अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@जिद्दु जी>> थोडी अर्जंट माहिती हवी आहे.
कुटुंबातील एक व्यक्ती पंचक मधे गेली आहे आणि गावाकडे सर्व उरकलयं घाईत पण बहुतेक पंचक ची काही प्रक्रिया केली नाहीये. आता काय करू शकतो यासंबंधी?
(जानकारांनी माहिती द्यावी आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांनी दुर राहावे)

भूतकाळात सूक्ष्मदेहाने जाऊन येणं हा प्रसंग देवेंद्रनाथ महाराजांनी केला होता बऱ्याच वेळा . नगर येथील एक इतिहासाचे प्राध्यापक अशोक नेवासकर आणि ते एकदा आळंदीला गेले तेव्हा महाराजांनी ध्यान लावून लावून माउलींचा समाधी सोहळा प्रत्यक्ष पहिला होता असा त्या सरांनी मला सांगितलंय . हे काम एखादा मोठा सिद्धच करू शकतो . बाकी भूतकाळ -भविष्यकाळ पाहण्याच्या शाबरी सिद्धीबद्दल मागे कोणत्यातरी आयुर्वेदाच्या धाग्यात मी लिहलं आहे . इंद्रजाल ची माहिती हवी असल्यास देतो ती पण

पाच दिवस असतं ते ठराविक वेळी काहीतरी नक्षत्र असतात. त्यात कुणाचे अंतिमसंस्कार केले तर 5 वेळा करावे लागतात असं ऐकलं आहे.

मला यातलं नाही माहिती फार पण तुम्ही पुण्यात मंदार खळदकर आहेत सहकारनगर ला त्यांना फोन करून विचारू शकता ते सांगतील व्यवस्थित ... किंवा त्रिम्बकेश्वर ला धारणे गुरुजी आहेत ते पण सांगू शकतील... नाहीतर तुम्ही स्वतः धर्मसिंधू किंवा निर्णयसिंधु रेफर करू शकता .. ते तर ultimate राहील ..पोस्ट एडिट केलीय आधी नाव चुकलं होत

त्रिम्बकेश्वर ला धारणे गुरुजी आहेत ते पण सांगू शकतील ... यांचं घराणं नाथपंथी पंडे म्हणून काम करायचं ... देवेंद्रनाथांचं अंतिम विधी यांनीच केला होता

ज्योतिषशास्त्रात ञिपाद व पंचक नक्षञे सांगितली आहेत.. धनिष्ठाचा उत्तरार्ध, शततारका, पूर्वा भाद्रपद, उ. भा. व रेवती हि पंचक नक्षञे होत.. पंचकात जर कोणि म्रूत झाले तर पाच लोक आणखी मरतात असा समज आहे म्हणून पुत्तल विधी सांगीतला आहे..

पण ५ जण मरतील त्यांच्या पत्रिकेतसुद्धा मृत्यु योग असायला हवा नं ! असे कसे उगीच मरतील बापुडे Uhoh
आणि पत्रिकेत मृत्यु दिसत नसताना मेले कोण तर मग पत्रिका / ज्योतिष काय कामाचे ?
आणि त्यांच्या प्रारब्धात मृत्यु असेल तर पंचक / पुत्तल विधी की काय असेल तो केला काय अन् न केला काय , मरण तर येणार नक्की असेच शास्त्र असेल ना !
..
कुछ तो गड़बड़ है ।
कोई जरा ये मॅटर क्लिअर करवा दो ।

ओ असं काय बोलताय? माझ्या रिलेटिव बद्दल लिहिलेय मी. तुम्हाला नाही पटत तर सोडून द्या ना विषय

