अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>नक्की काढा, मी पण माझ्या गाठीशी असलेले दोन चार अनुभव त्या धाग्यावर टाकेन Happy
Submitted by बोकलत on 16 January, 2019 - 17:16
>>>
@ बोकलत .... आता बास झालं... मस्करी एक लिमिट पर्यंत ठीक वाटते...कुणाच्या पर्सनल धाग्यावर जावून धुमाकूळ घालण्याला चेष्टा म्हणत नाहीत...तुम्ही खरे तर चांगले लिहिता जे विनोदी सदरात वाचायला आवडते ..पण दुसऱ्याला त्रास देण्याचा अतिरेक नका करू प्लीज..तुम्ही लिहा पण एक तर तुमच्या धाग्यावर नाही तर विनोदी धाग्यावर

बोकलत यांचे किस्से छान आहेत !

Submitted by आनंद. on 17 January, 2019 - 10:26 >>>
खरच छान असतात..वाचायला आवडतात.. पण विनोदी धाग्यावर शोभतात

@उमानु @ क्षितिज @अनिरुद्ध प कालच काढलाय नवीन धागा आणि त्यावर दोन पोस्ट्स पण टाकल्यात. अजून आठवडाभर टाकत राहील . पाहतो प्रतिसाद काय आहे आणि कोणी नसेल वाचत तर मी तरी का माझा वेळ वाया घालून घेऊ. तसही इथलं वातावरण बऱ्यापैकी होस्टाईल आहे

@ जिद्दु - माफ करा पण स्पष्ट बोलतो, तुम्ही केव्हापासून म्हणताय, असं असेल, तसं असेल, तर माझ्या पोस्ट डिलिट करा. प्रतिसाद आले नाहीत तर मी माझा वेळ का वाया घालवून घेऊ वगैरे.
तुम्हाला जे लिहायचं असेल ना, तर स्वतःला आनंद मिळतोय म्हणून लिहा. किंवा, आपल्या जवळच्या गोष्टी दुसऱ्यांबरोबर शेयर करण्यात आनंद मिळतो म्हणून लिहा.
येथील बरीच मंडळी तुम्हांला लिहा, लिहा म्हणून सांगतेय, पण त्या लिखानावरच्या इंटरेस्टपायी! त्यांच्यावर उपकार करतोय, असं दर्शवल्यासारखं करून लिहू नका...
तुम्हाला मी त्या धाग्यावर सपोर्ट केला. इथेही करेन, पण तुम्हाला आवडेल आणि वेळ असेल तरच लिहा! आम्ही सांगितलं, म्हणून विनाकारण वेळ घालवून लिहिलंत असं व्हायला नको!!!

@ अज्ञातवासी स्पष्ट बोलल्याबद्दल प्रथम धन्यवाद . मागच्या इथल्या काही पोस्टमधून थोडा मनःस्ताप झाला होता म्हणून मी पुन्हा पुन्हा खात्रीकरून घेतोय .. नाहीतर चांगल्या हेतूने काही टाकायला जायचो आणि परत तोच प्रकार व्हायला नको म्हणून आधीच खडा मारलेला बरा .उगाच कोना सत्पुरुषाची मागे हेटाळणी न झालेली बरी त्यापेक्षा .. वातावरण होस्टाईल कशामुळे म्हणतोय ते तुम्हालाही माहितेय .
बाकी असा धागा काढायचा खरा हेतू हा आहे कि भरपूर लोकांना अध्यात्मात रस असतो पण बऱ्याच वेळा प्रारब्धाच्या रेट्यात श्रद्धा डळमळीत होत राहते . अशा अमानवीय किस्स्यांतून एका व्यक्तीची जरी श्रद्धा थोडी दृढ झाली आणि एखाद्या सत्पुरुषाबाबत भक्ती तयार झाली तर माझा हेतू सध्या झालास असं मी समजेन . शुद्ध परमार्थ सांगणं फार जड असतं जो कोणी ऐकत पण नाही आणि त्याला मोठा अधिकार हि लागतो जो माझ्याकडे नाही . मनोरंजनातून तो साध्य झाला तर अजून काय हवं ?

पोळाची कन्सेप्ट तुम्हीच सांगितली आणि मी जोरदार अनुमोदनही दिलं.
हीच कन्सेप्ट अमलात आणून लिहा की Wink
आणि मनोरंजनातून कुणी अध्यात्माकडे वळलं तर खरंच चांगलं आहे, पण मोठमोठ्या सत्पुरुषांच्या गोष्टी ऐकून काही भारावलेले क्षण जगायला मिळाले, तर खूपच सुंदर.
Just want to feel their greatness by your writings!

