अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण जनरली ओम असा करतो पण तो चुकीचा आहे असे ऐकलं..>>>> its nothing concerned only with pronunciation..like a+u+m

Its all about the breath in and breath out whenever we pronounce ॐ.

With breath in is the correct way and those who worship bafomet says it in reverse manner (breath out.... that mixes ह inॐ)

<<इतरांनी काय करायचं ते त्यांचं ते बघून घेतील.>>
@व्यत्यय भाऊ हेच माझं म्हणणं आहे.. हे व्यक्ती स्वातंत्र्य अमानवी धाग्याला द्या.. बोकाळतांचे किस्से आवडत असतील तर दुसरा धागा आहेच कि.. याच झाडाला का लोंबकळत आहेत

तुमच्याकडे किस्से असतील तर इथे टाका, इतरांनी काय करायचं ते त्यांचं ते बघून घेतील.>>> इतना भी घमंड ना करो आपके किस्सो के उपर, आपके किस्सोसे ज्यादा चर्चा मेरे छुट्टीकी चल रही हैं

असे म्हणतात कि प्राण्यांना भूकंप वगैरे अगोदरच कळतो.. काही पक्षी भूकंपाच्या अगोदर स्थलांतर करतात.. मुंग्या वारुळातून बाहेर पडतात.. कुत्री रडतात..
म्हणून कुत्र्याचे रडणे अशुभ समजतात.. आमच्या गल्लीतील एक आजी आजारी होती.. आईबरोबर मीही त्यांना पाहायला गेलो होतो.. त्यांच्या घरासमोर एक कुत्रा अचानक रडू लागलं.. तर घरातील मन्डळि त्याला मारायला धावली.. मी आपलं भूतदयेने आईला विचारलं कि त्या बिचार्या कुत्र्याला का मारलं.. तर आई म्हणाली कुत्राच रडणं चांगलं नसत...
जस भूकंप कळतो म्हणतात तस कोणी मरणार असेल तर तेही कळत का प्राण्यांना

काही प्राण्यांना आणि पक्षांना, त्या व्यक्तीला, जनावराला प्रत्यक्षात पाहून कळतं.
जसे की कमजोर झालेले प्रतिकार करू न शकणारे जखमी जनावर / व्यक्ती पाहीली की गिधाडं टोचायला सुरू करतात, कोल्हे, लांडगे लचके तोडू लागतात.

जसे की कमजोर झालेले प्रतिकार करू न शकणारे जखमी जनावर / व्यक्ती पाहीली की गिधाडं टोचायला सुरू करतात, कोल्हे, लांडगे लचके तोडू लागतात.>>>>+११११११ एक नम्बर

जसे की कमजोर झालेले प्रतिकार करू न शकणारे जखमी जनावर / व्यक्ती पाहीली की गिधाडं टोचायला सुरू करतात, कोल्हे, लांडगे लचके तोडू लागतात.>>> कोतबो साठी प्रतीकात्मक उदाहरण होते का हे Light 1

मी सध्या आफ्रिकेच्या घनदाट जंगलात फिरतोय त्यामुळे लिहायला वेळ नाही मिळत. काही दिवसांपूर्वी आफ्रिकन सरकारने मला विनंती केली की आमच्या जंगलात भुतांचा वावर खूप वाढलाय, येऊन जरा बंदोबस्त करा म्हणून इकडे आलोय. त्यादिवशीची गोष्ट , मी दुपारी दिवसा ढवळ्या भूतं शोधत फिरत होतो तर अचानक सिंह माझ्यासमोर आला. मी पळून जाऊन बाजूच्या झाडावर चढणार होतो इतक्यात तोच मला बोलला अरे मित्रा पळू नको. तो माझ्याजवळ आला आणि खिशातून एक कागद काढून माझ्यासमोर ठेवला. कुतूहल म्हणून मी तो कागद हातात घेता तर माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही. मी दुसरीत असताना माझा आवडता प्राणी सिंहावर निबंध लिहिल्याचा कागद होता तो. सिंहाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. मला त्याने कडकडून मिठी मारली . तेव्हापासून इथले सगळे प्राणी माझे दोस्त झालेत. रात्रीची भूतं पकडायची आणि सकाळ झाली की थकवा घालवायला इथल्या प्राण्यांसोबत मस्त गप्पा मारत मारत चहा प्यायचा, अजून काय हवं?? असं मस्त सुरु आहे सगळं.

कसलेही प्रतीकात्मक उदाहरण नाहीये.
मी पक्षी आणि प्राण्यांबद्दल लिहीलंय. त्यांना हे जनावर / व्यक्ती आता मरणार आहे ते कळतं, पाहून.