@Dshradhha - पंचकविषयी माहिती सांगतो. माझे आजोबा दोन वर्षांपूर्वी पंचकावर गेलेत. कुठलीही व्यक्ती पंचकावर गेली याचा अर्थ त्या त्या पंचक्रोशीतल्या पाच व्यक्तींचा त्या कालावधीत मृत्यू होऊ शकतो असं आहे. पंचकावर गेल्याने त्यांचे काही विशिष्ट विधी केल्याचं मलातरी काही आठवत नाही. मेबी पंचकातले आजोबा दुसरे तिसरेही असतील. यामुळे कुणाचा मृत्यू होईलच असं नाही. हा फक्त योग असतो, एक शक्यता, आणि घरातल्या किंवा नात्यातल्या व्यक्तींवरच पंचक योग असेल असतर बिलकुल नाहीये, ही शक्यता अगदीच शून्यवत असू शकते. पंचक्रोशी हे मी स्वतः ऐकलंय, तेही शक्यता.
तसंही कुणाचा मृत्यू कधी होईल, हे कळलं, तर माणूस त्याच क्षणापासून जगणं सोडून देईल. म्हणून आपण आपलं आयुष्य मस्त जगावं हे उत्तम! तुमची समर्थांवर श्रद्धा आहे हे छानच आहे. सगळं ठीक होईल. नका काळजी करू, काहीही वाईट नाही घडणार.

व्हेरीगुड़ DShraddha
भक्ति असावी तर अशी कट्टर असावी अन्यथा असुच नये Happy
_________________

एक्चुली अनिस कार्य खरे की आपले शास्त्र खरे ह्याची शहानिशा पुराव्यांनिशी करण्याला हां मस्त चान्स होता पण रिस्क कोण घेणार !
शिवबा जन्मावा पण शेजारच्या घरात ही म्हण सोदाहरण पटली.

धन्यवाद @ अज्ञातवासी & डुडायडू

आणि घरातल्या किंवा नात्यातल्या व्यक्तींवरच पंचक योग असेल असतर बिलकुल नाहीये, ही शक्यता अगदीच शून्यवत असू शकते. >> आमच्या गावी 5 नाही पण 2- 3 जण एका कु ळातले गेले होते. पण अर्थात तो योगायोग असू शकतो. मला माहित नव्हतं जास्त म्हणून मी विचारलेलं. असो.

सस्मित, श्रद्धा म्हणतेय ते खरे आहे. ( लगेच दुसरे पाच जण जातात असे नाही ) तर असा समज आहे की पंचकात कुणी गेले, तर वर्षभरात त्याच्या / तिच्या नात्यातले लोक जातात. म्हणून वर रावलांनी सांगीतलेला विधी करतात.

श्रद्धा , तू जवळपासच्या गुरुजींना विचारुन माहिती काढुन तुझ्या नातेवाईकांना दे.

@ जिद्दु आणि रमेशजी , कृपया वर जे अघोरी सिद्धी करण्याचे प्रकार लिहिलेत ते ऍडमीनना सांगून डिलिट करून घ्या. किळस वाटते म्हणून नाही तर काही माथेफिरू, बिनडोक लोक तसे करायला जातील आणि त्या सर्व गोष्टी मिळण्यासाठी काय काय करतील याची कल्पना न केलेलीच बरी. अजून पण आपल्या समाजात नरबळी आणि तत्सम प्रकार अजून चालू आहेत.

@रश्मी >> हो एका दोघांना विचारले आहे. पण ज्यांनी ते विधी करायला हवे त्यांनी ऐकायला हवे. मी माझ्याकडून माहिती पोहचवणार आहे बाकी देवाची ईच्छा.

गोल्ड्फिश, +१ हा धाग आता त्याच मार्गावर जातोय.
लोक इंटरेस्ट घेउन लिहित-वाचत आहेत. पण आताच्या काही पोस्टी तुम्ही म्हणता तशाच आहेत.
अमानवीय अनुभव लिहिता लिहिता लोक अघोरी सिद्धी, तंत्र-मंत्र, काळी जादु बद्दल माहिती देउ लागलेत.
कृपया ह्या गोष्टी थांबवणार का?
ह्यापेक्षा आधीच्या सांगोवांगीच्या अमानवीय कथा बर्‍या होत्या.
आणि बोकलतांच्या स्टोर्‍या पण.

