा' प्रोमो दाखवायाला पाहिजे. डोळ्यांनी अभिनय कसा करायचा ते अमृता कडून शिक ईबाळा.

सुभाने 'नंदुची' साडी खाली पडताना पायाने उचलली. ते राजनंदिनी वर प्रेम नसल्यामुळे कि पोटाचा घेर वाढल्यामुळे. >>> Happy

तो एपिसोड विकांताला पाहिला .
आपल्या कपाटात ही साडी कशी आली याचा विचारही बाळाच्या मनात आला नाही ? फक्त ही कोणाची साडी ?? असं काहीतरी बोलली ती .
जसं कोणीही कोणाच्याही रूममध्ये कधीही घुसतं तसं कोणीही कोणाच्याही कपाटात कोणाचही सामान ठेवतं .
आणि हे तेच विसं चं कपाट आहे ना , मग खरोखर जादूगाराची पोतडीच आहे
बंद खोलीची चावी , वेताची छडी , कामाच्या फाईल्स , विसं चे कपडे आणि आता ईशाच्या साड्या ??????

सुभाने 'नंदुची' साडी खाली पडताना पायाने उचलली. ते राजनंदिनी वर प्रेम नसल्यामुळे कि पोटाचा घेर वाढल्यामुळे.>> इषावर प्रेम नसल्याने.

नंदुच्या जुन्या साड्या पण >>>>>> विस ईशावर (खोट) रागावून त्या बन्द खोलीत गेला तिकडून त्याने नंदुची साडी आणली कपाटात ठेवायला.

ईशा रन्ग लावल्यावर घाबरते, पण विसने रन्ग लावल्यावर भिती गायब? हि नन्दूच्या साडीची कमाल का? Uhoh

आता काय म्हणे रन्गीत मुखवटा घालून विस ईशाला घाबरवणार म्हणे.

सो, विस गजा पाटील आहे. इथे 'गजा' आड व्ह्याची वेळ आलीय आणि हा आरामात कॉफी पित बसला आहे.

त्या बेबीला कुणाचातरी मेसेज येतो की फ्रॉड करणार्या माणसाच नाव गजा पाटील आहे >>>>>>> जालिन्दरने पाठवला असेल मेसेज

जिवलगा चा प्रोमो पाहिला. कर्लस हिन्दीच्या बेपनाहची कॉपी वाटली. अमृता खानविलकर जेनिफर विन्गेट असावी. मधुरा देशपाण्डेला जेवि दाखवू नये म्हणजे मिळवल.

आणि हे तेच विसं चं कपाट आहे ना , मग खरोखर जादूगाराची पोतडीच आहे
बंद खोलीची चावी , वेताची छडी , कामाच्या फाईल्स , विसं चे कपडे आणि आता ईशाच्या साड्या ??????>>> ते एव्हढुस्स कपाट दोघांना मिळून पुरतंच कसं म्हणते मी .. कारण इशा पण तिथेच काय घालू बरं आज ?? असं म्हणून शोधते .. स्वतःच्या कपाटात नाही सापडलं म्हणून तिने विसं च कपाट उघडलं Uhoh .. कोणत्या बेसिस वर?? ती काय त्याचा टी शर्ट घालणार होती ?का झब्बा ? निव्वळ खुळचटपणा Angry Angry

गजा पाटील......मागे त्या कर्णपिशाच्च्यावाल्याने सांगितले होतेना कि इबाळाच्या होणार्‍या नवर्‍याचे नाव ग ने सुरु होणारे असेल. >>>>>> sonalisl त्यांना वाटले असेल लोक विसरले असतील. मग २५-३० एपिसोड गजा पाटील -- गजा पाटील खेळून मग गजा पाटील = सरंजामे "ट्विस्ट" !! आणायचा. आता काय करतील बिचारे ?

