Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ते शीर्षक गीत फार सुंदर आहे.
ते शीर्षक गीत फार सुंदर आहे.
नीट कान देऊन ऐकलं आणि एक राज की बात समजली. 'तुला पाहते रे' मधला 'तुलाsss' जरा तान घेऊन म्हटलंय असं इतके दिवस वाटत होतं. काल साक्षात्कार झाला ती तान नसून खरं तर 'तुला का पाहते रे !!!" असं आहे
सुभा आता काय तेल आणणार ...?
सुभा आता काय तेल आणणार ...? का करतोय तो एवढं ?
ते शीर्षक गीत फार सुंदर आहे.
ते शीर्षक गीत फार सुंदर आहे. >> हो आहे सुंदर ....पण सारखा आवाज कमी जास्त होत राहतो....
लहान्पणी टेप चा आवाज सारखा कमी जास्त करत गाणं कसं ऐकु येतं ते पहायचे, त्याची आठवण येते..
मित+1
मित+1
म्हातारडं सरंजामे गल्लितल्या
म्हातारडं सरंजामे गल्लितल्या घाण्यातुन तेलाचे २ डब्बे (एक खांद्यावर आणि एक हातात) आणतो हे पाहुन हा माणुस याच मिडल-क्लास रोल मधे शोभुन दिसला असता असं वाटलं..!
आईएइई आइइई गं डीजे, किती तो
आईएइई आइइई गं डीजे, किती तो दुष्टावा तो एखाद्या माणसाबद्दल.
अहो पण इशा सारखी कोवळी पोर
अहो पण इशा सारखी कोवळी पोर त्या सरंजामेचि बायको होनार म्हणुन कससंच होतं..
लंगुर के हात मे अंगुर?
लंगुर के हात मे अंगुर?
>>लंगुर के हात मे अंगुर?<<
>>लंगुर के हात मे अंगुर?<< अगदी बरोबर..!
आजकाल WApp वर एक मेसेज फिरतो
आजकाल WApp वर एक मेसेज फिरतो आहे की ही सिरियल चालू झाल्यापासुन ४०+ पुरूषांच्या मनात अंकूर फुटू लागला आहे.
तो जास्त चांगलाय खरं तर आता
तो जास्त चांगलाय खरं तर आता तिचं लग्न ठरल्यावर चुक दुरुस्त करायला जाऊन शारूक्कानगिरी करण्याची गरज काय ? केड्याचं लाॅजिक उलगडत नाहीये. >>>>>+++++११११११
म्हातारडं सरंजामे >>>>>
म्हातारडं सरंजामे >>>>> म्हातारड म्हणू नका हो त्याला.
ते शीर्षक गीत फार सुंदर आहे. >>>>>> +++++११११११ हॉन्टिन्ग सुद्दा आहे.
तुला का पाहते रे >>>>>>
खरं तर 'तुला का पाहते रे !!!>
खरं तर 'तुला का पाहते रे !!!>>>
आता सगळी लग्नाची तयारी दाखवतील.....आणि लग्नाच्या दिवशी महाएपीसोड. त्यावेळी काहीतरी गडबड होणार, आहे ते लग्न मोडणार आणि मग हे दोघे लग्न करायला मोकळे होणार. त्याच मांडवात लग्न करुन ईशाबाळ कर्जतच्या बंगल्यात रहायला जाणार.
आणि मग नदी सागराला मिळते
आणि मग नदी सागराला मिळते त्याप्रमाणे सर्वच्या सर्व स्टोरी, सासू सून जावाजावा कथानकाला जाऊन मिळणार. मग म्हातारा सुभा, त्याचं उतारवयातील अपत्य, प्राॅपर्टीचे वाद वगैरे बघायची तयारी ठेवा लोकहो पुढची काही वर्षं.
आजकाल WApp वर एक मेसेज फिरतो
आजकाल WApp वर एक मेसेज फिरतो आहे की ही सिरियल चालू झालूयापासुन ४०+ पुरूषांच्या मनात अंकूर फुटू लागला आहे.>>> बिबॉ १२ मधल्या अनुप जलोटावरुन तर जास्तच.
आरारा!!!!
आरारा!!!!
आणले एकदाचे सुभा ने दोन डबे तेल.
एखादी प्रेमकथा तरलतेने फुलवत
ही वेगळी प्रेमकथा तरलतेने फुलवत नेली असती तर त्यातला वयाचा मुद्दा सुद्दा प्रेक्षकानी नजरेआड केला असता पण केड्या म्हणाजे सगळ "उडुम धुडुम सत्यानाश " टाइप काम आहे.