रमेशजी , ओंकाराचे उच्चाराच्या अनेक पद्धती आहेत .. मला ज्यांनी मार्गदर्शन केलाय त्यांनी दोन प्रकार सांगितले होते . पहिल्यामध्ये अउम पैकी अउ वर जोर देऊन उच्चर करतात ज्याने करून बेंबीवर जोर पडतो आणि मणिपूर चक्र जागृतीसाठी मदत होते(अश्याने ते जागृत होत नाही आणि ते करायचं पण नाही ) नाथपंथात सिद्धी प्राप्तीसाठी सुरुवातीच्या टप्प्यात असाच ओंकार गुरु शिकवतो .
दुसऱ्या प्रकारात अउम पैकी "म " वर जोर दिला जातो ज्याने गळ्यातील विशुद्ध आणि डोक्यातील बाकीच्या चक्रांना जागृतीसाठी मदत होते पण त्यांनी यासाठी नको सांगितलं होत मला ...
ह्याच उद्देशाने तिबेटन लोकांचा "नं म्योहो रेंगे क्यो " हा मंत्र कसा म्हणायचा हेबी सांगितलं पण ते आता विसरलोय
त्यांनी नुसता ओंकार न म्हणता "हरी ओम" असा उच्चार करायला सांगितलं होत ...निखळ प्रणव जपाचे बरेच नियम आहेत कारण तो हि एक मंत्रच आहे आणि गृहस्थांना तो तसा जास्त प्रमाणात उच्चारायला निषिद्ध असून वैराग्य प्राप्तीसाठी करायला हरकत नाही .... गायत्रीचे पण तेच आहे .. गृहस्थानं फक्त तीन प्राणवाची गायत्री म्हणायची असते पण कोणीही स्वयंघोषित तज्ञ् हे सांगत नाहीत कारण त्यांनाच ते माहित नसते ..

बाकी अमानवीय धाग्यासाठीच मी खात खोललं होतं पण तिथं काही टाकायचा उशीर कि लोक सुरु होतात ज्ञान पाजळायला म्हणूनच मी तुमच्या आणि त्या नाशिककरांच्या ज्योतिष धाग्यावर इच्छा असून पण गप्प राहिलो कारण तिथंबी तोच प्रकार चालू झाला .असल्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवावाच असा हेतूबी नाही पण निदान समविचारी लोकांची चर्चा व्हायला पण यांचा विरोध असतो .... असो

एकदा आमच्या इथे रात्री सगळे कुत्रे रडत होते
अतिशय अभद्र वाटत होतं
समोरच्या इमारतीमधल्या एका फॅमिलीतले तिन जण अपघातात वारले

धन्यवाद जिद्दु जी,
अहो इतरांच्या टीके पेक्षा स्वतःचा अनुभव महत्वाचा. ज्योतिषशात्राचा अनुभव मी कित्येक वर्ष घेत आहे.. त्यामुळे इतरांच्या वायफळ बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहे.. मध्ये मला हुक्की आली होती कि या शात्राचे महत्व लोकांना कळावे म्हणून youtube वर ज्योतिष शिक्षण द्यायला चालू केलं त्याच बरोबर हेही लक्षात आलं कि विरोधका बरोबरच ज्योतिषाचे अंधभक्त पण याला कारणीभूत आहेत म्हणून ज्योतिषी कसा असावा हा धागा पण बनवला तर उलट मलाच मी ज्योतिषाचा धंदा कसा करावा याची माहिती हवी आहे वाटत तुम्हाला असे विचारण्यात आले .. असो कुणीतरी म्हंटल आहे कि माणूस म्हणजे एका विशाल समुद्राच्या जहाजावरील गोडावून मधल्या बटाट्याच्या पोत्यातील एका बटाट्यातील किडाआहे.. त्या किड्याला जसे अथांग समुद्राचे गूढ समजने अश्यक्य आहे तसेच माणसाला पण या विश्वाचे कोडे उलघडने अशक्य आहे.. स्वतःच्या बुद्धीवर काही नेत्रदीपक शोध माणसाने लावले हे मान्य.. त्याबद्दल त्याचे कौतुकच.. अगदी माणूस दुसऱ्या ग्रहावर गेला.. समुद्राच्या तळाशी गेला ..पण हे विसरला कि शेवटी त्याच्या मेंदूलाही.. शक्तीलाही कुठेतरी मर्यादा आहे.. असे कितीतरी प्रगत जाती आल्या व नामशेष झाल्या.. शेवटी कुठेतरी त्या परमात्याचे अस्तित्व मान्य करावेच लागते..आणि हे माणसाच्या आवाक्या बाहेरील आहे म्हणूनच या जगात अमानवी गोष्टी आहेत.. believe it or not

