अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सालंगपूर,गुजरात येथील हनुमानाचं मंदिर आहे , तिथला हा व्हिडीओ आहे . चॅनेल वर बरेच व्हिडीओ आहेत . अमानवीयतेची आवड काही प्रमाणात इथं पूर्ण होईल . मी स्वतः तिथं कधी गेलो नाही त्यामुळे त्यावर काही टिप्पणी करणं योग्य नाही .

https://www.youtube.com/watch?v=PXrSf7pHT8c

वरील भुत थोडं विनोदी वाटल्याने त्याची लिंक दिलीय . चांगली करमणुक झाली त्या चॅनेल वरती .

जावेद_खान >>> मी काकांकडे चौकशी केली त्यांनी सांगितले कि ते हॉटेल पाडून आता तिथे सिमरोसे का काहीतरी नावाचे रिसॉर्ट सुरु झाले आहे

थोड्या शंका आहेत
उगीच धागा विणण्यापेक्षा इकडेच अधिक छान उत्तर मिळेल म्हणून विचारतो --

वास्तु , वास्तु पुरुष आणि वास्तु शांत ह्याचा परस्पर संबध आहे तो आपण फ्लॅट संस्कृतिमध्ये जपणे आवश्यक असते का ? कारण मूळ वास्तु म्हणजे ती बिल्डिंग एकच असल्याने वास्तु एकच म्हणजे अक्ख्या बिल्डिंगसाठी असलेला वास्तु पुरुष सुद्धा एकच झाला नं ! आणि असे असेल तर एकदा का बिल्डिंगसाठी म्हणून कोणाही रहिवाश्यानी वास्तु शांत पूजा करवून घेतली की मग पुढे इतर सदनिका धारक कादचित काही काळानंतर त्या बिल्डिंगमध्ये रहायला आले तर त्याना त्याचा लाभ मिळेल का ? की त्यांच्यासाठी / प्रत्येक सदनिकेसाठी वास्तु पुरुष वेगवेगळ्या असतो म्हणून नव्याने पूजा आवश्यक असते ?

माझ्या मते वास्तूचा अर्थ जिथे आपला रहिवास असतो किंवा असणार आहे ती जागा.
त्यामुळे कदाचित एका बिल्डिंग मधील प्रत्येक फ्लॅट ची वास्तू शांती करावी लागेल.

जाणकारांनी प्रकाश टाकावा.

जावेद भाई
माझा प्रश्न एक्च्युली असा आहे पुढे की एखादी बिल्डिंग अनवधनाने किंवा माहितीच्या अज्ञानातून जुन्या काळातील स्मशानावर बांधली गेली असेल तर मूळ वास्तु म्हणजे अक्खी बिल्डिंग बाधित होईल की त्यातील काही ठराविक फ्लैट्सना फक्त अमानवीय शक्तींचा प्रश्न भेड़सावत राहील. आणि अश्या फ्लैट्सची ऑलरेडी वास्तु शांत झालेली असेल तर तेथील वास्तु पुरुषाचा नक्की रोल काय असावा ?

१. हिंदू स्मशानभूमीवर इमारत बांधली असेल आणि आत्मा मुक्त झाला असेल तर वास्तुपुरुष इमारतीत येण्याची शक्यता किती?
२. दफनभूमीवर इमारत बांधली असेल तर मल्टिपल वास्तुपुरुष येऊ शकतात का?
३. वास्तुपुरुषांऐवजी वास्तूस्त्री येण्याची शक्यता किती? तिच्यासाठी खणा नारळाने ओटी भरावी लागेल का?
कृपया जाणकारांनी खुलासा करावा.

४. ज्या जागी इमारती बांधणार आहेत, तिथे आधी गुरे बकऱ्या उंदीर इत्यादी प्राणी मेले असतील तरी ती वास्तू बाधीत होऊ शकते का? असल्यास त्या प्राण्यांच्या आत्मा शांतीस काय करावे?

प्राण्याचे आत्मे भटकत रहात नसावेत कारण कोणत्याही गोष्टीत त्यांचे मन अडकणे,हाव असणे,एखाद्याबद्दल आत्यंतिक चीड,राग किंवा प्रेम असणे यापैकी कोणत्याही प्रकारच्या भावना टोकाच्या स्वरूपात त्यांच्यात बहुदा असू शकत नसाव्यात,त्यामुळे मरत असताना जगण्याविषयी त्यांची दुर्दम्य इचछाशक्ती असण्याची शक्यता कमीच वाटते

त्यामुळे मरत असताना जगण्याविषयी त्यांची दुर्दम्य इचछाशक्ती असण्याची शक्यता कमीच वाटते>>>
प्राण्याला मारताना तो तितकाच ताडफडतो आणि जीव वाचवायचा आटोकाट प्रयत्न करतो जेवढा मानव करेल.