आजच्या भागात ते गुरुजीच काय
आजच्या भागात ते गुरुजीच काय ते रियलीस्टीक वाटले. कोणी संवाद लिहिले आहेत.....आमच्या वॉशबेसिन मधे हॅन्ड वॉश करणार का?
ईशाबाळ खूपच डाफरले आज सरांवर आणि तेल पण आणायला लावले.
म्हातारडं सरंजामे गल्लितल्या घाण्यातुन तेलाचे २ डब्बे (एक खांद्यावर आणि एक हातात) आणतो>> टोटल शारुकगीरी!!! एखादा म्हटला असता कि आमच्याकडे त्यासाठी नोकर असतात. एवडे पैसे उगाच कमवलेत कॉय?!!!
आणि ते मसाला मिल्क मिळालंच
आणि ते मसाला मिल्क मिळालंच नाही फायनली.
आणि ते मसाला मिल्क मिळालंच
आणि ते मसाला मिल्क मिळालंच नाही फायनली.>>>
नुसतेच घ्या घ्या.
ईशाबाळ खूपच डाफरले आज सरांवर>
ईशाबाळ खूपच डाफरले आज सरांवर>>>
ईशाबाळ नेहमीच डाफरते सरांवर
नोकरीत रहायचंय ना म्हणाव बाळा
नोकरीत रहायचंय ना म्हणाव बाळा.
येवढं यल्लो मसाला मिल्क!??
येवढं यल्लो मसाला मिल्क!?? हळद दूध वाटलं मला!! लंगूर के हाथ मे अंगुर --हो बरोबर सुबोध आहेच अंगुर
आरारा!!!!
आरारा!!!!
आणले एकदाचे सुभा ने दोन डबे तेल.>>> अहो पाथफाईंडर, इथे आरारांचा काय संबंध.
मला बिपिन आणि इशाच्या मैत्रीणीचे कामही आवडतयं.
लंगूर के हाथ मे अंगुर --हो
लंगूर के हाथ मे अंगुर --हो बरोबर सुबोध आहेच अंगुर Blush
अजुन एक म्हण
घेणार असाल तर सांगतो.
नवीन Submitted by वेडोबा on 25 September, 2018 - 22:00
>>>
@वेडोबा,
"प्यार मे गधी (गधा) भी परी (परा) दिखती (दिखता) है" (बायकोही सुभा प्रेमी आहे अन ही म्हण सांगून मी मार खाता खाता वाचलोय)
तुमच्या भावनांशी सहमत. मीसुद्धा सुभा प्रेमी आहे. पण त्याची मालीकेची निवड चुकली हेमावैम आहे.
@ऑर्कीड धाग्याला थोडी फोडणी द्यायचा प्रयत्न होता.
अजून तो तेल वाला भाग आला नाही
अजून तो तेल वाला भाग आला नाही इथे. उद्यापर्यंत येइल. मी लेटेस्ट पाहिला तो सरंजामे सरांची लग्नाच्या बैठकीत संवादाला प्रत्युत्तर देत ड्रॅमॅटिक एण्ट्री वाला.
आधीच्या भागात मायरा ईशाला चेक देते तो सीन थेट दीवार वरून घेतलेला आहे. मायरा दोन रूपयांचे नाणे तिच्याकडे फेकते, ईशा ते कॅच करते. आणि मायराला एक ब्लँक लूक.
"काय झाले?"
"मायराजी तुम्ही फार वर्षांपूर्वी मेक अप करायला पार्लर मधे जायचा तेव्हा, एकाच मुलीकडून नेहमी गजरा विकत घ्यायचात."
"हो, बरं मग?"
इथे ईशा कमरेवर हात, गंभीर चेहरा. अँग्री यंग वूमन.
"मी आजही फेकलेले दोन रूपये बरोब्बर कॅच करते" ***
त्यानंतर आजचा खीरयुक्त ब्रेफाचा सीन पाहिला. त्या सॉन्यावहिनीला नॉर्मल प्रतिक्रिया कधीच देता येत नाही का? सरंजामेला फक्त खीर ऐवजी फुल टेबल सर्व्ड ब्रेकफास्ट पाहिल्यावर मोटेल-६ मधून मेरीयट मधे आल्यासारखे वाटले असेल. पण त्याला नीरखीरविवेक अजिबात नसावा. तीच खीर काल आवडत नाही पण आज आवडते.
*** ते वाक्य "दो रूपये भी बहोत बडी चीज होती है बाबू" प्रमाणे (फक्त सिरीज मधे) लोकप्रिय होणार आहे. पुढच्या काही भागात तिची आई सुद्धा ते एकदोनदा म्हणणार आहे.
दिवार हे फक्त तुला सुचु शकता
दिवार
हे फक्त तुला सुचु शकता फारेन्डा!
