Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48
अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण काहीही असो बोकलत, तुझ्या
पण काहीही असो बोकलत, तुझ्या चिवटपणाची दाद द्यायला हवी
बोकलत ने एका चांगल्या
बोकलत ने एका चांगल्या धाग्याची वाट लावली या गुरुघंटाल यांच्या मताशी पूर्णपणे सहमत.
बोकलत यांना जर त्यांचे तुफान विनोदी (तसे ते त्यांचे स्वतःचे मत आहे) लेखन करायचे असेल तर त्यांनी खुशाल करावे परंतु त्यासाठी दुसऱ्या कुठल्याही धाग्याचा बळी का द्यावा?
जिद्दु - तुम्ही आपले अनुभव
जिद्दु - तुम्ही आपले अनुभव लिहावे, वाचक नक्कीच वाचतील ...
धन्यवाद उडाणटप्पू +१, कुणीतरी
धन्यवाद उडाणटप्पू +१, कुणीतरी स्पष्ट बोलणार्याच्या बाजूने आहे. नाहीतर आजकाल लोक सफेद बुरख्याआड लपणेच पसंद करतात.
स्पष्ट बोला. पण भाषा
स्पष्ट बोला. पण भाषा सांभाळुन.
+१ अवधूत. I can realize
+१ अवधूत. I can realize
उत्तरप्रदेश येथील एक निवृत्त
उत्तरप्रदेश येथील एक निवृत्त जिल्हा न्यायाधीश गोविंद श्रीवास्तव(हंगामी मुक्काम वाराणसी ) यांच्या पुस्तकातील किस्सा आहे . बरेच अमानवीय किस्से आहेत त्या पुस्तकात पण इथं एक टाकतो . एवढं टायपायला वेळ नसल्याने थेट फोटोच टाकतोय .



@जिद्दु आणखी टाका
@जिद्दु >> छान.. आणखी किस्से टाका
रमेश रावल लिहा तुम्ही, छान
रमेश रावल लिहा तुम्ही, छान लिहिताय. किमान बोकलत सारखी बकवास तरी नाही करत नाही >> +111111
धन्यवाद जिद्दु, धाग्याला
धन्यवाद जिद्दु, धाग्याला पुन्हा मार्गावर आणण्यासाथी. माझ्याकडेहि किस्से आहेत, हे किस्से माझी आई, काका, आजि, भाउ, आणी माझ्या मुलाच्या बाबतीत घड्लेले आहेत. आज मी माझ्या काकाचा किस्सा सान्गते. यात क्रुपया कोणीहि शन्का घेउ नयेत. आधि सर्व doctor उपाय झाले , मग इतर मार्गाकडे वळलो.
मी नाशिकचि आहे. नाशिकला एकमुखी दत्ताचे मन्दिर आहे. हा किस्सा रामकुन्ड व एकमुखी दत्त परिसरात घडला आहे. काकाचे वय तेव्हा १५- १७ असेल. काका तेव्हा शाळा बुड्वुन मित्राबरोबर या परिसरात गेला साधारण दुपारी १२ ची वेळ असेल, त्या नन्तर घरी येउन जे झोपला , ते रात्रि खुप उशीरा उथाला, उथल्यावर अस्सलीखीत उर्दु हिन्दि मध्ये बोलु लागला. घरच्याना वाटले कि वाताचा प्रकार असेल, मग सकाळी वैद्याना दाखवले, त्याच्या औशधानी फरक पडला नाही. त्यावेळी doctor गुप्ते म्हणुन होते (नाशीकचे पहीले नगरध्यक्श, famous doctor होते) त्यान्ची treatment सुरु केली. त्यानेहि फरक पडला नाही. त्याची शाळा सुटली, त्याला दुपारी १२ आणी रत्रि १२ attack यायचा उर्दु हिन्दिचा, अत्यन्त violent व्हायचा, मग त्याला मुम्बैला KEM मध्ये नेले, कोणत्याही treatment ने त्याला फरक पडत नव्हता. शेवटी, वडलान्चे काका यान्च्या ओळखीत एक मुस्लीम फकीर आला, हे काका मालेगाव ला बदली होती म्हणुन राहत होते. ते त्याला घरी नशिकला घेउन आले.त्याला पाहताच काका (माझा) फकीराला म्हणाला , इथुन जा, हे माझे झाड आहे, याला मी सोडणार नाही. फकीराने काही उतार केला, काही गोश्टी वाहत्या पाण्यात सोड्ण्यास दिल्या, त्याननतर काकाला कहिहि त्रास झाला नाही. यात त्याची ३ वर्शे वाया गेली. काकाला इतकेच आठावते कि त्याला एक काळी कफनी घातलेला माणुस भेट्ला , आणी त्याला काही खायला दिले. पुधचे कहिहि आठवात नाही. या घटना १९६५ ची असेल. या विशयी घरात कोनिही बोलत नाही. काकाचे वय ६५ च्या पुधे आहे. नन्तर त्याचे नीट झाले.