त्यामुळे मरत असताना जगण्याविषयी त्यांची दुर्दम्य इचछाशक्ती असण्याची शक्यता कमीच वाटते
Submitted by आदू on 23 February, 2019 - 12:53 >>>>>

नाही हो. दुकानात जेव्हा कोंबडी सिलेक्ट होते आणि मारण्यासाठी उचलली जाते तेव्हा खूप कलकल, फडफड करून स्वतःला सोडवायचा प्रयत्न करते. एकदा कुर्बानीसाठी रस्त्याने ओढत नेले जाणारे बकरी / पिल्लू पाहिले. नेणारा खूप दांडगा होता. त्यामानाने पिल्लू खूपच छोटे होते. पण ओरडत, चारही पाय रस्त्याला रेटून ते उत्तम प्रतिकार करत होते. शेवटी पायावर फटके मारून, रेटा सैल करून, पाय बांधले, त्याला उचलून दाबून धरले आणि तो माणूस पुढे गेला. तरीही ते धडपड करतच होते.

बाकी जिथे स्मशान / अनैसर्गिक मृत्यू / पाण्याचा स्त्रोत बुजवून बांधकाम होते, ते बांधकाम करण्यापूर्वी काही शुद्धी विधी करायची पद्धात आहे. अन्यथा बांधकाम पूर्ण न होणे, पूर्ण झाल्यास विकले न जाणे, विकले जाऊनही ओसाड पडून रहाणे, कौटुंबिक वापराचा प्रयत्न केल्यास मोठे नुकसान, आजारपण, अपमृत्यू, मुलांसंबंधी विवंचना असे अनुभव येतात. हा वैयक्तिक विश्वासाचा मुद्दा आहे. विषाची परीक्षा घ्या कशाला, असे. अशा जागा जनरली बाजारभावापेक्षा स्वस्त काढून मालक सुटायचा प्रयत्न करतो. मालक बदलला की प्रॉब्लेम ट्रान्सफर होतात.

ही माझी माहिती आहे. माझा विश्वास आहे. मी समजून-उमजून अशी जागा घेणार नाही. बाकी ज्यांचा विश्वास नाही, त्यांचे प्रतिसाद / प्रतिप्रश्न आल्यास मी प्रतिवाद करणार नाही. वाट बघू नका. त्याबद्दल मला माफ करा.

जगण्याविषयी इचछाशक्ती प्रत्येक सजीवांमध्ये असतेच पण मी प्राण्यांचा आत्मा भटकत रहात नसेल असे म्हटलेय कारण वर उल्लेखिलेल्या कोणत्याच भावना टोकाच्या स्वरूपात नसल्याने त्यांना मरताना अतृप्त वासना वगैरे नसाव्यात असे मला वाटते,बाकी यावर माझा कोणताच अभ्यास वगैरे
आजिबात नाही

आदु तुमचा मुद्दा बरोबर आहे असे मलाही वाटते कारण प्राण्याना मन नसते त्यामुळे त्यांच्या इच्छा आकांक्षा मानवाप्रमाणे आसक्तिकडे जाणाऱ्या प्रबळ असू शकत नाहीत आणि म्हणूनच त्या अपूर्ण राहिल्या म्हणून मरणोत्तर आत्मा अतृप्त राहील असे संभवत नाही.

आपलं जग आभासी आहे, हे खरं जग नाही, आपल्याला कोणीतरी प्रोग्रॅम केलंय. ते आपल्यावर नजर ठेवून आहेत, वेगवेगळ्या परिस्थितीत माणूस कसा वागतो तसेच सजीवांची उत्क्रांती कशी झाली याचा अभ्यास त्यांना करायचा आहे, आपण समजतो भुतं खेतं हे खरं तर त्या सिस्टीमचा बग आहे.

मन असल्या शिवायच
कुत्रा प्रेम करतो का?
गाय / बकरी लळा लावते का?
हत्ती लळा लावतो का?
माकडं माणसाळतात का?
आणि मनोगत सांगून आर्ततेने बोलावले की बोटभर लांब केस असलेला साप येतो का?
इच्छाधारी नाग इच्छा धरतो का?

प्राण्यांची भुते असतात, माझ्या पप्पांना आलेला अनुभव मी लिहिला आहे की इथे, ह्या धाग्यावर की जुन्या ते मात्र आठवत नाही

मन असल्या शिवायच
कुत्रा प्रेम करतो का?
गाय / बकरी लळा लावते का?
हत्ती लळा लावतो का?
माकडं माणसाळतात का?>>>> +१११११

मला तर माणसांपेक्षा प्राणीच बरे वाटतात किमान ते माणसांप्रमाणे विश्वासघातकी नसावेत असे वाटते

बाब्बो Proud
म्हणजे प्राण्याची भूते खरंच तो प्राणी मेल्यावर त्याच आत्म्याचे बनलेले असते का ? मग ईमानदार कुत्रा जो माणसाचा मित्र / जीवाभावाचा मैंतर समजला जातो तो भुत बनून माणसाला का घाबरवेल ?
की स्त्री/पुरुष ह्यांचे भटकते आत्मा जे भुत बनतात ते मुळात भुत असल्याने रूप बदलून प्राणी अवतार घेत असतील ?
अनुभवी जाणकार अधिक प्रकाश टाकू शकतील .