नीरखीरविवेक >> हे मस्तय।। दो
नीरखीरविवेक >> हे मस्तय।। दो रुपये च वाक्य ऐकूनच सरंजामी ला नवी आयडिया मिळाली म्हणे
पाफा सुबोधचे पंखे खूप आहेत हा इथे। जरा जपून: :):
अगडबम नावाचा भयाण मुव्ही पण सुबोध ने केलाय आणि त्यात अतिशय हिडीस दिसलाय तो। यावरून त्याची मजबुरी कळू शकेल।
पण काल तेलाचे डबे घेवून पण
पण काल तेलाचे डबे घेवून पण कसला दिसलाय
अॅक्च्युअली तेलाचे डबे
अॅक्च्युअली तेलाचे डबे घेतलेला सुभा - तो सीन ओके होता. तेथे धक्कातंत्र वगैरे जमले आहे. इव्हन ईशा जेव्हापासून चिडली आहे तेव्हापासून नॉर्मल, सेन्सिबल बोलत आहे. तिच्या आईनेही आज एक जेन्युइन जोकही मारला - नवर्याच्या त्या पटेल ला "कैसे हो आप" ची नक्कल करताना.
पण पटकथा/स्ंवादांबद्दलचे क्रेडिट इथेच संपते. बाकी जवळजवळ पूर्ण एपिसोड गंडला आहे.
मुहूर्त काढण्याचा संवाद नॉर्मल घरांत असा होतो:
गुरूजी एकदा पंचांग बघतात आणि सांगतात - आज ३१ मे. लगेच हवा असेल तर ८ जून आणि १५ जून आहेत. त्यानंतर दोन महिने मुहूर्त नाहीत. मग ३१ ऑगस्ट आहे. वगैरे वगैरे.
इथे हा संवाद कसा होतो:
पंचांगातून मुहूर्त काढणे या "प्रोसेस" ची सुरूवात आधीच्या भागातूनच झाली होती. बीटिंग अराउण्ड द बुश बराच वेळ चालले या भागातही.
"पुण्याहवाचन सुरू करायचे का?"
तेवढ्यात साहेब येतात. मग त्यांना मसाला मिल्क विचारा. मग ते हात धुवायला जाणार. त्यांच्या मागे सगळी पलटण दारापर्यंत.
गुरूजी "सर्व ग्रह आणि नक्षत्रांचा सखोल अभ्यास करून, मी दोन तारखा निश्चित केलेल्या आहेत."
इथे कोणताही सर्वसामान्य माणूस त्या तारखा कोणत्या ते सांगेल/विचारेल. पण ही असामान्य माणसे आहेत.
"लौकर सांगा. जवळची तारीख आहे ना?
पण तेवढ्यात साहेब परत. मग साहेब इकडे बसा. नको इकडे बसा. राहू दे मी इथेच बसतो.
मग गुरूजी चिडतात. त्यांची समजूत काढा. मग पुन्हा मुहूर्ताची चर्चा.
"तर शुभमुहूर्ताच्या दोन तारखा मी काढलेल्या आहेत" (अहो ते गेले चार पाच एपिसोड्स म्हणत आहात. तारखा बोला की)
"एक पुढच्या आठवड्यातला आहे. एक दोन महिन्यानंतरचा" (पुन्हा, कोणत्या तारखा ते पत्ताच नाही)
"दोन महिन्यानंतरचा घ्या गुरूजी"
"दोन महिने थांबायला कोणाला वेळ आहे? चला पुढच्या आठवड्यातलाच ठरवू"
मग चहा येतो. अजूनही कोणीही तारखेबद्दल बोलत नाही. इथे गुरूजी प्रत्यक्ष मुहूर्ताची तारीख सोडून सर्व गप्पा मारतात. ही बाकीची मंडळीही प्रत्यक्ष तारीख माहीत न करून घेता, तिचा एकदाही उच्चार न करता आख्खी बैठक पार पाडतात. पुढच्या आठवड्यात मुहूर्त आहे? चला तर मग. पुढच्या आठवड्यात लग्न!!! अरे कोणती तारीख, कोणता वार? मुख्य लोकांना काही अडचण नाही ना? काही चर्चा नाही. काही पत्ता नाही.
बहुधा पत्रिकेतही- "तारीख: पुढच्या आठवड्यात" असे छापणार असे दिसते.
बाकी पूर्वी बिनकंत्राटी लग्न करत त्यात सगळे लोक कामे करत तसे मटाराच्या शेंगा वगैरे सोलायला वगैरे लावणार का काय विक्रम सरंजामेंना. नराचा नारायण ऐकले होते पण इथे नवर्याचाच "नारायण" केला आहे पुलंचा, तेलाचे डबे आणायला लावून.
Pages