अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या धाग्यावर interesting गोष्टी सांगणे बंद झाले का? मी माझा एक अनुभव सांगते.माझे वडील वकील होते.त्यांच्या सुरुवातीच्या काळात ते एका वकिलांकडे उमेदवारी करत होते.ते त्या काकांना वडिलांच्या जागी मानत.खूप प्रेम होते त्या दोघांमध्ये .काकांना अमानवी खूप अनुभव होते.ते प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलायचे देखील.अशा जागा त्यांना जाणवायच्या पिडीत व्यक्तींचा त्रास दूर करण्यासाठी ते प्रयत्न करायचे.पण हे खूप नंतरच्या काळात.त्या आधीचा, म्हणजे काकांना आपल्यातील वेगळेपण, सामर्थ्य जाणवायच्या आधीचा हा प्रसंग.वकिली सुरू करण्याच्या आधी ते पोलीस इन्स्पेक्टर होते.त्यावेळी त्यांची बदली कोकण किनार पट्ट्यावरील एका गावात होती. काकांना टीप मिळाली होती की ,त्या रात्री किनाऱ्यावर तस्करी होणार आहे. काका आपल्या टीमला घेऊन त्या जागी गेले आणि पाहणी करायला लागले.बहुदा त्यांना टीप चुकीची मिळाली असावी किवा त्यांच्या पाहणीचा सुगावा तस्करांना लागला असावा पण त्यादिवशी काहीच झाले नाही. अर्थात पोलीसांना या गोष्टीची सवय असतेच .साधारण पहाटे ३/३.३० चा सुमार असावा. बराच गोंधळ त्यांना ऐकू येऊ लागला .काका त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले बरोबर १/२ च पोलीस घेतले होते. एक मोठा गट किनार्याच्या दिशेने येताना त्यांना दिसला. त्या गटात वेगवेगळ्या वयाचे स्त्री-पुरुष होते काही छोटी मुलेही होती.स्वाभाविकच काकानी त्यांना इतक्या रात्री कुठून येताय अस विचारलं त्यातील काही लोकांनी गावच नाव सांगितलं बोट उशिरा आली असे कारणही सांगितले बोलत बोलत काका त्या गटाबरोबर बरेच पुढे आले अचानक त्यातील मोरक्याने आता तुम्ही पुढे व्हा यापुढे आम्ही येऊ शकत नाही असे सांगितले. आणि बघता बघता सगळे दिसेनासे झाले.एवढा मोठा गट आणि अचानक सगळे गायब बघून काका चक्रावून गेले सोबतच्या पोलिसांना,कुठे गेली रे इथली माणसे? असे विचारू लागले .त्यावेळी त्या दोघांनी एकमेकांकडे बघत घाबरत घाबरत सांगितले की साहेब मगाचपासून बराच वेळ तुम्ही एकटेच बोलताय आपल्या शिवाय या किनार्यावर चिटपाखरू देखील नाही. काकांनी अधिक चौकशी केली तेव्हा कळले की ,काही वर्षापूर्वी त्या गावाहून येणारी एक बोट पाण्यात बुडालीहोती. त्यातील एकाही प्रवासी वाचला नाही

या धाग्यावर interesting गोष्टी सांगणे बंद झाले का?........
....... काकांनी अधिक चौकशी केली तेव्हा कळले की ,काही वर्षापूर्वी त्या गावाहून येणारी एक बोट पाण्यात बुडालीहोती. त्यातील एकाही प्रवासी वाचला नाही
Submitted by pintee on 30 January, 2019 - 11:38

धागा मूळ track वर आला म्हणायचा!!!

अमानवीय येऊद्या

आता track नको सुटू दे

धागा मूळ track वर आला म्हणायचा!!!>>>>> काsssही उपयोग होणार नाही. आता बोकलत इथे कोकलत येतील आणी काहीतरी अचाट लिहुन गोंधळ घालतील. Proud

बोकलत Light 1

काsssही उपयोग होणार नाही. आता बोकलत इथे कोकलत येतील आणी काहीतरी अचाट लिहुन गोंधळ घालतील. Proud

अरेरे मग अशा घट्ना लिहाव्यात की नाहीत << विचारात पडलेली बाहुली>>

अरेरे मग अशा घट्ना लिहाव्यात की नाहीत << विचारात पडलेली बाहुली>>Submitted by pintee on 30 January, 2019 - 11:२१ >> लिहा हो बिनधास्त , आपण राजहंसाप्रमाणे ठराविक गोष्टीच वेचाव्या. << स्वतःला राजहंस समजणारी बाहुली >>

अरेरे मग अशा घट्ना लिहाव्यात की नाहीत << विचारात पडलेली बाहुली>>>>> तुम्ही लिहा. तुम्हाला कोण लिहु नका म्हणतंय.