कल्याणला फोर्टीस हॉस्पिटल मध्ये कधी कधी पेशंट्स ना गाय बैलांचे आवाज येतात. कसाई पकडून नेताना बकऱ्या ओरडतायत अशी दृश्य दिसतात.
फार पुर्वी तिथे कत्तलखाना होता

आणि झाडं तोडून त्याजागी घर बांधले तर झाडांची भूते सतावतात. झाडं व्यक्त करू शकत नसली तरी त्यांना अपार वेदना होतात. आपल्या डोळ्यांना दिसत नाही म्हणजे तसं नसतंच असं नव्हे, असं याच धाग्यावर अनेकजण सांगत असतात ना.

कल्याणला फोर्टीस हॉस्पिटल मध्ये कधी कधी पेशंट्स ना गाय बैलांचे आवाज येतात. कसाई पकडून नेताना बकऱ्या ओरडतायत अशी दृश्य दिसतात.
फार पुर्वी तिथे कत्तलखाना होता>>>>>
अगदी खरं आहे गुगु...जिथे जिथे पुर्वी पांजरपोळ होते तिथे असे अनुभव आले असल्याचे ऐकिवात आहे, परेल चे बैलघोडा हॉस्पिटल सुद्धा अशाच अनुभवांसाठी प्रसिद्ध होते..

अचानक एवढ्या पोस्ट्स पाहून मला वाटलं की बोकलतनी नवीन किस्सा टाकला आणि त्यांच्या फॅन्सनी (?) लगेच धुमश्चक्री चालू केली, पण इथे नवीनच किस्से आले आहेत, ज्यामुळे धाग्याचं नाव बदलाव लागणार आहे.
मानवाच्या आत्मा आणि भुतांसाठी अमानवीय धागा तर प्राणी आणि वृक्षांचे आत्मे यायला लागल्यावर या धाग्याचं नाव बदलून काय ठेवणार?

५०-६० च्या दशकात नाशिक ला नरहर खंडेराव क्षीरसागर / दाजीकाका क्षीरसागर नावाचे मोठे प्रस्थ होऊन गेले. त्यांना ओळखणारे आता हयातीत असतील नसतील तरी त्यांच्या कुटुंबातील/परिचयातील कोणी इथं मायबोलीवर असल्यास कृपया मला खासगी संपर्कातून मेसेज करा .

>>>>>>बाब्बो Proud
म्हणजे प्राण्याची भूते खरंच तो प्राणी मेल्यावर त्याच आत्म्याचे बनलेले असते का ? मग ईमानदार कुत्रा जो माणसाचा मित्र / जीवाभावाचा मैंतर समजला जातो तो भुत बनून माणसाला का घाबरवेल ?>>>>
@ डूडायडू ....कोणी सांगितलं की भुते माणसांना घबरवयाला येतात??ती त्यांच्या रुपात फिरत असतात ..माणूस त्यांना घाबरतो त्याला ती काय करणार..माणसाने घाबरु नये ना

गोष्ट माझ्या मित्राच्या पणजोबांच्या काळातील आहे, घरातील वडिलधाऱ्यांनी सांगितलेली पणजोबा तेव्हा सरकारी नोकरीत तालुक्याच्या ठिकाणी पोस्टेड होते. तेव्हा वीजेवरचे दिवे गावांत नसत. तेलाच्या दिव्यांवर काम चाले. एक दिवस अंधार पडल्यानंतर ऑफिसचा शिपाई सांगून गेला “मामलेदार साहेबांनी बोलावलंय” पणजोबा कपड़े करून निघाले. कचेरीच्या फाटकातून आत शिरून दोन तीन पायऱ्या खालून समोर बघतात तर सर्वजण काम करत होते मात्र काहीच आवाज़ नव्हता संपूर्ण शांतता. समोर मामलेदार डेस्कपाशी बसले होते. ह्यांनी विचारलं “साहेब आपण बोलावलंत?” काहीच उत्तर नाही. त्याच क्षणी पणजोबांना जाणवलं हे काहीतरी वेगळं, अनैसर्गिक आहे. अंगावर काटा आला, तरी रामनामाचा जप सुरू केला. त्याच क्षणी समोरचा देखावा नाहीसा झाला. भीतीने त्यांना वळताही येईना तसेच नाम घेत पाठी पाठी सरकू लागले (मनात भीती की पुन्हा समोर काही दिसेल का) इतक्यात त्यांच्या पायाला काही अडखळले. अनवधानानेच त्यांनी पायाला अडखळलेली वस्तु उचलून हातात घेतली व जी धूम ठोकली ते धापा टाकत घरी पोचले.
जरा मन स्थिर झाल्यावर हातातील वस्तु बघितली तर ती तीन-चार इंच उंचीची तांब्याची मारूतीची उभी मूर्ती होती आजही त्यांयच्या देवघरात ती मूर्ती आहे.

माणसाने घाबरु नये ना
Submitted by उमानु on 25 February, 2019 - 14:57.... स्स्स्सशशश S असे नाय बोलायचा हं Wink नायतर हां धागा आणि त्या टीवी वरल्या हॉरर सिरीली कश्या ब्वॉ चालतील Light 1

डरना जरूरी है

Pages