@रश्मी @श्रद्धा -
माझ्या आजोबांनंतर आमच्या कुळात कुणीही गेलं नाही. आता दोन वर्ष झालीत या गोष्टीला.
जेव्हा आजोबांचे विधी करतांना गुरुजींना विचारलं, तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं
"हो पंचकावर गेलेत, पण कुणी जाईलच असं नाही. आणि ज्याची वेळ आली, तर त्याला कुणीही थांबवू शकत नाही. नाहक चिंताही करू नका, आणि पैसेही घालवू नका."

बरोबर अज्ञातवासी.

हो, जिद्दु आणी रमेश रावल, तुमच्या त्या ठरावीक पोस्ट डिलीट करवुन घ्या. जगात चांगल्यापेक्षा वाईट मार्गाला जाणारे लोकच जास्त आहेत. ते असे अर्धवट उद्योग करु शकतात.

ह्यापेक्षा आधीच्या सांगोवांगीच्या अमानवीय कथा बर्‍या होत्या.
आणि बोकलतांच्या स्टोर्‍या पण
+१११११

आणि बोकलतांच्या स्टोर्‍या पण>>>>> -१
बोकलत यांच्या स्टोऱ्या कायम टिंगल टवाळी करण्याच्या उद्देशाच्या वाटायच्या, आणि त्यांनी त्यासाठीच त्या टाकल्या होत्या.
बाकीच्या अमानवीय कथा खरंच जेन्यून वाटायच्या, भलेही काही खोट्या असतील, पण टिंगल करणे हा तरी त्यांचा उद्देश नसायचा.
असो. जिद्दु आणि रमेश यांनी जेव्हा हे किस्से टाकलेत, तेव्हा मलाही हेच म्हणावंसं वाटलं, की थरकाप उडवणारे जरूर आहेत, पण एखादा चक्रम हेच डोक्यात धरून आयुष्य खराब करून घेईल. तसंही चांगल्यापेक्षा लोक वाईटाकडे लवकर आकर्षित होतात.
पोस्ट डिलिट किंवा एडिट करणं, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आणि अधिकार आहे, कारण त्यांचे प्रतिसाद धाग्याला धरून आहेत, पण मीही विनंती करेन, की अशा पोस्ट काढणच उत्तम

@व्यत्यय - हेच लिहिलंय ना मी, कुणी चक्रम?
संशोधक वृत्तीच्या व्यक्तीला मी का चक्रम म्हणेन?
आणि खरं सांगायला गेलं, तर पूर्वग्रहदुषीतच आहे. आणि मी ते ठेवेनच. कुणीही संशोधक वगैरे जरी आला, तरीही त्याला मी या भानगडीत पडायला सांगणार नाही. कारण या विद्यांचा अंदाज भल्याभल्याना आला नाही, हजारो लोक फसवणूक होताना बघितलेत. दिल्लीत एक कुटुंब संपताना बघितलंय.
एखादा जितेंद्रियच ते कार्यकारण भाव वगैरे समजून घेण्याच काम करू जाणे, आणि त्याच्यासाठी चक्रमाना आवतण देणं नाही परवडणार.
प्रचंड प्राचीन भारतीय ज्ञान नामशेष झालं आहे, कोणीतरी पुढाकार घेऊन मागोवा घेतल्याशिवाय ते पुनरुज्जीवित होणार नाही.>>>>> प्रचंड नामशेष झालेल्या भारतीय ज्ञानात मागोवा घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, अवकाश संशोधन, आयुर्वेद, गणित वगैरे, त्याचाही कुणीतरी मागोवा घ्यावा.
जिद्दु आणि रमेश रावलजींनी याचा अभ्यास करावा, आदर आहेच त्याविषयी, पण बाकीच्या चक्रमांची भीती वाटते, की वाचलं मायबोलीवर आणि गेले एखाद्या बुवाकडे!

मला कालपासून अचानक भरपूर कॉल येताहेत. वाट्टेल ती फी देतो पण कृपा करून आम्हाला पंचक शिकवा, इंद्राजल शिकवा, मेलेल्या माणसाला वश कसं करायचं ते शिकवा, कशामुळॆ होतंय बरं हे असं :विचार करणारा बोकलत:

Pages