इशा किती बिंडोक आहे, >>>>> Happy मेधावि माहिती नसलेलं / नवीन काय तरी सांगा हो... हे जुनं झालं.
कुणीतरी मेसेज पाठवला तर लगेच विश्वास ठेवला >>>>> मेधावि, trust >>> love असते की नाही? मग त्या trustच्या कक्षेत सगळे आले, मेसेज पाठवणारा अपरिचीत पण

हातात असलेला प्रेक्षक नको जायला म्हणून लगेच एप्रिलमध्ये शितुची एन्ट्री.........आता कमी वेळात केड्या शितुची एन्ट्री कशी दाखवेल.परत एकदा माती खाईल का? >>>>> UP एप्रिल २०१९ असेल कशावरून? केड्यांना शंखपुष्पी बरोबर जंतांचे औषधही पाजावे लागेल, इतकी माती खाऊन नक्की झाले असणार जंत.

डोळ्यांनी अभिनय कसा करायचा ते अमृता कडून शिक ईबाळा. >>>>>> अनुराज, ती जे काय करतेय ते गुमान बघावं हे बरे. ८:३० ला जेवता जेवता बघणारे ठसका लागून मरतील तिचा नेत्राभिनय पाहून.

कारण इशा पण तिथेच काय घालू बरं आज ?? असं म्हणून शोधते .. >>>> अंजली, ती "काय नेसू आज" म्हणाली. काय घालू आज की साडी नेसू असे जेनेरिक वाक्य नव्हते. म्हणजे साडी ठरली होती मनात. फार तर लुंगी, धोतर वगैरे.
ड्रेस कोणी 'नेसत' नाही. पण साडी मनात असतानाही "काय नेसू" म्हणत नाही आपण, "कुठली साडी नेसू बरं" असं म्हणतो. पण हा सगळा शिमगा फिजूल आहे त्या लेखन-अभिनय-दिग्दर्शन दारिद्र्यापुढे.

सुलू_८२ >>>>> तुम्हाला निष्ठावान प्रेक्षक पुरस्कार नक्की द्यावा झी पुरस्कार सोहळ्यात. काय पेशंस आहे.

अवांतर -- स्माईली असतात तशा डिजिटल कानफटात मारता येत असतील तर त्यांच्या फेसबूक पेजवर चिकटवा माझ्या वतीने कोणीतरी. प्रत्येकासाठी १५-२०.

डिजिटल कानफटात मारता येत असतील तर त्यांच्या फेसबूक पेजवर चिकटवा माझ्या वतीने कोणीतरी. प्रत्येकासाठी १५-२०. >>>> Rofl

आजचा भाग पहायला लागले...पण शेताची किड-टोमॅटोची किडच्या पुढे बघूच शकले नाही.
काय ते इसापनीती-पंचतंत्र छाप उपदेश करत फिरत असते हि बया Uhoh
माझ्याकडे कथा दिली तर तिला इथून घरी जाता जाताच अपघात करुन प्लास्टीक सर्जरी करून बदलून टाकली असती.

मधुरा देशपाण्डेला जेवि दाखवू नये म्हणजे मिळवल. >>> Lol अगदी अगदी.

पण नसेल बेपनाह. मधुरा आणि स्वप्नील ऐवजी दुसरे दोघे हवे होते मात्र. स्वप्नील ऐवजी सुनील बर्वे चालला असता. मधुराऐवजी पण दुसरी कोणी चांगला अभिनय करणारी हवी होती. ती फार overacting करते.

तुपारे मध्ये शिल्पा तुळसकर ची एन्ट्री होणार होणार, होणार असं दोन महिने सुरु आहे. हवाच करतात नुसती. अजून आली नाही ना ती. तिला फार फार एक महिन्यासाठी आणतील मग हिलाच बघायला लावतील, ईशाला.

हाय भगवती, वाचते ग अधुनमधुन. काही प्रतिसाद rocking असतात, मजा येते वाचायला. शिल्पा आली का वाट बघतेय, इथे बघून समजेल मग एन्ट्री तरी बघेन तिची नेटवर Lol

त्या बेबीला कुणाचातरी मेसेज येतो की फ्रॉड करणार्या माणसाच नाव गजा पाटील आहे >>>>>>> जालिन्दरने पाठवला असेल मेसेज >>>>>>> नाही त्या युनियन लिडर ने च केला होता.... ती वाचते ना... कि तुम्ही ज्याला बहीण मानल ती बहीण विधवा होईल को णाला सागु नका