@अश्विनी >> thanks for
@अश्विनी >> thanks for sharing..
@अश्विनी: चांगला किस्सा.
@अश्विनी: चांगला किस्सा.
यावरुन मनात एक प्रश्न उभा राहीला आहे. भुतांनापण माणसाचे धर्म लागु असतात काय? म्हणजे ख्रिश्चन व्हॅम्पायरला मारायला क्रॉस, हिंदु भुतांना पळवायला राम/दत्त/हनुमान आणि मुस्लिम भुतांना पळवायला फकीर असं अस्तं का? की सर्व जाती/धर्माच्या अमानवी शक्ती सारख्याच असतात? जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती.
@अश्विनी भारी आहे किस्सा ..
@अश्विनी भारी आहे किस्सा .. येउद्या अजून .. या सारखाच किस्सा सांगतो . माझ्या वर्गमैत्रीणीची मोठी बहीण पुण्यात आझम कॅम्पस च्या आर्किटेक्ट्च्या तिसऱ्या वर्षाला असताना हा किस्सा घडलाय ..ती अचानक आजारी पडली आणि काही निदान होत नव्हतं .. मी भेटलो तेव्हा पूर्ण सुकून गेली होती . ती आरडाओरड करत नसे पण काहीतरी मंद बडबड चालू असे आणि घुम्यासारखी बसून राहायची . आई-वडील दोघे अधिकारी होते आणि त्यांनी बरेच वैद्यकीय उपचार केले मुंबई पर्यंत जाऊन पण काही झालं नाही . शेवटी गावाकडच्या एकाने एक भगत आणला तेव्हा त्याने काहीतरी जीन वगैरेची बाधा सांगितली आणि त्याच्या आवाक्यात नसल्याने सावरगावच्या मच्छिन्द्रनाथ गडावर सेवा करायला जायला सांगितलं . मग हिची आई आणि ती जवळपास दोन महिने तिथे राहिले होते . नंतर ती हळूहळू बरी झाली . या प्रकारात तिची दोन वर्षे वाया गेली आणि अत्यंत देखणी असल्याने एका मोठ्या सनदी अधिकाऱ्याच्या चांगल्या मुलाचं स्थळ आलं होत, ते लग्न पण मोडलं . सध्या ती लग्न होऊन निगडीला राहतेय . या प्रकरणात बऱ्याच चमत्कारिक घटना घडल्यात पण त्या लोकांनी बाहेर फार कळू दिलं नाही . आमच्या मैत्रिणीकडून जे कळलं तेवढंच
@व्यत्यय असं काही नाही .. ज्याला खरंच हे जमतं तो कशावरही उपाय करू शकतो .. धर्माचा काही संबंध नसतो .. आता फकीर लोक एखाद्या पिराची सेवा करतात तेव्हा त्यांना त्या पिराच्या अंडर असलेली जीन मंडळी मदत करतात . हिंदू धर्मीय साधक त्यांच्या इष्टदेवतेच्या जोरावर उपाय करतात . पण बहुतेक लोक एखादा मंत्र सिद्ध करून त्या जोरावरच असले प्रकार हाताळताना दिसतात . पण यात त्याच्या आवाक्याबाहेरची केस असेल तर त्याला पण ती शक्ती घोडे लावू शकते . म्हणून आपला आवाका पाहूनच असल्या लफड्यात पडावं . असे बूमरँग किस्से बरेच पाहिलेत . lol
अश्विनी, छान किस्सा.
अश्विनी, छान किस्सा.