हो हेच अपेक्षित आहे मला पण पब्लिक पोर्टल वर लिहिताना थोडा अंदाज घेतलेला बरा "नॉर्मल" वाचकांचा पण , नाहीतर माझी गाडी एकदा सुरु झाल्यावर मी थांबणार नाही .

धन्यवाद जिद्दुजी आणि श्रद्धाजी,

वाचला धागा, जिद्दुजी तुम्हाला एक निरोप पाठवला आहे.

अनिरुद्ध

लेखकाच्या नावावर क्लिक करून, लेखन या सदरात संबंधित लेखकाचे सर्व लिखाण दिसते, तिथे बघावे.
(तुम्ही जिद्दु यांचा विलक्षण/अमानवीय अनुभव वाला धागा शोधताय का?)

Kadhi कधि कधि समोर असलेली वस्तु दिसत नाहि after some time we find that thing exactly in front of us .. but very sure we search a lot it won’t find to anyone . What could be logic behind this ? Is there Amanaviy in this ? I am sorry was not able to type in Marathi

मी शोधतेय तो धागा.
>>
तो धागा उडवला गेलाय बहुतेक. जिददूंच्या लेखनात हि दिसत नाही.

लाईट बन्द चालु होणे, बाहेर आले की अति गार वार्‍याची झूळूक येणे, चित्रविचित्र आवाज येणे, उगाचच उदास वाटणे , मशिन अचानक हन्ग होणे, फोन च नेट्वर्क गायब होणे ई ई...

माझ्या मित्राने मला फोन करून सांगितले कि त्याला काही विचित्र अनुभव येत आहेत, मी विचारले कसले तर तो म्हणाला मी जे विचार करतो ते कोणीतरी घडवून आणत. मी म्हणालो म्हणजे स्पष्ट सांग,
तो म्हणाला परवा मी हेल्मेट बाइकवरच लावून वर कंपनी मध्ये गेलो होतो, पण उगीच मनला वाटत होत कि हेल्मेट असे पार्किंग मध्ये नको सोडायला वर आणलं पाहिजे पण कामाच्या गडबडीत गेलो नाही तर काही वेळाने हेल्मेट माझ्या डेस्क वर होत. मला वाटलं मीच आणलं आणि विसरलो बहुतेक पण नंतर हि तसेच अनुभव आले उदा. अंथुरणातून उठल्यावर वाटलं कि कांबरुणाची घडी घालून ठेवावी पण झोपेत तसेच उठलो व दात घासायला घेतले, दात घासताना पण तेच विचार कि दिवसभर तसेच पडून राहील आपणच आवरलं पाहिजे तर दात घासून झाल्यावर पाहतो तर घडी घातलेली वगैरे..
खरं तर खूप वर्ष्या पूर्वी मलाही सेम अनुभव येत होते पण नंतर ते आपोआपच बंद झाले.. मी त्याला म्हणालो कि बंद होईल तुला हि हे अनुभव,आणि नाही झाले तर चांगलाच आहे कि. खरं तर त्याची आई काही महिन्यापूर्वी देवाघरी गेली आहे त्यामुळे त्याला असे वाटत होते कि कदाचित आईच मदत करते वगैरे.. पण आता बंद आहेत अनुभव

याला आमच्यात विसरभोळेपणा म्हणतात>>> +११११

हो न, अन खूप जास्त भास होत असतील तर मानवीय- अमानवीय तर्क लावण्यापेक्षा सरळ डॉक्टर ची भेट घ्यावी☺️

नवीन Submitted by किल्ली on 29 January, 2019 - 17:34
मला हिन्जवडीमध्ये अमानवीय अनुभव येत आहेत
लाईट बन्द चालु होणे, बाहेर आले की अति गार वार्याची झूळूक येणे, चित्रविचित्र आवाज येणे, उगाचच उदास वाटणे , मशिन अचानक हन्ग होणे, फोन च नेट्वर्क गायब होणे ई ई...>>>
किल्लीताई, नविन भयगूढकथा साद घालतेय ! Happy

हिंजवडी - एक भयकथा>>>> अहं !! हिंजेवडी एक भयकथा असे लिहावे लागेल, मगच तिच्यात गुढ प्रवेशेल. कारण मूळ रहीवासी हिंजवडी म्हणतात आणी नवीन आयटीवाले हिंजेवडी म्हणतात. मग हे ऐकुन संतापलेला एका सरपंचाचा आत्मा सर्व आय टी कंपन्यांवर सूड घेऊ पहातो अशी काहीशी कथा किल्ली लिहीणारे. Proud Light 1

Pages