तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अलिकडचा ३२ वर्षीय युवक अर्जित सिंग ह्याचे गाणे नेहमी माझ्यापासून खूप दूर मला ऐकू येणारचं नाही इतके दूर ठेवले आहे .. होते. कलंक बघताना सुद्धा मी लताचे गाणे लावून पडद्यावर काय चालले आहे हे बघत होते त्याचे गाणे आले तेंव्हा. मला नाहीचं आवडत तो! पण का कुणास ठाऊक परवापासून मला कलंक मधील 'हवाओं में बहेंगे..' ह्या गाण्याची धून आवडली. ही धून 'तबाह हो गए..' च्या सवांदात येते म्हणून ऐकण्यात आली. आणि 'तबाह हो गए..' हे गाणे मी माधुरीसाठी वारंवार पाहिले. तर झाले असे की शेवटी मी अर्जित सिंगचे हे गाणे ''हवाओं में बहेंगे..' ऐकले आणि मी अ‍ॅट लीस्ट ह्या गाण्याच्या तरी प्रेमात पडले. माझी भाची त्याची जबरदस्त पंखा आहे. तिने मला त्याची ही गाणी तू मावशी ऐकचं म्हणून एक यादी पाठवली. सध्या तरी मी 'हवाओं में बहेंगे..' च्या पहिल्या दोन कडव्यात अडकले आहे. खूप वेदना आहेत ह्या गाण्यात.

घटाओं में रहेंगे
तू बरखा मेरी, मैं तेरा बादल पिया
जो तेरे ना हुए तो
किसी के ना रहेंगे
दीवानी तू मेरी, मैं तेरा पागल पिया

हजारों में किसी को
तकदीर ऐसी मिली है
एक रांझा और हीर जैसी
ना जाने ये जमाना
क्यूं चाहे ये मिटाना
कलंक नहीं इश्क़ है काजल पिया
कलंक नहीं इश्क़ है काजल पिया

बडी धीरे जली रैना....
धुआं धुआं नैना.....

रेखा भारद्वाज चा अत्यंत युनिक आणि भेदक आवाज!
आणि शब्द! अहाहा!
हे गाणं मी कित्येक महिने रिपीट मोडवर आइकते आहे. जी नही भरता.
(चित्रपटः ईश्किया)

मन्याकुमारी लिंक बरोबर गाण्याचं नाव तरी देत जा, उघडून बघावं लागणार नाही...
युवराज प्रचंड फ्लॉप होता, पण गाणी जबरदस्त होती...
माझं सगळ्यात आवडतं, शानो शानो!!!

गाणं सुंदर आहे पण अभंगाला तोड नाही.

आत्ता खिडकीत लावलेल्या मोगर्याचा मंद सुवास आणि ज्ञानेश्वरांचा अभंग दोन्ही एकाच वेळी enjoy केलं. Happy

Pages