लेखकाच्या नावावर क्लिक करून, लेखन या सदरात संबंधित लेखकाचे सर्व लिखाण दिसते, तिथे बघावे.
(तुम्ही जिद्दु यांचा विलक्षण/अमानवीय अनुभव वाला धागा शोधताय का?)
@ जावेद जी...मी जिद्दु यांचा नवीन धागा शोधतेय ...त्यांच्या लेखन सदरात एकच जूना धागा दिसत आहे

काही लोकांनी स्वतःला प्रश्न विचारायची गरज आहे कि आपण इथे का आहोत, आपणाला अमानवी गोष्टी पटत नसतील तर खुशाल त्यांनी दुसरा धागा काढून त्यावर गोंधळ घालावा. या धाग्यावर फालतू कंमेंट्स टाकून हा धागा बंद करण्याने कसला आसुरी आनंद आपण मिळवत आहोत हे सुज्ञपने विचारावे..

भूते सध्या निवडणूकांची वाट बघण्यात व्यस्त आहेत. बस्स, तारीख आने दो, फिर देखो कैसे कैस गढे मुर्दे उखाडे जाते है !Halloween RIP

हा अनुभव माझ्या काकांनी सांगितलेला. काका काही कामानिमित्त गोव्याला गेले होते ते ज्या हॉटेल उतरले (साऊथ गोआ) होते ते जरा आडवळणावर होते, त्या हॉटेलमधे फारशी गर्दी नव्हती तुरळक माणसे होती. हॉटेल मधे गेल्यावर जरा विचित्र वातावरण वाटल म्हणून त्यांनी दोनच दिवसाच बुकिंग केल. खर तर त्यांना पाच दिवस तेथे रहायच होत, पण हॉटेल मधे गेल्यावर त्यांना सतत कोणी तरी आपल्यावर नजर ठेऊन आहे व एक अदृश्य शक्ति अजुबाजुने फिरत आहे अस प्रखरतेने जाणवत होत. रात्रि त्यांना झोप येत नव्हती म्हणून ते पुस्तक वाचत बसले होते त्यांच्या रूम मधे, १२ - १२:३० च्या सुमारास बुटांचा आणि काठी टेकत चलताना जसा टक टक असा आवाज येतो तसा आवाज आला एवढ्या रात्रि कोण फिरतंय म्हणून त्यांनी बघायला दरवाजा उघड़ला पण कोणीच दिसेना म्हणून त्यांनी तिथला लाइट लावला पण कोणीच दिसत नव्हते पण काठीचा व बुटांचा आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होता, शेवटी त्यांनी लाइट बंद केला आणि परत ते रूम वर येऊन झोपले. पण झोप काही येत नव्हती काहीतरी विचित्र आहे या हॉटेलमधे तेव्हा उदयाच इथून निघाव म्हणून त्यांनी कशी बशी रात्र जागून काढली व उजडल्यावर आवरा आवर करून कॅश काउंटर वर पैसे व चावी जमा करायला गेले तेव्हा त्या काउंटरवाल्याने त्यांना एवढ्या तातडीने रूम का सोड़त आहात असा प्रश्न केला,तेव्हा काकांनी रात्रिची सर्व घटना कथन केली, तेव्हा त्या माणसाने सांगितले कि जो काल तुम्हाला भास होत होता तो खरा होता जी व्यक्ति अदृश्य रुपात होटेलात वावरत होती ति व्यक्ति ह्या होटेलचे मेन मालक त्यांच्या होटेलवर आणि कामावर नितांत प्रेम त्यामुळे त्यांच् निधन झालेल असताना सुद्धा ते आज ही रोज अदृश्य पणे हॉटेलमधे येतात सर्व कामावर लक्ष्य ठेऊन असतात पण कोणाला काही त्रास देत नाहीत. तो म्हणाला कि राहा निवांत काही होणार नाही परंतु काकांनी मात्र तिथें काढता पाय घेतला.