@जिद्दु... अश्विनी छानच
@जिद्दु... अश्विनी छानच किस्से आहेत...खूप दिवसांनी काही अमानवीय वाचायला मिळाले... अजुन येवू देत नवीन नवीन किस्से
काही अवलिया पुरुषांना
काही अवलिया पुरुषांना व्यक्तीच्या भोवतालचा ऑरा दिसतो असे म्हणतात.. स्त्रिया ना नाही दिसत का?
भोवतालचा ऑरा दिसतो असे
भोवतालचा ऑरा दिसतो असे म्हणतात..
व्यक्तीच्या सद्य परिथितीनुसार त्याचा रंग बदलत असतो म्हणे
सज्जन लोकांचा पांढरा ऑरा असतो असे म्हणतात
>> असे कोण म्हणते म्हणे ? दुसर्यांच्या नावाने का बिले फाडताय ? स्वतःचे बोला...
जिद्दु पुस्तकाचे नाव देता
जिद्दु पुस्तकाचे नाव देता येईल का तुम्हाला?
अतींद्रिय लोक - विश्वविद्यालय
अतींद्रिय लोक - विश्वविद्यालय प्रकाशन ,वाराणसी
मराठीत पण असेच अतींद्रिय अनुभव नावाचे पुस्तक मेहरा श्रीखंडे यांनी लिहिले आहे . त्यात त्यांनी बरीच वर्षे शोध घेऊन आलेले अनुभव दिलेत. मस्त आहे ते पुस्तक .. बुकगंगा वर मिळेल
जिद्दु - नक्की पाहतो मिळतायत
जिद्दु - नक्की पाहतो मिळतायत का ते
धन्यवाद लोकहो, व्यत्यय, मी
धन्यवाद लोकहो, व्यत्यय, मी जाणकार नाही, जसे घडले तसे सन्गितले. आता उद्याचा किस्सा आजच सान्गते.
तर हा किस्सा खुप जुना म्हणजे माझी आई ५वीत असतानाचा आहे.आई व तिचे कुटुन्म्ब औरन्गबाद जवळच्या गावातुन शिक्शणासाथी औरन्गबादला एका वाड्यात राहायला आले. त्या वाड्याचे मालक विटेकर नावाचे दोन भाउ होते. त्यान्ची कुटुम्न्बे पण होती. वाडा ३ मजली होता. खालचा मजला रिकामा, मधल्या मजल्यावर मालक आणी वरच्या मजल्यावर भाडेकरी कुटुन्म्ब. तळ मजला पुर्ण रिकामा तिथेच चौक आणी सन्डास वगैरे होते. भाडेकर्याना toilet व कपडे धुण्यासथी खाली जावे लागे. एक दिवस मालकापैकी एकाची बायको बाळान्पणात वारली काही दिवसाचे मुल थेउन.
एक दिवस आजीला toilet ला जावे लागले अपरात्रि, पण ती जशी जाशी जिना उतरुन जाउ लागली तिला मागे कुणीतरि आहे असे वाटु लागले. तशी आजी खामकी होति. तरिही पण ती पुधे जाउ लागली. पण शेवटी तिने वर पाहीले तर मेलेली मालकीन कथाड्यावर बसली दिसली. हाच भास त्या नन्तर काही भाडेकर्याना झााला. पण त्याची वाच्याता कोणेही केलि नाही. हे का ते देव जाणे. हा किस्सा अजी कडुन खुप नन्तर एकाला.
तसेच काकाच्या बाबतीत आजी म्हाणायची कि साइ बाबाची क्रुपा. त्यानी काकाला वाचवाले.
बाबा कामदेवा...येथे
बाबा कामदेवा...येथे सांगीतलेल्या अमानवी गोष्टी काही अनुभवाने तर काही ऐकिव असतात तर काही पुस्तकात,वर्तमान पत्रात वाचलेले असतात.. त्यासाठी स्वतःचे बोला असे मला सांगू नका...
अवलिया पुरूष असेच शक्यतो आपण ऐकतो स्ञी देखील अवलिया असू शकते व साहजिकच तिला हि औरा दिसेल पण लिहताना मी तसे लिहिले.. त्यावर स्ञीयांना दिसत नाही का हि आपली कमेंट उगीचच खोडी करणारी व धाग्याची वाट लावण्यासाठी केलेली आहे हे अमानवी धाग्याच्या चाहते वर्गाला कळलेली आहे..
अशाच तुमच्या खोडीमुळे एखादा तुम्हाला गुरू भेटतो व घंटा वाजवून जातो तेंव्हा तुम्ही त्याचा निषेध करता..
