दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका डॉक्टरची टीन एज मुलगी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत गातेय.. माझे नाव ओळखा वै! . तिलाच पुढे ब्लड कॅन्सर होतो.>>
कौन हु मै क्या नाम है मेरा
मै कहासे आयी हु
मै परीयोकी शहजादी
मै आसमा से आयी हु

तीन चोर चोरी करायला घरात राहिले.. चोरीच्या प्रयत्नात
मालक देवापुढे बसून गाणे गातोय.

मराठी चालत असेल तर घ्या अजून एक!

अशोककुमार अमोल पालेकराना चॉपस्टीकने चायनिज कसे खायचे ते शिकवत आहेत. विद्या सिन्हा बस स्टॉपवर

ये दिन क्या आये
लगे फूल हँसने

अ पा वि सि... छोटी सी बात

<<काय मस्त खेळ आहे, पण मला काहेच ओळखता येत नाहीये Uhoh<< किल्ली, क्ल्युज कडे लक्श दे आणि युट्यबवर बघ. Lol

लग्नाच्या वर्‍हाडाचा सजवलेला रेल्वेचा डबा. गाणार्या मन्डळीत सजनाला भेटायला अखिया तरसलेली ती डफलीवर गाणे म्हणतेय आणि अगदी शेजारच्याच डब्यात तिचे गाणे ऐकुन अस्वस्थ झालेला , दुसर्याच सजनीबरोबर बसलेला तिचा सजना !
मधेच रेल्वेला सिग्नल पडतो आणि आपला हिरो खाली उतरुन तिच्या डब्याच्या बन्द दरवाजाच्या जाळीतुन पहाय्चा प्रयत्न करतोय. पण व्यर्थ.

Pages