अरे काय हे..... Rofl ऑफिसमध्ये जसा वेळ मिळेल तसं वाचत असते इथल्या कमेंट, घरी साबा बघतात सिरियल नशिबाने मी किचनम्ध्ये असते तेव्हा. पण इथली एकही कमेंट मिस करत नाहि.
<<<माझ्याकडे कथा दिली तर तिला इथून घरी जाता जाताच अपघात करुन प्लास्टीक सर्जरी करून बदलून टाकली असती.>>> हे वाचुन अगदी इमॅजिनलं की ईबाळ रस्त्याने चाल्लिये मागुन कार येऊन धडकली तिला, मग लगेच हॉस्पिटल, मग सर्जरी करुन ईबाळ (बदललेली) स्वतःच चालत चालत घरी चाल्लिये. Rofl

सुलू_८२ >>>>> तुम्हाला निष्ठावान प्रेक्षक पुरस्कार नक्की द्यावा झी पुरस्कार सोहळ्यात. काय पेशंस आहे. >>>>>>> कारवी Rofl काय करणार? सार काही सुभासाठी आणि त्या सस्पेन्ससाठी ( फालतू असला तरीही )

नाही त्या युनियन लिडर ने च केला होता.... ती वाचते ना... कि तुम्ही ज्याला बहीण मानल ती बहीण विधवा होईल को णाला सागु नका >>>>>> काल बघितल ते.

मला वाटलेलच, ईशा नक्कीच राजेशला इमोशनल ब्लॅकमेल करणार.

बाकी ते सडलेल्या टोमॅटोची कथा सोडून ईशा सोनूशी बोलते, तेव्हा मला का कोण जाणे, ईशात नन्दूचा भास झाला. वाटल, नन्दू अशीच बोलत असावी कामगारान्शी.

आज जयदीप MFV (My friend Vahini) बरोबर राजेशकडे का नाही गेला? >>> तो बसलाय चाळीतल्या होळीचे व्हिडिओ बघत.

पुढच्या भागात झेण्डे विसला आईसाहेबान्ना गजा पाटील हे नाव ईशाकडून कळल तर मोठा गहजब होईल म्हणाला. विस घाबरलेला दिसला. आईसाहेबान्ना गजा हे विसच नाव आहे हे माहीत असणार. ईशा नाव सान्गणार तेवढयात विस किव्वा आणखी कोणीतरी येईल अस दाखवतील बहुधा.

राज नंदिनी गजा पाटील या व्यक्तीची बायको होती की विक्रांत सरंजामे याची..

स्माईली असतात तशा डिजिटल कानफटात मारता येत असतील तर त्यांच्या फेसबूक पेजवर चिकटवा माझ्या वतीने कोणीतरी. प्रत्येकासाठी १५-२०.>> Rofl

माझ्याकडे कथा दिली तर तिला इथून घरी जाता जाताच अपघात करुन प्लास्टीक सर्जरी करून बदलून टाकली असती.>> हे भारीये. Biggrin

केड्याची लेखणी गोल आणि खोल गर्तेत गटांगळ्या खातेय. .. पुढे सरकतच नाहीये... केड्या काहीच नाही करत... त्याच्या लेखणीला गटांगळ्या खात पुढे सरकत असताना महत् प्रयासाने गजा पाटील असे लिहिता आले.
आता बहुतेक केड्या अजून एक कुंभकर्णी झोप काढेल, त्याला जाग येईपर्यंत त्याची लेखणी गजा पाटील या अक्षरांच्या गर्तेत गोल गोल गटांगळ्या खात बसेल, त्यासोबत प्रेक्षक सुद्धा गुदमरून जातील..
त्या ईशाची प्लास्टिक सर्जरी करायच्या आधी केड्याला अर्धचंद्र दिला पाहिजे...

राजनंदीनी गजा पाटील हे वाचल्यावर एकदम दगडी शिदोबा बेडकीहळ्ळीकर आठवली.

वास्तविक त्या अभिनयाच्या अनाथालयाला इशा ऐवजी दगडी निमकर आणि लग्नानंतर दगडी सरंजामे हेच नाव अगदी शोभून दिसले असते.
एकदम रियलिस्टीक.

Pages