कदाचित हा गुरू पुण्याचा नसेल म्हणून बोकलतासारखे शालजोडे त्याला जमत नसतील.. असो...
@जिद्दू @अश्विनी खूप छान
@जिद्दू @अश्विनी खूप छान किस्से! @जिद्दू type न करता पुस्तकाचे photo टाकले तरी चालतील!
गरुडपुराण घरात ठेवू नये असे
गरुडपुराण घरात ठेवू नये असे म्हणतात. आणि कुणाच्या मृत्यू नंतर ते 10 दिवस घरात वाचतात. ते वाचून झाले कि त्याचे विसर्जन करावे, असे मी ऐकले आहे. यामागचे कारण काय असावे? कुणी जाणकार व्यक्ती असेल तर त्यांनी कृपया सांगावे.
मी गरूडपुराण ऐकलं आहे थोड फार
मी गरूडपुराण ऐकलं आहे थोड फार
रिलेटिव कडे. जे भटजी यायचे वाचायला ते परत घेऊन जायचे सोबत बहुतेक
माझं मराठी प्लिज समजून घ्या
माझं मराठी प्लिज समजून घ्या
मी घटना लिहिलीय कारण असावा कोणाला कधी असा अनुभव आलाय का?
आता गेल्या महिन्याची घटना १७ नोव्हेंबर ची आम्ही घरातील सर्व बाय रोड अक्कलकोटला जायला निघालो सकाळी मुंबई वरून निघोलो माझा नवराच गाडी चालवत होता त्यामुळे आम्ही आरामात जात होतो ऑन द वे तुळजापूरला जायचे ठरले आम्ही तुळजापुरात संध्याकाळी ६ ला पोहचलो असु दर्शन घेऊन ९ ला निघालो तिथे कोणीतरी सांगितले अक्कलकोटला जायला गावातून एक शॉर्टकट आहे त्याने सांगितले कि पुढे गेल्यावर एक मोठा चौक दिसेल तिकडून उजवीकडे वळा तो चौक अंदाजे ३० मिनिटाने येईल. आम्ही निघालो तो रास्ता निर्जन आम्हाला वाटलं की रात्र झाली आहे म्हणून कोणी नसेल. जवळ जवळ एक तास झाला पण आम्हाला कोणताच चौक दिसला नाही रास्ता पूर्ण निर्जन होता सांगायला ही कोणी नव्हतं म्हणून माझे सासरे बोलले की आता डावीकडे एक रस्ता गेला तो बहुतेक कोणत्यातरी गावात जात असेल तर आपण जाऊन विचारूया म्हणून टर्न घेतला आणि त्या रस्त्याला जाणार तेव्हड्यात एक पोलीसांची गाडी दिसली त्याला आम्ही विचारले तर तो म्हणाला तुम्ही आलात त्याच रस्त्याला होता तो चौक आणि तिथे ३० मिनिटं झाली एक अपघात ही झालाय पण खरंतर आम्हाला हातात काहीही दिसलं नव्हतं आणि आम्ही जेव्हा टर्न घेतला तेव्हा अचानक वस्ती दिसत होती प्रत्येक ठिकाणी डावी- उजवीकडे नाक्यावर माणसं दिसत होती असं कसं झालं? आम्ही कोणीही त्या विषयावर परत बोललो नाही पण ती घटना अजूनही डोळ्यासमोरून जात नाही
@DShraddha माझ्या आजी expire
@DShraddha माझ्या आजी expire झाल्या तेव्हा एक गुरुजी गरुडपुराण वाचायला यायचे आणि जाताना सोबत घेऊन जायचे गरुडपुराण.
एक गुरुजी गरुडपुराण वाचायला
एक गुरुजी गरुडपुराण वाचायला यायचे आणि जाताना सोबत घेऊन जायचे गरुडपुराण>> मी पण सेम असंच बघितलं आहे
आणि एरवी जर ऐकायचं असेल तर फक्त मंदिरात वाचून घेउ शकतो असं ही ऐकलं आहे.
@मउ >> चकवा प्रकार असावा
@मउ >> चकवा प्रकार असावा बहुतेक.
@मउ
@मउ
जवळपास सेम किस्सा माझ्या भावासोबत घडला होता.. चकव्याचा प्रकार वाटतो...
Pages