कोणतं हॉटेल? नाव आणि पत्ता सांगाल का? अजूनही तिथे अनुभव येतात का?

( धागा जिवंत केल्याबद्दल धन्यवाद)

२ वर्षांपुरवी दसऱ्याच्या दिवशी माझे आजोबा वारले. दसऱ्याची सुट्टी असलयाने माझी भावंडं आणि बाकीचे घरचे आजी आजोबांकडे होते. मी नोकरी कारणास्तव घरी गेले न्हवते. त्यांचा जाण्याची बातमी कळली आणि मग रितीरिवाजानुसार गावी सर्व कार्ये पार पडली. सर्व उरकून पुण्यात परत यायला निघाले. रात्री १२-१२.३० ला पुण्यात घरी पोहोचले. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिस ला जायचं असल्याने आल्या आल्या लगेच झोपायला बेडरूम मध्ये गेले. रूममेट बाहेर हॉल मध्ये झोपली होती आणि उशीर हि झाल्याने तिला न उठवता फक्त आले आहे एवढा सांगून झोपले. आणि मधेच अचानक जाग आली. खूप दडपण आल्यासारखा वाटत होतं म्हणून डोळे किलकिले करून बघितला तर शॉक बसला. माझे आजोबा पाठीमागे हात हातात घेऊन माझा बेड च्या बाजूला जी उरलेली L shape जागा होती त्यात चकरा मारत होते (माझ्या आजोबांना हात मागे बांधून शतपावली करायची सवय होती ). मला खूप दडपण आल्यासारखा वाटत होता. ओरडायच होत पण घशातून आवाज येत नव्हता. भीती अशी नाही पण विचित्रस वाटत होत. असा पाच एक मिनिटं चाललं आणि मग मी नॉर्मल झाले. पण मग मात्र बेडरूम मधे एकट झोपायची हिम्मत झाली नाही म्हणून बाहेर हॉल मध्ये आले आणि बघते तर माझाही रूममेट जागीच होती. आम्ही रात्री फार काही बोललो नाही. दुसऱ्या दिवशी जेवणाच्या वेळी विषय निघाला आणि मी तिला सहज विचारल कि रात्री का जागी होतीस तर ती बोलली आग झोप लागत नव्हती सारखा तुझा इकडे आतमध्ये कोणीतरी चालतंय असा भास होत होता. आणि मला शॉक बसला. आई ला हे सांगितलं तर बोलली जायचा आधी त्यांना तुला भेटायला मिळालं नाही म्हणून बघायला आले होते.

@उनाडटप्पू ... धाग्याला झोपेतून उठवल्या बद्दल धन्यवाद
@तेजोमयी ....जबरदस्त अनुभव
आणखी अनुभव येवूदेत लोकहो

अवांतर :- माझं घर जेव्हा तयार होत होतं तेव्हा मी सेफ्टी डोअर आणि ट्रॉलिज चं काम आधी करून घेतलं ते सुरू असताना ३१ डिसेंबर चा दिवस होता इलेक्ट्रिशियन, प्लम्बर, इ लोकांनी दांडी मारली पण सेफ्टी डोअर आणि ट्रॉली करणारे बिहारी मात्र रात्री १२.३० पर्यंत काम करत होते. त्यामुळे मला त्या रात्री तिथे राहण्याशिवाय पर्याय नव्हता.. प्रचंड भिती वाटली.. त्या नंतर काही दिवसात मी शिफ्ट झाले तरि भिती वाटत राहिलिच. पडद्यामागे कुणी लपलंय, बाथरूम मध्ये कुणी लपलंय असं वाटायचं. पण फेब्रुवारीच्या सुरुवातीला वास्तुशांती केली आणि त्यानंतर मला कधीच भिती नाही वाटली. वास्तुपुरूष अगदी प्रवेश द्वाराच्या मागेच फरशी खाली स्थापित केला आहे. तो सदैव बरोबर आहे असे वाटत राहते.

आहे मी उलटा टांगलेला इथेच,
तुम्ही गेलासी धागा सोडुनी,
या चिमण्यानों परत फिरा रे,
बोकलत वाट बघसी घरात.

Pages