तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

फारेंड...मस्त मस्त.. Biggrin
तेलाचे डबे घेऊनही कसला दिसत होता सुबोध! क्यूट!
आणी फारेंड...तारीख डिक्लेअर न करण्या मागे झी चा असा डाव आहे..की एपिसोड कसे आणि किती (आणि कुठल्या दिशेला) ताणायचे ते काही नक्की ठरलेलं नसतंय ना..!! जसा वारा वाहील तशी कथा आपली जात्ये पुढे पुढे.... म्हणून मग असं अधांतरी...!! मग यांचं ठरलं की महा एपिसोड..आणि अंगूर व लंगूर चं लग्न फायनली!!

हरीओम, हरीओम !!

पण काल तेलाचे डबे घेवून पण कसला दिसलाय Blush>> एकदम भारी। किती दमला होता बिचारा।
फारएन्ड आणि अं गो मस्त पोस्ट्स।।

पत्रिकेतही- "तारीख: पुढच्या आठवड्यात>>> Lol
काल तेलाचे डबे खांद्यावर घेउन आलेला सुभा पाहुन दया आली मला.

आणि तेलगल्ली तील घाण्यावरुन कोण तेल आणते हल्ली ? काहीही...........
:-)..म्हणजे मुळात अशी 'डेडिकेटेड' तेल गल्ली असते का कुठल्या गावात?

आणि पुण्याहवाचन कशाला लग्नाच्या प्रायमरी बैठकीला?

"दिल आ गया निमकर पे..." असं काहीतरी ती ईशाची अगडबंब आई बोलली तेव्हा ................................. हरे राम!!!! Uhoh !!
कोण लिहीतं असले संवाद....?

तेलगल्ली तील घाणीतून कोण तेल आणते हल्ली ? काहीही...........
:-)..म्हणजे मुळात अशी 'डेडिकेटेड' तेल गल्ली असते का कुठल्या गावात? --'x घाणीतून नाही, घाण्यावर.

हो आणि हो, quality कॉन्शस लोकं

आधीच्या भागात मायरा ईशाला चेक देते तो सीन थेट दीवार वरून घेतलेला आहे. मायरा दोन रूपयांचे नाणे तिच्याकडे फेकते, ईशा ते कॅच करते. आणि मायराला एक ब्लँक लूक.
"काय झाले?"
"मायराजी तुम्ही फार वर्षांपूर्वी मेक अप करायला पार्लर मधे जायचा तेव्हा, एकाच मुलीकडून नेहमी गजरा विकत घ्यायचात."
"हो, बरं मग?"
इथे ईशा कमरेवर हात, गंभीर चेहरा. अँग्री यंग वूमन.
"मी आजही फेकलेले दोन रूपये बरोब्बर कॅच करते" *** >>>>>

लय भारी, जबरदस्त आहे हे Lol

आजकाल २ डबे तेल कोण आणते लग्नासाठी.
लग्नाचे जेवण पूर्वी शिधा आणून आचार्याकडुन करुन घेत तेव्हा हे असं २ डबे तेल वगैरे लागे.
आजकाल सगळं केटरर करतो ना...मग २ डबे तेल कशासाठी म्हणे ?

सुभा.... इशाच्या लग्नाला मदत करण्यासाठी म्हणुन ४ दिवस सुट्टी घेतोय... चक्क सी एम ची मिटीन्ग कॅन्सल करुन!

एक मिनीट मला तो यावेळच्या गणेशोत्सवातील व्यक्तिचित्रण मधला "पुष्पा" लेख सुद्धा ईशाच्या आईवर आहे की काय अशी शंका आली Happy

सुभा.... इशाच्या लग्नाला मदत करण्यासाठी म्हणुन ४ दिवस सुट्टी घेतोय... चक्क सी एम ची मिटीन्ग कॅन्सल करुन! >>> लोल हो. आणि मायरा ला ते सांगितलेले नाही. आता ईशा सुद्धा मायराला फोन करेल की मला चार दिवस सुट्टी हवी आहे लग्नाकरता. मग बराच संशयकल्लोळ ४-५ भाग चालेल.

आणि हा सगळा ग्रॅण्ड प्लॅन त्या शेजारच्या बिपिन च्या बापाचा केवळ या भरवश्यावर आहे, की ईशा च्या कनेक्शन ने त्याला बिझिनेस मिळेल. म्हणजे ईशाने उद्या नोकरी सोडली तर हे सगळे फ्लॉप.

बाय द वे तो सुभा खरेच घाण्यातून तेल घेउन आला, की त्याच्या आईसाहेबांनी घरी तेलाचा डबा भरून ठेवायला सांगितला तोच उचलून आला घेउन?

फा ... Biggrin

कालचा सगळा एपिसोड सुभाने खाल्ला. बिपिनला शेक हॅन्ड करताना, तेलाचे डबे उचलताना, आणि कारकडे जाताना वळून मागे पाहताना काय कातिल एक्स्प्रेशन्स दिल्या आहेत त्याने! Wink
फारएण्ड, दिवार सिच्युएशन मस्त!

बाय द वे तो सुभा खरेच घाण्यातून तेल घेउन आला, की त्याच्या आईसाहेबांनी घरी तेलाचा डबा भरून ठेवायला सांगितला तोच उचलून आला घेउन?>>>> मला सुद्दा तोच संशय येतोय. अस जर असेल तर विकी चिटीन्ग करतोय. इट्स नॉट फेअर हा! Lol

आणि हा सगळा ग्रॅण्ड प्लॅन त्या शेजारच्या बिपिन च्या बापाचा केवळ या भरवश्यावर आहे, की ईशा च्या कनेक्शन ने त्याला बिझिनेस मिळेल. म्हणजे ईशाने उद्या नोकरी सोडली तर हे सगळे फ्लॉप>>>> बहुधा असच होईल. ईशा ऐनवेळी नोकरी सोडण्याचा हेतू (मायराला दिलेल वचन पाळायचय, विकीला विसरुन नवीन आयुष्याला सुरुवात करायची आणि विकीवरचा राग म्हणून) टिल्लू फॅमिलाला सान्गेल. मग सिनियर टिल्लू लग्न मोडेल. मग विकी आहेच तयार गधीशी लग्न करायला. Happy

इशाच्या घरी परवापर्यंत एकच पोळी सगळे खात होते. सिलेंडरसाठी पैसे नव्हते. आता एकदम लग्नाची तयारी करण्यासाठी कुठून पैसे आणले?

मुलीच्या लग्नासाठी असेच पैसे उभे करतात, कर्ज काढतात Sad मोस्टली लग्न झालं की दाखवतील तिचे वडील कर्जबाजारी झालेले Sad

सुभा काल बाहुबली स्टाईलने तेलाचा एक डबा खांद्यावर घेऊन आलाय. एक डबा उचलता उचलता इथे नाकी नऊ येतात. जिओ रे बाहुबली ऽऽऽऽऽ
बादवे उसण नाही भरली म्हणजे मिळवले. आणि कपड्याला लागलेले तेलाचे डाग निघता निघत नाही. कपड्याचा कोणता साबण वापरतो विचारले पाहिजे.

त्याला किती वेळ ताटकळत ठेवलं आहे दारात? आता आणलच आहे तर पटकन उतरवून घ्यायचं ना?
Submitted by अनामिका - on 26 September, 2018 - 19:38
>>>>
चेक करून घेतील. चुकीचे तेल असेल तर डबे बदलून आणायला पाठवतील.

Pages