दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाण्याच्या सूरुवातीला हिरविन म्हणते कि आज मला कोणीच दु:खी करू शकत नाही. मग हिरो पियानो बडवत काय काय करणार ते सांगतो आणि तिला रडवतोच Happy

संगीत खुर्ची मध्ये हरल्यावर छोटा मुलगा गाणं म्हणतो तेच गाण आधी त्याचे बाबा स्केटिंग करत म्हणतात...

70s मुव्ही

बंगळूर वाले अजून लक्षात येत नाही. आधी कुली मधले असेल असे वाटले होते. पण त्यातले द्वंद्वगीत बंगळूर मधल्या स्टेशन मधे नाही. कृष्णगिरी का काहीतरी आहे.

अनलेस, मशाल मधले अभिप्रेत असेल. मुझे तुम याद करना

अनलेस, मशाल मधले अभिप्रेत असेल. मुझे तुम याद करना>>>>
हो.
हे बंगलोर स्थानकावरील नाही का?

70s मुव्ही

तेरा मुझसे है पहले का
नाता कोई

हे बंगलोर स्थानकावरील नाही का? >>> हो तेथीलच आहे बहुधा.

ग्रेट माइण्ड्स! मी कालच हे गाणे देणार होतो. यातली गाणी जरा कमी प्रसिद्ध आहेत.

70s मुव्ही

तेरा मुझसे है पहले का
नाता कोई>> बरोबर

जितेंद्र अशोककुमारला सांगतो की बायको माहेरी गेली आहे. त्यानंतर समुद्रकिनारी बग्गीतून फेरफटका मारावयास जातो. त्याच्यामागे अनेक ललना लागतात. बायको माहेरी गेलेली असल्याने तो आता पुन्हा पहिल्यासारखा ब्रह्मचारी झालेला असतो. हे गाणे कुठले आणि कुठच्या सिनेमातले आहे ?

चला चला दिवाळी आली
गल्लीतल्या मैत्रीणी माहेरी येण्याची वेळ झाली

कुमार गंधर्व स्वतः मैफिलीत गात आहेत
प्रेक्षकात श्रीराम लागू आणि तनुजा (बहुधा) गाणे ऐकत आहेत . चित्रपट : झाकोळ

Pages