अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या धाग्यावरील किस्से यामुळे काय होऊ शकत याचा अंदाज आल्यानेच वर मी दोन उदाहरणे देऊन या नादाला लागून भरकटू नका असे म्हणालो आहे...अघोरी हा प्रकार किळस आणणाराच असतो म्हणून तो येथून उडवावा हे ठिक.. (पण त्याच्या नावाखाली बोकलत कथांच या धाग्यावर समर्थन चूक).. मी अॅडमीनला मागे माझेच दोन धागे डिलीट करायला सांगीतले होते..तेच अजून नाही झालेत तरी तुम्ही विनंती करून पहा माझी हरकत नाही.... पण मी न भरकटण्या विषयी लिहले आहे व परिणामाची कल्पना दिली आहे ते ही व्हायला पाहिजे नाही का...
दूसरे म्हणजे पंचका विषयी माहिती विचारली म्हणून सांगितली..तीही एखाद्या पंचांगात तुम्हाला मिळेल. चालू दाते पंचांग पान 111 पहा...
आता ती मानायची कि नाही हे ज्याचे त्याने ठरवावे.. उगीच विषाची परिक्षा नको इतकच..
अॅल्बस डंबल्डोर आठवले.. जिज्ञासा बूरी चीज नही है हॅरी लेकिन साथ मे सतर्कता जरूरी है||

जिद्दु आणी रमेश रावल, तुमच्या त्या ठरावीक पोस्ट डिलीट करवुन घ्या>>>>>डिलीट करायचा पर्याय कुठे दिसत नाही .... नाहीतर ऍडमिन ला सांगून कुणी माझ्या सर्व पोस्ट्स उडवल्या तरी माझी काहीही हरकत नाही .

अवकाश संशोधन, आयुर्वेद, गणित वगैरे, त्याचाही कुणीतरी मागोवा घ्यावा.जिद्दु आणि रमेश रावलजींनी याचा अभ्यास करावा>>>>ह्या विषयांवर माझा अभ्यास नाही असा का वाटलं आपणास ? कि फक्त अमानवीय धाग्यावरूनच ठरवलं सगळं?
असो इथून पुढं मी इथं काहीही पोस्ट टाकणार नाही ... म्हणजे मला राग वगैरे नाय आला पण मी खोटे किस्से नाही टाकू शकत किंवा मी काही टाकणार आणि परत ते डिलीट मारायला ऍडमिनची वाट पाहायची त्यापेक्षा बाकी लोक जे किस्से टाकतील त्याचाच आनंद घेतलेला काय वाईट आहे ?
बोकलत जिंदाबाद !!!!!

बोकलतांनी इंद्रजाल कसे भेदले त्याचा किस्सा येवू दया आता >>> लवकरच, अलीकडेच एका लग्नात गेलो होतो तिथे वेगळाच प्रकार घडला, त्यावरचा किस्सा सध्या लिहितोय.

जिद्दू जी जे त्राटक करतात त्यांना ही अनुभव येतात का????? कारण मी nostradamus च्या पुस्तकात वाचलंय की तो अधी त्राटक करायचा आणि मग त्याला एक गूढ आवाज भविष्यातील घटना सांगायचा....

हो पंचकावर गेलेत, पण कुणी जाईलच असं नाही. आणि ज्याची वेळ आली, तर त्याला कुणीही थांबवू शकत नाही. नाहक चिंताही करू नका, आणि पैसेही घालवू नका.">>>>अगदी खरे.माझे एक जवळचा नातलग त्रिपाद नक्षत्रावर वारले.त्यांच्या पत्नीने शांत वगैरे केली.पण त्यापुढील २ वर्षांत त्याचे (मृताचे) वडील व काका वारले.अर्थातच त्यात नवल नाही.८३-८४ वय होऊन गेले.