माणूस हा बुद्धी़जीवी प्राणी म्हणतात पण प्रत्यक्षात तो ९० टक्के पेक्षा आपल्या समाजाचे प्रॉडक्ट असतो. आपले विचार, आपले खाणेपिणे, आपली वेशभूषा, आपले निरीक्षण, आपले निष्कर्ष, आपले निर्णय, आपला विश्वास तसेच अविश्वास सुद्धा यांच्यावर आपण समाजात कसे वाढलो याचा एवढा प्रचंड पगडा असतो.
एवढेच काय "मानवी मेंदुला या विश्वाचा पसारा कळण्यास खूपच मर्यादा आहेत" याचा अर्थही आपण आपल्यापरीने आपल्याच ढाच्यातून काढतो आणि त्या अर्थावर आधारीत आपले निष्कर्ष सुद्धा.

बुद्धिजीवी म्हणवणारे सुद्धा हा पगडा तुलनेत कमी असणारे असतात. खरे बुद्धीजीवी जगात विरळाच असतील.

माझ्या मित्राबरोबर घडलेली विचित्र घटना
ही घटना 2010मधली आहे .माझा एक मित्र आहे .तो आणि त्याचा मित्र नेहमीप्रमाणं चाळीजवळच्या नाल्याच्या बाजूला एका कठड्यावर बसून गप्पा मारत होते.सिगारेट ओढत ओढत मस्त गप्पा रंगत होत्या.रात्रीचे अडीज वाजले होते.चाळीतली सगळी लोकं लाईट बंद करून झोपले होते.त्यामुळे आजूबाजूला अंधार होता .फक्त नाल्याजवळ असलेल्या विजेचा पोलचा जरासा प्रकाश होता.पोलच्या मागेच नाला होता आणि तिथे खूप अंधार होता.अचानक दोघांना त्या बाजूला कुणाचीतरी चाहूल लागली.असं वाटल पोलच्या मागे नाल्याच्या आतल्या बाजूस कुणीतरी उभं राहून आपल्याकडे एकटक निरखून पाहत आहे.ते जे कुणी होतं ते अंधार आणि प्रकाशाच्या सीमारेषेवर उभं होतं.म्हंजे पोलच्या प्रकाशापासून सूक्ष्म अंतर राखून अंधारात उभं होतं.त्या अंधारात ती पुरुषी आकृती स्पष्ट जाणवत होती, दिसत होती.मित्राने शिवी हासडत कोण आहे रे .....पण तो जराही तिथून हलला नाही.फक्त त्या सीमारेषेवर उभा राहून एकटक दोघांकडे पाहू लागला.आणि अचानक एक विचित्र प्रकार घडला.तो गाणं गाऊ लागला.मी विचित्र प्रकार यासाठी म्हणतोय कारण तो जो गाणं गात होता ते साधंसुध गाणं नव्हतं तर तो ऑपेरा पश्चिमी देशातले रागदारी शास्त्रीय गाणं गात होता ते अगदी सुरात आणि लयबद्ध.....त्याचा आवाज वाढतच होता असं वाटतं होतं की तो कानाजवळ येऊन 100डेसिब्ल आवाजात गातोय.दोघे प्रचंड घाबरले .पळायचे म्हटलं तर पाय दलदलीत रुतल्यासारखे झाले होते.दोघंही हिंम्मत करून मोठ्याने किंचाळत तिथून पळत सुटले.....दुसऱ्यादिवशी पासून त्यांनी रात्रीचे उशिरापर्यंत तिथे बसणं बंद केलं.

आत्मे रोज मलाही रेकीबिकी काहीही न करता दिसतात, फक्त त्यांनी शरीराचे कपडे चढवलेले असतात. Light 1

मी जिथे राहते तेथील एका बंगल्यातील माणसाचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या घरातील पाळलेला कुत्रा त्या दिवसापासून बऱ्याचदा रात्री भेसूर रडतो हल्ली ....नेमका रात्री 1-2 वाजता. मला रात्री उशिरा झोपायची सवय आहे पण या प्रकाराने भीती वाटून आता उशिरा पर्यंत जागणे मी बंद केले.

<<रेकी करणाऱ्या व्यक्तीला स्पिरीट (आत्मे) दिसतात असे म्हणतात..>>

मी रेकी शिकलो नाही मात्र .. काही अवलिया पुरुषांना व्यक्तीच्या भोवतालचा ऑरा दिसतो असे म्हणतात.. त्याच्या रंगावरून ते व्यक्तीला ओळखतात
व्यक्तीच्या सद्य परिथितीनुसार त्याचा रंग बदलत असतो म्हणे.. म्हणजे रागावली कि लाल..नाराज किंवा नाकारात्मकत विचाराने ग्रस्त असेल तर काळा
सज्जन लोकांचा पांढरा ऑरा असतो असे म्हणतात

Pages