@Dsharddha व जिद्द....मागे इतके सांगूनही बोकलत व त्यांचे समर्थक लिहीत असतील तर तुम्ही कि शांत राहताय.. फक्त अघोरी प्रकार नको इतकचं.. आपणाला शहापणाच्या चार गोष्टी सांगून बोकलतांना लिहा म्हणणार्यांचा कावेबाज पणा ओळखा...
बाकि कोणी प्रा. अव्दयानंद गळतगे यांचे चमत्कारांचे विज्ञान हे पुस्तक वाचलय का.. त्याविषयी बोलू शकतो मी वाचतोय सध्या...

आपणाला शहापणाच्या चार गोष्टी सांगून बोकलतांना लिहा म्हणणार्यांचा कावेबाज पणा ओळखा..>>>> Rofl

इथे कुणाला इतका फरक पडतो का कावेबाज पणा करायला Uhoh

>>>मायबोलीवरील आपलं अकाऊंट डिलीट कसे करता येईल? अकाउंट डिलीट करून आपल्या सर्व पोस्ट्स डिलीट करता येतील का ?>>>
@जिद्दू...तुम्ही का धागा सोडायचा विचार करताय...चांगली माहिती देत आहात तुम्ही..लिहीत रहा

सर्व भूतांना आणि त्यांच्या त्यांच्या झाडांना मकर सक्रांतिच्या खूप साऱ्या शुभेच्छा !
त्यांच्या आयुष्यातील भूतयोनीचे संक्रमण संपून लवकर मानव जन्म मिळो ही सदिच्छा !

बापरे असंही होऊ शकतं ही शक्यता लक्षातच आली नव्हती. अशा बातम्या आपण पेपरात नेहेमी वाचतोच नरबळी वगैरेे. मुळातच हे किती किळसवाणं आहे.

मायबोलीवरील आपलं अकाऊंट डिलीट कसे करता येईल? अकाउंट डिलीट करून आपल्या सर्व पोस्ट्स डिलीट करता येतील का ? >>>>> अकाउंट डिलीट करण्यासाठी पण ऍडमिनना लिहावे लागेल. आणि लॉग इन केलं नाही की 60 की 90 दिवसांनी अकाउंट डीऍक्टिव्हेट होते (म्हणे)

इतके दिवस न थांबता तत्काल सेवा हवी असेल तर राजकारण ग्रुप जॉइन करुन कुठल्याही बाफवर अर्वाच्य गोंधळ घातला तर १ दिवसात अकाउंट बंद होईल. Light 1

मी ऍडमिन ला सर्व पोस्ट्स उडवण्याची आणि खातं रद्द करायची विनंती केली होती पण त्यांनी फक्त काही पोस्ट्स उडवल्यात बहुतेक. खातं रद्द करायची मला फार घाई नाही तशी पण मला वाटलं खातं रद्द करून पोस्ट्स डिलीट होत असाव्यात .
असो... मी आता आपला प्रेक्षकच बरा आहे आणि बाकीच्यांनी काहीतरी खरे-खोटे किस्से (हा ट्रिकी पार्ट आहे इथला ) टाका जमलं तर ... थोडी करमणूक तरी होत जाईल

@रश्मी नाही , मला वाटलं खातं उडवून पोस्ट्स डिलीट होत असतील .. बरं झालं ऍडमिन ने त्या पोस्ट्स लवकर उडवल्या नाहीतर उद्या कुठं काही झालं तरी लोक अमानवीय धाग्याकडं बोट दाखवायची .. असाही मी स्वतःचा धागा काढायचं विचार करतोय ज्यात फक्त माझ्याकडचेच किस्से असतील (इथं झेपतील असेच )... वेगवेगळ्या संतांच्या-अवलियांच्या चरित्रात भरपूर किस्से आहेत , ते वाचायला आवडेल बऱ्याच लोकांना ... माझ्याकडे भरपूर आहेत तसे .. शिवाय कोणाला काही हरकत पण नसेल

नक्की काढा धागा. आवडेल आम्हाला तुमच्या जवळचे किस्से वाचायला.>>> नक्की काढा, मी पण माझ्या गाठीशी असलेले दोन चार अनुभव त्या धाग्यावर टाकेन Happy

>> वेगवेगळ्या संतांच्या-अवलियांच्या चरित्रात भरपूर किस्से आहेत
अमानवीय किस्से संतांचे

Pages